चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 6:57 pm

एकमेकांना उणे समजू नये
(नी स्वतःला शाहणे समजू नये)

चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये

माणसेही राहती रानीवनी
नेहमी बुजगावणे समजू नये

हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये

ही कशाची भूल या रातीवरी
चांदण्याला चांदणे समजू नये

पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलहे ठिकाणकवितागझल

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

27 Oct 2016 - 7:29 pm | चांदणे संदीप

:)

मस्त गजल डॉ.साहेब. बऱ्याच दिवसांनी.... तुमचे नाव पाहिले आणि काहीतरी छानस वाचायला मिळणार अशा कल्पनेनेच दिल खुश हो गया था!
बहोत खूब लिखा है सर...! माशाअल्लाह... एकेक शेर तबितयतसे रचलाय हो! कातिल! चाबूक!

Sandy

drsunilahirrao's picture

27 Oct 2016 - 8:31 pm | drsunilahirrao

sandy __/\__

वेल्लाभट's picture

27 Oct 2016 - 8:27 pm | वेल्लाभट

वा वा ! क्या बात है डॉक्टर ! सुपर्ब ! सुपर्ब तुमचं नाव बघून उघडला धागा आणि वस्सूल !

drsunilahirrao's picture

27 Oct 2016 - 8:37 pm | drsunilahirrao

धन्यवाद सरजी __/\__

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा

छानच आहे.. पण बांधणी सैल झाल्ये.

सतिश गावडे's picture

27 Oct 2016 - 10:45 pm | सतिश गावडे

अगदी. सैल बांधणी असणार्‍या कविता वेगळ्या असतात. तिथे सगळे घाईत असल्याने सैल बांधणी उपयोगी पडते.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा

ल्लुल्लुल्लुल्लु //lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif" alt="https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif" />

शार्दुल_हातोळकर's picture

27 Oct 2016 - 10:39 pm | शार्दुल_हातोळकर

जोरदार !

सतिश गावडे's picture

27 Oct 2016 - 10:46 pm | सतिश गावडे

छान आहे कविता. आवडली.

चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये

वाह... सुंदर !!!

छान आहे, पण वाचल्यावाचल्या आपसूक वाह निघतं तोंडून तसं झालं नाही.

सतिश गावडे's picture

27 Oct 2016 - 11:16 pm | सतिश गावडे

ते सैल बांधणीमुळे झाले असेल.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2016 - 11:29 am | अत्रुप्त आत्मा

अगदी बरोब्बर हो गा'वडे काका!
अत्ता कल्ला तुमाला, काय म्हनायचाय माका! ;)

चाणक्य's picture

27 Oct 2016 - 10:53 pm | चाणक्य

.

पैसा's picture

27 Oct 2016 - 10:54 pm | पैसा

सुरेख!

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2016 - 12:31 am | बोका-ए-आझम

हे

हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये

अाणि
हे

पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये

फारच सुंदर!

अनुप ढेरे's picture

28 Oct 2016 - 11:49 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय!!

आत्मबंध, सतिश गावडे,शार्दुल हातोळकर,सूड,चाणक्य,पैसा,बोका ए आझम,अनुप ढेरे
सर्व मित्रांचे मनापासून आभार!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

इल्यूमिनाटस's picture

30 Oct 2016 - 8:27 pm | इल्यूमिनाटस

छान जमलीय! आवडली

नाखु's picture

31 Oct 2016 - 12:20 pm | नाखु

वाटले कविराज संदीपाबाबत काही कवीता आहे का, पण हे वेगळेच चांदणे निघाले.

उन्हाचांदण्यातला नाखु

सत्यजित...'s picture

12 May 2017 - 3:22 pm | सत्यजित...

वाह्
गझल इतकी सुटसुटीत लिहिता यावी हेच मुळी कौतुकास्पद वाटते! गझल सुरेखच! त्यातही,तारांगणे व पाहणे,हे शेर लाजवाब!

मदनबाण's picture

12 May 2017 - 7:04 pm | मदनबाण