तर...

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
11 May 2021 - 10:04 pm

मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 May 2021 - 12:31 pm | विजुभाऊ

जी ए ( १२० एम एल ) + ग्रेस ( ४५ एम एल ) + धारप (९० एम एल) = कॉकटेल झालय दादा

अनुस्वार's picture

12 May 2021 - 1:22 pm | अनुस्वार

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

12 May 2021 - 8:26 pm | तुषार काळभोर

अन् ३० वपु add करा.

गोंधळी's picture

12 May 2021 - 5:07 pm | गोंधळी

आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. असच वाटत.

अनुस्वार's picture

12 May 2021 - 7:35 pm | अनुस्वार

आभार

नाहीतर आपण सारे चौथ्या मितीत जाउ ! विश्वाला तिरका छेद जाईल ! प्रकाश व अन्धार संगनमत करून अवकाशाला गिळून टाकतील !! )))))))))))

अनुस्वार's picture

12 May 2021 - 7:33 pm | अनुस्वार

अर्थात सगळं शून्य आणि अनंत होईल, असंच ना?

Bhakti's picture

12 May 2021 - 9:25 pm | Bhakti

ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...
आपला असा दुसरा सूर्य जपून ठेवूया
की मग सूर्याचा उसना अंश चंद्राच मागू या
:)
आपलं सहजच :)

अनुस्वार's picture

12 May 2021 - 9:49 pm | अनुस्वार

चंद्रही सूर्याच्याच प्रकाशाची उसनवारी करतो.
अशा वेळी बुद्धांचा मार्ग आहे: "अप्प दीपो भवः"
(बी युअर ओन लाईट)