भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
15 Apr 2021 - 9:30 am
गाभा: 

गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच.
तर याच्या अगदी उलट हिंदी ही सगळ्या देशाला व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे, पूर्ण देशाची स्वत:ची अशी एक भाषा हवीच यापासून ते हिंदीला विरोध म्हणजे देशद्रोह समजण्यापर्यंत काही लोक जातात. दक्षिण भारतीय लोक हिंदीला फारसे महत्व देत नसल्याने तिथल्या महानगरांमधे राहणारे लोक विशेषत: उत्तरभारतीय लोक चिडून असतात. नवीन भाषा ती सुद्धा जी पैसे मिळवायला मदत करत नाही ती 'शिकणे' हे अर्थातच त्यांच्यासाठी 'डोकेदुखी' असते. गायपट्ट्यातले बहुतांश लोक पैसे मिळवणे या एकाच दृष्टीकोनातून महाराष्ट्र ,द.भारतातील महानगरे गाठतात. साहजिकच स्थानिक भाषा, संस्कृती याला बाधा आणण्याला कारणीभूत ठरतात. काही स्थानिक नागरीक मानतात की यामुळे दुसर्‍या भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्याने आपली भाषा समृद्ध होते. भाषा पाण्यासारखी असते, हिंदीचा द्वेष करु नका वगैरे वगैरे.

अशाचप्रकारे RSS, भाजप आणि मोदी समर्थकांमुळे हिंदू धर्मविषयक समूहांतही वाढ झाली आहे,होते आहे. पैसे घेऊन केली जाणारी धर्मांतरे, मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी, जुनी,वापरात नसलेली मंदिरे चर्चमधे रुपांतरीत करणे किंवा चर्चची बाह्यरचना हिंदू मंदिराप्रमाणे करणे, ख्रिश्चन धर्मात नसूनही हिंदू पद्धतीने येशु किंवा मेरीच्या मुर्तीवर उपचार करणे , हिंदू पुजाविधीसदृश्य पद्धतीने येशुची मुर्ती सजवणे हे प्रकार त्यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहेत. अल्पसंख्यक लोकांची दादागिरी किंवा आक्रमकपणा, विशिष्ट पद्धतीनेच बनवलेला पदार्थ विकत घेईन अशी काही धर्मियांची मागणी किंवा अमुक पदार्थ विशिष्ट धर्मात निषिद्ध असूनही त्याच धर्मातल्या काही लोकांकडून तो खाल्ला जाणे हे काही लोकांच्या दृष्टीने चुकीचे,अस्मिताभंग करणारे,संस्कृतीला हानिकारक मानले जाते.
याउलट "संविधानाने आम्हाला हवी ती भाषा बोलण्याचा,हवं ते खाण्याचा अधिकार दिला अाहे,हवा तो धर्म अवलंबण्याचा अधिकार दिला आहे.आमच्यावर दादागिरी करणारे तुम्ही कोण" असा प्रतिरोधही दुसर्‍या बाजूने होत असतो.

मातृभाषा, स्वधर्म, मातृभाषेची शुद्धी, भाषेवरील किंवा धर्मावरील आक्रमण,धर्मांतर या अस्मिताविषयक गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता? यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? का आहेत? तुमच्या धर्मावर,भाषेवर होणारा अन्याय हा तुमच्यासाठी कितपत दखलपात्र आहे? काही लोक भाषा, उपभाषा,बोली, प्रांत, उपप्रांत, धर्म, भौगोलिक विभाग, स्थानिक संस्कृती हे सगळे बाजूला सारुन 'पैसे कमवणे' या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. 'पैशाने जितके श्रीमंत असाल तितकी तुमची जगात किंमत जास्त.कुठे या मर्यादा घालणार्‍या भाषिक,धार्मिक अस्मितांमधे अडकून वेळ वाया घालवता?' या विचारांचा अवलंब करणारे असतात. ते तुम्हाला योग्य वाटतात का?

भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता? का देता?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Apr 2021 - 9:55 am | मुक्त विहारि

वाचत आहे

चौकटराजा's picture

15 Apr 2021 - 12:25 pm | चौकटराजा

एखादा प्रान्त,एखादे साम्राज्य , एखादी भाषा, एखादा सम्प्रदाय ,एखादी रुढी, एखादी परम्परा ,एखादा धर्म इतकेच काय एखादा ग्रह ,एखादा तारा याबद्द्ल अस्मिता वगैरे कशाला हवी ? कालाच्या ओघात सारे बदलले पाहिजे यावर मतमतान्तरे असू शकतात पण कालौघात सारेच बदलते यात मतमतांतर असेल तर कालाला मात्र त्याची काही पर्वा नसते.

वरील सत्य ज्याला कळते तो अशा कोणत्याच वादात कधी पडत नाही . जे उपयुक्त असते तेच कालाच्या ओघात टिकते अगदी मानवी देह ही !!

शा वि कु's picture

15 Apr 2021 - 5:33 pm | शा वि कु

असेच वाटते.

देशातील वातावरण दूषित स्तरावर पोचलेले आहे.
देश स्तरावर हे पद्धतशीर नियोजन हवं ते होत नाही.विकास हा प्रतेक गावात खेड्यात पोचला पाहिजे पण तसे घडत नाही प्रदेशात भयंकर आर्थिक विषमता आहे आणि त्या प्रश्नाकडे गंभीर पने भारतातील केंद्र सरकार आणि राजकीय नेते बघत नाहीत.
अंतर राज्य स्थलांतर होणारच हे मान्य असून सुध्दा अनियंत्रित स्थलांतर राज्याराज्यांत द्वेष निर्माण करते.
विशिष्ट दोन तीन प्रदेशातून होणारे प्रचंड स्थलांतर देशातील वातावरण दूषित करत आहे.
म्हणून हिंदी भाषेला विरोध त्या भाषेचा द्वेष वाढत आहे.
भाषिक अस्मिता वाढण्याचे तेच महत्वाचे कारण आहे..
इथे धर्म हा फॅक्टर काम करत नाही एकच धर्म असलेले पण भाषा वेगळी असेल आणि त्या मध्ये हिंदी असेल तर एक धर्मीय असले तरी प्रेम वाटत नाही.
देशांतर्गत स्थलांतर विषयी कशी नियम ,कायदे असणे गरजेचे आहे.
नाही तर पुढे बिकट स्थिती होईल.
आर्थिक स्तरावरून देशाचे दोन भागात विभाजन होत आहे.
उत्तर भारत आणि पूर्व भारत. फक्त कामगार पुरवत आहे तर दक्षिण आणि पश्चिम भारत रोजगार निर्मिती करतो असे स्पष्ट विभाजन झालेले आहे.
ही दरी रुंद होणे परवडणारे नाही.
भाषिक संघर्ष चे मूळ इथेच आहे.

चौकटराजा's picture

15 Apr 2021 - 1:58 pm | चौकटराजा

भारत देशात घटना दुरुस्ती करून केंद्राचे नागरिकत्व व राज्यस्तरीय नागरिकत्व असे केल्यास काही फरक पडेल का ?

ज्या राज्यात जातील तिथली राज्यभाषा शिकली तर हा संघर्ष टळेल की. जया बच्चनसारखा अडेलतट्टूपणा केला तर संघर्ष अटळच असणार.

Rajesh188's picture

15 Apr 2021 - 3:39 pm | Rajesh188

Raj ठाकरे नी हिंदी भाषिक लोकांना झोडपले होते तेव्हाची गोष्ट आहे.मी लोकसभेचे लाईव्ह प्रक्षेपण बघत होतो आणि लोकसभेत ह्याच विषयावर चर्चा चालू होती
ह्या जया मॅडम बोलत होत्या आणि ह्यांनी लोकसभेत मुंबई केंद्र शासित करावी अशी मागणी केली .
मॅडम समाजवादी पक्षाच्या खासदार होत्या.
जसे जया नी मुंबई केंद्र शासित करण्याची मागणी केली मुलायम सिंग जी लगेच उभे राहिले आणि त्यांनी ते भाषण थांबवले आणि
समाजवादी पक्ष जया च्या मागणी शी सहमत नाही असे सांगितले.
एवढी ती जया बच्चन अती शाहणी आहे.
मुलायमसिंह जी कसलेले मुरलेले नेते आहेत त्यांना त्या मागणीचे काय परिणाम होतील ह्याची पूर्ण जाणीव होती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Apr 2021 - 1:37 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

असं आहे का?

उलट भाषिक अस्मिता असलेली राज्येच (म्हणजे तिथले लोक) भाषिक अस्मिता नसलेल्या राज्यांपेक्षा अधिक प्रगती आणि अधिक रोजगारनिर्मिती करत आहेत. हे कसं काय?

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Apr 2021 - 4:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

अन प्रगती करत आहेत, ते अस्मितेच्या लढ्यात आहेत का?

उपयोजक's picture

15 Apr 2021 - 7:01 pm | उपयोजक

महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मातृभाषाभाषाविषयक आंदोलने सतत होतात. अगदी कोर्टापर्यंत प्रकरणे जातात. रोजगारनिर्मिती करणे याचा अर्थ राज्याचा वापर परप्रांतीयांना वाटेल तसा करायला मुभा देणे असा नक्कीच नसेल. शिवाय अपेक्षांमधे गैर काय? म्हणजे अनेक वर्षे राहणार असाल तर स्थानिक भाषा शिकून घ्या या मागणीत गैर काय असावे?

जिथे राहायचे आहे तिथली स्थानिक भाषा शिकलीच पाहिजे. त्यात गैर काहीच नाही. हिंदी भाषिकांविषयी आक्षेप तोच असतो की त्यातले बहुतांश लोक स्थानिक भाषा शिकायला उत्सुक नसतात किंवा विरोध करतात. स्थानिकांनी त्यांच्याशी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा असते. १०-१२ वर्षे पुण्यात राहून अजिबात मराठी न बोलणारे लोक मला माहित आहेत. यात कुठेतरी हिंदी भाषा बोलणारे आम्ही खूप आहोत आणि बाकीच्यांनी आमच्याप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करावे असा (काहीसा) दर्प दिसून येतो. विरोध हिंदी भाषिकांच्या या अ‍ॅटिट्युडला आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Apr 2021 - 3:03 pm | चंद्रसूर्यकुमार

मी काही महिने गुरगावला कामानिमित्त होतो. तिथून दिल्लीला आठवड्यातून किमान तीनदा तरी जावे लागायचेच. आपण दिल्लीच्या लोकांविषयी जे मत साधारण असते (म्हणजे गोड बोलून टोप्या घालणारे लोक वगैरे) तसेच मत काही प्रमाणात दिल्लीच्या लोकांचे गुरगावविषयी होते असे जाणवले. आमच्या ऑफिसमध्ये मुळचे इतर राज्यातले बरेच लोक या कारणाने गुरगावमध्ये राहायचे नाहीत तर दिल्लीत राहून दररोज अप-डाऊन करायचे. रहदारीला काहीही शिस्त नाही, नियम वगैरे पायदळी तुडविण्यासाठीच बनविलेले आहेत असा काहीसा दृष्टीकोन आणि डी.एल.एफ कंपनीने मोठ्या प्रमाणावर जमिन खरेदी केल्याने पूर्वी फारसे काही हातात नसलेले लोक रातोरात करोडपती झाल्याने शुध्द शब्दात सांगायचे तर आलेला 'माज' असेही बरेच लोक तिथे बघितले. हिंदी सोडून इतर कोणतीही भाषा तिथे बोलायचा काही प्रश्नच नव्हता. मी तिथे काही महिनेच राहणार असल्याने भाड्याची जागा वगैरे न बघता पूर्वीच्या हवेलीचे रूपांतर केलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो. तिथे इतर कंपन्यांमध्ये कामाला असलेले माझ्यासारखेच काही लोक भेटले. ते तामिळनाडूचे होते. हिंदी व्यवस्थित येत नसल्याने त्यांचे तिथे फारच हाल झाले. मी माझ्या मुंबईय्या हिंदीतून बोलून काम आणि वेळ निभावून नेत होतो पण दक्षिण भारतीयांना ते पण करणे शक्य होत नव्हते. त्यातून समोरचा माणूस कसा असेल याची काहीच कल्पना नाही- खात्री तर सोडूनच द्या. असा समोरचा माणूस गरम डोक्याचा असेल आणि भाषा कळत नसेल/बोलता येत नसेल तर किती अडचण होत असेल!!

तेव्हा भारतात राहणार्‍या सगळ्यांना एका कॉमन भाषेतून कामापुरते व्यवहार करता येतील अशी परिस्थिती यायला हवी. लोकसंख्येचा विचार करता हिंदी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे तसेच इस्त्रीवाले, टॅक्सीवाले, रीक्षावाले वगैरे विविध वाल्यांमध्येही त्यांचीच संख्या जास्त आहे. त्याशिवाय बॉलीवूडच्या लोकप्रियतेमुळे हिंदी भाषा ती कॉमन भाषा म्हणून व्हायला जास्त मदत होईल (तामिळ, तेलुगू वगैरे भाषांपेक्षा नक्कीच जास्त). तेव्हा आपली भाषा, अस्मिता वगैरे गोष्टी ठिक असल्या तरी त्यामुळे आपलीच अडचण होणार नाही याची पण काळजी घ्यायला हवी.

म्हणून जे स्थलांतर पूर्व आणि उत्तर भारता मधून इतर राज्यात होत आहे आणि ते परत प्रचंड आहे म्हणून हिंदी शिकायला,बोलायला,लिहायला नकोच अशी तीव्र भावना आहे.
भाषेला विरोध असण्याचे आणि भाषेच्या अस्मिता तीव्र होण्याचे ते महत्वाचे कारण आहे.
देशात एकच भाषा असावी असे वाटत असेल तर ही प्रादेशिक आर्थिक विषमता दूर केली पाहिजे .
म्हणजे देशांतर्गत प्रचंड स्थलांतर one-way मार्गे होणार नाही.
मग एक भाषा एक देश हे थोडे फार यशस्वी होईल नाही तर नाही.

चौकटराजा's picture

15 Apr 2021 - 7:07 pm | चौकटराजा

१९६० ते १९७० या काळात तामिळनाडू पेक्षा महाराष्ट्रात रोजगार मिळण्याची फारच जास्त शक्यता होती ! त्यामुळे अनेक तामीळ लोक महाराष्ट्रात राहायला आले होते ! आता तिथे ती परिस्थिती नाही ! त्यामुळे आता खाजगी क्षेत्रात ही त्याचे प्रमाण कमी दिसते. अर्थात ज्याला अतिरिक्त पैशाची भूक आहे व तो मिळण्याची क्षमता ही आहे तो जगात कुठेही स्थायिक व्हायला कचरत नाही ! निदान आज स्टेनो ,क्लार्क अकाउंटंट या पदावर तरी इथे तामिळ माणसे कमी दिसतात !

उपयोजक's picture

15 Apr 2021 - 7:26 pm | उपयोजक

पंजाब,हरियाणा आणि दिल्ली हे तीन प्रदेश जाट,शीख या गरम डोक्याच्या लोकांचे प्राबल्य असलेल्यांनीच भरलेले आहेत. या भांडण उकरुन काढण्यास कोणतेही कारण पुरते. हे लोक अन्य प्रदेशात जरी गेले तरी तिथेही दादागिरी करता येते का याची चाचपणी करत असतात. पंजाब,हरियाणा इथला शेतीतून येणारा पैसा, पंजाब्यांची दणकट शरीरयष्टी आणि मोगली अत्याचारांविरोधात सातत्याने लढत राहिल्याने स्थायीभाव बनलेला रागीट स्वभाव या गोष्टी या मागे कारणीभूत असाव्यात.

( मागे अकुंनी हरियाणवी लोकांबाबत सांगितलेला अनुभव आठवला.

हरियाणवी: कुल मिलाके कितणे भाईबेहेण हो?
बाहेरचा: तीन
हरियाणवी: ओए चार भी होते तो क्या उखाड़ लेते हमारा?
(यावर तो आणि त्याचे साथीदार दाताड काढून त्याला दाद देतात.))
------------------------------------------------
दिल्ली,पंजाब ,हरियाणा हा प्रदेश वगळता अन्य महानगरांमधेही असाच अनुभव येतो का हे वाचायला आवडेल. कारण मी सध्या चेन्नईतल्या मराठी लोकांना तमिळ शिकायला मदत करतो आहे. त्यांना सरासरी १५-२० तमिळ शब्दांपुढे ज्ञान नाही तरीही ते लोक किमान २ वर्षांपासून फारसा त्रास न होता तिथे राहतायत. रोजचे व्यवहार इंग्रजी आणि हाताने दर्शवणे याद्वारे आरामात पार पडतायत. :)

> "संविधानाने आम्हाला हवी ती भाषा बोलण्याचा,हवं ते खाण्याचा अधिकार दिला अाहे,हवा तो धर्म अवलंबण्याचा अधिकार दिला आहे.आमच्यावर दादागिरी करणारे तुम्ही कोण"

संविधान विविध धर्माना विविध प्रकारचे हक्क देते. कलम ३० खाली सरकारी लुडबुडीशिवाय शालेय संस्था चालविण्याचे अधिकार फक्त अल्पसंख्यानक धर्माना आहेत. हिंदूंना नाहीत.

संविधान सर्वाना सामान हक्क देते तर मग हिंदू मंदिरेच फक्त सरकारी सर्पाच्या विळख्यांत का ?

Rajesh188's picture

16 Apr 2021 - 11:27 am | Rajesh188

बोलायचे झाले तर अल्पसंख्याक लोकांना त्यांच्याच समाजासाठी शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार दिलेला आहे.
आणि ठराविक टक्के विद्यार्थी हे त्याचं समाजाचे असणार अशी पण सवलत आहे
अनुदानात पण सवलत असू शकते.
पण अल्पसंख्य म्हणजे कोण?.
तर ह्या मध्ये धार्मिक अल्पसंख्याक तर आहेतच
पण तो नियम चुकीचा आहे असे मला वाटत.
देशात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत पण काही राज्यात त्यांची संख्या बहुसंख्य आहे तरी त्यांना अल्पसंख्याक च समजले जाते ही घोड चूक आहे.
राज्य नुसार धार्मिक अल्पसंख्याक ठरवले गेले पाहिजेत.
दुसरे अल्पसंख्याक हे भाषिक अल्पसंख्याक ह्यांना पण स्वतःची शिक्षण संस्था स्वतःच्या भाषिक लोकांसाठी चालवण्याचा अधिकार आहे.
मुंबई मध्ये तामिळी,गुजराती,आणि अशा भाषिक अल्पसंख्याक लोकांच्या शाळा आहेत.
इथे पण घोडचूक आहे.
मुंबई मध्ये मराठी लोक अल्पसंख्याक आहेत त्यांना हा अधिकार असायला हवा पण राज्यस्तर वरची लोकसंख्या पकडली जाते.
त्या मुळे मराठी भाषिक बहुसंख्य ठरतात आणि त्यांना मुंबई मध्ये अल्पसंख्याक (भाषिक) चे हक्क मिळत नाहीत.
सर्व गाढवपणा आहे.

उपयोजक's picture

16 Apr 2021 - 12:11 pm | उपयोजक

एक गोष्ट समजलेली नाही की जैन धर्मियांना आरक्षण का दिले आहे?
अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश हा त्या अल्पसंख्यक धर्मियांना बहुसंख्यक धर्मियांप्रमाणे समान प्रातिनिधित्व मिळावे हा आहे. बरोबर? मग जेव्हापासून जैन धर्मियांना आरक्षण मिळाले आहे त्या आधी त्यांच्यावर बहुसंख्य धर्मियांकडून अन्याय करणार्‍या काही घटना घडल्या आहेत का? किंवा आरक्षण मिळाले म्हणून त्या रागातून काही घडले आहे का? म्हणजे जैन समाजाच्या व्यक्तीला एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यापासून बहुसंख्य धर्मियांनी मनाई किंवा दादागिरी केली,अटकाव केला किंवा एखाद्या सरकारी क्षेत्रात नोकरी करताना त्रास दिला किंवा एखादा व्यवसाय करण्यास बहुसंख्यक धर्मियांनी मनाई केली,अडथळे आणले असे काही घडले आहे का? तशा काही घटना जैन धर्मियांबाबत घडल्या आहेत का? अशा किती घटना घडल्या आहेत? आख्ख्या समाजालाच आरक्षण द्यावे इतक्या मोठ्या संख्येने बहुसंख्यक धर्मियांनी स्वातंत्र्यापूर्वी जैन समाजावर अन्याय केला आहे का? (हे मी साधारण १९ व्या शतकापासून ते आजपर्यंत घडलंय का विचारतो आहे. प्राचीन काळी भारतात जैन,बौद्ध,वैदिकांमधे वैचारिक वाद व्हायचे ते विचारत नाहीये.)
कोणीतरी अशा अन्यायांची खात्रीलायक माहिती द्या. _/\_

आरक्षण हे नोकरीत असते,लोक प्रतिनिधी साठी सुद्धा आरक्षण असते जेणे करून अल्पसंख्याक लोकांचा सत्तेत सहभाग वाढेल.
पण माझ्या माहिती प्रमाणे ते धर्मावर आधारित नसून जाती वर आधारित आहे.
जैन धर्मीय लोकांना नोकरीत आणि निवडणुकीत आरक्षण नाही.
शिक्षण संस्था चालवण्यासाठी अल्पसंख्याक म्हणून जे अधिकार दिलेले आहेत ते त्यांना आहेत..
धार्मिक अल्पसंख्याक आणि भाषिक अल्पसंख्याक अशी ती विभागणी असते.

उपयोजक's picture

16 Apr 2021 - 12:54 pm | उपयोजक

जैनेतर धर्मियांनी विशेषत: हिंदू व्यक्ती किंवा हिंदू व्यक्तीसमूहांकडून चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक संस्थांमधे जैन व्यक्तींना प्रवेशासाठी अल्पसंख्यक म्हणून आरक्षण मिळल्याचे अनेक वर्षे पाहत आहे. हे आरक्षण कशाच्या आधारे मिळते?

चौकटराजा's picture

16 Apr 2021 - 7:22 pm | चौकटराजा

माझा एक प्रश्न आहे की जैन व शीख हे मूळ धर्म आहेत की ते हिंदू धर्मातील संप्रदाय आहेत ? लिंगायत हा धर्म आहे की तो हिंदू मधील एक संप्रदाय आहे ?

जैन लोक हिंदू देव देवतांची पूजा करत नाहीत आणि शीख लोक पण करत नाहीत.ते स्वतःला हिंदू समजत नाहीत..
जैन धर्मीय ईश्वर सुद्धा मानत नाहीत.
त्या त्यांचा हिंदू धर्माशी संबंध असेल असे वाटत नाही.
शीख धर्म एक ईश्वर वादी आहे.

चौकस२१२'s picture

20 Apr 2021 - 10:36 am | चौकस२१२

जैन किंवा शीख दधर्माचा हिंदूंशी काह्ही संबंध नाही असे पसरवण्याची एक पद्धशीर प्रयत्न केला जात आहे ... त्याचेच हे उदाहरण... हे म्हणजे जु आणि ख्रिस्ती धर्माचा काह्ही संबंध नाही हे म्हण्यायसारखेच आहे .. ! हास्यस्पद !

हिंदूत एकजूकत कशी राहणार नाही या साठी हुशरि वापरून आणि दे धक्का या तत्व्वर जगभर प्रयतन चालू असतात पण आपल्याच च हिंदूंना ते दिसत नाहि ..\याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे १८८ ची प्रतिक्रिया ( ओह क्षमा करा यात "मूर्ती " हा शब्द आणून हिंदूंची अरेरावी पुढे चालू ठेवल्याबद्दल !)

उपयोजक's picture

16 Apr 2021 - 11:05 pm | उपयोजक

हे नाव परदेशी अहिंदू लोकांकडून 'सिंधू' चा अपभ्रंश होऊन मिळाले आहे. हिंदू धर्माचे भारतीय नाव भागवत धर्म आहे. भगवंताला पुजणारे ते भागवतधर्मीय. या भागवत धर्मातूनच जैन,बौद्ध या विचारधारा निर्माण झाल्या.
शिख धर्मीय हे मूळचे बहुतांश हिंदू क्षत्रिय आणि काही ब्राह्मण वर्णातले लोक. १५ व्या शतकात गुरु गोविंदसिंगांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार चालणारा हा धर्म आहे. बहुतांश हिंदू आणि थोड्या प्रमाणात मुस्लिम धर्माचा प्रभाव असणारा हा धर्म आहे. मुस्लिम आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी,लढण्यासाठी शिख धर्म निर्माण झाला असे म्हणतात. पंजाब्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून हे पक्के मांसाहारी असतील असे वाटत असले तरी काही शिख हे चक्क शाकाहारी आहेत.
अंत्यविधी वगळता हिंदू धर्माशी बराच साधर्म्य असणारा लिंगायत धर्म आहे. लिंगायत धर्मीयांमधे निधन झाल्यावर दफन करतात. लिंगायत हे शैव विचारधारा मानतात. याला स्वतंत्र धर्मापेक्षा हिंदू धर्मातील संप्रदाय म्हणणे योग्य ठरेल.

> अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश हा त्या अल्पसंख्यक धर्मियांना बहुसंख्यक धर्मियांप्रमाणे समान प्रातिनिधित्व मिळावे हा आहे. बरोबर?

तुम्ही कुठल्या आरक्षणा बद्दल बोलत आहात ?

आर्टिकल ३० विषयी बोलत असाल तर हा अधिकार मिळावा म्हणून संपुन जैन समाजाने खूप लॉबीईंग केले आहे. आर्टिकल ३० खालील अधिकार खूप चांगले आणि महत्वाचे असल्याने लिंगायत समाज किंवा रामकृष्ण मिशन ने सुद्धा त्यासाठी स्वतःला अहिंदू घोषित करण्याचा आटापिटा चालविला होता.

अल्पसंख्यांक आणि अत्याचार वगैरे ह्यांचा काडीचाही संबंध नाही. लोक कशाला हे बादरायण संबंध जोडतात तेच मला समजत नाही. कायद्याने ज्यांना अल्पसंख्यांक घोषित केले आहेत ते समूह अल्पसंख्यांक आहे. उद्या लठ्ठ महिलांनी किंवा टकलू पुरुषांनी सरकारला कायदा बदलून स्वतःला अल्पसंख्यांक घोषित केले तर हि मंडळी सुद्धा अल्पसंख्यांक होतील आणि कलम ३० त्यांना लागू होईल. अल्पसंख्यांक दर्जा आणि अत्याचार वगैरेचा काहीही संबंध नाही. (आणि संख्येचा सुद्धा संबंध नाही.) भारतांत यहुदी लोक खऱ्या अर्थाने अल्पसंख्यांक असले तरी त्यांना ह्या लिस्ट मध्ये स्थान नाही.

-
भारतीय घटना बहुतेक ठिकाणी फक्त SC/ST ह्यांना घटनात्मक दृष्ट्या वेगळा समूह म्हणून ओळखते आणि त्यांना अधिक अधिकार देते. कलम ३० चा मूळ उद्देश फक्त इतका होता कि जे अधिकार हिंदूंना आहेत ते इतरांकडून काढून घेतले जाणार नाहीत हे आश्वासन. पण मधल्या काळांत भारत सरकारचा विळखा शिक्षण क्षेत्रांत हनुमाच्या शेपटा प्रमाणे वाढला आणि सोनिया सिब्बल मंडळींनी ९३वि घटना दुरुस्ती करून कलम ३० चा संपूर्ण अर्थच बदलला. मिपा वरील मी ह्या विषयावर विपुल लेखन केले आहे.

त्यामुळे आज काळ शिक्षण क्षेत्रांत ह्यांना भरपूर स्वतंत्र मिळते तर ह्याच स्वातंत्र्यासाठी कायदा हिंदूंना नालायक ठरवतो.

> अल्पसंख्यक आरक्षणाचा उद्देश हा त्या अल्पसंख्यक धर्मियांना बहुसंख्यक धर्मियांप्रमाणे समान प्रातिनिधित्व मिळावे हा आहे. बरोबर? मग

अजिबात नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून कुठेही हे तत्व वापरले गेले नाही आणि जात नाही. हे कदाचित निवडणुकीतील कोणाचे भाषण असेल पण घटना आणि कायदा ह्याला मान्यता देत नाही.

:(

मिपा वरील मी ह्या विषयावर विपुल लेखन केले आहे.

कृपया लिंक द्या. _/\_

:(

धर्मापेक्षा सोयीसवलती आणि त्याद्वारे येणारी आर्थिक संपन्नता अशी लाचारी करायला लावते. अंत्यविधी वगळता बाकी रितीरिवाज हिंदूंप्रमाणे असणारे लिंगायत लोक कर्नाटकात भाजपला भरघोस मतदान करतात पण स्वत:ला अहिंदू घोषित करण्यासाठीसुद्धा प्रयत्न करतात हे खेदजनक आहे. :(

Rajesh188's picture

16 Apr 2021 - 1:19 pm | Rajesh188

ही निती भारतात यशस्वी होते म्हणून ब्रिटिश काळा पासून आज पर्यंत तीच यशस्वी निती वापरली जाते.
विविध सवलती,आरक्षण,अगदी वेगळे कायदे सुद्धा .
ह्या आणि अशा विविध मार्गाने समाज विभागून टाकला जातो.
त्याचा फायदा निवडणूक जिंकण्यासाठी होतो.
सर्वांस समान न्याय आणि समान कायदे आणि समान सोयी सुविधा .
अशी सामान्य येणे गरजेचे आहे.
अल्पसंख्याक हा प्रकार च बंद केला पाहिजे.

ह्यांत खेदजनक असे काहीच नाही. लिंगायत समाजाने कोटयावधी रुपये खर्च करून हजारो शैक्षणिक संस्था चालविल्या आहेत. अश्या समाजाला RTE वगैरेचा दंडुका बसला तर वाट्टेल तो मार्ग वापरून आपल्या संस्था वाचविणे हे शहाणपणाचे लक्षण आहे . मूर्ख आणि खेदजनक वर्तन आहे ते भाजपा च्या लोकांचे जे हिंदू हिताची बात करतात आणि सत्तेत येताच काँग्रेस ची री ओढतात. महाराष्ट्रांत तर तावडे ह्या शिक्षण मंत्र्याने अक्षरशः शिव्या दिल्या होत्या हिंदू शैक्षणिक संस्थांना आणि त्यांच्या हक्काचे पैसे सुद्धा देण्यास नकार दिला होता.

लिंगायत समाजाचे काय घेऊन बसलात सर्वच जाती स्वतःला "मागासलेल्या' घोषित करण्यांत गुंतल्या आहेत. विधवांना मानधन देण्याची योजना गोवा सरकारने काढली होती तिथे चांगल्या सवाष्णी स्वतःला विधवा म्हणवून पैसे घेऊ लागल्या आणि चांगली डॉक्टर मुले असणारे पालक निर्लज पणे मुलाच्या गाडीतून जाऊन निराधार भत्ता घेऊन येतात.

कायदा जेंव्हा भेदभाव करतो तेंव्हा आपोआप लोक त्या पद्धतीने आपले वर्तन बदलतील.

चूक कायद्याची आहे लोकांची नाही.

वामन देशमुख's picture

16 Apr 2021 - 3:00 pm | वामन देशमुख
खेदजनक वर्तन आहे ते भाजपा च्या लोकांचे जे हिंदू हिताची बात करतात

बरोबर आहे. हिंदूविरोधी असलेला शिक्षण हक्क कायदा, मोदी सरकारने अजूनही रद्द केलेला नाही.

वामन देशमुख's picture

16 Apr 2021 - 11:34 am | वामन देशमुख

भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता?

धार्मिक अस्मितांना खूप महत्व देतो.

का देता?

कारण, भारतात इस्लाम अस्तित्वात आहे. भारतीय राजकारण, अर्थकारण, समाजकारण, प्रशासन, कायदा-सुव्यवस्था, शिक्षण, साहित्य, कला, संगीत, मनोरंजन... यांवर इस्लामचा लक्षणीय प्रभाव आहे. इस्लाम जगाची मुस्लिम आणि काफर या दोन भागात विभागणी करतो. इस्लामच्या दृष्टीने मुस्लिमेतर हे सगळे काफर आहेत. काफरांना काफर म्हणून जिवंत राहण्याची, नास्तिकांना नास्तिक म्हणून जिवंत राहण्याची, धार्मिक अस्मितेवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्यांना, तशी चर्चा करणाऱ्यांना जिवंत राहण्याची... परवानगी इस्लाम देत नाही.

भारताचे, काफरांनी लिहिलेले, संविधान ही परवानगी देते.

हे संविधान आणि त्यामागचा विचार कायम ठेवायचा असेल तर,
वरील गोष्टींची परवानगीच नव्हे तर प्रोत्साहन हवे असेल तर,
आपापला धर्म, भाषा संस्कृती यांच्या अस्मिता जपायच्या असतील तर,
हलाल-हराम या दहशतीखाली जगायचे नसेल तर,
स्त्री-पुरुष समानतेचा विचार करायचा असेल तर...

भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीच्या तुकड्यावर काफरांचे सार्वभौम राज्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी काफरांनी त्यांची काफर ही ओळख (किंवा इतर कोणतीही मुस्लिमेतर ओळख) कायम ठेवणे, तिचे संरक्षण आणि संवर्धन करत राहणे, त्यात सक्रिय योगदान देणे हे आवश्यक आहे.

हा माझा अभ्यासांती बनलेला दृष्टिकोन आहे, तो चर्चेचा विषय नाही. भिन्न मताचा औपचारिक आदर आहे.

उपयोजक's picture

16 Apr 2021 - 11:56 am | उपयोजक

वाचनीय प्रतिसाद. मुद्देसूद!

बापूसाहेब's picture

16 Apr 2021 - 12:33 pm | बापूसाहेब

वामन जी यांच्याशी सहमत

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Apr 2021 - 3:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राजेशाशी सहमत. भारतात स्थानिक/भाषिक अस्मिता उफाळून यायचे मुख्य कारण आर्थिक विकास असावे. तसा अनेकांचा भाषिक स्वाभिमान जाज्वल्य वगैरे असला तरी त्याची झेप "तुम्ही माझी मातृभाषा शिका" ईथवरच असते. मनसेचे २००८/०९ मधील 'आंदोलन' असो वा तामिळनाडूत हिंदीला नाके मुरडणे असो. बाहेरून येणारे लोक तुमची नोकरी हिरावून घेत आहेत हे राजकीय पक्ष स्थानिकांना पटवून देण्यात यशस्वी झाले की मग परप्रांतियांची भाषा,संस्कृतीद्वेष चालू होण्यास सुरुवात होते.

साहना's picture

18 Apr 2021 - 11:41 am | साहना

भाषीय अस्मिता ह्या इतकी मूर्खपणाची गोष्ट नाही. (माझे वैयक्तिक मत). कुणाच्याही भाषेला काही मध लागलेला नाही. बहुतेक भाषाशूरांचे भाषेतील आपले योगदान शून्य असते. इतरांच्या मुलांनी शाळेंत कुठल्या भाषेंत काय शिकावे ह्यावर है मूर्खांचे आपले मत असते. तुम्ही महाराष्ट्रांत जन्माला आलात म्हणून आपोआप भाषेवर तुमचा अधिकार आहे किंवा तुमच्या राज्याच्या राजकीय सीमा आणि भाषा ह्यांचा संबंध आहे हे माझ्या मते पूर्णपणे तर्कविरोधी आहे.

भाषा शिकून फायदा आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे. फायदा फक्त आर्थिक नसून मी सामाजिक आणि वैयक्तिक मनोरंजन हे सुद्धा गृहीत धरले आहे. भाषा शिकून फायदा नाही तर मग का कुणा मुलाने आपला वेळ ह्या खोट्या अस्मितेची पुंगी वाजवण्यात व्यर्थ घालवावी ? ज्याला जी भाषा आवडते ती त्याने शिकावी, बोलावी आणि लिहावी. राजकीय सीमा आणि इतरांची लुडबुड त्यांत अजिबात नको.

भाषिक अस्मितेने भारतीय भाषांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. सीमावर्ती भागांत भाषांची सरमिसळ होण्याच्या ऐवजी उगाच लोक आपली भाषा श्रेष्ठ म्हणून. भांडत बसतात आणि इंग्रजी आणि उर्दूचे फावते. मराठी भाषेचा बोर्ड लावला नाही म्हणून ज्या शिळ्यासैनिकांची मर्दानगी जागी होते ती उर्दूचे बोर्ड पाहतांच मात्र ब्रह्मांडापासून अणु एव्हडी होत जात असे !

मराठीही येते आणि कन्नड सुद्धा असे लोक कमी असल्याने दोन्ही भाषांचे आदान प्रदान कमी होते. हीच स्थिती इतर सर्व भाषांची आहे आणि दिवसेंदिवस भारतीय भाषांचे साहित्यदौर्बल्य वाढत चालले आहे. आपल्या राज्यांत/शहरांत परभाषिक आहेत म्हणून स्थानिकांना राग येतो. पण तोच राग इंग्रजी आणि उर्दूचा येत नाही. दुसर्याकडून त्यांच्या भाषा शिकून घेण्याच्या ऐवजी खोटा अभिमान आणि खोटी अस्मिता आडवी येते.

हीच गोष्ट राज्याच्या राजकीय सीमेची आहे. राज्य कितीही छोटे असले काही फरक पडत नाही. आपली संस्कृती हि जिल्हा कुठला आहे ह्यावर अवलंबून नाही. उगाच आपण अमुक राज्यांत जन्माला आलो म्हणून संपूर्ण राज्यावर आपला काही तरी अधिकार आहे अशा थाटांत लोक वावरतात. कर्नाटक आणि महाराष्ट्राने विनाकारण आपल्या सीमेला वादग्रस्त बनवून ठेवले आहे. महाराष्ट सारख्या राज्याचे किमान १० छोटे तुकडे केले असते तर सर्वांचीच प्रगती जास्त झाली असती.

पण धार्मिक अस्मिता मात्र वेगळी आहे. धर्माचे अतिशय उघड शत्रू आहेत त्यामुळे हिंदूंनी एकत्र राहिल्याशिवाय त्यांच्या निभाव ह्या शत्रूपुढे लागणार नाहीए !

शा वि कु's picture

18 Apr 2021 - 12:55 pm | शा वि कु

पूर्ण सहमत.

शा वि कु's picture

18 Apr 2021 - 12:59 pm | शा वि कु

(अ) पूर्ण सहमत :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Apr 2021 - 2:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

" इंग्रजी आणि उर्दूचे फावते"
उर्दु भारतिय भाषा नाही? स्वातंत्र्योत्तर काळात पद्धत्शीरपणे उर्दु काढुन त्या जागी संस्कृताळलेली हिंदी आणली गेली हे खरे पण त्याआधी उर्दुचा वापर मोठ्या प्रमाणावर होता. भगत सिंग ह्यानी त्यांच्या आईला लिहिलेले पत्र हे पंजाबी/हिंदीत नसून उर्दुत होते.

उपयोजक's picture

18 Apr 2021 - 6:35 pm | उपयोजक

देश पारतंत्र्यात आहे हे कळले.पण आपली मातृभाषासुद्धा पारतंत्र्यात आहे हे कळले नाही.

उर्दू ही भाषा मुस्लिम आक्रमकांकडून लादल्या गेलेल्या अरबी, फार्सी शब्दांमुळे निर्माण झाली आहे.
तिचा जन्म जरी भारतात झाला असला तरी तिच्या विटा भारतीय नाहीत. अन्य भारतीय भाषांप्रमाणे ती शेकडो वर्षांच्या भारतीय भाषांच्या उलथापालथीतून निर्माण झालेली नसून आक्रमकांनी लादलेल्या शब्दांतून निर्माण झाली आहे. या भाषेमुळे नुकसान हे की बहुतांश भारतीय मुस्लिम हे ज्या राज्यात राहतात तिथली भाषा हीच एकमेव न वापरता मुस्लिम धर्मीयांची भाषा असा उर्दूला दर्जा देऊन त्यात बोलत राहतात. हल्ली तर फतवा निघालाय की जनगणनेवेळी मातृभाषा उर्दू असे सांगा म्हणून. तस्मात ही भाषा भारतातून जितक्या लवकर जाईल तितका जास्त अापला भारत परकीय आक्रमकांपासून मुक्त होईल. परकीय आक्रमकांची भाषा जी न आल्याने काडीचेही नुकसान भारतीयांचे होणार नाही ती अजूनही अस्तित्वात असणे म्हणजे परकीय जुलमी आक्रमकांनी त्याकाळी केलेल्या अत्याचारांच्या खुणा अज्ञपणाने अजूनही दागिन्यांसारखे मिरवणे होय.

जर त्यांनी ते पंजाबी नाहीतर हिंदीत लिहाली असती तर आज संपूर्ण पंजाब भारतात असता.
म्हणूनच भाषिक अस्मिता गरजेची आहे

इंग्रजी किंवा उर्दूचे फावते ह्याचा अर्थ ह्या दोन्ही भाषांना भाषाशुरांनी त्रास करावा असे अजिबात नाही, माझे तसे म्हणणे नाही. उलट ह्या दोन्ही भाषांना ज्या पद्धतीने प्रत्येक राज्याने त्रास दिला नाही त्याच प्रमाणे इतर भाषांना सुद्धा प्रत्येक राज्याने मुक्त व्यासपीठ द्यावे असे माझे म्हणणे होते.

उर्दू भाषा हि इस्लामिक आक्रमकांनी निर्माण केलेली एक अनौरस भाषा आहे (म्हणून ती वाईट ठरत नाही) उगाच ती भारतीय भाषा म्हणून आपली छाती सर्व भारतीयांनी बडविण्यात अर्थ नाही. कितीही हिंदू पालक आपल्या मुलांना उर्दू माध्यमांत शिकायला पाठवतात किंवा दुसरं भाषा म्हणून उर्दू घ्यायला लावतात ? जवळ जवळ शून्य. उर्दू भाषा भारतीय असली तरी इस्लामिक प्रभुत्वाचे एक प्रतीक आहे. इस्लामिक प्रभुत्व राजकीय दृष्टया संपल्यास हि भाषा आपोआप लुप्त पावेल.

भगत सिंग कोवळ्या वयांत सुद्धा देशासाठी जीव द्यायला तयार होते म्हणून त्यांच्या प्रति मला प्रचंड आदर असला तरी त्याची वैचारिक बैठक फारच खराब होती. उर्दू भाशा ह्या साठी शिकले असावेत कारण इस्लामीक प्रभावाखाली शिक्षण झाले असावे.

---

उपयोजक's picture

18 Apr 2021 - 6:30 pm | उपयोजक

भाषीय अस्मिता ह्या इतकी मूर्खपणाची गोष्ट नाही. (माझे वैयक्तिक मत). कुणाच्याही भाषेला काही मध लागलेला नाही.

इंग्रजी भाषेला मध नक्कीच लागलेला आहे. इंग्रजी ही सर्वात महत्वाची अशी ज्ञानभाषा अाहे. इंग्रजीतून सफाईदारपणे बोलता येत असेल तर चांगला प्रभाव पडतो,माणूस ज्ञानी वाटू लागतो.काहीवेळा असतोसुद्धा कारण इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे असे तर्खडकर सांगून गेले आहेत. तुमचा ग्राहक उत्तरभारतीय किंवा मराठी,अोडिसी,बंगाली,ईशान्येकडचा असेल आणि त्याला इंग्रजी येत नसेल तर आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर हिंदी निदान मोडकंतोडकं तरी यायलाच लागतं. भाषेबाबत कट्टर असणार्‍या तमिळनाडूतही हिंदी शिकणार्‍यांची संख्या वाढते आहे. भाषा पैसे मिळवून देत असेल तर मध नक्कीच लागलेला आहे.

बहुतेक भाषाशूरांचे भाषेतील आपले योगदान शून्य असते.

नक्की काय योगदान हवं भाषेला भाषाशुरांचे? पूर्वजांची भाषा बोलत राहून ती जिवंत ठेवणे हे कमी प्रतीचे योगदान असते का?

इतरांच्या मुलांनी शाळेंत कुठल्या भाषेंत काय शिकावे ह्यावर है मूर्खांचे आपले मत असते.

कितीतरी जागतिक किर्तीचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून मिळाले तर पुढे बराच फायदा होतो.

भाषा शिकून फायदा आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे.

वर सांगितले आहे.जितक्या जास्त भाषा येतील तितका फायदा जास्त.

फायदा फक्त आर्थिक नसून मी सामाजिक आणि वैयक्तिक मनोरंजन हे सुद्धा गृहीत धरले आहे. भाषा शिकून फायदा नाही तर मग का कुणा मुलाने आपला वेळ ह्या खोट्या अस्मितेची पुंगी वाजवण्यात व्यर्थ घालवावी ? ज्याला जी भाषा आवडते ती त्याने शिकावी, बोलावी आणि लिहावी. राजकीय सीमा आणि इतरांची लुडबुड त्यांत अजिबात नको.

मातृभाषेत प्रत्येकाने फायदा बघितला असता तर इंग्रजीव्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख भाषा आतापर्यंत लुप्त झाल्या असत्या. एखाद्याची मातृभाषा हा त्याच्यासाठी सांस्कृतिक ठेवा असतो. त्यात फायदा-तोटा कसा बघणार? शिवाय राज्यभाषा बोलता येणे, ती येत नसेल तर शिकणे याने आदानप्रदान चांगलेच होईल की.त्यात नुकसान काय आहे?

भाषिक अस्मितेने भारतीय भाषांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. सीमावर्ती भागांत भाषांची सरमिसळ होण्याच्या ऐवजी उगाच लोक आपली भाषा श्रेष्ठ म्हणून. भांडत बसतात आणि इंग्रजी आणि उर्दूचे फावते.

उलट आहे. अस्मितांमुळे तर भाषा अजूनही टिकून आहेत. बांग्लादेशात पाकिस्तानकडून उर्दू लादायचा प्रयत्न झाला. तो बांग्ला भाषिकांनी उधळून लावला. त्यातूनच जागतिक मातृभाषा दिन सुरु झाला.भाषिक अस्मिता हा काही फक्त राजकारण्यांचा प्रांत नव्हे. उत्तरभारतात ब्रज,माळवी,अवधि,मैथिली वगैेरे हिंदीच्याच बोलींची गळचेपी करुन शाळेत एकच अशी हिंदीची खड़ी बोली शिकवली जाते.हे त्या त्या त्या बोली बोलणार्‍या लोकांनी पुरेशी अस्मिता न दाखवल्यानेच झाले. पुढच्या पिढ्या कदाचित या बोली बोलणारही नाहीत. मिपावर हिंदी लेख आले तर चालतील का? :)

उर्दूबाबत मात्र सहमत. ही भाषा मुस्लिम आक्रमकांकडून लादल्या गेलेल्या अरबी,फार्सी शब्दांमुळे निर्माण झाली आहे.

मराठीही येते आणि कन्नड सुद्धा असे लोक कमी असल्याने दोन्ही भाषांचे आदान प्रदान कमी होते. हीच स्थिती इतर सर्व भाषांची आहे आणि दिवसेंदिवस भारतीय भाषांचे साहित्यदौर्बल्य वाढत चालले आहे.

भारतीय भाषांमधे साहित्यनिर्मिती वाढून फायदा काय? लेखकांचे नि प्रकाशन संस्थामालकांचे पोट भरावे म्हणून? हल्लीची पिढी गॅजेटस आणि इन्स्टाग्रामवाली आहे. WhatsApp चे मेसेज वाचले तरी पुरे! कथा,कादंबर्‍या, कविता वगैरे वाचनाने आर्थिक फायदा काय वाचणार्‍यांचा?

आपल्या राज्यांत/शहरांत परभाषिक आहेत म्हणून स्थानिकांना राग येतो. पण तोच राग इंग्रजी आणि उर्दूचा येत नाही.

इंग्रजीचा का राग येईल? :) इंग्रजीभाषिक लोक मोठ्या संख्येने नाहीयेत भारतात. समजा जरी असते तरी इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा शिवाय ज्ञानभाषा असल्याने ती जितकी येईल,सराव होईल तितका फायदाच आहे.

महाराष्ट्र सारख्या राज्याचे किमान १० छोटे तुकडे केले असते तर सर्वांचीच प्रगती जास्त झाली असती.

तेलंगण,छत्तीसगड,उत्तराखंड,झारखंड यांची मूळ राज्यापासून वेगळे झाल्यावर सर्व क्षेत्रात प्रगती झाली आहे का?

Rajesh188's picture

18 Apr 2021 - 7:03 pm | Rajesh188

हे जगातील दिग्गज आहेत आहेत तंत्र ज्ञान बाप आहेत त्यांचे इंग्रज वाचून काही च अडले नाही.
ना रशिया,जर्मनी,फ्रान्स ह्यांचे इंग्लिश वाचून काही आडले हे सर्व देश प्रगत देश आहेत.
फक्त भारतीय आणि त्याच्या बाजू चे दोन चार गरीब देश ह्यांना च फक्त इंग्लिश ज्ञान भाषा वाटते ..
ह्याचे कारण गुलामी करण्याची वृत्ती आणि स्वाभिमानाचा अभाव.
माणसाला भाषेचा अभिमान असलाच पाहिजे.
फक्त संपर्क करण्या पुरताच भाषेचा उपयोग नसतो..भाषा आणि संस्कृती ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे..संस्कृती संपली की स्वतःची ओळख संपली,अस्तित्व संपले.
आणि भाषा संपली की संस्कृती पण संपते.

चौकस२१२'s picture

19 Apr 2021 - 5:05 am | चौकस२१२

फक्त भारतीय आणि त्याच्या बाजू चे दोन चार गरीब देश ह्यांना च फक्त इंग्लिश ज्ञान भाषा वाटते ..
हो फ्रेंच आणि जर्मन लोकांनी आपली स्वतःची भाषा जपून उत्तम प्रगती केली आहे हे खरे आहे पण म्हणून इंग्रजी ज्ञान भाषा नाही ! असल्या अगाध प्रतिसादाबद्दल काय बोलणार ! कप्पाळ

> इंग्रजी भाषेला मध नक्कीच लागलेला आहे.

> भाषा पैसे मिळवून देत असेल तर मध नक्कीच लागलेला आहे.

ह्याच्याशी मी १००% सहमत आहे. मी कदाचित योग्य प्रकारे लिहिले नाही पण माझा मूळ मुद्दा हाच होता कि कुठल्याही भाषेंत intrinsic असे काहीच वैशिष्ट्य नाही त्यामुळे ज्याला "फायदा" दिसेल तो ती ती भाषा शिकेल. भारतांत मातृभाषा इंग्रजी असणारे लोक जवळ जवळ शून्य असले तरी भाषेचा प्रसार प्रचंड वेगाने झाला आहे. हिंदीचे सुद्धा तसेच आहे. हिंदीचा प्रसार कुणी "हिंदी प्रेमीने" कष्ट घेतले म्हणून झाला नाही तरी क्रिकेट, बॉलिवूड इत्यादी माध्यमांनी त्याचा प्रसार ऑरगॅनिक पद्धतीने केला आहे.

त्यामुळे माझी मातृभाषा जगांत श्रेष्ठ अशी प्रौढी मिरविण्यात अर्थ नाही. तुमची भाषा श्रेष्ठ म्हणून ती शिकण्यात कुणालाही रस असणार नाही (असण्याची गरज सुद्धा नाही) फायदा असेल तर लोक शिकतील.

> नक्की काय योगदान हवं भाषेला भाषाशुरांचे?

भाषेचा अभ्यास, भाषांतरे, दर्जेदार साहित्य निर्माण करण्याची आवड आणि त्याला प्रोत्साहन दूर देशांत आणि दूर प्रदेशांत जाऊन आपल्या भाषेचा अभ्यास होईल ह्याची तळमळ दाखवणे हे सर्व अपेक्षित आहे. संस्कृत भारती चे अनेक स्वयंसेवक हि तळमळ दाखवत असतात. नाही चिरा नाही पणती ह्या न्यायाने आपले कर्तव्य बजावतात ते खरे शूर आणि क्षत्रिय. आपल्या शहरांत इतर भाषांचे बोर्ड लावले म्हणून त्यांना धमकावणारे ते डोमकावळे.

आमचे एक दूरचे स्नेही एक मराठी मासिक चालवायचे. ५ रुपये किंमत नि अत्यंत स्वस्त कागदावर स्वतः छपाई करून स्वतः पोस्टाने आपल्या सभासदांना पोचवायचे. ह्या मासिकाचे मूळ ध्येय म्हणजे जगातील विविध भाषांतील कथा भाषांतर करून प्रसिद्ध करणे. जपान, रशियन, स्वीडिश अश्या अनेक भाषांतील कथा ह्यांत प्रकाशित होत होत्या. स्वखर्चाने हौस म्हणून चालविणाऱ्या ह्या मासिकाचा खर्च शेवटी त्यांना झेपेनासा झाला त्यामुळे त्यांनी एका संपादकीयात आपण काही महिन्यांनी हे मासिक बंद करणार असे घोषित केले.

असे म्हणतात कि शरद पवार हे स्वतः हे मासिक वाचायचे. ते संपादकीय वाचतांच त्यांनी तात्काळ आपली सूत्रे हलवून मासिक बंद पडणार नाही ह्याची काळजी घेतली. इतर काहीही असो भाषाशुरांकडून असे वर्तन अपेक्षित आहे. (इथे पवार आणि संपादक दोघेही भाषा शूर आहेत).

> कितीतरी जागतिक किर्तीचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून मिळाले तर पुढे बराच फायदा होतो.

ठीक आहे. सल्ला ह्या तज्ज्ञांनी द्यावा. तो सल्ला घ्यायचा कि नाही हे पालकांनी ठरवायचे. (तेलगू लोक जे मुंबईत राहतात त्यांनी आपल्या पाल्यांसाठी तेलगू माध्यमाची शाळा चालविली तर ते ह्या भाषा शूरांना चालेल काय ? ). सल्ला चुकीचा आहे असे मी म्हणत नाही, लादणे चुकीचे आहे.

> मातृभाषेत प्रत्येकाने फायदा बघितला असता तर इंग्रजीव्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख भाषा आतापर्यंत लुप्त झाल्या असत्या

म्हणूनच फायदा हाय शब्दांत मी "संस्कृतीक ठेवा" वगैरे गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. मला जपानी भाषेचे प्रेम म्हणून मी जपानी भाषा शिकले आहे. आर्थिक फायदा नसला तरी मला भावनिक फायदा आहे. पण तेच इथे जबरदस्ती केले म्हणून इतरांना एखादी भाषा सांस्कृतिक ठेवा वाटेल काय ? (सुमित राघवन सारखा तामिळ माणूस स्वतःहून मराठी शिकून त्यांत भरीव योगदान करतो आणि तसेच इतरांकडून अपेक्षित आहे पण सरकारी दंडुका वापरून हे अचिव्ह करणे शक्य नाही)

> अस्मितांमुळे तर भाषा अजूनही टिकून आहेत.

तुम्ही स्वतःच आपल्याच मुद्यांचे खंडन केले आहे. भाषा हा विषय एकदा सरकारी हातांत गेला तर त्या भाषेचे नुकसान तर होतेच पण त्याशिवाय त्या राज्यांत असलेल्या इतर भाषांचे सुद्धा प्रचंड नुकसान होते. ब्रज भाषा किंवा भोजपुरी सारखी सुंदर भाषा ह्यांचे नुकसान त्या लोकांत अस्मिता नसल्याने झाला हा तुमचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे उलट ह्या भाषांचे नुकसान त्यांच्या राज्यांनी स्वतःला "हिंदी अस्मितावादी" ठरविल्याने झाला आहे. पण ह्या लोकांनी भोजपुरी सिनेमा, कविता, गाणी इत्यादीतून भाषा प्रचंड प्रेमाने जिवंत तर ठेवली आहेच पण महाराष्ट्रासारख्या राज्यांत सुद्धा आम्हाला भोजपुरीचे काही शब्द ठाऊक आहेत.

महाराष्ट्रांत मराठी सोडून इतर भाषा नाहीत काय ? आगरी भाषा सुंदर आहे, कोंकणी आहे, इतर सुद्धा असतील पण महाराष्ट्र म्हणजे मराठी असे समीकरण विनाकारण केल्याने पुणेरी तथाकथित "शुद्ध" भाषा सर्वांवर लादली जाते हे चुकीचे नाही काय ?

> भारतीय भाषांमधे साहित्यनिर्मिती वाढून फायदा काय? लेखकांचे नि प्रकाशन संस्थामालकांचे पोट भरावे म्हणून?

आपले लेखन पाहून आपण विचारपूर्वक लिहिता असेच मला वाटत आले आहे त्यामुळे कदाचित हा मुद्दा तुम्ही वादाच्या भरांत लिहिला असावा असे मला तरी वाटते. ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानेश्वरांनी पैसा केला नाही. पण ह्या पुस्तकाने एक अर्थाने मराठी साहित्याचा पाया रचला.

साहित्य निर्मिती फक्त छापील पुस्तकांनीच होते असे नाही किंवा कुणाचे तरी पॉट भरावेच म्हणून होते असे नाही. मिपा वरील आमचे वाद सुद्धा साहित्य आहेत आणि इंस्टाग्राम मधील मराठी मीम सुद्धा साहित्य आहेत. ह्या सर्वानी भाषा समृद्ध होते. जयंत कुलकर्णी ह्यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतर केले आहे. ते ह्यातून विशेष पैसा करतात असे मला वाटत नाही पण त्यांच्या कामाने मराठी भाषा समृद्ध होत आहे कि नाही ?

भाषेची समृद्धी महत्वाची आहे. एकदा दर्जेदार साहित्य निर्माण झाले कि आपोआप त्याचे सांस्कृतिक परिणाम वाढत जातात. लोक कथा वाचतात आणि त्याचे मिम बनत जातात. त्यातून टीव्ही आंणि चित्रपट सृष्टी ह्या कथा लोकांसमोर आणतात, मग तरुणाईला ते भुरळ घालतात. तसाच दम असला तर मग इतर भाषांत ह्या गोष्टी भाषांतरित केल्या जाऊन मूळ भाषेशी लोकांचे प्रेम वाढते. समाज प्रगत झाला आणि श्रीमंत झाला तर इतर समाज त्याची कॉपी करू लागतात.

जपान हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे. जपानी मंगा कॉमिक्स ने जगांत सर्वत्र लोकांना भूरळ घेतली आहे. त्यातून चित्रपट, संगीत इत्यादींवर जपानी भाषेचा प्रचंड प्रभाव अमेरिका सारख्या देशांत सुद्धा पडला आहे.

> तेलंगण,छत्तीसगड,उत्तराखंड,झारखंड यांची मूळ राज्यापासून वेगळे झाल्यावर सर्व क्षेत्रात प्रगती झाली आहे का?

तेलंगणाचा डेटा यायला वेळ आहे पण इतर सर्व राज्यांची प्रगती बऱ्यापैकी वाढली आहे. आणि फायदा फक्त छोट्या राज्याचा होतो असे नाही तर मूळ राज्याची प्रगती सुद्धा वाढते.

https://www.indiaspend.com/jharkhand-uttarakhand-the-post-split-growth-s...

उपयोजक's picture

19 Apr 2021 - 6:54 pm | उपयोजक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

हा मुद्दा तुम्ही वादाच्या भरांत लिहिला असावा

वादाच्या नाही पण त्राग्याने नक्कीच लिहिला आहे. त्याबद्दल क्षमस्व. _/\_ पण तो प्रतिसाद तुम्हाला नव्हता तर एकूणच मराठी प्रकाशनविश्वाबद्दल तक्रारीचा सूर होता. कथा,कादंबर्‍या,चरित्रे यांचे घाऊक उत्पादन मराठी प्रकाशक करतात. ही अशा विषयांवरची पुस्तके वाचण्याऐवजी आजची पिढी युट्यूबवर,इन्स्टावर जास्त रमते. मग ही पुस्तके केवळ मराठीचा बर्‍यापैकी गंध असलेले मध्यमवयीन आणि जेष्ठांपुरताच राहणार. तरुण पिढी काय वाचते,त्यांना पुस्तक वाचनाकडे कसे वळवावे याचा काहीच अभ्यास एकही प्रकाशक करताना दिसत नाही किंवा तसे प्रयत्न केल्याचेही दिसत नाही. माझा आक्षेप पुस्तके,प्रकाशन यांना नसून तरुणांनी स्वत:हून वाचावीत असे बदल मराठी पुस्तकविश्वात होत नसल्याबद्दल होता. _/\_

शा वि कु's picture

18 Apr 2021 - 1:17 pm | शा वि कु

भाषाशुद्धीची परिभाषा काळ आणि स्थळानुरूप कशी बदलते ह्यावर हा एकदम वाचनीय लेख आहे. सारांश-

एखाद्या भाषिक समूहाला स्वत:ची सोडून कुठली भाषा आपलीशी करावीशी वाटते आणि कुठली परकीय वाटते, कुठल्या भाषेचा संसर्ग हवासा वाटतो आणि कुठल्या भाषेचा नकोसा, या प्रश्नांची उत्तरं बहुतांशी राजकीय आहेत. इथे राजकीय या शब्दात सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक सत्ताही अभिप्रेत आहे.

यावरुन आठवलं... पुनेरी भाशा प्रमाण मानली जावी असा एक मतप्रवाह आहे त्यात कितपत तथ्य आहे ?

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2021 - 11:48 pm | श्रीगुरुजी

त्याला पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाणित मराठी म्हणतात.

गॉडजिला's picture

19 Apr 2021 - 8:19 am | गॉडजिला

?????

चौकस२१२'s picture

19 Apr 2021 - 5:30 am | चौकस२१२

- भाषिक,धार्मिक अस्मितां महत्वाची आहे पण त्याचा अतिरेक आणि "उर बडवणे " हे होऊ नये एवढेच वाटते
- स्वतःची भाषा नक्कीच जोपासणे महत्वाचे आहे .. उगाच अति उदारमतवादी होऊन " कम्युनिकेट झाल्यास कारण " हे सोंग पटत नाही त्यात मातृभाषेची लाज आहे अशा लोकांना असे वाटते ( तसे मान्य कोणी करणार नाही म्हणा )
- यूरोपात देश तशी भाषा आहे ( काही अपवाद सोडले तर म्हणजे स्विसीझरलंड मध्ये ३ भाषिक लोक राहटतात ) जवळ जवळ तसेच भारतातात झाले भाषावार प्रांत रचने मुळे आणि त्यात काही फार गैर झाले असे वाटत नाही सीमा भागात प्रश्न होणार काही इलाज नाही
- प्रमाण भाषा काही ठिकाणी असणे महत्वाचे आहे
- मुद्दामून स्व भाषेत इतर भाषेतील शब्द घुसडू नयेत विशेष म्हणजे सोपा आणि चांगला शब्द स्व भाषेतउपलब्ध असताना ...
- मराठी माध्यमात शिकून काह्ही बिघडले नाही हे खरे , जग फिरलो , राहिलो बऱ्यापैकी यशस्वी झालो पण त्याचा बरोबर उत्तम जगातिक भाषा हि यावी .. मला एवढे वर्षे हे कळले नाही कि भारतातात इंग्रजी माध्यमातील शाळातून १०० गुणांचे मराठी शिकवायाला काय हरकत आहे ?

- भाषा कधी कधी धर्मापेक्षा जास्त लोकांना जवळ आणते हे जरी खरे असले तरी पण ते तेवढयापुरतेच असे वाटते ( बांगलादेश स्वतंत्र झाला तेवहा इस्लाम पेकशा त्यांना बंगाली भाषा आणि संस्कृती महत्वाची होती पण आता पहा तू नाली वॉर बरेच बांगलादेशी "पाकिस्तान "उम्मा " चा भाग असल्यामुळे बांगलादेशला जास्त जवळचा असाच "सूर" काढतातत

- धर्माबद्दल काय बोलणार टोकाला जाऊ नये एवढेच , आपले २ पैसे म्हणतात " मी मंदिरात जाणार नाही पण बहुसंख्यांकांना मंदिर बांध्यानाचा हक्क आहे त्याला पाठिंबा मात्र नक्की देईन "

Rajesh188's picture

19 Apr 2021 - 8:51 am | Rajesh188

अस्तित्व टिकवणयासाठी साठीच सर्व धडपड असते आपल्या परंपरा,संस्कृती, भाषा,हे सर्व टिकले तर च आपले अस्तित्व राहील नाही तर नाही अशी भीती नेहमीच लोकांच्या मनात असते.
आपले आदर्श,आपल्या समजुती,आपली श्रद्धा स्थान ह्यांना धक्का लागलेला लोकांना आवडत नाही.
त्यांच्या वर आक्रमण म्हणजे स्वतः ला धोका ही भावना तीव्र असतेच.
जसे वर सांगितले त्या प्रमाणे Bangladesh ल भारताने किती ही मदत केली तरी त्यांना पाकिस्तान च जवळचा वाटणार.
युरोपियन लोक फक्त ज्ञान वाटत असतात पण ते पण कट्टर धार्मिक आणि संस्कृती प्रेमी च असतात.
आपल्या साड्या तेथील बायका नसतील का? किंवा आपली ज्वारी ची भाकरी त्यांच्या रोज च्या जेवणात असेल का?
आपण पिझ्झा पण स्वीकारला आणि मिनी स्कर्ट पण स्वीकारला.
हे घडले फक्त इंग्रजी भाषेच्या आक्रमणं मुळे
भाषेचे आक्रमण ही साधी गोष्ट नाही.
जपान नी इंगर्जी स्वीकारली नाही म्हणून त्यांनी पिझ्झा पण सर्रास स्वीकारला नाही.

गॉडजिला's picture

19 Apr 2021 - 8:56 am | गॉडजिला

हा विचारच केला न्हवता कधी, भाषेचे आक्रमण चिन्तादायक प्रकार वाटतोय

आपण योग्य बोलता

इंग्लंड चे राष्ट्रीय व्यंजन काय असेल बरे ? :)

G B हे असावे
किंवा U K, पण U हा तर स्वर झाला. ;)

Rajesh188's picture

19 Apr 2021 - 1:07 pm | Rajesh188

चिकन टिक्का मसाला म्हणत आहात का? तसे तुम्ही म्हणत असाल तर तो अन्न पदार्थ इंडियन,पाकिस्तानी ह्या लोकांनी ब्रिटन मध्ये प्रसिद्ध केला.
असा पण भारत त्यांचा गुलाम होता त्या मुळे १५० वर्ष त्यांचा आपला संबंध होता.
पण ज्वारी ची भाकरी, डाळ भात,चपाती,त्यांनी स्वीकारली नाही.
चिकन टिक्का मसाला अपवाद ठरतो.त्यांनी काही सिद्ध होत नाही.

भाषेचे आक्रमण ही साधी गोष्ट नाही.
सहमत

चौकटराजा's picture

19 Apr 2021 - 5:05 pm | चौकटराजा

यातील बटाटा भारतीय नाही अन पाव तर नाहीच नाही !

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 7:33 am | शा वि कु

+१

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 7:36 am | शा वि कु

अस्मितेचा विचार पिझ्झा आणि स्कर्ट पाशी येतो, तसा गाडी, इन्सुलिन, अँटी बायोटिक्स इथे का येत नसावा बरे ?

Rajesh188's picture

20 Apr 2021 - 8:52 am | Rajesh188

उलट अस्मिता खूप जास्त आहे .भारतीय लोकांना त्यांचे प्राचीन वास्तू शास्त्र,आयुर्वेद, योग विद्या,मंत्र ची ताकत ह्या विषयी खूप तीव्र अभिमान आहे तीच बाब ज्यांना प्राचीन संस्कृती आहे त्या सर्व देशात आहे.
आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वास असतो.

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 9:45 am | शा वि कु

आधुनिक वैद्यकशास्त्राचा जो कोपर्यातला अविश्वास आहे, त्याचे खऱ्या जीवनात कुठे कुठे फलित झाले आहे ब्रे ? कि फक्त तात्विक अविश्वास आहे ?

आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वास असतो.
डब्लु टी अ‍ॅफ ?

शास्त्र,आयुर्वेद, योग विद्या,मंत्र ची ताकत ह्या विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वासच असतो असे म्हणायचे असेल

आधुनिक वैद्यक शस्त्र विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वास असतो.
डब्लु टी अ‍ॅफ ?

शास्त्र,आयुर्वेद, योग विद्या,मंत्र ची ताकत ह्या विषयी आज पण एका कोपऱ्यात अविश्वासच असतो असे म्हणायचे असेल

चौकस२१२'s picture

20 Apr 2021 - 10:22 am | चौकस२१२

आपले विधान नक्कीच विचार करण्यासारखे आहे ....
अश्या विचारांमागे एक कारण असू शकेल
ते म्हणजे ... दुसऱ्याचे चांगले ते घयावे ... उगाच अंधानुकरण करू नये ..
म्हणजे --- सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केली हे "चांगले घेणे" तर कारण नसताना ४०° मध्ये टाय घालावे हे अंधानुकरण
पिझ्झा खाऊ लागणे यात वाईट काहीच नाही ..एक वेगळा पदार्थ म्हणून ते "चांगले घेणे " या सदरातच मोडते पण "पिझ्झा खाणे म्हणजे उच्चभ्रू आणि भाकरी पिठले म्हणे "डाऊन मार्केट " हि वृत्ती असणे हे चुकीचे / दांभिकतेच
माहित नाही मी नीट मांडलाय कि नाही .. यात आपण निदर्शनास आणलेलया विरोधाभासाचे समर्थन करीत नाहीये तर एक त्या मागचा वेगळा अर्थ आणि कदाचित त्यामागचे विचार मांडतोय

मुक्त विहारि's picture

20 Apr 2021 - 10:27 am | मुक्त विहारि

In Rome, do as Romans do

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2021 - 12:25 pm | टवाळ कार्टा

याचबरोबर
In the Rome, do the Roman =))

मुक्त विहारि's picture

20 Apr 2021 - 7:07 pm | मुक्त विहारि

+1

वामन देशमुख's picture

20 Apr 2021 - 9:37 pm | वामन देशमुख

आम्ही तर "Be romantic while in Rome." असं शिकलो होतो कॉलेजला असताना!

;)

सुबोध खरे's picture

21 Apr 2021 - 7:43 pm | सुबोध खरे

In Rome, do as Romans do

But if you are pope, behave as pope, even if you are in rome.

हे तत्व मी आयुष्यभर पाळलं

सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केली
नाही. स्मार्ट म्हणुन केली. सुट्सूटित तर लुंगी अस्ते पण स्मार्ट म्हणुन पोरं घरात ट्रॅक पॅंट घालतात. ज्या दिवशी पिठलं खाणारे लोक स्मार्ट, यशस्वी, जगावर प्रभुत्व गाजवणारे, यशस्वी आंत्रप्रिन्योर, गो गेटर वगैरे वगैरे मानसिकता बनेल त्या दिवशी पिझ्झा डाउनमार्केट फुकाच वाटेल

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 7:00 pm | शा वि कु

ह्यात परकीय संस्कृतीचा कितपत प्रभाव आहे ?
काही गोष्टी डाऊन मार्केट समजणे हे परकीय संस्कृतीचा शिवाय सुद्धा होत असतेच की. गावरान भाषा, हाणामारीचे बॉलिवुड सिनेमे, ईं गोष्टी काहींकडून डाऊन मार्केट समजल्या जातात ते काय परकीय संस्कृतीमुळे नसावे. आपल्याला आवडणारे जेवण, कला, साहित्य, कपडे इत्यादी श्रेष्ठ आणि बाकी कनिष्ठ हा भाव परकीय ऑर नो परकीय संस्कृती असतोच.

स्वतःला उच्चभ्रू समजण्यासाठी काही तरी मार्ग सापडतच असतो.

उदाहरणादाखल _ संदीप खरेला डाऊन मार्केट समजणारी कम्युनिटी आहे. ती काय संदीप खरे सोडा आणि रॉबर्ट ब्राऊन वाचा असं नाही म्हणत. संदीप खरे सोडा आणि अरुण कोलटकर वाचा म्हणते.

मी सुद्धा नीट मांडले की नाही माहीत नाही.

म्हनुन डाउन मार्केटसुध्दा नेमके ठरवता येणार नाही...

घराणेदार शास्त्रिय संगितवाले उडत्या चालीची गाणी म्हननारी नेहा कक्कर डाउनमार्केट म्हणतील मग भलेही वर्षातील सर्व चार्टबस्टर तिने गायले आसोत...

पुणेरी भाषा प्रमाण म्हणत तिला अपमार्केट ठरवणारे भेटतील तर कोणी त्या प्रमाणाला मराठीचा संस्कृतसोबतचा व्याभिचार ठरवेल... थोडक्यात काय तर मार्केट बदलत असते.

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:52 am | उपयोजक

प्लेन पँट घालणारे चुणीची पँट घालणार्‍यांना मागासलेले समजतात.

चौकस२१२'s picture

21 Apr 2021 - 6:15 pm | चौकस२१२

शविकूं नाही कळला आपला मुद्दा

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:48 am | उपयोजक

ती नसेल तर एकच भाषा बोलणारे लोक एकमेकांशी नीट संवाद साधू शकतात. विदर्भातला माणूस पुण्यात येऊन अजून वंडी आली नाही म्हणाला तर पुणेरी माणसाला तो गाडीबद्दल बोलतोय हे समजणार नाही. यासाठी प्रमाणभाषा गरजेची असते.

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:50 am | उपयोजक

ती नसेल तर राज्यसरकार शासकीय कागदपत्रे कोणत्या भाषेत काढणार? मालवणीत शासकीय अध्यादेश काढला तर किती मराठी लोकांना तो समजेल?

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:50 am | उपयोजक

ती नसेल तर राज्यसरकार शासकीय कागदपत्रे कोणत्या भाषेत काढणार? मालवणीत शासकीय अध्यादेश काढला तर किती मराठी लोकांना तो समजेल?

मालवणी,कोकणी,राजस्थानी,भोजपुरी,मैथिली,आणि अशा अनेक भाषा ह्या बोली भाषा आहेत त्यांची लिपी नाही त्या लिहल्या जातं नाहीत फक्त बोलल्या जातात
तामिळी ही जुनी भाषा आहे असे म्हणतात
हिंदी भाषा ही उर्दू भाषेचं पिल्लू आहे.
मराठी भाषा हिंदी पेक्षा जुनी आहे.
महारष्ट्र मध्ये पाहिले म्हणजे १०० वर्ष पूर्वी मोडी भाषा होती ती मराठीत वाचली जायची की काय
हे माहीत नाही.
मोडी जर मराठीत वाचली जात असेल तर देवनागरी लिपी महाराष्ट्रात कधी पासून वापरात आली ह्याचा शोध घेतला पाहिजे.

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 5:06 pm | उपयोजक

सध्याचा जो महाराष्ट्र आहे त्या भूभागावर कोणती भाषा बोलली जात होती ते कोणी सांगू शकेल का?

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 5:15 pm | उपयोजक

टोपे साहेब नाशिकमधे घडलेल्या दुर्घटनेबद्दल हिंदी वाहिन्यांना हिंदीत माहिती सांगत होते. दक्षिणेतल्या चार राज्यांचे मंत्री त्यांच्या राज्यात घडलेल्या अशा मोठ्या घटनांबद्दल हिंदी वाहिन्यांच्या सोयीसाठी हिंदीतून माहिती देतात का? देत नसतील तर महाराष्ट्राचे मंत्री हिंदी वाहिन्यांची आयती सोय का करुन देतात? आपल्याला हिंदीतून सहज बोलता येतं हे आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ते हिंदीतून बोलतात का? या हिंदी वाहिन्यांना दक्षिण भारतीय मंत्री हिंदीतून बाईट देत नाहीत तेव्हा त्या वाहिन्या काय करतात? जे करतात तेच महाराष्ट्रात का करत नाहीत?

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2021 - 5:19 pm | श्रीगुरुजी

हिंदी बोलण्याची खाज महाराष्ट्रातील बहुसंख्य नेत्यांना आहे. यात सर्वात प्रथम क्रमांकावर आहेत फडणवीस. आपले प्रत्येक वाक्य ते मराठी पाठोपाठ हिंदीतही सांगतात.

विदर्भात, विशेषतः वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ह्या भागांत, हिंदी सर्रास बोलली जाते...

चलो, आते क्या

ठेले पे जाएंगे

बहुत बढिया

क्या बात है

बिलकूल सही

घरी मराठी आणि बाहेर जास्त करून हिंदी, हे वैदर्भिय लोकांना नविन नाही...

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2021 - 6:43 pm | श्रीगुरुजी

विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही. राज्याचा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेता या पदावर असताना हिंदीत का बोलतात? वर मखलाशी म्हणजे हिंदी वाहिन्यांसाठी हिंदीत बोलतो असे निर्लज्ज समर्थनही करतात.

विदर्भात माडिया किंवा तत्सम भाषासुद्धा बोलली जाते. मग त्या भाषेत हे का बोलत नाहीत?

हिंदीभाषिक राज्याचे मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेता मराठी वाहिन्यांसाठी मराठीत बोलतात का?

फक्त हिंदी का? इंग्लिश, तामिळ, कन्नड, गुजराती अशा वाहिन्यांसाठी त्या त्या भाषेत का बोलत नाहीत?

मुळात फडणवीस व इतर नेते प्रत्येक वाक्य हिंदीत सांगत असतील, तर हिंदी वाहिन्या महाराष्ट्रात एकही मराठी कर्मचारी नोकरीत न घेता सर्व कर्मचारी थेट उत्तर प्रदेश, बिहार वगैरे राज्यातून भरतील कारण कर्मचाऱ्यांना मराठी येण्याची गरजच नाही.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वगैरे करताना मराठीत बोलतात. हिंदी वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करताना प्रत्येक वाक्याचे हिंदी भाषांतर खालील पट्टीत दिसत राहते. म्हणजे हिंदी वाहिन्यांना हिंदीत सांगण्याची अजिबात गरज नाही. ठाकरेंच्या जागी फडणवीस असते तर फेसबुक लाईव्ह आधी मराठीत व नंतर ते जसेच्या तसे हिंदीत सांगितले असते.

कोणत्या राज्यात सर्व निवेदने स्थानिक भाषेच्या बरोबरीने हिंदीत सुद्धा सांगितली जातात?

कारण,

तुमच्या आणि माझ्या मैत्रीत, हा वादाचा मुद्दा आहे आणि तो मी तरी टाळलेलाच बरा ....

जून किंवा जुलै महिन्यात, पुण्याला येत आहे... मस्त पैकी बियर पिऊ आणि इतर चर्चा करू...

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2021 - 7:33 pm | श्रीगुरुजी

चालेल. तुम्ही बिअर प्या. मी कॉफी घेईन.

मुक्त विहारि's picture

21 Apr 2021 - 8:44 pm | मुक्त विहारि

पेय महत्वाचे नाही, गप्पा महत्वाच्या

डॅनी ओशन's picture

22 Apr 2021 - 9:24 am | डॅनी ओशन

बाद घालू इच्छित नाही मंजी काय हॉं?

१. गाडीभर पुरावे आहेत असे कोण म्हणाले ?

२. सकाळी सकाळी शपथविधी कोण उरकला ?

३. कोणाच्या भाच्याला वेळेपूर्वी लस मिळाली ?

ह्याची उत्तरे हवी आहेत, नाहीतर गोल गोल राणी.

खरेच कट्टा होणार असेल तर मलाही यायला आवडेल मिपाकरांना भेटणे म्हनजे देव भेटण्याचा अनुभव आस्तो आसे म्हणतात. बसुच एकदा कट्टा करायला. मला मात्र बडवायजर लागते, हार्ड असेल तर मजाच और.

Rajesh188's picture

21 Apr 2021 - 7:47 pm | Rajesh188

तुमच्या मता शी सहमत आहे.कोणताच मुख्यमंत्री स्थानिक भाषे व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत स्टेटमेंट देत नाही.

मराठी_माणूस's picture

22 Apr 2021 - 11:30 am | मराठी_माणूस

हिंदी भाषिकांची आपण अरेरावी सहन करतो म्हणुन ते अरेरावी करत रहातात.
एक जुना प्रसंग आठवतोय, TV वर पाहीलेला. आपले एक मुख्यमंत्री पत्रकारांना नुकत्याच घडलेल्या घटने बद्दल माहीती देते होते. सर्व पत्रकार त्यांच्या भवती कोंडाळे करुन प्रश्न विचारत होते. त्यात एका हिंदी चॅनल ची पत्रकार सतत "हिंदी मे बोलिए , हिंदी मे बोलिए " असे म्हणत होती. ते बघुन अतिशय चीड येत होती.
पण मुख्यमंत्र्यांनी न चिडता तिला , "बताता हुँ" म्हणत हिंदीतुन उत्तर दिले.
विनंती समजु शकतो पण तिच्या बोलण्यात सरळ सरळ उध्दटपणा होता.

Rajesh188's picture

22 Apr 2021 - 11:55 am | Rajesh188

आपलेच मुख्यमंत्री एक नंबर चे भित्रे आणि आणि दिल्ली ची गुलामी करणारे असतात.
हिंदी ही राष्ट भाषा आहे असा ह्यांचा गोड गैर समज असतो.
राज ठाकरे ना मुख्यमंत्री करा एका पण हिंदी न्यूज चॅनल चे रिपोर्टर त्यांना हिंदीत बोला असे म्हणणार नाहीत .स्वतःच द्विभाषिक व्यक्ती बरोबर घेवून येतील.
मान सन्मान पाहिजे असेल तर कणा ताठ असावा लागतो.
छ्त्रपती ना औरंगजेब बादशहा नी चुकीच्या रांगेत उभे करून त्यांचा अपमान केला तेव्हा त्यांनी भर दरबारात बादशाह ला सुनावले होते.
शत्रू च्या ताब्यात असून सुद्धा.
ही आपली परंपरा आहे.
पण मुख्यमंत्री मंडळी खुर्ची साठी किती ही झुकतील.

किती जणांना पटते? मराठी भाषेतून अरबी, फार्सी, पोर्तुगीज शब्दांची हकालपट्टी करणे हे जुलमी परकीयांची गुलामगिरी झिडकारुन स्वातंत्र्य मिळवणे आहे का?

वैयक्तिक मला तरी ती पटते. आता जरी माझ्या लेखनात जुलमी परकीयांनी लादलेले काही शब्द असले तरी ते माझे मराठी लेखन सर्वांना सहज समजावे म्हणून वापरले आहेत. आपण सर्वांनीच अरबी, फार्सी, पोर्तुगीज शब्द मराठीतून हाकलून लावल्यास मराठी स्वतंत्र होईल. त्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत एकट्यादुकट्याने हे साध्य होणार नाही.

मुक्त विहारि's picture

21 Apr 2021 - 6:00 pm | मुक्त विहारि

मान्य आहे

मिपावर कुणीतरी मराठीत प्रचलित झालेले ऊर्दू -अरबी -फारसी -पोर्तुगीज- इंग्रजी वगैरे शब्द आणि त्यांना सावरकरांनी वा अन्य कुणी सुचवलेले संस्कृतोद्भव /मराठी शब्द यांची एक यादी द्यावी त्यात वाचकांनी भर घालावी असे सुचवतो. असा एकादा धागा यापूर्वी मिपावर आलेला असल्यास कृपया त्याचा दुवा द्यावा.

उपयोजक's picture

23 Apr 2021 - 5:57 pm | उपयोजक

तसेच मशारनिल्हे धाग्यात आता फारसे प्रचलित नसलेले शब्दही द्यावेत जेणेकरून हल्लीच्या पिढीस देखील त्यांचा बोध होईल.