पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी.
बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला.
रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते.
अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले.
दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता. उजव्या मांडीपासून खालचा, स्टीलचा रॉड सकाळच्या उन्हात चमकत असतानाचा क्षण छायाचित्रकाराने सुरेख टिपला होता.
प्रतिक्रिया
7 Jan 2022 - 12:23 am | सौन्दर्य
छान कथा, शेवट अपेक्षेप्रमाणेच होता.
7 Jan 2022 - 2:10 pm | सौंदाळा
मस्त, आवडली