आठवणींचा वसंत
वेळी अवेळी भासे मज चाहूल
वाजे तुझे पैंजणांविना पाऊल
लागताच तुझी चाहूल
मम हृदयी भृंगारव झाला
आठवणींची पाणगळ झडली
फुटली पालवी चैत्राला
शोभून दिसते गळ्यात तुझ्या
पर्णफुलांची माला
संपले बळ पंखातले
नाही मिळाले घरटे या पाखराला
काय नेणार बरोबर मज पुसशी
नेणार मी या आठवणींच्या वसंताला
राजेंद्र देवी
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 12:05 pm | निनाव
"वाजे तुझे पैंजणांविना पाऊल" - म्हण्जे हे असे सुचतेच कसे!!!! :)
13 Sep 2016 - 12:10 pm | राजेंद्र देवी
धन्यवाद...