शूर्पणखा

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
26 Oct 2023 - 11:11 am

परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.
मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे. थोडेफार शब्द आणि संपुर्ण चाल आठवत होती.
जीव गुगलुन टाकला अन् १९२० ते १९५० या कालावधीतील गाजलेल्या मराठी कवितांचं संग्रह असलेलं एक पुस्तक सापडलं. मुंबई मराठी साहीत्य संघानं सन् १९५० मध्ये प्रकाशीत केलेलं "माझी कविता" या संग्रहात भा रा तांबे, माधव ज्युलियन, केशवकुमार, अज्ञातवासी, गिरिश आदी कविंच्या तत्कालिक गाजलेली काव्ये आहेत. .
पहा, तुमच्याही आठवणीतीली एखादी जुनी कविता या संग्रहात सापडतेय का ! सोबत कवि गिरिश यांची *"शूर्पणखा"* कविता आठवणीतल्या चालीत गायचा प्रयत्न केलाय त्यासही प्रतिसाद द्या!

https://youtu.be/IGX_c9oIXOk?si=oTuFYIMSHIBOImd1

कवितामुक्तकभाषाआस्वाद

प्रतिक्रिया

Bhakti's picture

27 Oct 2023 - 4:40 pm | Bhakti

छान आहे!

मुक्त विहारि's picture

27 Oct 2023 - 5:21 pm | मुक्त विहारि

हे वाक्य आवडले..

व्हिडिओ पण मस्त आहे.

छान गायले आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2023 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीव गुगलून टाकणे आवडले. बाकी गीत बरं गायलं आहे.
आनंद महत्वाचा. ताल, सुर एवढं तेवढं चालायचंच.

शुभेच्छा..! लिहिते राहा. येत राहा.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2023 - 5:40 pm | चौथा कोनाडा

मस्त .. झकास गायलंय !
ही कविता प्रथमच ऐकण्या बघण्यात आली !
कविता आणी कविता गायन दोन्ही आवडलं !

पुढच्या मिपा कट्ट्यासाठी एक चांगला कलाकार सापडला !