✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेषेवरची अक्षरे २००८

म
मेघना भुस्कुटे यांनी
Wed, 10/22/2008 - 12:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16974 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

म
मनिष Wed, 10/22/2008 - 13:03 नवीन

पीडीएफ

पीडीएफ नाहि बघता येत आहे? The viewer is unable to Descrypt असा मेसेज येतो आहे!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/22/2008 - 13:05 नवीन

मेघना, धन्यवाद

वाचून मत कळवेनच पीडीएफ नाहि बघता येत आहे? The viewer is unable to Descrypt असा मेसेज येतो आहे! मला इव्हिन्स वापरून पीडीएफ बघता आली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 10/22/2008 - 13:06 नवीन

मी उतरवली

मी उतरवली आणि मला नीट दिसत आहे. तुझ्या कडे अडोब पीडीएफ रिडर आहे का? काही मदत लागली तर सांग. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Wed, 10/22/2008 - 13:13 नवीन

हो, अडोब

हो, अडोब पीडीएफ रिडर ५ - व्हर्जन चा प्रॉब्लेम दिसतोय! :( फाईल च्या हेक्स डम्प मधे हे मिळाले -
/* Copyright 2008 Google. */ (function() { // Input 0 var a=window; // Input 1 var b="start";function c(){this.t={};this.tick=function(d){this.t[d]=(new Date).getTime()};this.tick(b)}var e=new c;a.jstiming={Timer:c,load:e};if(a.external&&a.external.pageT)a.jstiming.pt=a.external.pageT; })() webspace = {}; webspace.domain = 'defaultdomain'; webspace.isConsumer = true; webspace.sharingPolicy = 'OPENED'; webspace.baseUri = '/site/reshewarachiakshare2008'; webspace.siteTitle = 'reshewarachiakshare2008'; webspace.homePath = '/'; webspace.analyticsAccountId = ''; webspace.enableAnalytics = false; webspace.domainAnalyticsAccountId = ''; webspace.termsUrl = 'http://www.google.com/sites/help/intl/en/terms.html'; webspace.gadgetDirectoryUrl = 'http://www.google.com/ig/directory'; webspace.isStartPageEnabled = false; webspace.user = {}; //must be a guest webspace.user.uid = ''; webspace.user.primaryEmail = 'guest'; webspace.user.userName = 'guest'; webspace.user.displayNameOrEmail = 'guest'; webspace.user.domain = ''; webspace.user.hostedAccount = false; webspace.user.guest_ = true; webspace.user.hasAdminAccess = false; webspace.user.hasWriteAccess = false; webspace.page = { type: "text", properties: {}, title: "System_Error_Too_Many_Redirects", path: "/system/errors/TooManyRedirects", wuid: "wuid:gx:1b0f6", name: "TooManyRedirects", revision: "1", parentPath: "/system/errors", canChangePath: true, state: "", locale: "en", bidiEnabled: false }; var editorResources = [ '/site/reshewarachiakshare2008/_/rsrc/1223500934543/system/js/trog_edit.js', '/site/reshewarachiakshare2008/_/rsrc/1223501915240/system/app/css/trogedit.css', '/site/reshewarachiakshare2008/_/rsrc/1223500834953/system/app/css/editorToolbar.css' ]; var JOT_clearDotPath = "/site/reshewarachiakshare2008/_/rsrc/1223501440667/system/app/images/cleardot.gif"; window.jstiming.load.tick('scl'); /* Copyright 2008 Google. */ (function() { var e=window,h="length";function i(a){return document.getElementById(a)}e.byId=i;var j="";function l(a){return a.replace(/^\s+|\s+$/g,j)}e.trim=l;var n="MSIE",o="6.0",p="string",q="px",r='progid:DXImageTransform.Microsoft.AlphaImageLoader(src="',s='", sizingMethod="scale")',t="noIe6ImgFix";function u(a){var c=e.navigator?navigator.userAgent:j;if(c.indexOf(n)!=-1&&typeof opera=="undefined"){var b=/MSIE\s+([^\);]+)(\)|;)/;b.test(c);var f=RegExp.$1;if(f==o){var d=typeof a==p?document.getElementById(a): a;d.onload=j;d.style.width=d.width+q;d.style.height=d.height+q;d.style.filter=r+d.src+s;d.src=e.JOT_clearDotPath;d.setAttribute(t,true)}}}e.ie6ImgFix=u;var v=[],w=0;function x(a,c,b){var f=new String(w++),d={eventName:a,handler:c,compId:b,key:f};v.push(d);return f}e.JOT_addListener=x;function y(a){var c=v;for(var b=0;b window.jstiming.load.tick('cl'); Attachment error (reshewarachiakshare2008) guest | Help | Sign out Image removed.

reshewarachiakshare2008

Attachment error

Your browser appears to be configured to reject cookies from googlegroups.com. Please set your browser settings to allow cookies from googlegroups.com, or your attachment will not download.

Sign in Home Sitemap Terms Report Abuse | Powered by Google Sites

window.jstiming.load.tick('sjl'); window.onload = function() { var loadTimer = window.jstiming.load; loadTimer.tick("ol"); loadTimer["name"] = "load"; window.jstiming.report(loadTimer); } window.jstiming.load.tick('jl'); JOT_insertAnalyticsCode(); //
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मनिष Wed, 10/22/2008 - 13:14 नवीन

व्हर्जन चा प्रॉब्लेम नाही

डाऊनलोड्चा प्रॉब्लेम आहे तर! बघतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Wed, 10/22/2008 - 13:26 नवीन

प्रॉब्लेम सापडला --

Your browser appears to be configured to reject cookies from googlegroups.com. Please set your browser settings to allow cookies from googlegroups.com, or your attachment will not download. हे मी केलेल्या सुररक्षेचे परीणाम, कुकी वेगळ्या डोमेनकडून पाठवतोय गुगल. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 10/22/2008 - 13:04 नवीन

अभिनंदन

मेघना, पूर्ण फाईल नीट वाचेन, पण एक खरोखर विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल, तुझे आणि या उपक्रमात सामिल असणार्‍या सर्व लोकांचे अभिनंदन लगेच करतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 10/22/2008 - 13:06 नवीन

हे खूप

हे खूप आवडले
माणसं लिहीत होती. भाषा मरत असताना, संस्कृतीला धोका असताना, ब्रेनड्रेन होत असताना, साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना माणसं लिहीत आलीयेत. माणसं लिहितायत. अजूनही. पायांखालची माती आणि खिशातली चलनं बदलत गेली. छपाईची माध्यमं आणि मक्तेदार्‍या बदलत गेल्या. लिखाणाची भाषा कात टाकत गेली. लांबी अधिकाधिक आटत गेली. तरीही माणसं लिहितायत. नव्या दमानं. अजूनही. प्रेम, प्रेमभंग, पाऊस. नॉस्टाल्जिया, स्वदेस. कंटाळा, स्टॅग्नेशन. पुन्हा प्रेम. न चुकता पडणारी तीच ती भव्यदिव्य स्वप्नंबिप्नं. त्यांचे तेच ते माती खायला लावणारे अपेक्षित शेवट. आणि याच चिखलामातीतून रसरशीतपणे वर येणारी काही जिवंत झाडं हिरवीगार माणसं भाषेत रुजवत आलीयेत. माणसं लिहितायत. अजूनही. झाडांची दखल घ्या न घ्या. ती असतातच माती आणि पाण्यासकट. सावल्या पेरत. तशीच माणसांची अक्षरं तरत आलीयेत. परभाषांची आक्रमणं, कॉपीराइट्सच्या साठमार्‍या आणि छापखान्यांच्या मक्तेदारीतून. विचार पेरत. माणसं लिहीत आलीयेत. माणसं लिहितायत. अजूनही.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 10/22/2008 - 14:25 नवीन

असेच म्हणतो

रेषेवरच्या अक्षरांची स्वागताची अक्षरे सुरेख आहेत. आवडली. दिवाळी अंकाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
सहज Wed, 10/22/2008 - 13:17 नवीन

धन्यवाद

वाचून कळवेन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 10/22/2008 - 13:19 नवीन

वा..

मेघना,रेषेवरची अक्षरे वरवर चाळली. आता सवडीने वाचते,दिवाळीअंकच झाला की हा एक! सुरुवातीचे मुक्तक फारफार आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनी Wed, 10/22/2008 - 17:47 नवीन

i tried but find it

i tried but find it difficult to download the file wht is prob ? if any one can help in this matter. sorry its difficult to type in marathi .. hope people can understand Mani
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/22/2008 - 19:44 नवीन

मुखपृष्टावरची कविता

आवडली. स्तुत्य उपक्रम आहे. तुझ्या टीममधल्या सर्वांचे अभिनंदन.. निवांत वाचून कळवेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 10/22/2008 - 19:47 नवीन

धन्यवाद मेघना

शांतपणे बघतो आता.
  • Log in or register to post comments
म
मानस Wed, 10/22/2008 - 20:02 नवीन

चांगला उपक्रम

अभिनंदन पीडीएफ डाऊनलोड केली आहे. निवांत वाचून झाल्यावर अभिप्राय कळवतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राजेन्द्र Wed, 10/22/2008 - 21:37 नवीन

सुरेख

फारच छान! पूर्ण वाचला व आवडला!!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/22/2008 - 22:14 नवीन

उत्तम

उत्तम उपक्रम !!! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 10/25/2008 - 09:35 नवीन

प्रतिक्रिया -१

अंक वाचन चालू आहे. काही कामामुळे हवा तसा निवांतपणा मिळत नव्हता. त्यामुळे ही प्रतिक्रिया विस्कळित , अपूर्ण ठरेल. संपादिकेचे अभिनंदन केलेच आहे. या कामात बरीच मेहनत केली असणार , बराच वेळ दिला असणार. या सार्‍याबद्दल कौतुक वाटते. शाबासकी द्यावीशी वाटते. आता अंकाबद्दल. अंकामागची भूमिका प्रस्तावनेत उत्तम रीतीने विशद केलेली आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, याची नोंद की , या अंकात कुठल्याही प्रकारचे मीमांसक लेखन : म्हणजे साहित्य, चित्रपट , संगीत , पौराणिक ग्रंथ इतिहास याबाबत विवेचन असणार नाही व सामाजिक/राजकीय विषयावरील लिखाण असणार नाही. हे वाचतानाच, वाचकाच्या अपेक्षा पुरेशा अचूकपणे प्रस्थापित झाल्या. याचा अर्थ सरळ होता की, या अंकातील लिखाणाचे स्वरूप केवळ "ललित" असे म्हणता येईल. "ललित लिखांण" असे ज्याला पारंपारिक रीत्या म्हण्टले जाते त्यामधे कथा/कादंबर्‍या/कविता/लघुनिबंध( किंवा ललितलेख)/विनोदी स्फुटे/ प्रवासवर्णने याचा सामान्यतः अंतर्भाव होतो. नाटक/एकांकिका/नाट्यछटा सुद्धा यात अर्थात येतातच. आणि ब्लॉगविश्वाशी ज्याचा संबंध येणे प्रायः अशक्य आहे अशा महाकाव्याचाही समावेश यात करता येईल. आत्मचरित्रातील एखादा अगदी छोटासा भाग यात येऊ शकेल ; परंतु याच्या आणि ललितलेख यातील सीमारेषा फारच धूसर ठरतील. पैकी प्रस्तुत अंकात कविता/लघुनिबंध( किंवा ललितलेख)/विनोदी स्फुटे/ प्रवासवर्णने स्थान मिळाल्याचे दिसते. यापैकी प्रवासवर्णन आणि विनोद यांचा परामर्शे वेगळा घ्यावा लागेल. आणि या दोन विभागांचे प्रमाण एकूण अंकामधे थोडे आहे. राहिलेल्या लिखाणाबद्दल एक महत्त्वाचे सूत्र मला दिसले. एकूण निवडीचे निकष लक्षात घेतां वैयक्तिक अनुभवाच्या चित्रणाला प्राधान्य मिळणे अपरिहार्य. आणि अनुभव ग्रहण करताना संवेदना आणि विचार या दोन प्रमुख फॅकल्टीज् (मराठी शब्द ?) पैकी संवेदनांना प्राधान्य मिळालेले दिसते. याचे एक कारण असे की, विचार या फॅकल्टीवाटे जेव्हा आपण आपल्याला येणार्‍या अनुभवाचे ग्रहण करतो तेव्हा त्याला सामाजिक/राजकीय/ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भ बहुशः चिकटून येतात. आपण आपल्या विचारांची सांधणी एका पोकळीत बहुशः करत नाही. याउलट संवेदनशीलतेला जे टिपायचे त्याचे स्वरूप बहुतांशी सार्वभौम असे ठरते. आणि एकूण अंकाच्या निवडीशी , संपादनप्रक्रियेशी या प्रकारचे अनुभव नैसर्गिकरीत्या मेळ खातात. अंक वाचायला सुरवात केली आणि अपेक्षांना फार धक्का बसेल असे (चांगल्या किंवा वाईट, दोहो अर्थांनी) दिसले नाही. काही लेख वाचले , काही कविता वाचल्या. त्याबद्दलची इम्प्रेशन्स थोडी सांगता येतील. एकेका कलाकृतीचा आढावा घेत घेत शेवटी सार्‍या अंकाचे सिंहावलोकन आणि एकूण ताळेबंद असे खरे तर लिहायला हवे. यापैकी पहिल्या भागाबद्दलचे थोडेसे याच धाग्यात हळुहळू लिहीत राहीन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/25/2008 - 11:01 नवीन

अभिनंदन !!!

अंक आज चाळला, ब्लॉगवरील उत्तम लेखन निवडणे तसे कठीन काम आहे. अंकासाठी संपादक मंडळाने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक आहेच. या उपक्रमात सहभागी सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !!! तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 10/26/2008 - 06:51 नवीन

तोतया !!!!!

तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!! अहो तो विसोबा खेचर म्हणजे तात्या नाही, चिरुटेशेठ !!! च्यामारी येवढे तात्याचे चमचे म्हणून तिकडे मिसळप्रेमी तुमचा उदो उदो करतात, आणि तुम्हाला यवढं शिंपल पन कळेना ? च्छा ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/26/2008 - 11:49 नवीन

विषयांतर : सर्किटा झालं का सुरु !!!

च्यामारी येवढे तात्याचे चमचे म्हणून तिकडे मिसळप्रेमी तुमचा उदो उदो करतात, आणि तुम्हाला यवढं शिंपल पन कळेना ? कोण म्हणतं आम्हाला तसं ;) बाय द वे, त्या ब्लॉगवर एक महिला सदस्य आमच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यासाठी त्या संस्थळाचा उपयोग करते, याचे फार आश्चर्य वाटले. स्त्रीया असेही करु शकतात, या विचारानेच चक्रावलो आहे. संस्कृतचे एक वचन पाठ आहे ;) 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवा: जीथे स्त्रींयांची पूजा (आदर केला जातो ) केली जाते. तिथे देवता वास करतात असे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही स्त्रीयांचा जिथे तिथे आदर करतो, त्यांना नमस्कार करतो. पण त्यामुळे आमची मोठी गोची झाली आहे. :) -दिलीप बिरुटे (धार्मिक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Sun, 10/26/2008 - 16:02 नवीन

तात्या,

तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!! अहो बिरुटे मास्तर, ते विसोबा खेचर आम्ही नाही, आमचे लेखन हे अश्या कुठल्या रेषेवरील अक्षरे.." वगैरेसारख्या उच्च साहित्यिक का काय म्हणतात (!) अश्या ठिकाणी सिलेक्ट होण्याच्या लायकीचे नसते! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/26/2008 - 18:40 नवीन

सॉरी :)

अहो बिरुटे मास्तर, ते विसोबा खेचर आम्ही नाही, हम्म :( विसोबा खेचर म्हणजे तात्या इतकेच आम्हाला माहित, तेव्हा वरील प्रतिसादात आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!! असे वाचावे.तात्या, यांचे नाव लिहिल्यामुळे ज्यांना मानसिक त्रास झाला त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मेघना भुस्कुटे Sun, 10/26/2008 - 12:13 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मंडळी प्रतिसादाबद्दल. मुक्तसुनीत, खरं आहे. 'हा पहिलाच अंक आहे. ब्लॉग्स आत्ता कुठे गंभीरपणे लिहायला लागले आहेत' असं समर्थन करता येईलच. पण ते लंगडं आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. हे साहित्य उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तमोत्तम होत जाईल, अशी अपेक्षा. सर्किट, गैरसमज दूर केल्याबद्दल आभार. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 10/26/2008 - 13:03 नवीन

प्रतिक्रिया

संपादिका बाईंच्या येथील व माझ्या खरडवहीतील प्रतिक्रियेवरून मला या अंकात काही टीका करण्यायोग्य न्यून सापडले असावे असा त्यांचा समज झालेला दिसतो. त्यांनी अंगभूत चांगुलपणा व विश्वास यामुळे माझ्या कथित टीकेचे स्वागत जरी केले असले , तरी मला थोडे स्पष्टीकरण देणे येथे भाग आहे. माझ्या वरील पोस्ट मधे मी टीकेचा सूर कुठे लावला आहे असे मला वाटत नाही. जे वाचले त्याचे (मला जाणवलेले) स्वरूप विशद करून सांगावेसे वाटले. एखादी गोष्ट काय आहे आणि काय नाही हे सांगितल्यामुळे त्या गोष्टीला कुठले न्यूनत्व येते असे म्हणता येत नाही. जसजसा अंक वाचत जाईन तसतसे त्याबद्दल थोडेबहुत लिहावे असा अजूनही मानस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा