शिक्षणाचा जिझीया कर अर्थांत Right To Education कायदा

साहना's picture
साहना in काथ्याकूट
9 Mar 2016 - 6:04 am
गाभा: 

शिक्षणाचा अधिकार (RTE) हा कायदा काँग्रेस सरकारने पास केला. काहीही विरोध न होता सोनिया गांधी ह्याचा हा कायदा संसदेत विरोध न होता पास झाला. ह्या कायद्याची स्तुती जवळ जवळ सर्वच लोकांनी केली. महाराष्ट्रातील भाजप सरकार सुद्धा हा कायदा अतिशय तडफेने लागू करत आहे आणि मोडी सरकारच्या एका समितीने हा कायदा अकरावी बारावी साठी सुद्धा लागू करावा अशी मागणी केली आहे.

माझ्या मते मागील ६५ वर्षांत जेव्हडे कायदे सरकारने पास केले त्यातील RTE हा कायदा सर्वाधिक धोकादायक असून हा कायदा अतिशय तातडीने रद्द बातल केला पाहिजे. वास्तविक पाहता हा कायदा जेंव्हा मी लोकांना समजावून सांगितला तेंव्हा त्याचे सुद्धा तेच मत बनले. ह्या कायद्याच्या बाबतीत लोकां मध्ये प्रमुख (गैर) समज आहेत ते मी इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुद्य वाचकांनी आपले मत प्रदर्शन करावे अशी विनंती आहे.

- हक्क म्हणजे काय ?

शिक्षण हि फार चांगली गोष्ट आहे ह्यांत कुणाचेच दुमत नाही. सर्व मुलांना शिक्षण मिळावे ह्यासाठी सरकारच नाही पण आम्ही सुद्धा हातभार लावतो. आम्ही सर्वानीच आपल्या आयुष्यांत कधी न कधी निस्वार्थ भावनेने शाळा, विद्यार्थी किंवा शिक्षक ह्यांना आर्थिक मदत केली आहे.

पण शिक्षण हा हक्क असू शकतो काय ? ह्या प्रश्नावर थोडा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. समजा एकाद्या माणसाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. अश्या परिस्थिती मध्ये त्याला जर कुणी मुत्रपिंडाचे दान केले तर फार चांगले होयील असे आम्हा सर्वांनाच वाटते. पण म्हणून “मुत्रपिंड हा हक्क आहे” असे आम्ही म्हणू शकतो का ? बहुतेक लोक ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे देतील कारण, मुत्र पिंड दान हा हक्क केला तर सरकारला आणखी कुणाचे मूत्र पिंड जबरदस्तीने काढून त्याला द्यायला भाग पडेल. उद्या कोणी सरकारी माणूस आपल्या २५ वर्षांच्या मुलाचे मूत्रपिंड मागायला आला तर तुम्हाला काय वाटेल ?

पण शिक्षण हे इतके टोकाचे उदाहरण नाही. पण तत्व मात्र तेच आहे. शिक्षणाचा अधिकार म्हणजे प्रत्येक मुलाला शिक्षक घेण्याचा अधिकार आहेच पण तो अनिवार्य सुद्धा आहे. ह्याचाच अर्थ जेंव्हा सरकार बिहार मधील एखाद्या गरीब मुलाला शाळेत जबरदस्तीने पाठवते तेंव्हा त्याच्या शिक्षणाचा खर्च अंशतः तुमच्या आमच्या कडून वसूल केला जातो.

बहुतेक वेळा आम्ही कुणा गरीबाच्या शिक्षणाचा खर्च स्वखुशीने देवू. ह्यामुळे सरकारने “शिक्षण हक्क” केला तर आम्ही जास्त वाईट वाटून घेत नाही.

पण कुठलाही नवीन “हक्क” केला ह्याचा अर्थ असा होत नाही कि सर्वांना ती वस्तू भेटते. जीवनाचा हक्क घटनेत आहे पण दिवसाला किती तरी खून होत असतात. एखादा हक्क पण खरोखर रक्षित करू शकतो कि नाही हे त्याला लागणार्या खर्चावर अवलंबून असते.

शिक्षण हा हक्क केला तरी सरकार कडे तो बजावण्यासाठी पैसा अजिबात नाही आहे, त्यामुळे सर्व मुलांना जास्त शिक्षण मिळणे कागदावर सुद्धा अशक्य आहे आणि प्रत्यक्षांत तर अगदीच अशक्य आहे. म्हणून सरकारने हा हक्क बजावण्याची एक वेगळी युक्ती काढली आहे. कर न वाढवता इतर लोकांवर त्याचा खर्च जबरदस्तीने टाकला गेला आहे. पुढे वाचा.

- शिक्षण म्हणजे काय ?

आमच्या तुमच्या मते शिक्षण म्हणजे मुल शाळेत जावून विषय शिकतात. पण सरकारी कागदांत शिक्षण म्हणजे फारच वेगळी प्रक्रिया आहे.

सरकारी नियमानुसार शिक्षणाचा हक्कात खालील गोष्टी येतात

- प्रत्येक मुल शाळेत जावून शिकले पाहिजे.

- शाळा म्हणजे काय हे सरकार ठरविते. उद्या एखाद्या आदिवासी भागांत एखाद्या गुरुजीने शाळा चालविली तर ते बेकायदेशीर कृत्य आहे जो पर्यंत तो गुरुजी अशी शाळा उभारत नाही जी सरकारी व्याख्ये प्रमाणे शाळा नाही.

- एखादी शाळा, खरोखर शाळा आहे कि नाही ह्याच्या व्याख्येंत अनेक गोष्टी येतात. ह्या राज्य सरकार आपल्या परीने बदलू शकते.

* शाळेला प्रत्येक मुला मागे अमुक इतकी जमीन असली पाहिजे.

* शाळेला प्रत्येक शिक्षक मागे अमुक इतकी जमीन असली पाहिजे.

* प्रत्येक १०० मुलां मागे किमान अमुक इतकी शौचालये पहिजेत.

* कुठलीही शाळा जर ह्या व्याख्येत बसत नाही तर ती बेकायदेशीर असून अशी शाळा एक तर सरकार ताब्यांत घेयील किंवा शाळेच्या व्यवस्थापकांना अटक केली जावू शकते.

मुंबई सारख्या शहरांत जागेची टंचाई आहे पण धारावीतील झोपडपट्टीत शिक्षणाची गरज जास्त आहे. ह्या कायद्याने अनेक समाजसेवक जे रात्री तात्पुरत्या शेड मध्ये गरीब मुलां साठी शाळा चालवितात ते कायद्याने बेकायदेशीर ठरतात.

गावांत जागेची विशेष कमतरता नसते पण त्याच वेळी खूप शौचालये वगैरे बांधण्यासाठी त्यांच्या कडे पैसा नसतो, अश्या शाळा बे-कायदेशीर ठरतात.

शिक्षणाचा हक्क ह्या कायद्या अंतर्गत सर्व हिंदू नागरीका कडून त्याच्या स्वतःच्या शाळा त्यांच्या गरजेनुसार चालविण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. आता शाळा म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय हे सरकरी बाबू ठरवतात.

एखादा गुरुजी निव्वळ विद्यादानाच्या भावनेने गरीब मुलां साठी कितीही चांगले विद्यादान करत असला तरी त्याच्या तात्पुरत्या शेड मध्ये शौचालय नाही म्हणून त्याची शाळा हि शाळा ठरत नाही आणि त्या मुलांचे ज्ञान हे शिक्षण ठरत नाही. ह्या मुलांना बाहेरून दहावीची परीक्षा देण्याचा हक्क सुद्धा हिरावून घेतला जात आहे.

- शिक्षणाचा जिझीया कर

सर्वांत मजेची गोष्ट म्हणजे हे सगळे कायदे फक्त हिंदू ना लागू अहेत. आणि मी हे अलंकारिक दृष्ट्या बोलत नाही. कायद्या नुसार RTE फक्त हिंदूनी चालविलेल्या प्रायवेट शाळांना लागू आहे. अश्या शाळा सरकार कडून एकही पैसा घेत नसल्या तरी सुद्धा त्यांना हा कायदा लागू आहे पण सरकारी जमिनीवर किंवा सरकरी अनुदानातून चालणार्या ख्रिस्ती, मुस्लिम किंवा पारसी शाळाना हा कायदा अजिबात लागू नाही. [1]

सुप्रीम कोर्टाने जेंव्हा ह्या प्रकारचा धार्मिक भेदभाव रद्द बातल ठरविला ( पै विरुद्ध कर्नाटक सरकार ) [2] तेंव्हा सोनिया गांधी ह्यांनी तत्काळ भारतीय घटना बदलून ९३वी घटना दुरुस्ती आणून कोर्टाचा निर्णय रद्द केला. [3]

पण ह्याला मी जिझिया कर का म्हटले आहे ?

RTE कायद्या प्रमाणे प्रत्येक बिगर-अल्पसंख्यांक शाळेला २०% - २५% आरक्षण समाजातील गरीब मुलांना फुकट द्यावे लागते. ह्याचाच अर्थ ह्या २५% लोकांचा खर्च इतर ७५% मुलां कडून वसूल केला जातो. त्याची चूक काय तर त्यांनी हिंदू शाळेंत प्रवेश घेतला. फुकट ह्याचा अर्थ विना-फी असा नाही. ह्या मुलांना गणवेश, पुस्तकें इत्यादी पुरविण्याची जबाबदारी सुद्धा शाळेवर (इतर ७५% मुलांवर) असते.

“गरीब मुले” ह्याचा अर्थ खरोखर गरीब मुले असा घेवू नका. इथे सुद्धा वर प्रमाणे गरीब आणि गरजू शब्दांची व्याख्या सरकारी लोक करतात. “गरीब आणि गरजू” हि व्याख्या बहुतेक राज्यात जात इत्यादी बघून केली जाते.

समज टिळक शाळा १०० मध्यम-वर्गीय मुलांना दर वर्षी प्रवेश देते. ह्यातील २५% जागा गरीब मुलांना राखीव केल्या तर खरोखर काही फायदा होतो का ? अजिबात नाही कारण ह्या जागेवर एरवी इतर २५ मध्यमवर्गीय मुलांनी प्रवेश घेतला असता. २५% जागा कमी झाल्याने एक तर ह्या पाल्यांना इतर शाळांत धाव घ्यावी लागेल किंवा व्यवस्थापनाला जास्त पैसे चारून सीट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्यामुळे कायदेशीर आणि बे कायदेशीर फी वाढते आणि २५ मध्यमवर्गीय मुलांना टिळक शालेंतून बाहेर जावे लागते.

खाजगी शाळा म्हणजे पैसे कमविण्याचे साधन आहे असे अनेक लोकांना वाटते पण प्रत्यक्षांत खाजगी शाळा चालविणे सरकारी हस्तक्षेपामुळे अवघड आहे आणि अश्या प्रकारचे कायदे मध्यमवर्गीय लोकांना पैसे चारून मुलांना अडमिशन घ्यायला भाग पडतात आणि चांगल्या शाळांना प्रामाणिकपणे शाळा चालविणे अवघड जाते.

जेम्स टुली ह्या ब्रिटीश माणसाने भारतांत खाजगी शाळांवर अभ्यास केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतेक गरीब पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांत टाकायचा प्रयत्न करतात कारण सरकारी शाळा पेक्षा खाजगी शाळांत चांगले शिक्षण भेटते हे गरीबातील गरीब व्यक्तीना सुद्धा ठावूक आहे. [४]

जेम्स ने मुंबई, हैदराबाद इत्यादी झोपडपट्टीत जावून खाजगी शाळांचा शोध घेतला. सगळी कडे त्याला अनेक अनधिकृत खाजगी शाळा सापडल्या. कोणी तरी निवृत्त शिक्षक १० रुपये दिवसाला घेवून एका कारखान्यात रात्री मुलांना शिकवत असे. जेम्सने ह्या मुलांच्या पालकांना विचारले कि सरकारी शाळा फुकट शिक्षण देत असताना आपली मुले ह्या असल्या जागेवर का जातात ? पालकांना ठावूक होते कि सरकारी शाळेंत शिक्षक बहुतेक वेळा येत नाहीत. सरकारी शाळेचे छप्पर गळते किंवा शाळा फारच दूर असते. उलट तो निवृत्त गुरुजी सगळ्यांच्या ओळखीचा असतो आणि १० रुपये भेटले तरी मुले शाळेंत यावी आणि शिकावी ह्या साठी तो जास्त प्रयत्न करतो.

RTE कायद्या नुसार हि शाळा बे कायदेशीर आहेच पण समज शाळेला कसेही करून परमिशन भेटले तर इतर २५% गरीब विद्यार्थ्यांचा भार ७५% उचलण्यास सांगणे म्हणजे आधीच पांगळ्या माणसाच्या खांद्यावर वजन टाकणे होय.

अल्प संख्यांक शाळांची चांदीच चांदी

समज सरकारने कायदा केला कि जी कंपनी मुस्लिम लोक चालवितात त्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही पण जी कंपनी हिंदू चालवितात त्यांना कर भरावा लागेल आणि २५% अधिभार. ह्यातून काय निष्पन्न होयील बरे ?

१०० वर्षानी हिंदूनि चालविलेल्या कंपन्या बंद पडतील आणि सर्व कंपन्यावर फक्त मुस्लिम लोकांची मालमत्ता असेल. (हिंदू मुसलमान हे फक्त उदाहरणासाठी घेतले आहे, तुम्ही वाट्टेल तो क्रायटेरिया लावा )

RTE कायदा पास झाल्या नंतर सर्व श्रीमंत शाळांनी तत्काळ स्वतःला अल्पसंख्यांक घोषित केले. कुणा तरी ख्रिस्ती किंवा मुस्लिम माणसाला अप्लाय बोर्ड वर घेतले कि शाळा अल्प्संख्यान दखला तेंव्हा प्राप्त करू शकत होती. आता ती प्रक्रिया फार क्लिष्ट झाली आहे.

सर्व राजकारणी (उद अरविंद केजरीवाल ह्यांची मुलगी ) इत्यादी अश्या अल्पसंख्यांक (DPS) शाळा मध्ये जातात. आदित्य ठाकरे ह्यांचे शिक्षण बॉम्बे स्कोटिश आणि सेंट झेवियर मध्ये झाले. इथे गरीब मुलांना वगैरे काहीही आरक्षण नाही. धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळा ही सुद्धा अल्पसंख्यांक शाळा आहे. (कशी झाली हे जिज्ञासूनी शोधावे).

चर्च ज्या शाळा चालविते त्यांना RTE लागू नसल्याने त्यांचा खर्च कमी असतो म्हणून शाळा चालविणे हा त्यांच्या साठी जास्त फायदेशीर धंदा आहे. त्या शिवाय अश्या शाळा आपली फी स्वतः ठरवितात, कुणाला अडमिशन द्यावे हे स्वतः ठरवितात त्यामुळे सर्व श्रीमंत किंवा अतिशय हुशार मुले ह्याच शाळांत जातात. चर्च च्या शाळा श्रीमंत मुलांना जास्त फी लावतात तर गरीब मुलांना परीक्षा मुलाखत वगैरे घेवून फक्त हुशार लोकांनाच प्रवेश देतात.

आता ३० वर्षांनी काय होयील ? हि अनेक हुशार मुले IAS वगैरे बनतील. आदित्य ठाकरे सारखी मुले राजकारणी बनतील. काही लोक खूप श्रीमंत होतील. त्यानंतर ती आपल्या शाळांना आर्थिक किंवा इतर मदत करतील. बॉम्बे चे मुंबई करावे म्हणून आम्हा तुम्हाला शिवसैनिक दमदाटी करतील पण बॉम्बे स्कोटिश शाळेला कधी दम दाटी केल्याचे वाचले आहे का ?

ह्याला Social Capital असे म्हणतात. ज्या संस्था शेकडो वर्षे चालू शकतात त्यांच्या साठी Social Capital हा फार मोलाचा घटक असतो.

अरविंद केजरीवाल ह्याने तर एक पायरी पुढे जावून सर्व बिगर-अल्पसंख्यांक शाळांचा अडमिशन प्रक्रियेचा सरकारी ताबा घेतला आहे. दिल्ली मधील एकही हिंदू शाळेला आता आपली मुले निवडण्याचा अधिकार नाही. ह्यामुळे काय होते कि ह्या शाळा राजकारणी, उद्योगपती ह्यांना सीट देवून Social Capital बनवू शकत नाहीत. ५० वर्षांनी जेंव्हा ह्या शाळा काही समारंभ करतील तेंव्हा त्यांच्या माजी विद्यार्थ्या मध्ये श्रीमंत मुलांची संख्या फारच कमी असेल. [5]

उलट दिल्ली मधील ख्रिस्ती शाळांची चांदी होयील. जवळ जवळ सर्वच ख्रिस्ती शाळांनी स्वताहून सरकरी नोकरांना आरक्षण दिले आहे.

दूरगामी परिणाम

ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्यामुळे हिंदू लोकांना शाळा काढणे आणि चालविणे मुश्किल होत जायील. उलट अल्प-संख्यांक शाळांना आपला धंदा चालविणे अधिकाधिक सोपे होते जयिल.

फार मोठा परिणाम गरीब आणि आदिवासीवर होयील. एकल विद्यालय नावाचा एक प्रकार RSS ग्रामीण आणि दुर्गम भागांत चालवते. एक स्वयंसेवक दुर्गम भागांत जावून आदिवासी लोकांना शिक्षण देतो. आता RTE कायद्या नुसार हे बेकायदेशीर कृत्य आहे. पण एखादा ख्रिस्ती पाद्री ह्या भागांत जावून आपली शाळा चालवतो तर त्याला मात्र तो पूर्ण अधिकार आहे.

ख्रिस्ती शाळांत वाट्टेल ते नियम बनवले जावू शकतात. उदा मेहंदी, कुंकू, केसातील फुले इत्यादी वर बंदी[६]. ख्रिस्ती प्रार्थना जबरदस्तीने लादली जावू शकते. प्रार्थनेची जबरदस्ती नाही केली तरी बहुतेक शिक्षक ख्रिस्ती असल्याने ते वाट्टेल ते संस्कार आपल्या विद्यार्थ्यांना देवू शकतात.

मोदी सरकारच्या कमिटीने RTE हा फार चांगला कायदा असून तो अकरावी बारावी ला लागू करावा अशी मागणी केली आहे. पुढे जावून हा कायदा, मेडिकल, अभियांत्रिकी इत्यादी ना सुद्धा लागू होयील ह्यांत शंका नाही. [8]

तथाकथित हिंदू पुढाऱ्यांचा षंढ पणा आणि काही आकडे

RTE आणि ९३वि घटना दुरुस्तीला भाजप किंवा इतर पक्षां कडून विशेष विरोध झाला नाही. JDU ने विश्वास घात करून ह्या मुद्यावर कोन्ग्रेस ला साथ दिली. कोन्ग्रेस च्या वतीने योगेंद्र यादव (केजरीवाल वाले) ह्यांनी RTE निर्माण करण्यात विशेष भाग घेतला होता.

महाराष्ट्रातील भाजप सरकारने हा कायदा लागू करण्यात विशेष उत्सुकता दाखविली आहे. नागपूर मध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकाने RTE कायद्यानुसार अनेक शाळा वर बडगा उचलला आहे.[७] लक्षांत घ्या कि नागपूर हे हिंदुत्व वादी RSS चा बालेकिल्ला मानला जातो.

RTE च्या पहिल्या ५ वर्षांत १ लक्ष शाळांना बंद पडण्याची नोटीस पाठविण्यात आलेली आहे. ह्यातील सर्वाधिक शाळा हरियाना आणि आंध्र प्रदेश मधील आहेत. किती शाळा स्वतःहून बंद झाल्या ह्याला गणती नाही. [9]

तात्पर्य

कायदा नेहमीच सर्वाना समानपणे लागू असला पाहिजे. वाईट कायदा जो सर्वाना लागू असतो तो वाईट कायदा असतो पण जो कायदा सर्वांना समान लागू नसतो त्याला कायदा म्हणताच येत नाही.

शिक्षणा सारख्या महत्वाच्या क्षेत्रांत नागरिकांना त्यांना हव्या त्या प्रकारच्या शाळा काढण्याचा अधिकार असला पाहिजे आणि मुलांच्या शिक्षणा बाबत निर्णय घेण्याचा अधिकार पालकांचा असला पाहिजे. फक्त हिंदू नागरिकांना तो अधिकार नाकारणे म्हणजे प्रचंड अन्याय कारक गोष्ट असून सर्व व्यक्ती ज्यांना आपला भारत देश समृद्ध आणि सहिष्णू बनवायचा आहे अश्या लोकांनी ह्या कायद्याचा विरोध करणे आवश्यक आहे.

आज कोचिंग क्लासेसची कसलीही कमतरता नाही कारण ह्या क्लासेस वर सरकारी नियंत्रण शाळांच्या तुलनेत शून्य आहे. उलट कोचिंग वाले खूप चांगली सेवा देत असल्याने हजारो मुले लाखों रुपये कसलीही बळजबरी नसताना स्वखुशीने खर्च करतात.

ह्याच न्यायाने, ज्या शाळांना स्वायत्तता असेल त्या शाळा वर्षागणिक जास्त चांगल्या बनत जातील, चांगले विद्यार्थी मिळवत जातील आणि ज्या शाळांना स्वातंत्र्य नसेल त्या शाळा मागे पडत जातील.

===================================

[1] http://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/Minority-card-is-passport-to-freedom-from-RTE/articleshow/42399797.cms

[2] http://www.gktoday.in/answer/what-was-held-in-the-case-of-t-m-a-pai-foundation-v-state-of-karnataka-in-respect-to-article-26a/

[3] https://realitycheck.wordpress.com/2016/02/28/explaining-the-93rd-amendment-to-the-bjp/

[4] https://en.wikipedia.org/wiki/James_Tooley

[5] https://realitycheck.wordpress.com/2016/01/07/delhi-schools-run-by-non-minorities-lose-all-admissions-autonomy-under-media-coverfire-of-lies-and-deceit/

[6] https://realitycheck.wordpress.com/2015/10/24/analyzing-indian-education-law-in-light-of-christian-schools-ban-on-hindu-symbols/

[7] http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/37-unrecognized-schools-under-education-department-scanner/articleshow/38986875.cms

[8] http://indianexpress.com/article/india/india-news-india/group-of-secys-recommend-extension-of-rte-up-to-class-xii/

[9] http://www.bbc.com/news/world-asia-india-26333713

प्रतिक्रिया

थोडे फोर्मेटिंग गंडले आहे, जमल्यास संपादकांची मदत घेऊन सुधारा.. वाचायला खूप त्रास होतो आहे.

साहना's picture

9 Mar 2016 - 11:44 am | साहना

संपादकांना मेल पाठवला आहे.

बाकी हल्ली मी असे देखील ऐकले आहे की सरकार "शाळा" या शब्दाच्या व्याख्येतच आमूलाग्र बदल करणार असून हळूहळू होमस्कूल किंवा एखादी कंपनी देखील व्यावसायिक तत्वावर शाळा कढू शकेल..

साहना's picture

9 Mar 2016 - 11:47 am | साहना

तसे झाले तर चांगले होयील पण दुर्दैवाने "शिक्षण" हा मुलभूत अधिकार केल्याने तसे होणे मला शक्य वाटत नाही. तसेच होमस्कूल आता बेकायदेशीर आहे.

http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/RTE-does-not-allo...

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2016 - 12:03 pm | प्राची अश्विनी

हे माहित नव्हते. तसेच तुअच्या लेखातल्या देखील अनेक गोष्टी माहीत नव्हत्या. लेख आवडला. चर्चेची वाट पहात आहे.

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 1:02 pm | बोका-ए-आझम

या लिंकमध्ये नॅशनल ओपन स्कूल सिस्टिम २०१५ पर्यंतच चालू राहणार आहे असं काहीतरी म्हटलेलं आहे. त्याबद्दल काही कल्पना आहे का? शिवाय ही बातमी आॅक्टोबर २०१२ ची आहे. सध्या काय परिस्थिती आहे? या बातमीत सरकारने कोर्टाकडे अॅफिडेव्हिट दाखल करण्यासाठी वेळ मागितलाय असं सांगितलंय. सध्या काय परिस्थिती आहे?

ह्या विषयावर अजून पर्यंत काहीही स्पष्ट पणे उपलब्ध नाही. आज सुद्धा Child Protection वाले आणि इतर बिगर सरकारी संस्था घरी शिकणार्या मुलांच्या पालकांच्या विरोधांत तक्रार करत असतात. २ महिने मागे बेंगलोर मध्ये अशी एक तक्रार माझ्या हाती आली होती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2016 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

या लेखातले दावे फार गंभीर आहेत... जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

राजाभाउ's picture

9 Mar 2016 - 1:08 pm | राजाभाउ

असेच म्हणतो.
कारण हे सर्व फारच मुलगामी आणि दुरगामी परीणाम करणारे आहे.

sagarpdy's picture

9 Mar 2016 - 6:54 pm | sagarpdy

+1

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2016 - 1:18 pm | पिलीयन रायडर

भारत जर निधर्मी देश आहे तर धर्मावर आधारित कायदे कसे काय बनु शकतात?

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 1:32 pm | बोका-ए-आझम

याचा अर्थ कुठल्याही धर्माला इतर धर्मांपेक्षा जास्त किंवा कमी महत्त्व नाही असा आहे. राज्यक्रांतीपूर्वी नेपाळचा अधिकृत धर्म हिंदू होता. पाकिस्तान, इराण, इंडोनेशिया हे देश स्वतःला इस्लामिक रिपब्लिक म्हणतात. याचाच अर्थ इस्लाम हा तिथे अधिकृत धर्म आहे. तसा भारताचा कुठलाही अधिकृत धर्म नाही. पण घटनेत धार्मिक स्वातंत्र्य हे मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केलेलं आहे, ज्यात धार्मिक संस्था, प्रार्थनास्थानं आणि शिक्षणसंस्था काढण्याचं (not necessarily धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था) स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. अल्पसंख्यांक या गटात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी यांचा समावेश आहे. या धार्मिक गटांना त्यांच्या समुदायासाठी शैक्षणिक संस्था काढता येतात आणि तिथल्या ५०% जागा या त्या समुदायासाठी राखीव ठेवायला लागतात. त्यामुळे एखाद्या कायद्यात जर अल्पसंख्यांकांसाठी वेगळी तरतूद असेल - तर तिथे धार्मिक अँगल येतो. याचा अर्थ तो कायदा धर्माधारित आहे असा होत नाही.

सदर अधिकार हिंदुना देण्यात येत नाही म्हणून हा कायदा धर्माधारित ठरतो. ह्यामुळे एका धर्माच्या लोकांचे विशेष नुकसान होते. इतर कुठल्याही धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी देशांत अश्या प्रकारचे कायदे नाहीत. आणि लक्षांत घ्या कि हा कायदा अनुदानीत शाळांनाच नाही तर १००% स्वखर्चाने चालणार्या हिंदू शाळा वर सुद्धा लागू आहे.

हाच मुद्दा सुप्रीम कोर्ट ने पै विरुद्ध कर्नाटक सरकार मध्ये ग्राह्य धरला होता आणि विशेष घटना दुरुस्ती काढून त्याला रद्द केले गेले होते.

तसेच इथे प्रश्न फक्त शाळा सुरु करण्याचा नाही तर शाळा चालविण्याचा सुद्धा आहे. RTE कायदा वापरून अरविंद केजरीवालने सर्व हिंदू शाळांच्या १००% सिट वर सरकारी ताबा मिळविला आहे. आता दिल्ली मधील कुठलीही हिंदू शाळा मेनेज्मेण्ट कोटा द्वारे एकही सीट वाटू शकत नाही.

शहरातील अनेक शाळा मोठ्या कंपन्याकडे करार करतात आणि बदली घेवून आलेल्या त्यांच्या कर्मचार्यांचा मुलांना शाळेत सिट देतात. ह्यामुळे शाळा पैसा उभारू शकतात आणि बदली घेवून येणार्या कर्मचार्यांना मुलांची चिंता करावी लागत नाही. अरविंद केजरीवालच्या निर्णयाने आता हा मार्ग फक्त हिंदू शाळा साठी बंद झाला आहे आणि त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्या आता अल्पसंख्याक शाळा पुढे हात पसरून आहेत.

तेलंगाना मध्ये सर्व मुस्लिमांना रिक्षा चालविण्याचा परवाना १००% भेटतो पण हिंदुना मात्र लॉटरी द्वारे जावे लागते. आता हा कायदा पूर्णपणे धर्माधारित आहे आणि RTE च्या संदर्भांत Analogues आहे. उद्या मुस्लिम लोकांना स्टेट बेंक ९% व्याज देयील आणि हिंदुना ८% ते आम्हाला चालेल का ?

साहना's picture

10 Mar 2016 - 7:34 am | साहना

भारत हा निधर्मी देश आहे ह्यांत काहीही तथ्य नाही. निधर्मी हा शब मुळात इंदिरा गांधीनी घटनेत घुसवला. मुल घटना लिहिताना "निधर्मी " हि संकल्पना डोक्यांत नव्हतीच मुळी. "समान कायदा" हि संकल्पना निधर्मी लोकशाहीसाठी आवश्यक आहे एकदा तिथे कॉम्प्रोमायीझ केले कि बाकीच्या गोष्टी पत्त्याच्या किल्ल्या प्रमाणे कोसळतात.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 2:06 pm | तर्राट जोकर

लेख खूप मोठा आणि विस्तृत आहे. खाजगी शाळांमधे २५% गरिब मुलांना घेतल्यामुळे खाजगी शाळा म्हणून असलेली इमेज खराब होऊन धंदा कमी होण्याची भीती स्पष्ट दिसून येत आहे. ह्या आधीही अशी ओरड हा कायदा लागू केला तेव्हा केली गेली होती. आता ह्याला हिंदू-अहिंदू रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रकार दिसतो. लेखातले दावे अतिरंजीत करुन मांडले आहेत. बाकी सविस्तर प्रतिसाद माहिती काढून देतो.

तुर्तास, एक खाजगी शाळा चालवण्यामागचे अर्थकारण ह्या प्रकल्प-अहवालात मिळेल.
http://www.everonn.com/images/clsa140308.pdf

पान नंबर ९३ >> Appendix 1: Modelling a school

९३ वी सुधारणा वाचली आहे का?

असंका's picture

9 Mar 2016 - 2:51 pm | असंका

हा प्रश्न आप्ल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर विचारला आहे :-

आता ह्याला हिंदू-अहिंदू रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रकार दिसतो

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 3:27 pm | तर्राट जोकर

नाही वाचली. तुम्ही सांगा.

सांगू तर शकतो; पण 'पुरेशी माहिती न घेता असे आरोप करायची गरज एखाद्याला का वाटत असावी?' ह्यावर विचार करण्यात सध्या मी व्यस्त आहे.

माझा विचार करून झाला की नक्कीच सांगेन.

एवढा वेळ समजा आपल्याला नसेल तर स्वतःच गूगल करायचा पर्याय आहेच. ९३ वी सुधारणा म्हणजे अगदी छोटासा कायदा आहे.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 4:04 pm | तर्राट जोकर

आरोप केला नाही. प्रकार दिसतो म्हटले. म्हणजे शंका आहे असे. बाकी तुम्हाला पाहिजे ते विचार करण्याचे स्वातंत्रय आहे.

माझ्या विचारस्वातंत्र्याची आपल्याला जाणीव आहे हे कळल्याने आनंद झाला. असो.

सगळं हवं तसं लिहून झाल्यावर सरकारने फक्त हे एक वाक्य जोडलं - "आर्टीकल ३०(१) मध्ये संदर्भ दिलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था सोडून ". इतकं स्पष्ट विभाजन आहे ते. आणि ते घटनेतच!

शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे ना? मग तो मिळवून देताना या अल्पसंख्यांक संस्थांची मदत का नाही घ्यायची? बहुसंख्यांच्या असणार्‍या संस्थांकडनं त्यागाची अपेक्षा कशाच्या आधारावर केली आहे?

कशाच्या आधारावर म्हणताय हे? जरा एखादं Real life उदाहरण द्या बरं

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 3:28 pm | तर्राट जोकर

जरा रुको भाईजान, माहिती काढून सविस्तर लिहितो. ह्याबद्दल चार वर्षांआधी वाचले होते, आता जरा खोदकाम करायला लागेल.

यातील बऱ्याच मुद्द्यांवर खूप वेळा चर्चा ऐकली आहे, पण ती बहुतेक वेळा मला वरवरची आणि काहीशी फंडामेनटालिस्ट वाटायची त्यामुळे याकडे नेहमी दुर्लक्षच करत आलोय.पण आपण एकदम वेल-डोकुमेंटेड रित्या गंभीर दावे केले आहेत त्यामुळे आता थोडेसे लक्ष्य घालावेसे वाटते आहे.चूक काय आणि बरोबर काय हे शोधून काढावे लागेल, त्याशिवाय चैन पडणार नाही. वाचनखून साठवली आहे. पाहूयात चौफेर मिपाकर काय म्हणतायत!

संपूर्ण लेखाचा उद्देश हाच होता कि लोकांनी थोडा जास्त वेळ ह्या कायद्याचा आभास करण्यात घालवावा.

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 11:34 am | निशांत_खाडे

मग तो साध्य होईल असे दिसतेय. अर्थात, तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आही कि नाही हे थोड्या अभ्यासानंतरच कळवतो. :-D धन्यवाद.

साहना's picture

10 Mar 2016 - 11:54 am | साहना

realitycheckindia हे संकेत स्थळ आणि त्याचे ट्विटर handle इथे तुम्हाला अतिशय चांगली कमेंट्री भेटेल.

मास्टरमाईन्ड's picture

9 Mar 2016 - 3:06 pm | मास्टरमाईन्ड

RTE लागू झाल्यावर माझ्या मुलाच्या शाळेनं पण ३०% फी वाढ केली.
आता माझं स्प्ष्ट मत असं आहे की, जर आम्ही दिवसरात्र कष्ट करून आमच्या मुलांचं भवितव्य घडण्यासाठी पैसे खर्च करत असू तर या कायद्यानं कसल्याही फालतू दर्जाच्या (शिवराळ भाषा, गलिच्छ राहणीमान, घाणेरडं आरोग्य, टुकार मानसिकता इ.) लोकांचा खर्च पण आमच्यासारख्या नियमानं कर भरणार्‍यांच्या माथी मारला गेलाय. वरून तसल्या मुलांच्यात राहून नाही म्हटलं तरी आपल्या मुलांवर १०% का होईना परिणाम होतोच.
एकवेळ "त्यांचा" खर्च परवडला पण सहवास नको अशी परिस्थिती आहे.
आणी जर आम्ही यांचा शैक्षणिक खर्च उचलायचा आहे तर Income Tax मध्ये पण सवलत द्यायला पाहिजे नां सरकारनं.

“गरीब मुले” ह्याचा अर्थ खरोखर गरीब मुले असा घेवू नका. इथे सुद्धा वर प्रमाणे गरीब आणि गरजू शब्दांची व्याख्या सरकारी लोक करतात. “गरीब आणि गरजू” हि व्याख्या बहुतेक राज्यात जात इत्यादी बघून केली जाते.

याचा Live अनुभव घेतला आहे.
पुण्यात एका शाळेत एका मुलाला जागा नसल्यानं प्रवेश नाकारण्यात आला. त्याच्या आईनं (जी बहुधा डॉ. आहे) शाळेला अक्षरशः वेठीला धरून RTE चा नियम दाखवून शाळेत प्रवेश घेतला (यात एक बर्‍यापैकी प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलनं पण ट्यार्पीसाठी तिला मदत केल्याचं समजलं). तेव्हा चौकशीत काही जणांकडून हेही समजलं की सदर व्यक्तीनं "जातीच्या" आधारावर RTE खाली प्रवेश मिळवला.
बरं ही "गरीब" व्यक्ती स्वतःच्या चार चाकी मधून फिरते.(धन्य ते गरीब आणी धन्य तो देश ज्यात स्वतःची चार चाकी असणारे गरीब आहेत)

ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्यामुळे हिंदू लोकांना शाळा काढणे आणि चालविणे मुश्किल होत जायील. उलट अल्प-संख्यांक शाळांना आपला धंदा चालविणे अधिकाधिक सोपे होते जयिल.

हे पण १००% बरोबर आहे. आणि "अल्पसंख्यांक शाळा" म्हणजे फक्त मुस्लीम, ख्रिस्ती वा पारशी नाहीत तर महाराष्ट्रात काढलेल्या इतर भाषिक (इंग्रजी सोडून) शिक्षण संस्था पण आहेत.

थोडक्यात काय तर काँग्रेसनं जिथे तिथे घाण करण्याची परंपरा चालूच ठेवलीये. आणी विरोध केला तर आपलेही मतदार नाराज होतील म्हणून जवळपास सर्वच पक्षांनी शक्यतो विरोध केला नाही.

सुरुवातीला अनेक श्रीमंत शाळा ज्यांच्या कडे वकिलांना द्यायला पैसे होते अश्यानी स्वतःला भाषिक अल्पसंख्यांक करून घेतले पण NCMEI अंतर्गत ती वाट पूर्ण पाने बंद झाली आहे.

बाळ सप्रे's picture

10 Mar 2016 - 12:33 pm | बाळ सप्रे

या कायद्यानं कसल्याही फालतू दर्जाच्या (शिवराळ भाषा, गलिच्छ राहणीमान, घाणेरडं आरोग्य, टुकार मानसिकता इ.) लोकांचा खर्च पण आमच्यासारख्या नियमानं कर भरणार्‍यांच्या माथी मारला गेलाय.

शिक्षणापासून वंचित राहून लोक असे (शिवराळ भाषा, गलिच्छ ...) राहू नयेत हा दूरगामी हेतु पाहील्यास आपल्यासारखांचा हा दृष्टीकोन खचितच चिंताजनक आहे.

पण गरजू विद्यार्थी ठरवण्यात जात/धर्म निकष लावणे व अल्पसंखांक संस्था यातून वगळणे निश्चितच निषेधार्ह आहे.

मृत्युन्जय's picture

9 Mar 2016 - 4:22 pm | मृत्युन्जय

अवघड आहे. इतक्या विस्तृतपणे या कायद्याची आणि त्याच्या व्याप्तीची कल्पना नव्हती. लेख लिहुन या परिस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद.

पण ज्या अर्थी झाडुन सगळे पक्ष याची भलामण करत आहेत (स्वतःचा काही फायदा होण्यासारखा नसताना) त्या अर्थी याला दुसरी ही काही बाजू असेलच की. ती देखील समजली तर अजुन सांगोपांग विचार करता येइल असे वाटते. त्यामुळे जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

ह्या कायद्याचे परिणाम दूरगामी आहेत. दूरगामी परिणाम समजण्यासाठी ५ वर्षांचे प्लेनिग करणारे राजकीय पक्ष चालत नाहीत तर ५० वर्षांचे प्लेनिंग करणारे लोक/संस्था लागतात. सदर सुविधा रोमन चर्च कडे आहे, सदर सुविधा डाव्या विचारवंता कडे आहे पण उजव्या पक्षां कडे नाही. मुल्ला ची दौड मस्जिद तक आणि संघ वाल्याची दौड गाय पर्यंत अशी परस्थिती आहे.

उदाहरण देवून सांगतो.
१५ वर्षे मागे रोमन चर्च ने गोव्यांत मराठी हद्दपार करून कोकणी सक्तीची केली पाहिजे अश्या प्रकारचे वातावरण केले. "कोकणी हि गोवेकरांची ओळख आहे." असा आव आणला. कोकणी हि बहुजन समाजाची भाषा असून मराठी हि ब्राह्मणाचे अतिक्रमण आहे असे सुद्धा म्हटले गेले. भाजपने तेथे पूर्ण शरणागती पत्करून मराठीला तिलांजली दिली. मी विचारले तेंव्हा एका भाजप पुढार्याने सांगितले "कोकणी भारतीय भाषा आहे ना ? " काय फरक पडतो ?

५ वर्षे मागे कोन्ग्रेस सरकारला हाताला धरून चर्च ने सरकरी अनुदान इंग्रजी शाळांना देण्याचा कायदा केला. ह्या कायद्या नुसार सर्व चर्च शाळा कोकणी मधून इंग्रजी माध्यमाच्या झाल्या. काही हिंदू शाळांनी सुद्धा अनुदान मिळते म्हणून इंग्रजी माध्यम केले. पर्रीकारानी (जे फार चतुर आणि विद्वान आहेत) ह्याला प्रचंड विरोध केला.

पर्रीकाराचे सरकार येताच काय झाले ?

पर्रीकारनी कायदा केला कि "सर्व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्यात यावे. सरकरी अनुदान फक्त मराठी आणि कोंकणी शाळांनाच भेटेल. फक्त ख्रिस्ती शाळा सोडून. ह्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्या तरी त्यांना मात्र सरकारी अनुदान भेटेल."

मी चौकशी केली तेंव्हा मला सांगण्यात आले कि "सरकार ठेवण्या साठी हे छोटेशे compromise आवश्यक आहे".

आज माझी भाची किंग्स शाळेत जाते. ती देव म्हणत नाही God म्हणते. मेहंदी घालणे तिला मूर्खपणाचे वाटते, ती कुंकू लावत नाही. १० वर्षांनी जेंव्हा ती मतदान करायला जायील तेंव्हा तिचे मत हिंदू हिता साठी असणे फार मुश्किल आहे.

पर्रीकर सारख्या विद्वान लोकांची हालत अशी तर आंडू-पांडू लोकांची विचारक्षमता किती असावी ह्याचा अंदाज लावलेला बरा.

अभिजित - १'s picture

9 Mar 2016 - 4:30 pm | अभिजित - १

पैसेवाल्या लोकांना काही फार फरक पडत नाही. पवार / अंबानी स्कूल , बॉम्बे स्कोटिश मध्ये जाणार त्यांची मुले. फरक पडतो मध्यम वर्गीय लोकांना. आणि भाजप ला मध्यमवर्गीय लोकांची काही फार पडली नाहीये.

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 4:39 pm | बोका-ए-आझम

शिक्षण हा राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणारा विषय आहे, बरोबर? मग अल्पसंख्यांक हा निकष राज्यातल्या परिस्थितीत लावला जातो की केंद्र सरकारच्या निकषांवर? हे मी RTE च्या अनुषंगाने विचारतोय.
उदाहरणार्थ शीख हे केंद्र सरकारच्या नियमांनुसार अल्पसंख्यांक आहेत, आणि हे संपूर्ण देशाचा विचार करुन केलेलं आहे. पण पंजाबमध्ये शीख हे अल्पसंख्य नाहीत. हिंदू आणि मुस्लिम आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या शैक्षणिक योजनांमध्ये शीख अंतर्भूत असतात पण पंजाब सरकारच्या नाही. गोव्यात किंवा पूर्वोत्तर राज्यांत ख्रिश्चन्स बहुसंख्य आहेत (कदाचित. चूभूद्याघ्या - विशेषतः गोव्याच्या बाबतीत) त्यामुळे ते तिथे अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेऊ शकतात पण राज्य सरकारच्या नाही.

भाषिक अल्पसंख्यांकांमध्ये हे आहे हे मला माहित आहे. उदाहरणार्थ श्री विलेपार्ले केळवणी मंडळ किंवा SVKM ही संस्था मुंबईत किंवा महाराष्ट्रात भाषिक अल्पसंख्य असलेल्या गुजराती भाषिकांना आपल्या महाविद्यालयांत ५०% आरक्षण देते. पण ते गुजरातमध्ये असं करु शकणार नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे?

शिक्षण हा राज्य सरकारचा विषय असला तरी "मुलभूत अधिकार" केल्यामुळे शिक्षण ह्या भागांत केंद्र सरकारचे अतिक्रमण झाले आहे. राज्य सरकार काही बाबतीत बदल घडवून अनु शकते पण "मुलभूत हक्काच्या" बाबतीत बदल घडवून आणू शकत नाही.

पै विरुद्ध कर्नाटक सरकार मध्यें सुप्रीम कोर्टाने जाहीर केले कि भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक नक्की कोण हे राज्यातील त्यांच्या संख्याबळावर आधारित करावे. सोनिया गांधीनी NCMEI कायदा लागू करून त्या निर्णयाला रद्द केले आहे. ह्या कायद्या अंतर्गत एखाद्या अल्पसंख्यांक संस्थेला NCMEI कडून NOC भेटली कि त्याच्या अल्पसंख्यांक स्टेट्स वर शिक्का बसतो. NOC देण्याचे काम एक कमिशन करते, ह्या कमिशन चे सभासद फक्त मुस्लिम किंवा ख्रिस्ती असू शकतात. हिंदू माणसाला ह्या कमिशनचा सभासद होण्यावर बंदी आहे.

स्वतंत्र भारतात सर्वप्रथम अशी सरकारी संस्था बनवली गेली आहे जेथे धर्म पाहूनच माणसाला नेमले जाते.

माहितगार's picture

9 Mar 2016 - 5:39 pm | माहितगार

अल्पसंख्यकत्वाच्या आणि क्रिमीलेयर्सच्या व्याख्यांमध्ये अधिक अचुकतेची गरज आहे ; अल्पसंख्याकीय शाळांमध्ये अल्पसंख्याकांना मर्यादीत आरक्षण असले तरीही बोर्ड परिक्षेच्या अभ्यासाचे विषय एक सारखे असणे, राज्याच्या स्थानिक प्रमाण भाषेचे एक विषय म्हणून शिक्षण अनिवार्य असणे, अल्पसंख्याकीय भाषांना सुद्धा नागरी लिपीच लागू करणे अशी बंधने असावीत, हे नमुद करून बाकी धागा लेखाशी आणि काही संकुचित विचारांच्या प्रतिसादांशी सहमत होणे जरासे अवघड आहे.

माझे मुद्दे असे
१) चार पालकांनी मिळून एका गरीब विद्यार्थ्याचा खर्च उचलण्यास शेअर करण्यास काहीच हरकत नसावी, हम्म.. तीन पालकात एका विद्यार्थ्याचा खर्च शेअर करणे काही पालकांसाठी जाचक ठरु शकते त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे आरक्षण २५ एवजी २० टक्के असावयास हवे होते.
२) या वाढीव खर्चावर इनकम टॅक्स मधून वजावट देण्यास हरकत नसावी
३) अल्पसंख्यांक शाळातील पालकांना सुद्धा एका पाल्याचा २५ % खर्च उचलणे/शेअर करणे बंधनकारक असावे
४) वर एका प्रतिसादात मुद्दा मुले सुसंस्कृत नसण्याची आशंका व्यक्त केली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर संस्कारात कमी पडणारी मुले तुमच्या मुलांसोबत राहुन सुसंस्कृत व्हावयास हवीत तसे होत नसेल तर तुमचे संस्कार बाहेरच्या जगात इतरांच्या सोबत राहण्यास निरुपयोगी आहेत असे सिद्ध होते किंवा कसे.
५) गरीब आणि हिंदु धर्मीय विद्यार्थी अल्पसंख्यांकाच्या नसलेल्या शाळेत शिकणार म्हणजे बहुसंख्यांकांच्या संकृतीसोबत राहणार ह्याचा आनंद व्हावयास हवा, हि ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने पहाण्याची पद्धत असावी.
६) अल्पसंख्यांकाच्या शाळेतही २० % विद्यार्थ्यांचा खर्च उचलणे बंधनकारक असेल तर सोबत गरीब विद्यार्थी नकोत या कारणाने अती श्रीमंतांची मुले अल्पसंख्यांकांच्या शाळेत शिकण्यास जाण्याचे आकर्षण कमी राहील
७) इन एनी केस अल्पसंख्यांकाच्या शाळेतून त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा खर्च न उचलल्या गेल्यास ती मुले मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्यास आली तर तेही बहुसंख्यांकांसाठी फायद्याचेच ठरत असावे.
८) भाषिक अल्पसंख्यांकांची व्याख्या -क्रायटेरीआ काय माहीत नाही पण ज्यांना फारच तक्रार करावी वाटते त्यांनी आपापल्या बोली भाषा स्वतंत्र जाहीर केल्यास अल्पसंख्यांकाना मिळणारे घटनात्मक संरक्षण बर्‍याच बोलीभाषा धारकांना मिळू शकेल. असे वाटते

* घटनेचे आर्टीकल ३०
* ९३ वी घटना दुरुस्ती

वरील मुद्द्यात काही त्रुटी आहेत

घटना दुरस्ती मुळे तुम्ही मांडलेली काहीही बंधने अल्पसंख्यांक शालावर टाकली जावू शकत नाहीत. आणखीन घटना दुरुस्ती आणण्याचा दम (किंवा इच्छाशक्ती) मोदी सरकार मध्ये नाही. इतर कुणामध्ये असण्याची शक्यता नाही.

१. २५% बरोबर कि २०% ह्यात काहीही अर्थ नाही. काही शाळांत ५०% टक्के केला तरी फरक पडत नाही पण काही शाळांत ५% केला तरी फार वाईट परिणाम होतो. धारावी सारख्या भागांत दिवसाला १० रुपये देवून मुले शिक्षण घेतात. (सध्या ह्या शाळा बे कायदेशीर आहेत) इथे १० चे १२ झाले तर सुद्धा त्यांना फरक पडतो.

समजा मी १४० पेक्षां जास्त IQ असणार्या मुलां साठी शाळा काढत आहे. आता २०% गरीब मुलें ह्यांचा IQ १४० पेकशा मी कशी शोधून काढावी ? (सध्या २५% मुले सरकार निर्धारित करते)

ह्या २०% न्यायाने अनेक innovative प्रकारच्या शाळा काढणे अशक्य होते.

>>> २. - या वाढीव खर्चावर इनकम टॅक्स मधून वजावट देण्यास हरकत नसावी.
अगदी सहमत. ज्यांची मुले खाजगी शाळेंत जातात ती सरकारी तिजोरीवर भार टाकत नाहीत म्हणून त्यांना कर कमी लागू केला पाहिजे. कदाचित तसे होत सुद्धा असेल.

>>>> ३. अल्पसंख्यांक शाळातील पालकांना सुद्धा एका पाल्याचा २५ % खर्च उचलणे/शेअर करणे बंधनकारक असावे
शक्य नाही.

>>>>> ४. वर एका प्रतिसादात मुद्दा मुले सुसंस्कृत नसण्याची आशंका व्यक्त केली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करत असाल तर संस्कारात कमी पडणारी मुले तुमच्या मुलांसोबत राहुन सुसंस्कृत व्हावयास हवीत तसे होत नसेल तर तुमचे संस्कार बाहेरच्या जगात इतरांच्या सोबत राहण्यास निरुपयोगी आहेत असे सिद्ध होते किंवा कसे.

तुमची मुले कसल्या सहवासांत असावी हे निर्धारित करण्याचा अधिकार तुमचा आहे सरकारचा नाही. जेंव्हा तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा १००% खर्च तुम्ही करत असाल तेंव्हा तुमच्या मुलाचे मित्र निवडण्याचा अधिकार तुमचा आहे सरकारचा नाही. त्या शिवाय मुलां वर पालकांच्या संस्कारापेक्षा समवयस्क मुलांचा प्रभाव जास्त पडतो असे विज्ञान सांगते. (ब्लेंक स्लेट हे स्टीवन पिंकर ह्याचे पुस्तक ह्या विषयावर आहे. )

त्या शिवाय गरीब मुलाचा सुद्धा विचार करा. एक गरीब मुलगा दररोज अश्या शाळेंत बस ने जातो जिथे त्याचे सर्व मित्र गाडीने येतात. सर्व मित्र छोटा भीम बघतात पण ह्याच्या कडे टीवी सुद्धा नाही. मुलाच्या मनावर काय परिणाम होईल ?

>>>>>५. गरीब आणि हिंदु धर्मीय विद्यार्थी अल्पसंख्यांकाच्या नसलेल्या शाळेत शिकणार म्हणजे बहुसंख्यांकांच्या संकृतीसोबत राहणार ह्याचा आनंद व्हावयास हवा, हि ह्या विषयाकडे सकारात्मक पद्धतीने पहाण्याची पद्धत असावी.

गरीब विद्यार्थी सध्या सुद्धा त्यांच्या निवडीच्या खासगी शाळांत जातात. त्यामुळे ह्या कायद्याने कुणालाच फायदा नाही.

पण ह्या कायद्याने हुशार, श्रीमंत आणि मोठ्या खानदानातील (उद आदित्य ठाकरे) मुले ख्रिस्ती शाळेंत जातील. ज्याचा परिणाम दूरगामी आहे. सागरिका, बरखा, सरदेसाई, इतके हिंदू द्वेष्टे का आहेत हा प्रश्न कधी पडला असेलच त्याचे कारण त्यांच्या संस्कृतीत आहे.

>> ६. अल्पसंख्यांकाच्या शाळेतही २० % विद्यार्थ्यांचा खर्च उचलणे बंधनकारक असेल तर सोबत गरीब विद्यार्थी नकोत या कारणाने अती श्रीमंतांची मुले अल्पसंख्यांकांच्या शाळेत शिकण्यास जाण्याचे आकर्षण कमी राहील

तुमचा मुद्दा बरोबर आहे पण ते होणे शक्य नाही.

>>>७ इन एनी केस अल्पसंख्यांकाच्या शाळेतून त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा खर्च न उचलल्या गेल्यास ती मुले मुख्य प्रवाहातील शाळेत शिकण्यास आली तर तेही बहुसंख्यांकांसाठी फायद्याचेच ठरत असावे.

प्रश्न गरीब मुले कुठे जातात हा नाही. प्रश्न हुशार आणि श्रीमंत लोकांची मुले कुठे जातील हा आहे.

त्याशिवाय RTE च्या कायद्याने ओरिसा मधील दुर्गम आदिवासी भागांत कोण शाळा चालवू शकतो ? हि शाळा हिंदूची असेल तर शौचालय नाही म्हणून सरकार ती बंद पडू शकते. पण ख्रिस्ती पाद्री झाडाखाली शाळा भरवत असेल तर ते सुद्धा चालेल.

>>८. षिक अल्पसंख्यांकांची व्याख्या -क्रायटेरीआ काय माहीत नाही पण ज्यांना फारच तक्रार करावी वाटते त्यांनी आपापल्या बोली भाषा स्वतंत्र जाहीर केल्यास अल्पसंख्यांकाना मिळणारे घटनात्मक संरक्षण बर्‍याच बोलीभाषा धारकांना मिळू शकेल. असे वाटते

हा मार्ग काही काळा पर्यंत खुला होता. त्या दरम्यान धीरूभाई अंबानी सारख्या शाळांनी तो दर्जा मिळविला. पण सोनिया गांधी ह्यांच्या NCMEI कायद्याने ती पळ वाट बंद केली. ह्या कायद्या प्रमाणे अल्प संख्यांक शाळांना NCMEI कमिशन कडून NOC मिळवणे आवश्यक आहे. ह्या कमिशन चे सदस्य कायद्याने *** फक्त मुस्लिम, ख्रिस्ती, बिगर हिंदूच *** असू शकतात.

आता सांगा मुंबईतील सरस्वत कोकणी शाळेने अर्ज केला तर त्यांना NOC भेटेल का ?

माहितगार's picture

10 Mar 2016 - 11:32 am | माहितगार

साहनीजी बकीच्या प्रतिसादास उत्तर देतोच तत्पुर्वी NCMEI च्या वेबसाईटवरील अबाऊट अस पानावरील मुद्दा क्रमांक ३ दिनांक ३/१०/२०१६ सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी जसा दिसला त्यात "However, the linguistic minorities are outside the purview of the NCMEI Act." असे ठळक अक्षरात नमुद केले आहे.

त्या शिवाय चांगला कायदे तज्ञ सोबतीस असल्यास ncmei कायद्यात वेगळा कायदा करुनही बंद करण्यास अवघड असेल अशा पळवाटा प्रथमदर्शनी दिसतात पण ते सांगणे माझे काम नाही ;) असो.

साहना's picture

10 Mar 2016 - 11:43 am | साहना

मी कायदे पंडित नाही. मी रेफेरेंस मध्ये RealityCheckIndia चे लिंक दिले आहे. तो लेखक पंडित आहे, त्यांचे लेखन वाचावे म्हणजे मुद्दे लक्षांत येतील. त्याच्या सरके लिहायची माझी कुवत नाही.

प्रदीप साळुंखे's picture

10 Mar 2016 - 9:12 am | प्रदीप साळुंखे

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसादही,
लेखाबद्दल धन्यवाद!!!

आतिवास's picture

10 Mar 2016 - 10:04 am | आतिवास

वेगळा विषय दिसला म्हणून अपेक्षेने धागा उघडला.
टीका करायला आणि चर्चा करायला अडचण नाही - तो घटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे.
पण जिझिया कर, शिक्षण हा हक्क असू शकतो काय, सोनिया गांधी यांनी घटना दुरुस्ती केली, हिंदू पुढा-यांचा षंढपणा... वगैरे शेलकी भाषा (शेलकी विशेषण असतात तशी शेलकी भाषा) वाचून या विषयावर इथं अधिक लिहावं की नको या विचारांत पडले आहे.

मृत्युन्जय's picture

10 Mar 2016 - 10:19 am | मृत्युन्जय

मी देखील सुरुवातीला हाच विचार केला होता. पण लेखकाची लिखाणामागील कळकळ जाणवली त्यामुळे मी त्या भाषेच्या वापराच्या मुद्द्याला गौण ठरवले. अजुन विचारांती असे दिसते की या लेखामागची प्रेरणा राजकीय देखील वाटत नाही. लेखक ज्या तळमळीने सोनिया गांधी आणि काँग्रेस वर टीका करतो आहे त्याचप्रकारे संघाच्या भूमिकेबद्दलही स्पष्ट नापसंती दर्शवतो आहे आणि हे करताना त्याच्या मते जो नेता बरा वाटतो त्याच्या भूमिकेचे खुलेपणाने वर्णनही करतो आहे. या आणी अश्या काही कारणांमुळे हा धागा मला राजकीय धूळवडीचा वाटत नाही आणि शिवाय लेखामागची भावना लक्षात घेता काही गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले.

असो. ही माझी भूमिका झाली. पण इतर राजकीय धूळवड धाग्यांपेक्षा हा धागा वेगळा आहे आणि त्याचा आशय आणि विषय वेगळा आहे.

तर्राट जोकर's picture

10 Mar 2016 - 10:28 am | तर्राट जोकर

+१

जिझिया कर हे अलंकारिक विशेषण आहे. त्याला कुठल्याही दृष्टीने "शेलके" म्हणता येत नाही.

सोनिया गांधीनी घटना दुरुस्ती केली हे सत्य आहे. RTE, ९३वी घटना दुरुस्ती इत्यादीत सोनिया गांधी ह्यांच्या सल्लागार मंडळाची फार मोठी आणि प्रमुख भूमिका आहे. "शिक्षणाचा अधिकार" हि सोनिया गांधी ह्यांची कल्पना असून ती त्यांनी २००० साली वाजपेयी प्रधानमंत्री असताना (विरोधी पक्षांतून) त्यांनी मंडळी होती. ९३वि दुरुस्ती आणि NCMEI हे सुद्धा सोनिया गांधी ह्यांचेच विजन आहे. हा आरोप सुद्धा नाही! कोन्ग्रेस नेत्यांना विचारलं तर ते अतिशय अभिमानाने ह्या गोष्टी मान्य करतील.
ह्यात "शेलके" असे काय आहे हे कृपया स्पष्ट करावे.

हिंदू पुढारी लोकांचा षंढ पणा ही शेलकी भाषा आहे हे मी मान्य केलेच पाहिजे. वास्तविक पाहता मी आणखीन शार्प भाषा वापरली होती पण संस्कार आडवे आले.

बाळ सप्रे's picture

10 Mar 2016 - 12:26 pm | बाळ सप्रे

वगैरे शेलकी भाषा (शेलकी विशेषण असतात तशी शेलकी भाषा) वाचून या विषयावर इथं अधिक लिहावं की नको या विचारांत पडले आहे

इथे मला या गोष्टी दुय्यम वाटतात. अल्पसंख्यांकांच्या शाळांना यातून वगळणं निश्चितच अन्यायकारक वाटतं.
खासकरून अंबानींच्या शाळेसारखी श्रीमंत संस्था या निकषामुळे वगळली जात असेल तर खचितच अयोग्य आहे.
हे कलम वगळता कायद्याचा हेतु (इतर नागरीकांवर जास्त बोजा पडणार असला तरी) योग्य वाटतो.

माझ्यामते खर्‍या निधर्मी राज्यात सरकारने कुठल्याही नागरीकाचा धर्म विचारू नये. धर्म हा संपूर्णपणे वैयक्तिक पातळीवर असावा.

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2016 - 11:27 am | बोका-ए-आझम

शिक्षणाचा हक्क मूलभूत ठरवलाय - याचा अर्थ त्याचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि जर तसं होत नसेल तर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात writ petition दाखल करणं हा मार्ग लोकांपुढे आहे की नाही?

अभिजित - १'s picture

10 Mar 2016 - 3:40 pm | अभिजित - १

RSS किवा BJP चा लोकांची इतकी क्षमता नाही कि ते इथे काही करू शकतील. फंड गोळा करणे आणि मंदिरे उभारणे आणि आपले उच्च विचार लोकांच्या गळी उतरवणे इतकेच जमते त्यांना .. थोडक्यात सांगायचे तर पढतमुर्ख आहेत हे लोक .

मला सुद्धा तसे अनेकदा वाटते, पण संघने संघटना उभारण्याचे काम छान केले आहे. १००० लोक ते सहज जमा करू शकतात पण दुर्दैवाने शिस्तीवर आधारित संघटना मध्ये स्वतंत्र विचारांच्या लोकांना जास्त headroom असत नाही. अनेक जाती प्रांताच्या लोकांना संघाने "राष्ट्रप्रेम" ह्या व्याख्या न केलेल्या शब्दाच्या आधारे जवळ आणले आहे. माझ्या मते संघ आणि भाजप वाल्यांना काहीही मुलभूत सिद्धांत नाहीत त्या मुळे गरज पाहून ते वाट्टेल त्या कोलांट्या उड्या मारतात आणि कुणीही त्यांची चूक दाखवली कि शिस्तीचे कारण सांगून त्याला बेदखल करतात. ह्यामुळे RTE सारख्या दूरगामी परिणाम करणार्या कायद्यावर किंवा सोनिया गांधीच्या कोर टीमच्या विजन वर हे लोक काही तोड काढतील अशी अपेक्षा माझ्या मनात तरी नाही. ह्याच्या साठी आमच्या तुमच्या सारख्यांनी कंबर कसली पाहीजे.

माहितगार's picture

11 Mar 2016 - 11:29 am | माहितगार

ह्याच्या साठी आमच्या तुमच्या सारख्यांनी कंबर कसली पाहीजे.

;)

अभिजित - १'s picture

11 Mar 2016 - 3:30 pm | अभिजित - १

पब्लिक पिटीशन टाका .. change.org वर