लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना"
चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले.
शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले ....
स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ...
"गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे."
बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा ....
"सध्या आम्ही फक्त दारूवादी."
एखादा जर, गोल गोल राणी, करत, मुळ विषयाला, जाणून बुजून बगल देत असेल तर, खालील डायलाॅग ऐकवायचा....
"मारूती कांबळेचे काय झाले?"
पण, सर्वात जास्त वापरलेला डायलाॅग मात्र एकच .....
एखाद्या गोष्टीला अनेक पैलू असतात. समस्येच्या मुळाशी न जाता, नेता सांगतो, तेच सत्य किंवा एखादे वर्तमान पत्र सांगत आहे, तेच सत्य, किंवा एखादे पुस्तक सांगतंय तेच सत्य, असे समजून चालणारी, एक जमात असते.... अशा जमातीतला, एखादा भेटतोच भेटतो.... सत्य नाकारणारा, मनुष्य भेटला की, एक डायलाॅग ऐकवावासा वाटतो .....
आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?
प्रतिक्रिया
29 Jan 2021 - 12:26 pm | राघव
मुवि काका जोरात!
29 Jan 2021 - 12:45 pm | शशिकांत ओक
असे राजदीप यांना विचारायला आता दीप घेऊन शोधायची गत होणार की काय?
29 Jan 2021 - 12:58 pm | कंजूस
हे सुज्ञाना माहीत झालंय. कारण त्यांच्या मागे झुंडशाही असते. आपल्या मागे फक्त एक डबल डेकर बस. ती पण गेल्यात जमा.
तेव्हा अक्षयकुमार निर्मित FAU_G गेम डाउनलोड करा आणि चिन्यांना { त्यांच्याच} मोबाइलवर लुटुपुटु हाणा .
आत्मनिर्भर.
29 Jan 2021 - 1:01 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
29 Jan 2021 - 1:01 pm | बाप्पू
मुवि काका जोरात.. मिपाकर्स कोमात..
एका मागोमाग एक धागे..
29 Jan 2021 - 2:08 pm | कुमार१
छान वाक्ये
29 Jan 2021 - 5:58 pm | मुक्त विहारि
सामना, हा कालातीत सिनेमा आहे ...
दुर्दैवाने मी ऑस्कर परिक्षक नाही ... नाहीतर, ह्या सिनेमाला, सर्वकालीन सर्वोत्कृष्ट सिनेमा, असा पुरस्कार दिला असता ...
दरवेळी, वेगवेगळे मानवी स्वभावाचे पैलू उलगडत जातात आणि पुढच्या वेळी बघतांना, अजूनच काही वेगळे हाताला लागते....
30 Jan 2021 - 7:19 pm | गामा पैलवान
मुविकाका,
सर्वकालीन सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून सामनास घोषित करण्यासाठी ऑस्करचं परीक्षक कशाला व्हायला पाहिजे? त्याविनाही घोषणा करता येते की! ;-)
आ.न.,
-गा.पै.
30 Jan 2021 - 7:53 pm | मुक्त विहारि
जोपर्यंत एखादा परदेशी सांगत नाही, तोपर्य॔त त्या गोष्टीला, भारतात समाजमान्यता मिळत नाही....
राहुल गांधी, हे अपरिपक्व नेते आहेत, हे बराक ओबामांनी, सांगीतले तरच पटणार... सामान्य माणसाने, कितीही ओरडून सांगीतले तरी, ही वस्तुस्थिति, घराणेशाहीची पूजा करणारे, लवकर स्वीकारत नाहीत.
30 Jan 2021 - 11:59 pm | गामा पैलवान
मुवि,
हें बरींक खरें ! पण शेवटी आपण आपल्या मर्जीचे राजे !
आ.न.,
-गा.पै.
31 Jan 2021 - 1:53 am | शशिकांत ओक
प्रतिसाद दिला आहेत. मान गये उस्ताद
1 Feb 2021 - 5:16 pm | nutanm
तर माझ्यासारखी जास्त काय बोलणार, मुविजी आपल मत एकदम पटले.परदेशीयांनी सांगितल्यवरच आपल्या बहुतेकांना पटते . हल्ली हल्लीच सर्वाना थोडे कळतेय दोन्ही कडे सारखेच चांगले व वाईट आहे. कुठलेही टोकाचे मत नसणारी, (तेही माझ्या मते) nutanm
1 Feb 2021 - 6:39 pm | शाम भागवत
ह्या वाक्यांचा उगमस्थान आहे स्वामी विवेकानंद.
त्याचा सुंदर उपयोग केलाय डॅा भटकर यांनी.
सकाळ मध्ये त्यांचा लेख आला होता. त्यात त्यांनी या वाक्यावर आधारित महासंगणकाची कथा सांगितली होती.
31 Jan 2021 - 6:06 pm | सिरुसेरि
छान लेखन . पुर्वी अनेक ऑर्केस्ट्रांमधे सामनामधील संवादांची मिमिक्री होत असे . जसे की , "मास्तर , औंदा पोरं पास झाली पाहिजेत . नाहितर शाळेची छपरं जाग्यावर राहणार नाहीत . "