नाच नाच मोरा..

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
17 Sep 2008 - 4:12 pm

नाच नाच मोरा..
==========================

नाच नाच मोरा, तुझा फुलेर पिसारा..
नाच नाच मोरा, तुझा फुलू दे फुलोरा..

उडे गरुड, उडो नभी, नको खंत तुला..
तोड नाही कुणापाशी, तुझ्या गारुडा..!

नाच हरपूनी तन्मया, नको भान तुला..
येते नभ उतरून, वाजविते टाळ्या...!

नीलपंखी पाखरावरी, नीळ्याची रे माया..
जडविले जडाव पाठी, नको मानू हारा...!

वाळवंटा देई रंग, तुझा रंगित कुंचला..
रंग निळा-हिरवा; मन-मानसी गारवा...!

==========================
स्वाती फडणीस ............... १४-०९-२००८

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

राघव's picture

17 Sep 2008 - 4:21 pm | राघव

छान कविता. एकदम वेगळ्या बाजाची!

नाच हरपूनी तन्मया, नको भान तुला..
येते नभ उतरून, वाजविते टाळ्या...!

वाळवंटा देई रंग, तुझा रंगित कुंचला..
रंग निळा-हिरवा; मन-मानसी गारवा...!

हे विशेष आवडलेत. :)

मुमुक्षु

अनिरुद्ध शेटे's picture

17 Sep 2008 - 4:36 pm | अनिरुद्ध शेटे

तुम्ही तुमच्या कवितेत अनुस्वाराचा वापर कोणत्या पद्धतीने केला हे समजु शकेल का

अरुण मनोहर's picture

18 Sep 2008 - 10:31 am | अरुण मनोहर

कविता आवडली.

मृगनयनी's picture

18 Sep 2008 - 1:00 pm | मृगनयनी

उडे गरुड, उडो नभी, नको खंत तुला..
तोड नाही कुणापाशी, तुझ्या गारुडा..!

खूप सुंदर..
आपल्याकडे असलेल्या कमतरतेपेक्षा, आपल्याकडे जे "ऍस्सेट्"आहे, त्याचा अभिमान बाळगला, तर मनातील न्यूनगंड हद्दपार होतो...!!!

:)

नीलपंखी पाखरावरी, नीळ्याची रे माया..

का कुणास ठाऊक.... मला सारखी कृष्णाची आठवण येतेय......

:)

प्रेम-व्याकुळ राधा : मृगनयनी

:)

स्वाती फडणीस's picture

22 Sep 2008 - 12:22 pm | स्वाती फडणीस

:)