दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..
सहजच चूक ती मान्य करोनी, तू निमूट माझ्यासमोर यावे,
तुला पाहुनी छद्मीहसूनी मी मग उदारातेने माफ करावे.
सहजच मग तू लाचार हसूनी, स्पर्ष मला जरा करु पहावा,
शहारुन मी झुरळा सारखा झटकून त्याला दूर करावा.
सहजच तुझिया नयनी तेव्हा अंगार क्षणभर फुलूनी यावा,
संधी साधुनी तेवढीच मग शब्दांचा तूज मार बसावा .
सहजच म्हणूनी बाजाराला, आपण दोघांनी पोचावे,
रिक्तहस्ते कैसी परतू मी? मग आठ दहा तरी कपडे घ्यावे .
अशी सहजता माझ्या मधली, नाव कोणते देऊ याला?
जूने जितके होऊ तेव्हढा, माझा दरारा वाढत जावा..
(पिडीत) पैजारबुवा,
प्रतिक्रिया
11 Sep 2020 - 9:17 am | प्रचेतस
मूळ पीठच विशेष आवडलं नसल्याने विडंबनातही मजा नाही आली.
11 Sep 2020 - 9:57 am | Bhakti
जमलय.. मस्त
20 Sep 2020 - 3:31 am | शार्दुल_हातोळकर
छान विडंबन !!