काळ वेळ क्षण सार कही तिच्या अवति भोवती गोठून गेल होत.निलांबरीला स्वताच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता बसत की खरच समोर तो उभा आहे. तिला अजूनही हां भासच वाटत होता.इतक्यात कोणीतरी घाईगड़बड़ित असणाऱ्या प्रवाश्याचा तिला धक्का लागला आणि ती आपल्या भावविश्वातून भानावर आली.मनातल्या मनात चरफडत तिने त्या प्रवाश्याला चार स्त्रिसुलभ शिव्या घातल्या.आणि पुन्हा एकदा नीलांबरी त्याला न्याहाळु लागली.नक्की तोच आहेना.हसरा चेहरा ,कुरळे केस, तजेलदार पण खोडकर डोळे ,बोलघेवडा कोणाशी बोलायला लागला की त्या व्यक्तीला आपलस करणारा,सावळा रंग.कदाचित सावळा होता म्हणूनच घरच्यानी त्याच नाव कृष्णा ठेवल होत. अग पहात काय राहिलिस मीच आहे कृष्णा ओळखतेस ना की विसरलिस?इतकी shocked का आहेस?बोलायचो तुला ना always expect the unexpected.
hmm आहे सगळ लक्ष्यात माझ्या तू आणि तुझ बोलण दोन्ही.त्याचा प्रत्ययहि दिला आहेस करून तू.बोल तू काहीतरी बोलणार होतास.मला काम आहेत.नीलांबरी रागावर आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती तरीही तीच्या बोलण्यात कृष्णाला ते लगेच जाणवल.कृष्णाने तीला शांत करण्यासाठी आपल्याच शैलीत तो हसत बोलू लागला. अग हो हो हो!!!! जरा दम घे आता तर भेटलोय लगेच जायच काय बोलतियेस. आणि राग वगैरे शोभत नाही हां तुला जरा ठण्ड घे. आणि बघ उन्हामुळे कसली लालबुंद झलियेस. एक काम करुया inorbit मधे जाऊया.तिथल्या cafe मधे बसुयात तू काही cold coffee घे.म्हणजे तुला हवी असली तर जबरदस्ती नाही. मला भूक लागली आहे मला खाल्याशिवाय बोलायला जमणार नाही.नीलांबरीने काही विचार केला आणि त्याच्यासोबत मॉल मधे जायला तय्यार झाली.कृष्णा कितीही हसत असला तरीही त्याच्या मनातही घालमेल चालूच होती.नीलांबरी सोबत फ़ोन वर बोलण झाल्यापासून ते या क्षणापर्यंत तो हाच विचार करत होता.काय सांगणार तो तीला? तीचाच काय कोणाचाहि विश्वास बसला असता का त्याच्या बोलण्यावर? का तो काहीही न सांगता तीला एकटिच सोडून निघुन गेला? नाही पण काहीही झाल तरी सत्य काय आहे हे तीला काळायला हवे.आणि तो तीचा हक्क देखील आहे.पण सात वर्षानंतर आपण पुन्हा एकदा नीलांबरी ला भेटणार आहोत.राग तर तीच्या मनात असणार आहेच त्याची भडकाग्नि आपल्याला सहन तर करावी लागेल परंतु सोबत तिच्या प्रश्नांच्या तोफखान्याला देखील सामोर जाव लागेल.एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या शांत डोक्याने सांगाव्या आणि ऐकून घ्यव्या लागतील.या विवंचनेत कृष्णा असतानाच ते मॉल मधे शिरले.
weekday आणि दिवसाची वेळ असल्याने मॉल ला खास गर्दी अशी न्हवती. कृष्णा नीलांबरी ला घेऊन CCD cafe मधे गेला.त्याने cafe मधे नजर फिरवली आणि कोपरयातल एक टेबल निवडून त्यावर ते दोघेही बसले.कृष्णाने नीलांबरीस काय हवे ते विचारले आणि काउंटर वर आर्डर देऊन आला.hmm सांग आता का बोलावलस आज इकडे भेटायला? अग होना ते संगणारच आहे मी तुला. वेळ आहे खुप आपल्याकडे.म्हणजे तुला घाई नसेल जायची तर.नीलांबरीही आता त्याच्या कलाने वागणार अस ठरवून ok बोलली.कृष्णाच बोलण संपत नाही तोवर waiter एक छानसा cake घेऊन तिथे हजर झाला.त्यावर लिहील होत Happy Birthday Megh"!!!!! तो cake आणि त्यावर रेखाटलेले ते नाव पाहून नीलांबरीला आणखी एक धक्का बसला. याच्या लक्षात आहे?खरच कृष्णाला सगळ आठवतय?तो तीला प्रेमाने मेघ बोलावत असे. एकदा तिनेच कृष्णाला विचारल होत. अरे माझ इतकं छान नाव असताना मेघ का हाक मारत असतोस. तेव्हा कृष्णा बोलला होता की तुझ्यासाठी किंवा लोकांना ते फक्त मेघ असेल पण माझ्यासाठी ते "Mine Ever with Good Heart" अस आहे.Happy birthday to you!!! या अवजाने तिच्या विचारांची शृंखला तुटली. कृष्णा आणि cafe मधले काही waiters आणि तिथे बसलेले लोक टाल्या वाजवून नीलांबरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते.हे सगळ एवढ्या लोकांमधे पाहुन नीलांबरी गोरिमोरि झाली तीच्या गालावरचि लाजेचि लाली तीला आणखी सुंदर बनवत होती.नीलांबरी आजच्या ह्या गड़बडित स्वताचाच वाढदिवस विसरली होती.पण हे सर्व पाहून तीला आनंदाचा धक्का बसला होता.पण सोबतच हा आनंद दुखाची एक लहर देखील सोबत घेऊन आला. कारण सात वर्षापुर्वी याच दिवशी कृष्णाने तीला शेवटचा कॉल केला होता. तीला अश्रू अनावर झाले.नीलांबरी उठली तसा कृष्णा बोलला का ग कुठे चाललीस? ती काहीही न बोलताच restroom च्या दिशेकड़े गेली.कृष्णा समजून गेला होता नीलांबरी ला भावनांचा वेग आवरत नाहीये.तीच्या पाठमोऱ्या आकृतिकडे पाहता पाहता तोही भूतकाळाच्या अविरत अरण्यात हरवून गेला.त्याला सगळ आठवत होत जस कालच घडलय.
प्रतिक्रिया
23 Jan 2016 - 10:56 pm | पद्मावति
मस्तं. आधीचा आणि हा दोन्ही भाग छान झाले आहेत. पु.भा.प्र.
23 Jan 2016 - 11:07 pm | Savnil
धन्यवाद!!! ताउसाहेब!!!!!