कळेना मला

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
16 Aug 2021 - 11:57 am

मनात मोर कसे नाचतात
हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर...
...मला कळालं!

जीभ कशी अडखळते
हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना...
...मला कळालं!

हृदय कसे धडधडते
हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना...
...मला कळालं!

पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही
तुझा निरोप घेताना, दरवेळी
डोळ्यातलं पाणी कस अडवावं
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!

- संदीप चांदणे

माझी कविताकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2021 - 12:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

तरल... छान लिहिली आहे...
आवडली
पैजारबुवा,

जव्हेरगंज's picture

16 Aug 2021 - 2:23 pm | जव्हेरगंज

Beautiful

तुषार काळभोर's picture

16 Aug 2021 - 5:43 pm | तुषार काळभोर

थेट 'तुझे मेरी कसम' च्या जीनिलियाची आठवण करून देणारी!

प्रचेतस's picture

17 Aug 2021 - 9:06 am | प्रचेतस

एकच नंबर संदीपशेठ.

प्राची अश्विनी's picture

21 Aug 2021 - 1:30 pm | प्राची अश्विनी

वाह!

पाषाणभेद's picture

22 Aug 2021 - 7:19 pm | पाषाणभेद

एकदम झकास!

राघव's picture

24 Aug 2021 - 9:40 am | राघव

आवडले! :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2021 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. लिहिते राहा शेठ.

-दिलीप बिरुटे