मिठीतली रात्र

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
14 Sep 2016 - 7:22 pm

अनेक वर्षानी जुनी पाने पालटली आज, आणिक हि कविता नजरेस अाली
मिपा वर बरेच नविन कवि वर्ग जुडले आहे, तेव्हा पुन्हा सादर करतो आहे.

"मिठीतली रात्र"

आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
आवरे मोह मज न अधिक आता
पडदा तारकांचा पडू दे ना रे...

निजले जग, निजले तारे
अंतर असे हे मिटले सारे
माझ्या कुशीत तु उजळला अधिकच
तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे

विझले कधी मी मलाच कळेना
तुझ्या कुशीतुन पदर सुटेना
उलगडली वेणी, उलगडले अशी मी
तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे

आले विरह ते किरणांचे मज
कलह मनाचा काही शमेना
दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध,
पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे?

आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
न आवरे मोह मज अधिक आता
पडू दे तारकांचा पडदा ना रे...

मुक्त कविताशृंगारकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

14 Sep 2016 - 7:24 pm | शिव कन्या

सुरेख!

दत्ता काळे's picture

14 Sep 2016 - 7:32 pm | दत्ता काळे

बरेच वर्षानी मी पण मिपाची जुनी पाने चाळतो आहे. हि कविता वाचण्यात आली नव्हती. सुरेख आहे कविता.

पगला गजोधर's picture

14 Sep 2016 - 8:20 pm | पगला गजोधर

शीर्षक वाचून,
कवी ऑफिसमधून संध्याकाळी, घरी लेझीम खेळत खेळत जात असताना, मुंबईच्या मिठी नदीत, पडला असावा, आणि तिथेच रात्रभर पडून राहिला असावा,
असे चित्र डोळ्यापुढे आले.

निनाव's picture

14 Sep 2016 - 9:47 pm | निनाव

;)