तो

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
3 Jun 2024 - 4:17 pm

दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे झालेला हिरवागार आसमंत!

देवगड बीच व पवनचक्की परिसरामध्ये असलेली भव्य शिव मूर्ती! तिथून किनार्‍यालगत कुणकेश्वरकडे जाणारा रस्ता! अवाक् करणारा अनुभव! नंतर पावसामध्ये चढणार्‍या व उतरणार्‍या रस्त्याची मजा! रस्त्याजवळ छोट्या वाड्या आणि गावात जाणारे लाल मातीच्या वाटा! अधिक काही बोलत नाही. फोटोजचा आनंद नक्की घ्या. आणि हो, हे फोटो विचलित करू शकतात. कृपया तुमच्या जोखमीवर पाहा! :)

आणि आज जागतिक सायकल दिवससुद्धा आहे! तेव्हा happy cycling and happy fitness! फायनान्ससाठी जे खरं आहे ते फिटनेसच्याही बाबतीत खरं आहे- थोडा ताण चांगला असतो- a little bit of discomfort is very comfortable in the long run! धन्यवाद.

(निरंजन वेलणकर 09422108376)

आरोग्यप्रवासअनुभवआरोग्य