काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला. वपुंची अनेक पुस्तके आत्तापर्यंत वाचली होती पण ह्या नावाची कथा वाचल्याचे काही आठवत नव्हते, त्यामुळे झोप येत असून सुद्धा केवळ २७ मिनिटे आणि ५३ सेकंदांचाच तर आहे कि, आत्ताच बघू असा विचार करून पुढचा हा व्हिडीओ पहिलाच.(व्हिडिओमध्ये फक्त कथेचे मुखपृष्ठ असून चलचित्र काहीच नसल्याने ऐकलाच म्हणा ना.)
पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील ह्या मातब्बर लेखकांच्या कथा आणि कथाकथनांचा मी खूप आधीपासूनच फॅन, त्यामुळे त्यांच्या कॅसेट्स, सीडी'ज आणि पुस्तकांचा संग्रह पण केला होता. पण कशी काय कोणास ठाऊक, हि कथा मात्र वाचायची किंवा ऐकायची राहूनच गेली होती. काल ती ऐकायला मिळाली आणि एक छान समाधान मिळाले.
वर उल्लेख केलेल्या सर्वच लेखकांची कथेतील पात्रे वाचकांच्या/श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभी करायची हातोटी विलक्षण आहे. अगदी हुबेहूब ती व्यक्तिरेखा मनःचक्षूंसमोर उभी राहते.
'पंतवैद्य' ह्या कथेतील पंतवैद्य हि व्यक्तिरेखा जर खरोखरीच त्यांना वास्तवात भेटलेली व्यक्ती असेल तर वपुंच्या निरीक्षणशक्तीला आणि काल्पनिक असेल तर त्यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीला लाख लाख सलाम.
बहुतांश वाचनप्रेमी मिपाकरांनी हि कथा आधी वाचली/ऐकली असेलच, परंतु माझ्याप्रमाणे काहीजणांची राहून गेली असेल तर त्यांच्या सोयीसाठी व्हिडिओची लिंक मी वर दिलेली आहे. ऐका व आनंद घ्या...
"नसलेलं अवसान, उसनं बळ आणून आणता येतं...असलेली शक्ती विसरणं, ह्याला फार मनोधैर्य लागतं" - पंतवैद्य (व.पु.काळे)
प्रतिक्रिया
14 Sep 2017 - 11:37 pm | एस
अरे वा! ऐकायला हवी ही कथा.
15 Sep 2017 - 8:23 am | टर्मीनेटर
जरूर ऐका...Don't judge a book by its cover ह्या म्हणीचा प्रत्यय येईल. :).
15 Sep 2017 - 10:31 am | शित्रेउमेश
मी पण नुकतीच ऐकलि ही कथा, भारीये एकदम....