कुलदिपक - भाग २

विप्लव's picture
विप्लव in जनातलं, मनातलं
10 Aug 2016 - 6:25 pm

अरे मध्येच कुठे शिरतोयस, भली मोठ्ठी रांग दिसत नाहिये का तुला?" मध्येच घुसू पाहणाऱ्या युवकाला मेघा दटावतच बोलली. त्यासरशी तो युवक चिडून मागे वळला आणि पाहतच राहिला. सुंदर टपोरे डोळे, लांबसडक नाक, रेखीव ओठ, काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी, अहाहा काय ते रुप, जणू सुंदरतेची मुर्तिच. तो युवक मेघाकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या अशा पाहण्याने मेघा अवघडली. कुठे पहावे हेच तिला उमजेना? तिची नजर खाली वळली जमिनीशी उगीच चाळा करणाऱ्या स्वतःच्याच पायाच्या अंगठ्या कडे.
"अरे विकी कुठे आहेस अरे फॉर्मवर फोटो. चिकटवायचा राहिला." कुठूनतरी त्याला मित्राने हाक मारली तसा तो समाधीतून बाहेर आला. काही न बोलता तो निघुन गेला.

'आपण इतका वेळ हिच्याकडे बावळटासारखे एकटक पाहत होतो. काय वाटले असेल यार तिला?' विकी मनातच ओशाळला. 'पण काय दिसत होती ती! कोण होती ती? परत भेटेल का? कसं शोधु मी तिला? परत एकदा मला तिचं सौंदर्य पहायचय, डोळ्यात साठवायचयं.' विकी तिच्या विचारात गर्क होता मित्राच्या बडबडी कडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते.

ईकडे मेघा मनाशीच पुटपुटली, 'कोण होता तो? कस्सा वेड्या सारखा पाहत होता.' या विचारसरशी तिच्या चेहरऱ्यावर हलके स्मित उमटले आणि गालावर खळी.

"हुश्श, झाला बाई एकदाचा फॉर्म भरुन. कसली मोठ्ठी रांग होती अग आई! अन् त्यात..."

गोरागोमटा, उंचापुरा, पिळदार शरिरयष्टीचा विकी तिच्या डोळ्यासमोर परत उभा राहिला अगदी तसाच जसा तो तिच्याकडे एकटक पाहत होता. मेघा अक्षरशः एकटीच लाजुन हसली गालावरची खळी खुलवत.

" काय झाल गं एकटीच हसतियास काय खुळ लागलय काय?" आईच्या प्रश्नाने मेघा भानावर आली.

"अग काय नाही ग. एक शहाणा मुलगा मध्येच शिरत होता रांगेत" मेघा स्वतःला सावरत बोलली.

" लक्षुम्बाई तुम्ही लडाई न्हाई खेळलासा न्हव? तु तलवार उपसुनच असत्यास भांडायला"
"अग आई काहीपण. मी कशाला भांडू. मी काहीच नाही बोलले तिथल्या सरांनी दम दिला त्याला. न मी काय लक्ष्मीबाई नाही ह." मेघा लटकाच राग आणत म्हणाली.

"बर बाई. चल ऊठ हातपाय धुन घे मी ताट घेते. भुक्यावली असल गो माझी बाय"

रात्री सगळी कामं आवरुन मायलेकी अंथरुणावर पडल्या. पार्वती कधीच झोपी गेली पण मेघा मात्र या कुशीवरुन त्या कुशीवर धडपडत होती.

' तो का बरे पाहत होता आपल्याकडे एकटक. इतकी का मी सुंदर दिसते? पण तो मात्र राजबिंडा होता. कोण बर असेल तो?' विचार करत करत अखेर मेघा झोपी गेली.

इकडे आपल्या मजनूची हालत सुद्धा तिच होती.

मजनू अहो आपला विकी म्हणजेच विक्रांत.
चंद्रकांत देशमुखांच शेंडेफळ.

चंद्रकांत देशमुख हे गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व. ते कृषि पदवीधर होते. ते कृषी सहाय्यक म्हणुन कार्यरत होते. पण वडिलांच्या अकस्मात निधनामुळे त्यांना नोकरी सोडून गावी यावे लागले. देशमुखांची चांगली शेतीवाडी होती. भलामोठ्ठा वाडा न त्या सर्व मालमत्तेचा विक्रांत एकुलता एक वारस त्याच्या दोन मोठ्या बहिणी विदुला आणि विनया. दोघी लग्न तरुन आपापल्या सासरी सुखात नांदत होत्या.
एकुण काय आपल्या कथेचा नायक अमिरजादा आहे.

"गुरूजी,.....गुरूजी."
मेघा गुरूजींना एकसारख्या हाका मारत होती.
"माई गुरूजी कुठे गेलेत?"

गोखलीणबीई बाहेर आल्या

"काय झाल मेघा?"

"माई...माई, मला प्रवेश मिळाला. शेजारच्या गावातच आहे कॉलेज." माईंसोबतच गिरकी घेत मेघा बोलत होती. खुप खुश होती ती.

" अरे व्वा. आमच्या छकुलीच स्वप्न आता पुर्ण होणार. थांब पहिला पेढा देव्हाऱ्यावर ठेव अन् नमस्कार कर." माई

" नाही माई माझ्यासाठी माझे पहिले दैवत तुम्ही न गुरुजी आहात." मेघाने माईंच्या हाती पेढा ठेवला व नमस्कार केला. तिचे डोळे भरुन आले.

" हे जरा तालुक्याला गेलेत. संध्याकाळ पर्यंत येतील ते. ये तु बैस मी थालीपीठ केलेत आणते तुला गरम गरम."

" माई नको आत्ता भुक नाही. मी संध्याकाळी येते गुरुजी आल्यावर. आत्ता शाळेत चाल्लेय सर्व शिक्षकांना पेढे द्यायला."

' देवा खुप सोसलय हो मायलेकींनी. आमच्या छकुलीला अशीच साथ दे. सुखी रहा हो पोरी.' पाठमोऱ्या मेघाकडे पाहत माई स्वतःशीच बोलत होत्या.

(क्रमशः)

-------- विप्लव

कथालेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

10 Aug 2016 - 6:31 pm | पद्मावति

मस्तं!

लालगरूड's picture

10 Aug 2016 - 7:14 pm | लालगरूड

छान वीआयपी लव

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2016 - 7:37 pm | ज्योति अळवणी

छान.... आशा आहे टिपिकल शेवट नसेल.

चांगलं लिहिलंय. पुभाप्र.