२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.
अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.
काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.
त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.
हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.
अधिक अपडेट इथे करत राहू.
प्रतिक्रिया
20 Aug 2025 - 1:36 pm | कंजूस
जे दोघे वैमानिक तेच विमान आणखी दोन ठिकाणांहून घेऊन इथे आले त्यांचे मधल्या दोन तासांत डोके फिरले म्हणणे अशक्य आहे.
20 Aug 2025 - 2:29 pm | गवि
+१
आणि एखाद्याच्या मनात काही वादळ चाललेले असते आणि ते खूप जास्त वाढले तर आजूबाजूच्या कोणाच्या तरी लक्षात येत असते जनरली.
20 Aug 2025 - 4:17 pm | भागो
The Boeing advisory, issued by the FAA, recommended airlines inspect fuel control switches on several Boeing aircraft models to ensure the locking mechanism was properly engaged, preventing accidental movement that could lead to unintended engine shutdowns. This advisory was prompted by concerns that some switches were installed without the locking feature engaged, particularly affecting the 737
8 Oct 2025 - 5:09 pm | गामा पैलवान
परत एकदा बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरच्या उड्डाणयंत्रणेतल्या दोषामुळे आपत्कालीन भिरभिरे आकस्मिक व अनावश्यक रीत्या सक्रीय झाले. एआय-११७ हे अमृतसर ते बर्मिंग(हॅ)म फेरीचे विमान भूगमन करतेवेळी आपत्कालीन भिरभिरे आपत्काल नसतांना आकस्मिक रीत्या कार्यान्वित झाले.
संबंधित बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh/air-india-amritsar-birmingham-fligh...
माझ्या मते वर्मव्य ( = firmware ) मध्ये कोणीतरी मुद्दाम त्रुटी ( = bug ) ठेवली आहे. त्या त्रुटीच्या सहाय्याने भिरभिरे सक्रीय करून भारताला एक चेतावणी देण्यात आली आहे.
-गामा पैलवान