भय इथले संपत नाही (मूळ कवी - ग्रेस)
*****************************************
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही
ते झरे चंद्र सजणांचे
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही
तो बोल मंद, हळवासा
तो बोल मंद, हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही
स्तोत्रात इंद्रिये अवघी
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे?
हे सरता संपत नाही
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही
********************************************
काम इथले संपत नाही (विडंबन)
********************************************
काम इथले संपत नाही, काम इथले संपत नाही
मज घरची आठवण येते
मी रात्रंदिनी झटतो
मी रात्रंदिनी झटतो, (तरी) तू मला लाखोली वाहते
काम इथले संपत नाही, काम इथले संपत नाही
ते मेल मज तक्रारींचे
ते मेल मज तक्रारींचे, ते चढवी माझा पारा
बॉसशी भांडलो तापून
बॉसशी भांडलो तापून, नोकरीत नको रहावया
काम इथले संपत नाही, मज घरची आठवण येते
काम इथले संपत नाही
तो बॅास मंद पळपुटा,
तो बॅास मंद पळपुटा, सुट्टीस निघूनी गेला
क्लायंटच्या कटकटींनी
क्लायंटच्या कटकटींनी मनी अती उबग आला
काम इथले संपत नाही, काम इथले संपत नाही
मज घरची आठवण येते
गात्रात वेदना केवढी
गात्रात वेदना केवढी गुणगुणती दुःख कुणाचे?
हे सरता संपत नाही
हे सरता संपत नाही लोढणे माझ्या कामाचे
काम इथले संपत नाही, काम इथले संपत नाही
मज घरची आठवण येते
मी रात्रंदिनी झटतो
मी रात्रंदिनी झटतो, (तरी) तू मला लाखोली वाहते
काम इथले संपत नाही, काम इथले संपत नाही
प्रतिक्रिया
27 Oct 2024 - 7:06 pm | चौथा कोनाडा
छान विडंबन रचना... छान कसे म्हणावे? काही लोकांच्या बाबतीत स्वप्नच.. काम संपतं नाही.. काम थांबवलं तर प्रगती अशक्य... काही लोकांना १८ + तास काम करावे लागते. वर्क लाईफ बॅलन्स वै गोष्टी फोल ठरतात
28 Oct 2024 - 10:09 am | श्वेता२४
पण विडंबन म्हणून हसू येत नाही. कारण बरीच वस्तुस्थिती आहे.
28 Oct 2024 - 12:54 pm | कर्नलतपस्वी
त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे.
हा केवळ शब्दच्छल.
काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी दुपारी खातो
तू दिलेली थंडगार शिते....
28 Oct 2024 - 1:09 pm | कर्नलतपस्वी
त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे.
हा केवळ शब्दच्छल.
काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी दुपारी खातो
तू मज दिली थंडगार शिSsssते....
28 Oct 2024 - 1:27 pm | कॉमी
तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता (कवी तर आहातच.), ग्रेसच्या कवितांवर काही प्रतिक्रिया वाचल्या. मला ग्रेसच्या कविता अजिबात समजत नाहीत पण त्यातल्या शब्दांचा एक इन्टेन्स गूढ-दुःखी असा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्याकडून लिहिलेले ग्रेसच्या कवितांचे रसग्रहण, किंवा "बिगीनर्स गाईड टू ग्रेस" असे वाचायला आवडेल.
28 Oct 2024 - 9:43 pm | कर्नलतपस्वी
मी अजून विद्यार्थीच आहे.
तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता.
होय,पण ग्रेस समजणे आवाक्याबाहेर चे. अनुभवायचा प्रयत्न करतोय.
मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झऱ्यावर रात्री
मज ऐकू येतो पावा
श्वासांचे तोडून बंधन
हे हृदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे
मग वैभव निघून जाई
या कडव्यात कवि मनाचा अंदाज येतो पण यानंतरची कडवी वाचताना मात्र आकलना पलीकडची वाटतात.
सळसळते पिंपळपान
वार्यात भुताची गाणी
भिंतीवर नक्षत्रांचे
आभाळ खचविले कोणी ?
मन बहर गुणांचे लोभी
समईवर पदर कशाला ?
हे गीत तडकले जेथे
तो एकच दगड उशाला
चल जाऊ दूर कुठेही
हातात जरा दे हात
भर रस्त्यामध्ये माझा
होणार कधीतरी घात
त्यामुळे महाकवीच्या कवितांचे रसग्रहण करणे दुसाहस ठरेल व माझे हसू होईल.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
28 Oct 2024 - 9:45 pm | कर्नलतपस्वी
आपला आय डी चुकीचा टंकाळला. क्षमस्व.
28 Oct 2024 - 1:55 pm | अत्रुप्त आत्मा
जिलब्या इथल्या संपत नाही .
मज पांडू आठवण येते . =)))))
मग अगोबा काठी घेतो . . मग अगोबा काठी घेतो . . =))
जिल्बुचा ही मागूनी येते ! :D
-----------------------
पूर्वीचं मी पा अस्त तर अशी किती विडंबन पडली असती ! किती मजा आली असती ! गेले ते दिवस ! :(
दुत्त दुत्त ! ! !
इथला जुना :- आत्मू टवाळ !