मराठी ब्लॉगविश्व आता केवळ हौशी नवोदितांचे माध्यम उरलेले नाही. अक्षर साहित्यात ज्याला हक्काचे स्थान मिळेल असे सकस लिखाण इथले
कित्येक लेखक सातत्याने करत आहेत.
या लेखनातील सुमारे ६० निवडक ब्लॉग्सचे वाचन करून या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत प्रकाशित झालेल्या नोंदींपैकी काही वेचक नोंदी आम्ही निवडल्या आहेत. या नोंदी त्या त्या लेखकांच्या ब्लॉगपत्त्यासह आणि लेखकांच्या जालीय नावासह 'रेषेवरची अक्षरे २००८' या नावाने एका पीडीएफ फायलीत प्रकाशित करण्यात आल्या आहेत. भाषा, आशय, नाविन्य आणि घाट अशा निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
हा 'रेषेवरची अक्षरे २००८'चा दुवा.
या लेखनाचे अंतिम हक्क लेखकांकडेच राहणार असून या उपक्रमात कोणताही आर्थिक व्यवहार अंतर्भूत नाही.
संकलन वाचून आपले मत जरूर कळवा.
(मेघना, ए सेन मॅन, ट्युलिप, संवेद)
प्रतिक्रिया
22 Oct 2008 - 1:03 pm | मनिष
पीडीएफ नाहि बघता येत आहे? The viewer is unable to Descrypt असा मेसेज येतो आहे!
22 Oct 2008 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाचून मत कळवेनच
पीडीएफ नाहि बघता येत आहे? The viewer is unable to Descrypt असा मेसेज येतो आहे!
मला इव्हिन्स वापरून पीडीएफ बघता आली.
अदिती
22 Oct 2008 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते
मी उतरवली आणि मला नीट दिसत आहे. तुझ्या कडे अडोब पीडीएफ रिडर आहे का? काही मदत लागली तर सांग.
बिपिन कार्यकर्ते
22 Oct 2008 - 1:13 pm | मनिष
हो, अडोब पीडीएफ रिडर ५ - व्हर्जन चा प्रॉब्लेम दिसतोय! :(
फाईल च्या हेक्स डम्प मधे हे मिळाले -
22 Oct 2008 - 1:14 pm | मनिष
डाऊनलोड्चा प्रॉब्लेम आहे तर! बघतो...
22 Oct 2008 - 1:26 pm | मनिष
Your browser appears to be configured to reject cookies from googlegroups.com. Please set your browser settings to allow cookies from googlegroups.com, or your attachment will not download.
हे मी केलेल्या सुररक्षेचे परीणाम, कुकी वेगळ्या डोमेनकडून पाठवतोय गुगल. असो!
22 Oct 2008 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते
मेघना, पूर्ण फाईल नीट वाचेन, पण एक खरोखर विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल, तुझे आणि या उपक्रमात सामिल असणार्या सर्व लोकांचे अभिनंदन लगेच करतो.
बिपिन कार्यकर्ते
22 Oct 2008 - 1:06 pm | मनिष
हे खूप आवडले
22 Oct 2008 - 2:25 pm | आनंदयात्री
रेषेवरच्या अक्षरांची स्वागताची अक्षरे सुरेख आहेत. आवडली.
दिवाळी अंकाबद्दल धन्यवाद.
22 Oct 2008 - 1:17 pm | सहज
वाचून कळवेन.
22 Oct 2008 - 1:19 pm | स्वाती दिनेश
मेघना,रेषेवरची अक्षरे वरवर चाळली. आता सवडीने वाचते,दिवाळीअंकच झाला की हा एक!
सुरुवातीचे मुक्तक फारफार आवडले.
स्वाती
22 Oct 2008 - 5:47 pm | मनी
i tried but find it difficult to download the file wht is prob ? if any one can help in this matter. sorry its difficult to type in marathi ..
hope people can understand
Mani
22 Oct 2008 - 7:44 pm | प्राजु
आवडली. स्तुत्य उपक्रम आहे.
तुझ्या टीममधल्या सर्वांचे अभिनंदन..
निवांत वाचून कळवेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Oct 2008 - 7:47 pm | संदीप चित्रे
शांतपणे बघतो आता.
22 Oct 2008 - 8:02 pm | मानस
अभिनंदन
पीडीएफ डाऊनलोड केली आहे. निवांत वाचून झाल्यावर अभिप्राय कळवतो.
धन्यवाद
22 Oct 2008 - 9:37 pm | राजेन्द्र
फारच छान! पूर्ण वाचला व आवडला!!
22 Oct 2008 - 10:14 pm | सर्किट (not verified)
उत्तम उपक्रम !!!
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
25 Oct 2008 - 9:35 am | मुक्तसुनीत
अंक वाचन चालू आहे. काही कामामुळे हवा तसा निवांतपणा मिळत नव्हता. त्यामुळे ही प्रतिक्रिया विस्कळित , अपूर्ण ठरेल.
संपादिकेचे अभिनंदन केलेच आहे. या कामात बरीच मेहनत केली असणार , बराच वेळ दिला असणार. या सार्याबद्दल कौतुक वाटते. शाबासकी द्यावीशी वाटते.
आता अंकाबद्दल. अंकामागची भूमिका प्रस्तावनेत उत्तम रीतीने विशद केलेली आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, याची नोंद की , या अंकात कुठल्याही प्रकारचे मीमांसक लेखन : म्हणजे साहित्य, चित्रपट , संगीत , पौराणिक ग्रंथ इतिहास याबाबत विवेचन असणार नाही व सामाजिक/राजकीय विषयावरील लिखाण असणार नाही. हे वाचतानाच, वाचकाच्या अपेक्षा पुरेशा अचूकपणे प्रस्थापित झाल्या. याचा अर्थ सरळ होता की, या अंकातील लिखाणाचे स्वरूप केवळ "ललित" असे म्हणता येईल.
"ललित लिखांण" असे ज्याला पारंपारिक रीत्या म्हण्टले जाते त्यामधे कथा/कादंबर्या/कविता/लघुनिबंध( किंवा ललितलेख)/विनोदी स्फुटे/ प्रवासवर्णने याचा सामान्यतः अंतर्भाव होतो. नाटक/एकांकिका/नाट्यछटा सुद्धा यात अर्थात येतातच. आणि ब्लॉगविश्वाशी ज्याचा संबंध येणे प्रायः अशक्य आहे अशा महाकाव्याचाही समावेश यात करता येईल. आत्मचरित्रातील एखादा अगदी छोटासा भाग यात येऊ शकेल ; परंतु याच्या आणि ललितलेख यातील सीमारेषा फारच धूसर ठरतील.
पैकी प्रस्तुत अंकात कविता/लघुनिबंध( किंवा ललितलेख)/विनोदी स्फुटे/ प्रवासवर्णने स्थान मिळाल्याचे दिसते. यापैकी प्रवासवर्णन आणि विनोद यांचा परामर्शे वेगळा घ्यावा लागेल. आणि या दोन विभागांचे प्रमाण एकूण अंकामधे थोडे आहे. राहिलेल्या लिखाणाबद्दल एक महत्त्वाचे सूत्र मला दिसले. एकूण निवडीचे निकष लक्षात घेतां वैयक्तिक अनुभवाच्या चित्रणाला प्राधान्य मिळणे अपरिहार्य. आणि अनुभव ग्रहण करताना संवेदना आणि विचार या दोन प्रमुख फॅकल्टीज् (मराठी शब्द ?) पैकी संवेदनांना प्राधान्य मिळालेले दिसते. याचे एक कारण असे की, विचार या फॅकल्टीवाटे जेव्हा आपण आपल्याला येणार्या अनुभवाचे ग्रहण करतो तेव्हा त्याला सामाजिक/राजकीय/ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भ बहुशः चिकटून येतात. आपण आपल्या विचारांची सांधणी एका पोकळीत बहुशः करत नाही. याउलट संवेदनशीलतेला जे टिपायचे त्याचे स्वरूप बहुतांशी सार्वभौम असे ठरते. आणि एकूण अंकाच्या निवडीशी , संपादनप्रक्रियेशी या प्रकारचे अनुभव नैसर्गिकरीत्या मेळ खातात.
अंक वाचायला सुरवात केली आणि अपेक्षांना फार धक्का बसेल असे (चांगल्या किंवा वाईट, दोहो अर्थांनी) दिसले नाही. काही लेख वाचले , काही कविता वाचल्या. त्याबद्दलची इम्प्रेशन्स थोडी सांगता येतील. एकेका कलाकृतीचा आढावा घेत घेत शेवटी सार्या अंकाचे सिंहावलोकन आणि एकूण ताळेबंद असे खरे तर लिहायला हवे. यापैकी पहिल्या भागाबद्दलचे थोडेसे याच धाग्यात हळुहळू लिहीत राहीन.
25 Oct 2008 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंक आज चाळला, ब्लॉगवरील उत्तम लेखन निवडणे तसे कठीन काम आहे. अंकासाठी संपादक मंडळाने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक आहेच. या उपक्रमात सहभागी सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !!!
तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
26 Oct 2008 - 6:51 am | सर्किट (not verified)
तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!!
अहो तो विसोबा खेचर म्हणजे तात्या नाही, चिरुटेशेठ !!!
च्यामारी येवढे तात्याचे चमचे म्हणून तिकडे मिसळप्रेमी तुमचा उदो उदो करतात, आणि तुम्हाला यवढं शिंपल पन कळेना ?
च्छा !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
26 Oct 2008 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यामारी येवढे तात्याचे चमचे म्हणून तिकडे मिसळप्रेमी तुमचा उदो उदो करतात, आणि तुम्हाला यवढं शिंपल पन कळेना ?
कोण म्हणतं आम्हाला तसं ;)
बाय द वे, त्या ब्लॉगवर एक महिला सदस्य आमच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यासाठी त्या संस्थळाचा उपयोग करते, याचे फार आश्चर्य वाटले. स्त्रीया असेही करु शकतात, या विचारानेच चक्रावलो आहे.
संस्कृतचे एक वचन पाठ आहे ;)
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवा: जीथे स्त्रींयांची पूजा (आदर केला जातो ) केली जाते. तिथे देवता वास करतात असे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही स्त्रीयांचा जिथे तिथे आदर करतो, त्यांना नमस्कार करतो. पण त्यामुळे आमची मोठी गोची झाली आहे. :)
-दिलीप बिरुटे
(धार्मिक )
26 Oct 2008 - 4:02 pm | विसोबा खेचर
तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!!
अहो बिरुटे मास्तर, ते विसोबा खेचर आम्ही नाही,
आमचे लेखन हे अश्या कुठल्या रेषेवरील अक्षरे.." वगैरेसारख्या उच्च साहित्यिक का काय म्हणतात (!) अश्या ठिकाणी सिलेक्ट होण्याच्या लायकीचे नसते! :)
तात्या.
26 Oct 2008 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो बिरुटे मास्तर, ते विसोबा खेचर आम्ही नाही,
हम्म :( विसोबा खेचर म्हणजे तात्या इतकेच आम्हाला माहित, तेव्हा वरील प्रतिसादात आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!! असे वाचावे.तात्या, यांचे नाव लिहिल्यामुळे ज्यांना मानसिक त्रास झाला त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
26 Oct 2008 - 12:13 pm | मेघना भुस्कुटे
धन्यवाद मंडळी प्रतिसादाबद्दल.
मुक्तसुनीत, खरं आहे. 'हा पहिलाच अंक आहे. ब्लॉग्स आत्ता कुठे गंभीरपणे लिहायला लागले आहेत' असं समर्थन करता येईलच. पण ते लंगडं आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. हे साहित्य उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तमोत्तम होत जाईल, अशी अपेक्षा.
सर्किट, गैरसमज दूर केल्याबद्दल आभार. :)
26 Oct 2008 - 1:03 pm | मुक्तसुनीत
संपादिका बाईंच्या येथील व माझ्या खरडवहीतील प्रतिक्रियेवरून मला या अंकात काही टीका करण्यायोग्य न्यून सापडले असावे असा त्यांचा समज झालेला दिसतो. त्यांनी अंगभूत चांगुलपणा व विश्वास यामुळे माझ्या कथित टीकेचे स्वागत जरी केले असले , तरी मला थोडे स्पष्टीकरण देणे येथे भाग आहे.
माझ्या वरील पोस्ट मधे मी टीकेचा सूर कुठे लावला आहे असे मला वाटत नाही. जे वाचले त्याचे (मला जाणवलेले) स्वरूप विशद करून सांगावेसे वाटले. एखादी गोष्ट काय आहे आणि काय नाही हे सांगितल्यामुळे त्या गोष्टीला कुठले न्यूनत्व येते असे म्हणता येत नाही.
जसजसा अंक वाचत जाईन तसतसे त्याबद्दल थोडेबहुत लिहावे असा अजूनही मानस आहे.