लस आणि शेरलॉक

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
14 Apr 2021 - 4:40 pm

“अहो उद्या आपला लसीचा दुसरा डोस आहे” रजनीकाकू उत्साह –भीती मिश्रित आवाजात अशोककाकांना आठवण करून देत होत्या.
“हो हो,अग पण बातम्या येत आहेत की लस संपली आहे.काय माहित आपल्या सेन्टरवर काय परिस्थिती असेल.”अशोक काकांना लस मिळेल की नाही धास्ती वाटत होती.
“मीना वहिनींना फोन करतेय तर त्यांचा फोनच लागतं नाही,मागच्यावेळी आम्ही दोघींचा लसीसाठी नंबर येऊ पर्यंत चांगला टाइमपास झाला होता,यावेळीही त्या असत्या तर तसाच वेळ गेला असता.” रजनीकाकूंना उद्या वेळ कसा जाईल याचा प्रश्न पडला होता.
उद्या लस मिळेल का याचा विचार करत दोघेही रात्री लवकर निजले.
दुसऱ्या दिवशी रजनीकाकू पहाटे लवकरच उठल्या एखाद्या दूर गावाला देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे अशा आवेशात त्यांनी भराभर सर्व कामी उरकली.नाष्टासाठी काकांना आवडणारे पोहे केले,स्वतःला पोळी आणि भाजी केली.अशोक काकांनीही लवकर देवपूजा करून “लस शिल्लक असू दे रे महाराजा” असा उद्घोष केला.
नऊ वाजले लगबगीने दोघेही मास्क चढवत आरोग्यकेंद्राकडे रवाना झाले.
आरोग्य केंद्रावर पोहचता चूक चूक करत परतणारा बरेचसे लोक दिसले.
काकांनी विचारले “ काय झाले?”,
“लस नाहीये ,संपली म्हणे” एकजण म्हणाला.
“चला परत घरी”काकू निराशेने म्हणाल्या.
“इथवर आलो आहोत तर सीमाला भेटून जाऊ”काकांना लवकर घरी जाण्यात काहीच स्वारस्य नव्हते.
“अहो काळ काय ?कुठे फिरायचं ?सीमाच काम चालू असेल.”
“चल चल” म्हणत काका पटकन पुढे केले ,काकूही नाराजीने मागेमागे गेल्या.
सीमा केंद्रावर काम करणारी नर्स होती पण सतत सर्व्हे करायला यायची त्यामुळे तिच्याशी दाम्पत्यांची जुजबी ओळख झाली होती.
“नमस्ते सीमा,आता समजल लस नाहीये .संपली आहे .तेव्हा कधी येणार आहे विचारव म्हणाव तुला.”काका सीमाला म्हणाले.
“हो काका आताच पहिल्या डोससाठी आलेल्या लोकांना आम्हाला घरी पाठवावे लागले.”
“म्हणजे ते पहिल्या डोससाठी आलेले लोक होते तर,दुसऱ्या डोस असेल तर मिळेल का?” काकांनी विचारले.
“सांगता नाही येणार ,सर आले की कळेल.”सीमा जरा संभ्रमातच म्हणाली.
तेवढ्यात सर आले.”सर लसीचा दुसरा डोस मिळेल का?” काकांनी घाईघाईतच विचारलं आणि प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.
“नर्स त्या फ्रिझरमध्ये स्टोक किती उरला आहे ते पाहा” काकांच्या प्रश्नांनी आणि लशीच्या ताणाने सरांच डोक भणभणल होत.
नर्सने आत जाऊन एक बाटली आणली .काका ,काकू लस शिल्लक आहे हे बघून आनंदून गेले.
नर्सने आधी काकांना लस दिली आणि काकूंना देताना बाटली बऱ्याचवेळा खालीवर केली.
"आहे कि नाही" ती पुटपुटली.
“काय म्हणाली?” रजनी काकू कान टवकारत तिला विचारू लागल्या.”काही नाही करा दंड पुढे देते लस” असे म्हणत सीमाने काकूंना लस दिली.डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि कशा घ्यायच्या ते सांगितले.
काका - काकू आता संध्याकाळी आणि उद्या डबा मागवावा लागेल असा विचार करत घरी पोहचले.पहिल्या डोस घेतल्यावर काकूंना अशक्तपणा आला होता.तेव्हा आताही सगळी तशीच तयारी ठेवावी म्हणून काकांची डब्यासाठी घाई चालली होती.
दुपारची वामकुक्षी झाल्यावर काकांना वाटलं ही काही उठायची नाही ,जवळ जाऊन पहावे तर काकू मस्तपैकी चहा करत होत्या.
“रजनी बर वाटतंय ना तुला .आराम करायचा.काही थकवा त्रास ?” काकांची प्रश्नाची सरबत्ती नेहमीप्रमाणे चालू लागली.
“नाही हो,काही त्रास वाटत नाहीये .मागच्यावेळी खूप थकवा आला होता .” चहाचे घोट पित पित काकू म्हणाल्या.
काकू नाही म्हणाल्या म्हणून रात्री डबाही मागवला नाही.
दुसऱ्या दिवशी काकू पुन्हा लवकर उठल्या भरभर काम आवरत होत्या.
“काही त्रास ?”काकांचा पुन्हा प्रश्न.
तशा काकू धीर गंभीर होत म्हणाल्या “अहो,नक्की मला लस मिळाली ना? यावेळी नाही त्रास नाही झाला आणि सीमापण आहे की नाही अस काहीतरी पुटपुटत होती.अजून आपल सर्टिफिकेटही नाही आले.”
लसी आणि लसीच राजकारण यावरला लेख त्यांनी लिहायचं बाजूलाच ठेवलं.
आता पुन्हा आपला घरगुती शेरलॉक होणार आणि किती वेळ होणार याबाबत काका विचार करत बसले.

-भक्ती

मुक्तकविडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

आजकालच्या आणि सर्वसामान्यांना भिडणाऱ्या विषयावर रचलेली छोटेखानी कथा आवडली.

Bhakti's picture

14 Apr 2021 - 5:13 pm | Bhakti

हो प्रचेतस
पण सांगाव वाटत ही सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे.
अवघड आहे सगळं.

गॉडजिला's picture

14 Apr 2021 - 7:49 pm | गॉडजिला

I will solve your murder, but it takes John Watson to save your life - शरलॉक

Bhakti's picture

15 Apr 2021 - 1:20 pm | Bhakti

.

सतिश म्हेत्रे's picture

15 Apr 2021 - 6:21 pm | सतिश म्हेत्रे

छान वाटली कथा.