अगतिकता

सुधीरन's picture
सुधीरन in जे न देखे रवी...
8 Apr 2016 - 2:12 am

काळ्याशार गूढगर्भ डोळ्यांत तुझ्या
अपेक्षेची मासोळी हलली
ते ओझे पेलण्याची ताकद
माझ्या इवल्या खांद्यांत आहे का?
शंका मनास काजळू लागली
तुझे ओठ बोलले काहीतरी
विचारांच्या भेंडोळ्यांत गुंतले मन
त्यास त्याची जाणीवच ना झाली
निर्विकार चेहरा पाहून माझा
अश्रू लपवित ते मागे वळलीस
मणामणाच्या बेडया दुःखाच्या पायी
ओढीत हल्के तू चालू लागलीस
थांबवावे तुला वाटले किती
पण माझे शरीरच दगड झाले

प्रेम कविताकवितामुक्तक