नीलांबरी आज लवकर निघाली ऑफिस मधून नेहमीच जादा तास काम करणाऱ्या नीलांबरी ला HOD नेही जाण्याची परवानगी दिली.परवानगी मिळताच ती घाईघाइने निघाली.नावा प्रमानेच निळसर डोळे गोरा वर्ण सरळ नाक काळभोर केशसंभार आणि ओठांवर नेहमी हसु.एखाद्या कवीने पाहील की म्हणाव जिवंत कविता नजरेसमोर उतरली आहे.या सर्वातहि तीच सर्वांशि मिळून मिसळून वागण सर्वनाच् तीआवडे.पण तिलाही थोडासा गर्व हा होताच. नाही गर्व रूपाचा नाही तर तिच्या कर्तुत्वाचा होता. कारण तिला साजेस स्वताच करियर तिने घडवल होत. घडवण्यापेक्षा तिने स्वताला त्यात बुडवल होत.एक IT फर्म मधे 5 आकड़ी पगार आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेली बढ़त.एकूण काय तर आजच्या शहरी जीवनातल MM म्हणजे मैरिज मटेरियल.एवढं सगळ गाठिशि असतानाही तिचे दोनाचे चार हात न्हवते झाले.किंवा तिनेच ते होउ न्हवते दिले.
आज नेहमीप्रमाणे तिच्या दीवसाला सुरुवात झाली होती.तीच 7:31 ची ठाणे लोकल घेऊन ती निघाली 8:30 ला तिने लॉगिन केल नित्य नियमाच्या सवयिनुसार तिने 10ला तिचा कॉफ़ी ब्रेक घेतला.कॉफ़ी घेत असतानाच तिचा mobile खणखणला.अनोळखी नंबर असल्याने जरा नाखुशीनेच तिने कॉल उचलला कारण दिवसातून 2-3 तरी मार्केटिंग कॉल तिला येतच असत .हेल्लो आणि समोरच्याचा आवाज ऐकून तीच जगच हलल होत. तो आवाज ओळखिचा होता.सगळ काही स्तब्ध निश्चल झाल होत.आज तिचा नियमिततेचा आणि शिस्तीचा साचा जो तिने गेल्या सात वर्षात स्वतासाठी बनवलेला तो तुटनार होता.आणि ती वेळेच्या लहरिवर स्वार होऊन भूतकाळाच्या समुद्रात बुडून गेली.आणि त्या समुद्राचे दोन थेंब मात्र नकळत तिच्या नयनांच्या किनाऱ्यावर अलगद डोकावु लागले.ऑफिस मधून सर्व रितसर परवानगी घेऊन ती निघाली खरी पण तिच्या डोक्यात विचारांचे वादळ घोंगावत होत. आज सात वर्षांनंतर पुन्हा त्याने कॉल का केला असेल?.काय असेल इतकं महत्वाच् ?त्याला मलाच का भेटायचय?. इतक्या वर्षात एकदाहि कॉल नाही की साधी विचारपुस नाही. त्यावेळेस फ़क्त मोजकि मोघम उत्तर देऊन त्याने पुन्हा कॉल करतो बोलला अणि तो त्याचा शेवटचाच त्यावर पुन्हा आज. का पुन्हा आलाय हा मनुष्य मी त्याच नाव तरी घेते का.?त्याला विसरता याव म्हणून मी स्वता:ला कामात गुंतवून घेतल.
विचारांच्या धुंदीत असतानाच लोकलचा हॉर्न ऐकून तिची तंद्रि भंगलि आणि ती वाशी लोकल मध्ये चढ़लि.ट्रेनला गर्दी न्हवती, तिला बसायला जागा मिळाली. तिच्या समोरच्या बाकावर एक कॉलेज तरुणी कानात हेडसेट्स लावून कोणाशी तरी बोलत होती बहुदा बॉयफ्रेंड असावा.कितीही दुर्लक्ष केलं तरी तिचे शब्द नीलांबरी च्या कानावर पडतच होते.आणि परत एकदा नीलांबरी आपल्या विचारात गढुन गेली.खरच इतकं सोप्प आहे त्याला विसरण. ? आपल्याला स्वता:ला पण त्याला एकदा भेटायच होतच ना.? मग.त्याला जाब विचारायचा होताच ना.मग आता ही तगमग का? की भीती आहे त्याला पाहताच आपला राग ओशाळेल.? त्याला काही बोलताच येणार नाही किंवा आपण त्याला सांगितल की त्याच्यामुळे आपण स्वता:ला संपवण्याचा प्रयत्न केला हे ऐकून तो दुखावेल??? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. ती समोर बसलेली तरुणी नीलांबरी ला गदागदा हलवत होती. oh!! hellloooo!!!! are you alright?? चलिये ma'am लास्ट स्टेशन हैं! आप ठीक हो ना? या आँखे खुलि रख कर सो जाती हैं आप?? भानावर येत नीलांबरी न तिच्याकडे पाहिल. तिला त्या तरुणीच्या तस बोलण्याचा राग तर आलेला पण तिने स्वता:ला सावरत तरुणीला sorry and thanx म्हणत नीलांबरी ने बहेरचा रस्ता धरला.आता तीला घाई होती त्याला पहायची सात वर्ष ज्याने तिला एक कॉल नही केला. ती जिवंत तरी आहे का हे पाहण्याची तसदि नाही घेतली तो आज स्वता: तिलालाEका भेटनार होता.कसा असेल आता तो म्हणजे बदलला असेल की तसाच असेल. अश्या एक न अनेक प्रश्नांनी तीच मन भंडावून सोडल होत.
आणि जशि स्टेशनच्या बाहेर ती पडली समोर तो उभा होता.तो ज्याने तिचा काहीही विचार न करता तिला एकटीला सोडून गेला होता तोच तो.आता तिच्या समोर उभा होता आणि तीच्यासाठी का होईना तिच्या सभोवतालच जग आतापुरत निश्छल झाल होत घड्यालाचा काटा जणू काही वेळेसाठी आराम करत होता.
प्रतिक्रिया
18 Jan 2016 - 12:09 pm | Rahul D
wah
18 Jan 2016 - 1:21 pm | Savnil
धन्यवाद राहुल
20 Jan 2016 - 11:13 am | क्रेझी
पुढे काय? पुढचा भाग लवकर टाका
20 Jan 2016 - 1:44 pm | मयुरMK
पुढील भागाच्या प्रतीक्षेत