साम दाम दंड भेद
आमच्या घामाला दाम नाही
हे रामा, आता जगण्यात राम नाही
किती हि कष्ट केले तरी
कनवटीला छदाम नाही
नियतीला पण काही ना वाटे
परिस्थितीशी साम नाही
अहोरात्र धडपडतो पण
वेदनेला बाम नाही
भरल्या गोकुळात भरकटतो
भेटत अजून श्याम नाही
गतजन्मीच्या कर्माचा दंड हा
ह्यात काही भेद नाही
जगण्याशिवाय तरी आता
या जगात दुसरे काम नाही
राजेंद्र देवी
प्रतिक्रिया
26 Sep 2016 - 11:04 am | अत्रुप्त आत्मा
तांब्या कढई जिल्बी तेल...
26 Sep 2016 - 12:09 pm | टवाळ कार्टा
गुर्जी तुम्च्याकडनं मिस्ळीचं आमंत्रन कदी येल
26 Sep 2016 - 11:57 am | राजेंद्र देवी
धन्यवाद...