<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
21 May 2016 - 9:37 am

मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका
एकोणवीस
शोधण्यात खूप वेळ जातो

काथ्याकुटात एक धागा हुकला आहे
त्याच्या जरासं खाली
एक किडा वळवळतोय
दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो

टंकाळा आल्यावर मी
एखादा प्रतिसाद लिहायला घेतो
अर्थ?
समजण्यात खूप वेळ जातो

तोल सुटलाय मिपावरचाही
रोज उठून कोण साव्ररणार त्याला?
सल्ला,
मागण्यातही तूचभेळ खातो

मिपा !
ही तर एक रिक्षाच आहे
वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो

-नजरबंद

dive aagareggsअनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीफ्री स्टाइलहास्यअद्भुतरसमुक्तकविडंबनऔषधोपचारराशीमौजमजा

प्रतिक्रिया

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 9:48 am | नाईकांचा बहिर्जी

आवडली! एकंदरित मिपावर "एकमेकां टारगेट करू अवघे धरु कुपंथ" प्रकार चालतात दैनंदिन असे काहीसे इम्प्रेशन माझ्या सारख्या नवागत मेंबराला मिळत आहे! कठीण आहे!

कसं काय सुचतं हो तुम्हाला हे असं?

अजिबात नाही.....

उलट अशा धाग्यांचा "खरडफळा" करण्यातच जास्त गंमत आहे.

नाखून्स तुमचा कृष्णमोहर होत चाललाय असे निरीक्षण नोंदवावेसे वाटू लागावे असे का लिहिता?

चौकटराजा's picture

21 May 2016 - 10:17 am | चौकटराजा

मी फार भोळा( दुसर्‍या शब्दात गाढव ) असल्याने आपल्या लिखाणाने दिपून गेलो आहे. त्यामुळे एकूण काय..... कसं सुचतं हो तुम्हाला असं अशीच प्रतिक्रिया.

विवेकपटाईत's picture

21 May 2016 - 11:06 am | विवेकपटाईत

मिसळपाव प्रतिसाद देणार्यांकरता सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ आहे. इथे शब्दांचा गडगडत आहे. चांगला पाऊस हि आहे आणि गरजणारे मेघ हि आहेत

अधजल गगरी छलकत जाये
खुळखुळा नाद गुंजीत जाये.

पण भरलेल्या गगरीचा जास्ती आवाज होत नाही आणि प्रतिसाद हि जास्त मिळत नाही. मग काय करणार राव. खुळखुळा धागा टाकावाच लागतो.

....... प्रतिसाद हि जास्त मिळत नाही."

असे नाही.....

भले २-३च प्रतिसाद असतील पण उत्तम लेखाला इथे प्रतिसाद मिळतोच मिळतो.

जव्हेरगंज's picture

21 May 2016 - 1:13 pm | जव्हेरगंज

he

gr

rc

br

रातराणी's picture

21 May 2016 - 1:18 pm | रातराणी

ही ही ही