मातृमांगल्याचा महामहोत्सव.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
30 Sep 2008 - 8:02 am

मातृमांगल्याचा महामहोत्सव आणि महाराष्ट्र्शारदेच्या चरणी एक छोटेसे कमळ.

आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. त्याचा सुंदर आढावा भाग्यश्री ताईंनी "आठवणीतलं नवरात्र" या लेखात घेतला आहेच. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे.

आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो. हीच माता आपल्या भक्तांना शारदेच्या रुपात काव्य, लेखनाची प्रेरणा देत असते, आस्वादाची क्षमता देत असते. याच शारदारुपी मातेच्या पायावर आम्ही एक छोटेसे कमळ अर्पु इच्छितो.

या कमळाचे नाव आहे, www.pustakvishwa.com.

या संकेतस्थळावर शारदेचे मुर्त स्वरुप असलेल्या पुस्तकांना, तिच्या या रुपावर प्रेम करणार्‍या भाषिक भक्क्तांना आणि लेखनकरुन विचारांना अक्षर करणार्‍या लेखकांना अढळ असे स्थान आहे.

या संकेतस्थळावर वाचकांना आपापल्या आवडत्या पुस्तकावर समीक्षण, परीक्षण, आवडलेला उतारा / कविता, वाचनालयाची यादी, लेखकांची यादी इत्यादी पाहता येतील.

त्याच बरोबर मराठी भाषेतील ५००/६०० पुस्तक प्रकाशकाना, ४००/५०० नियमित पणे मासिके वगैरे प्रसिद्ध करणार्‍या प्रकाशकांना आणण्याचा प्रयत्न राहील. त्यामूळे प्रकाशकांची पुस्तक सुची, आगामी प्रकाशने इत्यादीची माहिती वाचकाना अद्ययावत मिळत राहील अशी अपेक्षा आहे. जसेजसे महाजाल साक्षरता वाढत जाईल आणि तशीतशी त्या महाजालाच्या अमर्याद अश्या ज्ञान आणि माहितीच्या संकलन आणि वितरण क्षमतेचा लाभ आपल्या असंख्य अश्या मराठी बांधवाना मिळत राहील अशी अपेक्षा आहे.

मराठीच्या संवर्धनाचा हा प्रयत्न असल्यामूळे शारदेच्या कृपेशिवाय आपले हे प्रयत्न असफल राहतील. शारदेने मराठीभाषेवर प्रसन्न होऊन जगातील सर्व तंत्रज्ज्ञान, विचार, आचार मराठी भाषेत आणण्यासाठी या कमळाचा स्विकार करावा अशी मनापासून प्रार्थना कराविशी वाटते.

या जगतमातेला आपल्या भाषेच्या रुपात सदैव बघत असलेला हा सामान्य मातृभाषाभक्त,

द्वारकानाथ कलंत्री

संस्कृतीधर्मभाषासाहित्यिकशिक्षणशुभेच्छाबातमी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

वा! अतिशय सुरेख शीर्षक...!

कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा...

आपण या संस्थळाला 'मिपाचे लहान भावंडं' असे संबोधले आहे. मिपाला थोरलेपणा देऊन हा आपण मिपाचा सन्मानच केला आहे असे मी मानतो!

आपलं,
(मायमराठीचं एक लेकरू) तात्या.

प्राजु's picture

30 Sep 2008 - 8:21 am | प्राजु

अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही सुंदर आहे..
धन्यवाद...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

गणा मास्तर's picture

30 Sep 2008 - 9:29 am | गणा मास्तर

उत्तम संकल्पना.
अशा प्रकारच्या संकेतस्थळांमुळे मायमराठीच्या लेकरांची खुप छान सोय होईल.
मराठीच्या संवर्धनासाठी झटणार्या कलंत्रीकाकांना लक्ष लक्ष धन्यवाद.
आपला मराठीप्रेमी
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
पूर्वाश्रमीचा अनिकेत केदारी

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 9:39 am | जैनाचं कार्ट (not verified)

कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा...

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

कलिका's picture

30 Sep 2008 - 1:05 pm | कलिका

छान उपक्रम
संकेतस्तथळला शुभेच्छा

स्वाती दिनेश's picture

30 Sep 2008 - 1:18 pm | स्वाती दिनेश

अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही आवडले.
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
स्वाती