ठिकरी
पडू दे चांगले दान
मिळू दे यशाची शिडी
नकोत ते सर्प जागोजागी
आयुष्याची सापशिडी
सापडू दे लगेचच
लपलेले सुख
नकोच सापडू दे दुःख
आयुष्याचा लपंडाव
मिळू दे सुखाचा झेल
जिंकेन सर्वदा मी
जाऊ दे दुःखाची विकेट
आयुष्याच्या सामन्यात
पडू दे चांगल्या घरात
या देहाची ठिकरी
नको होऊ दे स्पर्श
या दुर्भाग्याच्या रेषांचा
राजेंद्र देवी