(आनंदाने)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
8 Oct 2008 - 9:43 pm

अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;)

पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने
सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने...

शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी
बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने...

जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती
जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने...

"विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? "
चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने...

पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो;
आता गजला तासत सुटतो, आनंदाने...

लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो
विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने...

चतुरंग

कवितागझलविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

8 Oct 2008 - 11:27 pm | केशवसुमार

वा रंगाशेठ,
बरेच दिवसांनी मिपावर आल्याच सार्थक केलेत..
एकदम झकास विडंबन..
(निवृत्त)केशवसुमार
स्वगत: बाकी हल्ली जे काही लेखन या नावाखाली चाललं आहे त्याची उबग आली होती..

राघव's picture

8 Oct 2008 - 11:31 pm | राघव

हा हा हा...
"विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? "
चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने...
...मस्त!!!
मुमुक्षु

बेसनलाडू's picture

8 Oct 2008 - 11:44 pm | बेसनलाडू

एकदम सहज उतरलेले. मजा आली.
(आस्वादक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 2:09 am | विसोबा खेचर

पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो;
आता गजला तासत सुटतो, आनंदाने...

लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो
विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने...

मस्त रे! रंगा... :)

तात्या.

ऋषिकेश's picture

9 Oct 2008 - 10:35 am | ऋषिकेश

:)
सह्ही.. फर्मास विडंबन
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

9 Oct 2008 - 12:43 pm | स्वाती दिनेश

झकास विडंबन.. आवडले.
स्वाती

शाल्मली's picture

9 Oct 2008 - 1:04 pm | शाल्मली

झकास विडंबन.. आवडले.
सहमत.
--शाल्मली.

पद्मश्री चित्रे's picture

10 Oct 2008 - 9:57 am | पद्मश्री चित्रे

सहमत

चतुरंग's picture

11 Oct 2008 - 11:04 am | चतुरंग

देणार्‍या आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार!

चतुरंग