पदर

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
5 Jun 2018 - 1:43 pm

युष्या मला तुझी खबर मिळू दे
केलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे

प्रेमरोगी कधी होत नाही बरा
औषधाच्या नावावर जहर मिळू दे

जन्म जावो उभा वाळवंटी फिरून
अंत समयी परी तुझे शहर मिळू दे

काट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी
कागद कोरा कराया रबर मिळू दे

नको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष
मिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे

वाट पंढरीची सरता सरे ना झाली
विठुनामी अमृताचा गजर मिळू दे

मंजूर आहे मरण अगदी या क्षणीही
एक तुझी हळहळती नजर मिळू दे

किनाऱ्यावर आता नाही राहिली मजा
खोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे

सात जन्म संपत आले गोष्ट तरी बाकी
सोबतीचा अजून एखादा प्रहर मिळू दे

काहीच यातले वा नको तुझ्या कुशीत
लपायला तुझा फक्त आई पदर मिळू दे

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 2:16 pm | श्वेता२४

शेवटच्या दोन ओळी का कुणास ठाऊक शोभत नाहीत असं वाटलं. त्या दोन ओळी सोडून बाकी छान लिहीलय. खरं तर याही ओळी छान आहेत फक्त त्या वरच्या आशयाला शोभत नाहीत असं वाटलं. माफ करा

अगदी बरोबर आहे. गझलेच्या नियमानुसार प्रत्येक शेर स्वतंत्र हवा.. आणि शेवटच्या शेराने ही गझल नियमबाह्य होते. लिहिताना लक्षात आले पण तुम्हाला वाटले तसेच तो एक स्वतंत्र शेर म्हणून तसाच राहू दिला.. कविमनाच्या समाधानासाठी ☺

छानच! प्रत्येक शेर मस्त.

खिलजि's picture

11 Jun 2018 - 5:43 pm | खिलजि

छान झाली आहे . मस्तच

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मदनबाण's picture

11 Jun 2018 - 6:04 pm | मदनबाण

केवळ अप्रतिम !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bho Shambo Shiva Shambo by Lakshmy Ratheesh & Radhika Venugopal