मिपाबाजार

Primary tabs

बापूसाहेब's picture
बापूसाहेब in जनातलं, मनातलं
19 Apr 2021 - 11:01 pm

http://misalpav.com/node/48684 इथे प्रतिसाद म्हणून लिहिणार होतो. पण मूळ लेखापेक्षा प्रतिसाद मोठा व्हायला लागला त्यामुळे नवीन जिलेबी पडायची ठरवली.

कोरोनाकाळात आमच्यासारख्या विंडो शॉपिंग करणार्या लोकांचे हक्काचे ठिकाण म्हनजे मिपाबाजार.. या बाजारात हर तऱ्हेची दुकाने आहेत. पण आजकाल काही दुकादारांकडून गोंधळ घातला जात असल्याने मिपाबाजार नेहमीचं गजबजलेला असतो.

बाजारात १८८ नंबर ला जे दुकान आहे ते दुकान एकदम मस्त आहे. प्रत्येक प्रकारचा माल तिथे मिळतो.. एक प्रकारचं D MART च म्हणा ना. अगदी कोणत्याही वस्तूचे नाव घ्या तिथे ती मिळणारच. पण दुकानाच्या मालकांना कमळाच्या वासाची अलार्जी आहे. त्यामुळे कधी तिकडे गेलात तर कमळ फुल जवळ ठेवणे, कमळाचा सेंट मारणे कटाक्षाने टाळा नाहीतर मालक अक्षरशः अंगावर येतात.

तिथेच बाजूला बाहुबली नावाचं आणखी एक दुकान आहे. तिथे १८८ मध्ये असणाऱ्या वस्तूंची जाहिरात केली जाते. १८८ नंबर दुकानात एखादा माल आला रे आला की बाहुबली नावाच्या दुकानामधून जाहिरात केली जाते.

चार पाच दुकाने सोडून मूव्ही अश्या आधुनिक नावाचे आणखी एक दुकान आहे.
गोल गोल राणी या गाण्याची सीडी फक्त तिथेच मिळते.
तिथेही अनेक वस्तू मिळतात पण शेती आणि त्याच्याशी संबंधित वस्तू तिकडे जास्त चांगल्या मिळतात. माझे जवळचे नातेवाईक " बाप्पू " यांनी तिथून बऱ्याच वेळेला खरेदी केली आहे.
यांची आणी दुकान नंबर १८८ यांची नेहमीच चढाओढ चालू असते की चांगलें दुकान कोणाचे. त्यांच्या भांडणामुळे बाजारात नेहमीच गोंगाट आणि गोंधळ असतो. बरेचसे पब्लिक स्पेशली हा गोंधळ बघायला बाजारात येतात.
या सर्व भांडणात मूव्ही दुकानाचे मालक पण काही कमी नाहीत. एक शब्द पडुन देत नाहीत. कित्येक प्रोडक्ट च्या जाहिराती आणि पांपलेट्स ते बाजारात आणून आणून वाटत असतात. त्यानी पांपलेट पब्लिश केले रे केले की १८८ वाले त्याच प्रोडक्ट मधले defects सांगणारे दुसरे पांपलेट आणतात आणि बाजारात pablish करतात..
असा हा खेळ अनंत काळापर्यंत चालूच असतो.

अजून थोडे पुढे गेल्यावर सुहाना मल्टीपरपस शॉपी आहे. दुकानात बरेचसे प्रकारच्या वस्तू मिळतात . बहुदा "अमेरिकेतून" आणत असाव्यात. वस्तू एकदम चांगल्या दर्ज्याच्या आणि सर्व कागदपत्रासोबत असतात. क्वालिटी चांगली असल्याने त्या दुकानाच्या owner थोड्या rude पणे बोलतात. पण त्यांचे बोलणे सडेतोड असते. टीका परखड आणि रोखठोक असतात. त्यामुळे १८८ वाले आणि इतर दुकानदार पण थोडे टरकून असतात.
सहसा त्या मालकीणबाई कोणाच्या वाट्याला जात नाहीत पण कोणी दुकानदार आडवा आला तर त्याला डायरेक्ट भुईसपाटच करुन टाकतात.

अजून पुढे गेल्यावर कुमार हेल्थ सर्व्हिसेस नावाचे आरोग्य विषयक समान विकण्याचे दुकान आहे. तिथले मालक खूपच हुशार आणि सचोटीने व्यवसाय करणारे आहेत. शक्यतो ते इतर कोणत्याही दुकानांमध्ये आणि बाजारात चाललेल्या गोंधळात भाग घेत नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे, असा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांची गट्टी सर्वांशी जमते.

अश्याच प्रकारचे अजून एक दुकान आहे. "खरे" हेल्थ सर्व्हिसेस नावाचे. तिथे सुद्धा चांगल्या क्वालिटी च्या आरोग्यविषयक वस्तू मिळतात. पण त्याचसोबत तिथे इतर प्रकारच्या वस्तू देखिल मिळतात. कदाचित याच मुळे त्यांची इतर दुकान मलकासोबत भांडणे आणि वादविवाद होतात पण नावाप्रमाणेच त्यांचे युक्तिवाद देखिल "खरे" च असतात.

"गणेश" एंटरप्रायजेस नावाचे एक दुकान आहे. त्यांचं आणि १८८ नंबरच समान बऱ्याच वेळेला सारखेच असते पण ते वस्तूचे पॅकिंग, क्वालिटी, कागदपत्रे इ गोष्टी खूप चांगल्या प्रकारे देतात त्यामुळे कधीकधी मी यांच्याकडून वस्तू खरेदी करतो..

सेम असेच दुकान कोपऱ्यावर प्राध्यापक साहेबांचे आहे. त्यांच्या दुकानाचे नाव वेगळे असले तरी सर्व बाजारात त्याला प्राध्यापक साहेबांचे दुकान म्हणूनच ओळखले जाते. तिथेही सर्व प्रकरचा माल मिळतो. कित्येक वेळेला चांगला असतो पण "डावखुऱ्या" लोकांना तिथल्या वस्तू विशेष आवडतात.

बाजारात पूर्वी एक दोन अध्यात्मिक बाबांची पण दुकाने होती. पण काही कारणास्तव बाजार समितीने ती दुकाने कायमची बंद केली.

३ नंबर गल्लीत "चंद्र"कांत आणि "सन"स् यांचे world फेमस दुकान आहे. यांचे पूर्वज आणि अमेरिकेचे बिल "क्लिंटन" यांचे पूर्वज कदाचित एकच शाळेत शिकले होते. या दुकानाचे मालक आकडेवारी , तारखा, statistics या गोष्टीत खूपच फेमस आहेत. फालतू बडबड करणारी गिऱ्हाईक आणि इतर दुकानदार यांच्या तोंडावर फाडफाड आकडे फेकून त्यांना "आकडी " आणण्यात स्पेशालिस्ट आहेत.

"जोकर" नावाची एक सर्कस देखिल मिपाबाजारात खूप फेमस होती.
तिथला विदूषक कायमच "तर्राट" असायचा. पण नंतर नंतर बाजारातील लोकांनी त्याच्याबाबत तक्रार केल्यामुळे त्याने सर्कस बंद केली. दुसऱ्या शहरातील कोणत्यातरी बाजारात त्याची सर्कस अजूनही चालू आहे असं जाणकार सांगतात.

जागू नावाचे एक फेमस नॉन वेज हॉटेल आहे मिपाबाजारात. मासे आणि सीफूड बाबत त्यांची स्पेशालिटी आहे.. पण सध्या तिथं नवीन डिशेस येताना दिसत नाहीत.

काही हात विक्री वाले बाजारात कॅलेंडर, डायऱ्या इ विकत असतात. मागच्या वर्षी याच तारखेला काय झाले होते याबाबत लोकांना माहिती देत असतात.

देशमुखकाका नावाचे सद्गृहस्थ गल्लीच्या शेवटी छोटेखानी दुकान चालवतात. काका खूप वयस्कर असल्याने आणि खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असल्याने त्यांच्याजवळ आठवणीचा पेटारा आहे. गिराईक आले रे आले की काका त्यांना सुंदर आठवणी सांगून अर्धा तास तरी दुकानातून बाहेर जाऊ देत नाहीत.

याचसोबत काही छोटेमोठे इतर दुकानदार आपला आपला माल विकला जावा म्हणून नेटाने प्रयत्न करत असतात पण वर सांगितलेल्या प्रसिद्ध दुकानदारांची रोजची शाब्दिक चकमक आणि गोंधळात या इतर दुकानदारांची व्यवस्थित जाहिरात होत नाही आणि मग त्यांच्याकडे कमी गिऱ्हाईके येतात.

असा हा मिपाबजार नेहमीचं गजबजलेला असतो. गिऱ्हाईक येतात जातात. दुकाने उघडतात बंद होतात.. पण बाजार नेहमीच सुरू असतो. आणि तो नेहमीचं सुरु राहील.

कथामुक्तकविडंबनसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

लई भारी बाप्पूसाहेब, एकदम झकास बर्रका.

ह्या मॉलच्या बाहेरील रस्त्यावर पथारी टाकून किरकोळ विक्री करणारे काही विक्रेते देखील असतात. :)

आणि "म्या पयला' ...
असं आजकाल कोणी लिहीत नाही
पुमिराना ...

Rajesh188's picture

20 Apr 2021 - 12:08 am | Rajesh188

भारी लिहलय.तुमच्या लिखाणाचा आनंद घेतला .मस्त जमलीय भट्टी.

अनन्त अवधुत's picture

20 Apr 2021 - 12:30 am | अनन्त अवधुत

बुरा न मानो होली है.
जमलयं, जमलयं. बाजार आवडला.

चित्रगुप्त's picture

20 Apr 2021 - 1:53 am | चित्रगुप्त

एकदम फर्मास सजवलात हो बाजार बापूसाहेब. याचाच पुढचा भाग पण येऊ द्या सवडीप्रमाणे. आणखी कोणकोणती दुकाने आहेत तेही सांगा.

चौकटराजा's picture

20 Apr 2021 - 6:11 am | चौकटराजा

एवढेच म्हणतो ... तरी एक पुराणवस्तू चे दुकान राहिलेच ते लई फेमस आहे मिपा बाजारात ! )))))

सर्व प्रकारच्या पुराणवस्तू आमचा जिव्हाळ्याचा विषय. तेंव्हा त्या दुकानात आमचा वावर असायलाच हवा, तरी नाही ओळखता आले बुवा. जरा हिंट द्या बरे.
.

चौकटराजा's picture

20 Apr 2021 - 9:53 am | चौकटराजा

मु पो वेरूळ हे त्या दुकानाचे हेड ऑफिस आहे !!

चौकटराजा's picture

20 Apr 2021 - 10:06 am | चौकटराजा

मु पो वेरूळ हे त्या दुकानाचे हेड ऑफिस आहे !!

आजच बाजारात, डब्बल ढोलकी उर्फ शोले काॅइन पण येणार आहे ...

मुक्त विहारि's picture

20 Apr 2021 - 7:08 am | मुक्त विहारि

बघू शकता

चौकटराजा's picture

20 Apr 2021 - 7:17 am | चौकटराजा

१८८ हे ही दुकान चांगले आहे व " रियल " इस्टेट हे ही दुकान चांगले आहे असे कॉईन वाजवायचे का इतर दुकानदारांनी .. ? ))))))))

मुक्त विहारि's picture

20 Apr 2021 - 9:00 am | मुक्त विहारि

तारतम्य असलेला मनुष्य, सोन्याच्या खाणीत माती पण असतेच, इतके जरूर ओळखतो...

त्यामुळे आजकाल शोले काॅईन्स बाजारात चालत नाहीत...

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 7:27 am | शा वि कु

मस्त लिहिले आहे!

यांची आणी दुकान नंबर १८८ यांची नेहमीच चढाओढ चालू असते की चांगलें दुकान कोणाचे. त्यांच्या भांडणामुळे बाजारात नेहमीच गोंगाट आणि गोंधळ असतो.

ह्याबाबतीत तुमचे जवळचे नातेवाईक बाप्पू सुद्धा वंदनीय आहेत हां खरं !

बापूसाहेब's picture

21 Apr 2021 - 8:35 pm | बापूसाहेब

शा वि कु..

:) :)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2021 - 8:24 am | प्रकाश घाटपांडे

आनंद घारेंचे मिसळपाववरील पहिले वर्ष आठवले.

लई भारी ! वाचून खूप मजा आली. मिपा वर अश्याच लेखनाची अपेक्षा आहे.

कुमार१'s picture

20 Apr 2021 - 8:41 am | कुमार१

जमलयं.
बाजार आवडला !!

चौकस२१२'s picture

20 Apr 2021 - 10:06 am | चौकस२१२

दांडी गुल झाली .. प्रथम त्या जुन्या पुराण्या वस्तूंच्या दुकानाचा फोटू बघितला आणि तिथून वाचायला लागलो आणि इंदूर किंवा जुनी दिल्ली इथल्या खरंच अस्तित्वात असलेली बाजार गल्ली मधील दुकानाबद्दल लिहिलंय असा वाटायला लागलं.... मग हळूच ट्यूब पेटली कि हि मिपागल्ली आहे !
म्हणजे हे एक प्रकारचं हॉल ऑफ फेम झाले कि .... मजा आली वाचून

आनन्दा's picture

20 Apr 2021 - 10:51 am | आनन्दा

मस्त, आवडेश!!

गॉडजिला's picture

20 Apr 2021 - 11:00 am | गॉडजिला

मजा आ गया

बाजारतच ऐन मध्यावर पर चेत अस प्राच्य विद्या संशोधन मंदिर दिमाखात उभे आहे... भारताचा इतिहास, ऐतिहसिक वास्तु वगैरे बाबत माहितीचा खजिनाच इथे उपल्ब्ध आहे. याचे प्रमुख आपला लाघवी स्वभाव, अभ्यास याने सर्व उपस्थितांची मने जिन्कुन घेतात असे बोलले जाते. अनावश्यक गोष्टिंकडे दुर्लक्ष हा भलेही त्यान्च्या स्वभावाचा भाग आसेल पण गोश्ट अनावश्यक आहे या बाबीकडे जर का त्यांचे दुर्लक्ष झाले तर समोरच्याची मिश्किल खिल्लि उडलीच समजो.

बाजारात काही दुकानदार एकमेकांतच जोरदार व्यवहार करुन दुकान भले थाटात चालु असल्याचा भास णिर्माण करतात पण मुळातच दर्जाहीन माल असल्याने त्याना पुन्हा पुन्हा बाजारातील प्रथितयश दुकानदारही आम्हाला ओळखतात हे पुन्हा पुन्हा गिर्हाइकांसमोर आणावे लागते.

आसो अ‍ॅकुणच बाजार जरी मुक्त अर्थ व्यवस्थे सारखा भासत आसला तरी तो एक खाजगी कारभार आहे.

-(विडोंशॉपर) गॉडजिला

नि३सोलपुरकर's picture

20 Apr 2021 - 12:06 pm | नि३सोलपुरकर

वाचून मजा आली ,
विशेषत: दुकानदार आणी त्याची वैशिष्ट्ये एकदम चपखल आणी बाजार समिती १००% .

मिपा बाजार नियमित चक्कर टाकणारा
नि३

असली माल. अधुनमधून गावच्या आठवणी सांगतात पटकन.

भारी लिहिलंय, एकदम चपखल!
मिपा बाजारातील अशीच एक फेरीवाली :)

अनिंद्य's picture

20 Apr 2021 - 12:55 pm | अनिंद्य

झकास !

मिपा बाजारसमितीचे अभिनंदन :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2021 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. अशा लेखनात सुधारणा करायला अजून वेळ आहे. पण चांगला प्रयत्न आहे. असे लेखन करावे वाटणे म्हणजे मिपाकर म्हणून किंवा जालावर रुळु लागणे असा त्याचा अर्थ आहे. मिपाबाजार आवडला. निरिक्षणे आवडली. टपल्याही आवडल्या. नाव न लिहिता, लेखनावरुन तो आयडी ओळखता आलं पाहिजे, असं ते कसब असावं लागतं. अर्थात, अजून भर घालून रंगवून छान करता आलं असतं.

उपक्रमचा एक तास, तात्या मनोगतावर परतला अशाच प्रकारचे दळण आम्ही यापूर्वी इथे दळलं आहे. अशा लेखनाच्या बाबतीत आपले एक मिपाकर लै भारी, जब्बरदस्त लिहायचे. त्यांचं पाहुनच आम्हालाही सुचलं होतं. त्यांचं खयाली पुलाव. आस्वाद नक्की घ्या.

बाकी, पुलेशु.

-दिलीप बिरुटे

अमर विश्वास's picture

20 Apr 2021 - 1:34 pm | अमर विश्वास

व्वा ,, हा बाजार असाच चालत राहो

प्रचेतस's picture

20 Apr 2021 - 1:41 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंय.
मिपाबाजाराच्या किंचित आडबाजूला बाजार समितीने एक फळ्या टाकून एक ओसरी ठेवलेली आहे, बाजारात इकडं तिकडं हिंडून, दुकानदारांची एकमेकांतील भांडणं पाहून वैतागलेली गिऱ्हाईकं इथं काही वेळ टेकतात, सवडीने सुखदुःखाच्या गप्पा हाणतात, इकडे शक्यतो हेवेदावे दिसत नाहीत. साहित्य, पर्यटन, कला, संस्कृती, सिनेमे इत्यादी विविध विषयांवर येथे गुजगोष्टी सुरू असतात. काही गिऱ्हाईकांना ही फळीवाली ओसरी इतकी आवडते की ते बाजारात आल्याआल्या इतर कुठेही न जाता येथेच येऊन बसतात आणि येथूनच परत जातात.

बापूसाहेब's picture

21 Apr 2021 - 8:34 pm | बापूसाहेब

मस्तच. प्रचेतस..

चौथा कोनाडा's picture

1 May 2021 - 2:59 pm | चौथा कोनाडा

सही हैं प्रचेतस !

आम्ही ह्याच "फळीवाली ओसरी" वर रमतो !

Rajesh188's picture

20 Apr 2021 - 2:58 pm | Rajesh188

हा सर्व बाजार ज्या मार्केट यार्ड मध्ये भरतो त्या मार्केट यार्ड चे अध्यक्ष कधी तरी गुपचूप फेरी मारायला येतात.त्यांच्या येण्याची चाहूल लागली की सर्व दुकान दार चिडी चूप असतात.
माला वर टीका करा पण माल विकणाऱ्या ला काहीच बोलायचे नाही असे काही तरी सांगत असतात.पण १० मिनिटाच्या वर दुकानदार च्या ते लक्षात राहत नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Apr 2021 - 4:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

बरेच आय डी राहुन गेले आढावा घ्यायचे. तरी बाजार आवडला.

पिनाक's picture

20 Apr 2021 - 5:14 pm | पिनाक

188 आणि भाऊबली हे दोन आयडी दिसलं रे दिसलं की स्विमिंग पूल मध्ये उद्या टाकतात आणि तोंडावर आपटतात. आधी त्या स्विमिंग पूल मध्ये पाणी आहे का नाही हे पण तपासत नाहीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Apr 2021 - 5:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

बाजार उठवला आहे सगळ्यांच्या.
लैच भारी
पैजारबुवा,

बापूसाहेब's picture

21 Apr 2021 - 8:32 pm | बापूसाहेब

मिपाबजारातील सर्व दुकानदारांचे आणि गिऱ्हाईक लोकांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!!!

चौथा कोनाडा's picture

22 Apr 2021 - 11:58 am | चौथा कोनाडा


लै भारी !


वाचताना ज्याम धम्माल आली !

बापूसाहेब, साष्टांङ दंडवत _/\_

वामन देशमुख's picture

22 Apr 2021 - 12:46 pm | वामन देशमुख

लेख आणि प्रतिक्रियांचा मस्त जमलाय बाजार, बापूसाहेब!

मिपा बाजारातला फेरफटका अजून विस्तीर्ण करता येईल; कारण, मोटारी, फटफट्या घेऊन भटकंती करणारे, नाना तऱ्हेचे पेय-पदार्थ विकणारे, अध्यात्म-तत्वज्ञान सांगणारे, गणित, अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे... असेही दुकानदार इथे ग्राहकप्रिय आहेतच की!

अवांतर: या पृथ्वी नामक ग्रहाच्या पृष्ठभागावर कुण्या भल्या माणसाने आपला सद्गृहस्थ असा उल्लेख केला हे पाहून डोळे पाणावले त्याचबरोबर काका, वयस्कर अशी विशेषणे मिळालेली पाहून मन उदासले! ;) मी जेमतेम चाळीशी ओलांडली आहे हो!

चौथा कोनाडा's picture

22 Apr 2021 - 1:27 pm | चौथा कोनाडा

मी जेमतेम चाळीशी ओलांडली आहे हो!

म्हंजे मिडलाईफ क्रायसिस सुरु होणार म्हणायचा !
:-))))

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 3:02 pm | मुक्त विहारि

मी चुकून "मिडवाईफ" वाचले

वामन देशमुख's picture

22 Apr 2021 - 3:26 pm | वामन देशमुख

आता काय बोलू, चौथा कोनाडा / मुक्त विहारि?

मिडलाइफ असो की मिडवाइफ, क्राइसिसशिवाय लाइफ असू शकतं का?

मिडवाइफ घ्या की नुसती वाइफ घ्या, त्यांच्याबरोबरच्या लाइफमध्ये स्ट्राइफ तर असणारच, नाही का?

;)

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 3:43 pm | मुक्त विहारि

प्रश्र्नच नाही

मिडवाईफचा कोमिकल अर्थ तुम्ही घेताय.
त्याचा अर्थ सुईण असा आहे.

अमर विश्वास's picture

22 Apr 2021 - 3:28 pm | अमर विश्वास

मुवि

तुम्ही आमच्यात सर्वात जास्त अनुभवी आहात

अशा चुका नका करू :)

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 3:44 pm | मुक्त विहारि

कधी कधी होतं असं

आमचे हे छोटेशे योगदान. ग्वाड़ मानून घ्या. :))

विमुक्त बिहारी तप्त
क्षणिक निहारी तख्त
स्पॅम च्या मुठी वर उधळूनी गरजे
शिवशंभो शिवशंभो !

सुप्त बिहारी रम्य
शांत राही थ्रेड
उघडले नेत्र, क्षेपणी 'बोल्ड', गरजे
शिवशंभो शिवशंभो !

आरक्त बिहारी रुद्र
घराणेशाहीवरी बहु कुद्ध
क्रान्तीचा सिंदूरी झेंडा घेऊनी गरजे
शिवशंभो शिवशंभो !

पार्थ बिहारी सौम्य
८८ चरणी लीन
प्रभू प्रतिसादे लोम:, गरजे
शिवशंभो शिवशंभो !

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2021 - 4:24 pm | चौथा कोनाडा

रचना नाय कळ्ळी !
जरा ईस्कटून सांगा की राव !

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2021 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

एकदम खरपूस लेख. सांप्रतच्या मिपाचे प्रतिबिंब चपखलपणे टिपले आहे व अवखळपणे मांडले आहे.
मी आजकालात मिपाबाजारात रमण्याऐवजी बाजाराच्या एका कोपर्‍यातल्या ओसरीवरच अधिक रमतो.

गणेशा's picture

24 Apr 2021 - 5:08 pm | गणेशा

हा हा हा..

नेत्रेश's picture

27 Apr 2021 - 10:33 am | नेत्रेश

जबरा बाजार उठवला आहे!