आगामी संपन्न दशकाची (काल्पनिक!!!) डायरी : भारतवारी

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
21 Nov 2007 - 10:43 am

आगामी दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला जाईल, असा साहित्यप्रकार, म्हणजे भारतवारी. हा प्रकार ढोबळमानाने टवाळखोरपणा ह्या प्रकारात मोडतो, पण अशी टवाळखोरी ही बरेचदा रोचक असते, आणि, अमेरिकन भारतीयांच्या देसी सासूसासर्‍यांच्या अमेरिकावारीवरची टीकाकारी तसेच त्यांची स्वतःची भारतवारी हे या टवाळखोरांसाठीचे रेचक, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.

भारतवारी हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. भारतवारीवरची समीक्षा, टीका केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची अनेक रिमे आणि शाईचे अनेक ब्यारेल्स वाया गेलेले आहेत. पूर्वी नवा चित्रपट, नवे नाटक आल्यावर टीका करायची प्रथा होती. त्याला "** मारणे" असे नाव होते. हल्ली हे अमेरिकावारीवर आणि संबंधित वारकर्‍यांवरच्या टीकेने आणि स्वतःच्या भारतवारीच्या उदात्तीकरणाने तसेच इतरांच्या भारतवारीला 'नाटकी साले' संबोधण्याने साध्य करण्याची अनिष्ट पद्धत सुरू झाली आहे. त्यासाठी कारणीभूत असणार्‍या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा आपण ह्या लेखात आढावा घेणार आहोत.

१९९०, २००० च्या वगैरे दशकात आय आय टी चे नसलेले विद्यार्थीही उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी एक गठ्ठा अमेरिकेत जायचे. त्यावेळी पूर्वीपासून "ब्रेन ड्रेन" म्हणून चालू झालेली आरडाओरड खरे तर केव्हाच थांबली होती. सॅन होजे , सी ए ९५१२९ किंवा सॅन होजे, सी ए ९५१३४ ह्या परिपूर्ण साहित्यिकांच्या घरात किंवा रुबी स्काय, अबिस, झालंच तर पेद्रोजच्या गुत्त्यात, ओल्डीज, इनलॉज, सिनिअर्स, डिस्पोजेबल मटिरिअल वगैरे शब्द "चिअर्स", "टोस्ट" च्या गजरातून ऐकू येत. ऑडी, मर्क, शेवी ही नावे कानावर वारंवार पडलेल्या मिसिज तळवलकर, मिसिज करमरकरना "अगं हॅज युवर रौनक बॉट ए फोर? नील हॅज झी फोर बाबा" अशी बढाई मारत. आणि मिसिज करमरकर "हॅजन्ट युवर नील बीन टु सफायर येट?" असे मुद्दाम चारचौघांत विचारून मिसिज तळवलकरांचा पाडाव करत. मिसिज तळवलकर आणि मिसिज करमरकर मग आठवडाभरातच एखाद्या स्ट्रिप क्लबमध्ये आपापल्या मुलांची नावे नोंदवत. आणि एका फाईलवर रौनक किंवा नीलचा फक्त अंडरविअरमधला फुल साइझ फोटो, आत लॅप डान्सवर लावलेली मॅक्जिमम बोली, आधीच्या स्ट्रिपर्सच्या अनुभवपूर्ण मुलाखती यांचा संचय सुरू होतो. येत्या फॉलमध्ये मुलगा परत कॅम्पसवर जाणार; तिकडे दुसर्‍यातिसर्‍यांदा होईलच, तेव्हा पहिले तरी स्वहस्ते "उरकून टाकू" असा चहूकडून उद्घोष होतो. मुलगा तसा गुणी आहे, पण आजूबाजूला असे "ओल्डीज'चे वातावरण, पाय घसरला तर ? म्हणून लवकरच त्याच्याबरोबर आणखी चार जणी हव्यात, नाही का ?

आलेल्या चारशे अर्जांपैकी चाळीस अर्ज निवडले जातात. "मुलगी वी आय पी डॅन्स एक्स्पर्ट आहे, शिवाय वी आय पी प्रायवेटचा कोर्स केलाय सहा महिन्यांचा, आणि सर्टफिकेट तयार आहे" असे अर्ज अग्रस्थानी येतात. क्लबचं बुकिंग होतं. वराचा पत्ता नाही, वधू कोण हेही ठरलेलं नाही, पण एंगेजमेण्टची तारीख ठरते (त्यासाठी आख्खं स्ट्रिपक्लब बुक होतं.) भावी सुनेचे वडील ह्या बुकिंगचे पैसे रिफण्ड करणार, म्हणून त्याच फायलीच्या शेवटी सगळ्या रिसीट्स काळजीपूर्वक ठेवण्यात येतात.

मुलगा येतो. बाबांसाठी जॅक डॅनिअल्स किंवा अब्सोल्यूट, आईसाठी डायमन्ड रिंग, बहिणीसाठी पालोमिनोचे पासेस घेऊन येतो. आदल्या रात्रीची अर्धवट चड्डी तात्पुरती सावरून अर्धवट झोपेतच, वधुपरीक्षेला सुरुवात करतो. सकाळी शॉर्टलिस्ट केलेल्या स्ट्रिपर्सशी संध्याकाळी क्लबात भेटतो. तिसर्‍या दिवशी, "** पसंत आहे"चा निरोप जातो. चौथ्या दिवशी फाईलमधल्या रिसीटांची झेरॉक्स (मुलगा नेहमीच त्याला फोटोकॉपी म्हणतो) वाग्दत्त सासर्‍याच्या हवाली होतात. मिडटर्म लगेच असते, हनिमून आधीच अनेकदा उरकलेला असतो. त्यामुळे लग्न लावायची खरे तर गरजच नसते. लगेच प्याकिंगला सुरुवात होते. जेमतेम चार दिवस पुरणारे कपडे आणि जुजबी पुस्तके भरून मुलगा युनिवर्सिटीत आणि नवी सून स्ट्रिप क्लबात नोकरीवर रुजू होतात.

आणि मिस्टर ऍन्ड मिसिज तळवलकर पुन्हा पेद्रोजच्या बार सीटवर शनिवारी फोनवर मिळणारे अपडेट्स आठवडाभर मिस्टर ऍन्ड मिसिज करमरकर यांना ऐकवतात. सुनेने महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात आजेसासूच्या सांगण्यावरून चक्क पूर्ण बाह्यांचा ब्लाउज आणि कोरी करकरीत पाचवारी नेसली, ही बातमी मल्लिका शेरावतने अंगभर कपडे घातले, ह्याच तोर्‍यात सांगण्यात येते. मुलाच्या युनिवर्सिटीकडून त्याला असिस्टन्टशिप मिळणार, ह्या बातमीसारखीच ती सॅन होजे ९५१३४ मध्ये वायुवेगाने पसरते.

आणि मग नोव्हेंबरात एका फोनमध्ये शॉकिंग न्यूज कळते. डॉक्टरांनी जूनमधली तारीख दिलेली असते. ईस्ट कोस्टला नोव्हेंबरात खरे तर जबरी थंडी असते, पण मिसिज तळवलकरना सुनेच्या पराक्रमाच्या "फ्रीक्वन्सी" चे चारचौघात मनसोक्त कौतुक करताना, आपण कुठल्या गोष्टीचे कौतुक करतोय, ह्याचे भानही उरलेले नसते. खरी परिस्थिती कळल्यावर मात्र "सूनबाई कॅलिफोर्नियात असती, तर तिला सातव्या दिवशीच माहेरी धाडले असते", कारण पहिल्या घटस्फोटाची जबाबदारी माहेरची! पण लॉयर सध्या ईस्ट टूरवर असल्याने आम्हीच जावे म्हणतो, इथून सुरुवात होते. आणि घटस्फोटाचे अर्ज मागवण्यात येतात. मुलाकडून फॉर्मल नोटिस जाते, कोर्टात डिवोर्स अप्लिकेशनला जोडायला बायकोचे कामाच्या वेळातले फोटोज जातात, आणि मिसिज तळवलकर वॉलमार्टमधून एक डायरी विकत आणतात. आणि "अमेरिकावारीवरच्या वारकर्‍यांचे मागासलेपण" ह्या टीकात्मक लेखनाचे गर्भाधान होते.

सासूबाई नको म्हणत असतानाही पोरीला वेगस ला जायला पंधराशे डॉलर्स दिले, ह्यापासून ते कोर्टात घटस्फोट मिळेपर्यंत तो टळावा म्हणून सासूसासर्‍यांनी केलेल्या प्रार्थना, जप, नवस, कुणाचे कसे चुकले, आम्हाला काय प्रश्न विचारले, जज्ज गोरा होता की काळा, सासूबाईंचे कोर्टातले रडगाणे, मामंजींना 'अनटाइमलि' आलेला हृदयविकाराचा झटका, त्या दोघांनी सुरुवातीपासूनच लावलेली नरटी, इथपर्यंत सगळ्या नोंदी डायरीत होतात. कॅलिफोर्नियाला परत जायचा दिवस उजाडेपर्यंत पहिली डायरी भरलेली असते. त्यात ऍलिमनी किती, लॉयरची फी किती ह्या यादीपासून, ते याधी अमेरिकावारी घडलेल्या सर्व आप्तस्वकीयांच्या सासूसासर्‍यांच्या अनुभवांर्यंत सगळे असते. नवीन डायरी आणण्यात येते. तिची सुरुवात सासूबाई आणि मामंजींना भारतात परत सोडून त्यांची नरटी संपवायच्या आणि मुलाला सगळे विसरून पुन्हा नव्याने उद्योग(धंदे!) सुरू करण्यासाठी उभारी मिळायच्या आयडियाने 'चेन्ज' म्हणून 'इन्डिया ट्रिप'च्या संकल्पाने होते.

भारतदौरा! मुंबईला विमान घिरट्या घालताना मिसिज तळवलकरांना चुकून शाळेत मराठीच्या तासाला दांडेकर बाईंनी शिकवलेल्या कविता आठवतात. रिसीव्ह करायला मोठ्या दिराने न येणे, त्याच्या हेडक्लार्क म्हणून मिळालेल्या बढतीबद्दल आपण साधा फोनही न करणे, भारतात एक्श्प्रेसवे वरसुद्धा मोकाट चरणार्‍या गाई, बेशिस्त वाहतूक ह्याविषयी लिहायला जेटलॅग उपयुक्त ठरतो. जावेने केलेल्या खरवसावर ताव मारायला हपापलेल्या मुलाशी बोलल्यावर "दिस इज मच मच बेटर दॅन दॅट शिटी ऍपल पाय" असे तो म्हणाला, ही नोंद करायला मिसिज तळवलकर विसरत नाहीत. भारतीय किराणामालाच्या दुकानांचे वर्णन होते. सकाळी भावोजी ऑफिसला गेल्यावर जाऊबाई स्वयंपाक करताना, शेजारच्या कुणी आजी वाटीभर साखर मागायला येतात; आणि संध्याकाळी डिंकाचे का काहीतरी म्हणतात ते लाडू त्याच वाटीत घालून आणून देतात. एवढ्या अनुभवावर, मिसिज तळवलकरांच्या डोक्यात "अमेरिकेतील शेजारधर्माच्या समस्या" अशी लेखमाला तयार होते. दिवसभर टीव्ही बघून "भारतीय कुटुंबव्यवस्थेचे यश", ह्याविषयी मिसिज तळवलकर डायरीत टिपणे करतात. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला एकदा जाऊन "भारतातील मराठी माणसे" ह्याविषयी दोघेही ललित लेखाची जुळवाजुळव करतात.

दिवाळीला दिराला तीन दिवसाची सुट्टी असते, तेव्हा मिसिज तळवलकरना गुहागर घडते. तिथेच डेट्रॉयटवरून आलेले (मूळचे डहाणुकर कॉलनीतले, त्यांच्या सुनेला जुलैची तारीख दिली आहे) सरमळकर कुटुंब भेटते, आणि तळवलकर आणि सरमळकर ह्या दोघांच्याही डायरीत त्याची नोंद होते. महिना असाच जातो. दु:ख विसरू पाहणार्‍या मुलाची काळजी घेण्यात आणि उरलेल्या वेळात जावेच्या हातचे ओरपण्यात मिसिज तळवलकर गुंततात, आणि मिस्टर तळवलकरांच्या डायरीत आता "कंटाळा" हा शब्द खूपदा लिहिला जातो. सगळी सुबत्ता, सुखसोयींच्या गराड्यात असूनही आपली माणसे, आपले लोक वगैरेंच्या आठवणी अधनं मधनं लिहिल्या जातात. "गड्या आपुला देश बरा" वगैरे ओळींची गर्दी होते.

जून एन्ड उजाडतो. लवकरच फॉल सुरू होणार, युनिवर्सिटी चालू होणार म्हणून मिस्टर ऍन्ड मिसिज तळवलकर मुंबईतून काढता पाय घेतात. जुलै ४ च्या परेड आणि फायरवर्क्ससाठी कॅलिफोर्नियात घरी असायला हवे, असे सगळ्यांना सांगतात. दुसरी डायरी आता भरलेली असते.

परतल्यावर पेद्रोच्या बार सीटवर "हे हाव वाज इट?" ह्या वाक्याने त्यांचे स्वागत होते. आणि बारमध्ये तोंडीस्वरूपात आणि घरी आल्यावर लेखीस्वरूपात "इन्डिया टूर: ऍन अन् फर्गेटेबल एक्स्पिरिअन्स "चा जन्म होतो. ते कुणीही न वाचल्यास, भाव न दिल्यास, कुठल्याशा एन आर आय नी चालवलेल्या लेखन चळवळीचा भाग न झाल्यास, किटी पार्टीमध्ये कौतुकाचा विषय न झाल्यास स्वतःच एखादे पुस्तक काढून त्यात चढवण्यात येते.

आगामी दशकात होणार्‍या एकूण साहित्यनिर्मितीच्या ३४ टक्के लिखाण हे "भारतवारी" ह्या साहित्यप्रकारात मोडते. गावांची नावे बदलतात, कधी मुंबई, तर कधी पुणे. क्वह्चित नागपूर, कोल्हापूर वगैरे. मुलांची, सुनांची नावे बदलतात. आजूबाजूच्या रस्त्यांची नावे बदलतात. पण एकंदरीत स्वरूप हे असेच असते. पण सर्वच लोक काही मिसिज तळवलकरांसारखे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहीत नाहीत. "विमान लॅन्डिंगसाठी प्रिपेअर करू लागले, मुंबईचे ते लुकलुकणारे दिवे पाहताना, मला माझे पुण्यात घालवलेले लहानपण आठवले", अशी सुरुवात करून पहिल्याच प्रकरणात आपले संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. काहीजण, कविता जनरल स्टोर्स किंवा सर्वोदय सुपरमार्केटचे, सुभिक्षा चेनचे वर्णन करताना, वॉलमार्टची आठवण लिहून, पुढे संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. काही जण भारतातील शेजारीण आजीबाईंच्या नऊवारीचे आणि नंतर कॅलिफोर्नियातील शेजारच्या आजोबांच्या हॅन्डसम फ्रेन्च दाढीची आठवण लिहून मग पुढे संक्षिप्त आत्मचरित्र लिहितात. एकंदरीत भारतवारी, ह्या साहित्यप्रकारात संक्षिप्त आत्मचरित्र लिहिण्यास खूप स्कोप असतो. मस्त, छान वगैरे 'देसी' दाद देण्यापेक्षा ***लेले अमेरिक ऍक्सेन्ट मारून मिळालेली कूल, ऑसम् ही दाद जास्त मोलाची नाही का?

सध्या एवढेच. आमचा ह्या साहित्यप्रकाराचा सखोल अभ्यास असून ह्याविषयावर आमचा प्रबंध तयार होतो आहे. लवकरच प्रकाशित होईल. तारखेकडे लक्ष ठेवा.

समाजजीवनमानराहणीलेखअनुभव

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

21 Nov 2007 - 10:51 am | आजानुकर्ण

बाकी काही नाही तरी मिसळपाव कृपेने पचन व रेचन होत आहे. वैद्य पाटणकर काढ्याचे पैसे वाचले म्हणायचे!

स्नेहल's picture

21 Nov 2007 - 3:04 pm | स्नेहल

:) क.वि. (कल्पना विलास) चांगला आहे.

आनंदयात्री's picture

21 Nov 2007 - 3:19 pm | आनंदयात्री

पद्य विडंबनानसारखा हा नविन 'गद्य विडंबन' साहित्यप्रकार. स्वागत.

पद्य विडंबनांनी तिथे फारच जेरीस आणले होते बाबा. एक कोणती कविता पडायचा अवकाश कि दहा पंधरा मिनिटात त्याचे दोन चार विडंबने आणी "व्वा छान" वाले दहा पंधरा प्रतिसाद पडायचे. तिथलच्या कविंना फक्त प्रेम अन प्रेयसीच आठवायची, आणी तिथलचे ते विडंबन महर्षी प्रेमाच्या जागी दारुचा गुत्ता किंवा गटार अन प्रेयसीच्या जागी दारु टाकुन विडंबने करायचे. सुटलो बाबा मि.पा. मुळे.

कोलबेर's picture

21 Nov 2007 - 9:10 pm | कोलबेर

बेसन लाडू,
ह्या रेसिपीसाठी आवश्यक खमंग आणि कुरकुरीतपणा ह्यांचा अभाव असल्याने वाचताना धमाल आली नाही. बर्‍याच ठीकाणी कोण कुठे चाललाय आणि कशाची खिल्ली उडवली जातेय हे जरा कन्फ्युजिंग वाटले. बेटर लक नेक्श्ट टाईम!!

प्रामाणिक मत राग नसावा

-(जयंता५२ फॅन)कोलबेर

बेसनलाडू's picture

21 Nov 2007 - 9:48 pm | बेसनलाडू

कोलबेर साहेब,
अहो कसला राग आणि कसले काय! प्रामाणिकपणाचा आदरच आहे.
असो. पुन्हा एकदा वाचलेत(च), तर कदाचित कन्फ्यूजन दूर होईल आजच्या दिवसात.
(क्रिस्टल क्लिअर)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

21 Nov 2007 - 10:11 pm | विसोबा खेचर

लेख चांगला झाला आहे परंतु बेसनाच्या लाडवाला यापेक्षाही अधिक उत्तम आणि रंगतदार लिहिता येतं असा आमचा विश्वास आहे. लाडवाचा मधुबालेवरचा आणि आज्जीवरचा लेख आमच्या आजही स्मरणात आहे! अर्थात, या लेखांचे विषय सदर लेखापेक्षा पूर्णत: वेगळे होते हे मान्य.

सबब, कोलबेराच्या म्हणण्याशी काहीही सहमती दर्शवून आम्ही पुढील लेखनाकरता बेसनलाडवाला मनापासून शुभेच्छा देतो...

आमचेही प्रामाणिक मत, राग नसावा!

आपला,
अनन्ता५३! :)

विसोबा खेचर's picture

21 Nov 2007 - 10:17 pm | विसोबा खेचर

आज खरं तर आमचा बुधवार! परंतु कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज इथे चक्क ड्राय-डे आहे, त्यामुळे आमची काळ्या कुत्र्याची आज कुठेच सोय झाली नाही! नेहमीच्या ठिकाणी खरं तर तसा प्रॉब्लेम येत नाही परंतु त्या हाटेलाचा मालक आज नेमका बाहेर गेला होता! :(

तात्पर्य, म्हणूनही कदाचित बेसनलाडवाच्या लेखाची आम्हाला वाटायला पहिजे होती तेवढी गंमत वाटली नाही! :)

असो,

या काळ्याकुत्र्याने विठ्ठलाचं काय घोडं मारलं आहे कुणास ठाऊक! :)

आपला,
(बुधवार चुकल्यामुळे आता शनिवारपर्यंत बोंबललेला!) तात्या.

कोलबेर's picture

22 Nov 2007 - 1:23 am | कोलबेर

अनन्ता५३ सहीच!!

धनंजय's picture

21 Nov 2007 - 10:26 pm | धनंजय

हे दुसर्‍या एका लेखाचे वाक्यशः विडंबन आहे म्हणून गमतीदार आहे. या विषयावर स्वतंत्र विनोदी लेखन लिहायला घेतले असते तर तुम्ही वेगळी रचना केली असती असे वाटते.

सर्किट's picture

22 Nov 2007 - 12:47 am | सर्किट (not verified)

वा बे.ला. वा !!!

विडंबनाला पद्याच्या जोखडातून मुक्त केल्याबद्दल अभिनंदन !

लेख खूपच आवडला !

आणि मुख्य म्हणजे, फक्त मूळ लेखाचेच नव्हे, तर त्याला आलेल्या प्रतिसादांचे देखील संदर्भ छान टाकले आहेत.

उदाहरणार्थ, हे बघः

मस्त, छान वगैरे 'देसी' दाद देण्यापेक्षा ***लेले अमेरिक ऍक्सेन्ट मारून मिळालेली कूल, ऑसम् ही दाद जास्त मोलाची नाही का?

काय बाण सोडला आहे ! वा !!!

- सर्किट

बेसनलाडू's picture

22 Nov 2007 - 1:08 am | बेसनलाडू

नशीब सगळेच कन्फ्यूज्ड नाहीत! :) बाय द वे ही ऍक्सेन्टवाली 'दाद' पण स्वानुभूतीच बरे का! :)
(नशीबवान)बेसनलाडू

कोलबेर's picture

22 Nov 2007 - 1:29 am | कोलबेर

पुन्हा एकदा कन्फ्युज केलेस बाबा

'बाय द वे ही ऍक्सेन्टवाली 'दाद' पण स्वानुभूतीच बरे का! :)

काही कळले नाही रे! माझ्यावरचा बाण निदान मला तरी ए़ंजॉय करू दे की! :)
(ईंडीयन बॉर्न कन्फ्युज्ड देसी) कोलबेर

बेसनलाडू's picture

22 Nov 2007 - 1:37 am | बेसनलाडू

ऍक्सेन्टवाली दाद ही येथे अमेरिकेत तरी नवीन नाही; अनेकदा स्वतः अनुभवली आहे. त्यामुळे स्वानुभूती म्हटले इतकेच.
बाकी सर्कीटकाकांनी बाण योग्य लक्षाकडे वळवला आणि तुम्हाला एन्जॉय करायची इच्छा आहे, हे वाचून बरे वाटले. म्हटले नव्हते तुमचे कन्फ्यूजन आजच्या दिवसात दूर होईल म्हणून?
(स्वानुभूत्युपकृत)बेसनलाडू
अवांतर - तुमच्या आधीच्या कन्फ्यूजनमुळे या प्रतिसादातील तुमची सही प्रथमदर्शनी (इनबॉर्न कन्फ्यूज्ड देसी) अशी वाचली. क्षमस्व.
(देसी)बेसनलाडू

कोलबेर's picture

22 Nov 2007 - 1:48 am | कोलबेर

ऍक्सेन्टवाली दाद ही येथे अमेरिकेत तरी नवीन नाही; अनेकदा स्वतः अनुभवली आहे.

म्हणजे बर्‍याच जणांना ऑसम् म्हणताना ऐकले आहे. असेच का? मी पण ऐकले/ऐकतो म्हणूनच सदर लेखाला 'अनुरूप' अशी दाद ह्याच शब्दाने द्यावीशी वाटल्याने दिली हो. आता त्यात तुम्हाला माझा चांदण्यात न्हालेला ऍक्सेंट कुठे दिसला ते कळले नाही बाबा!

तसेच हा बाण सर्किटकाकांनी वळवण्याआधीच समजला होताच हो.. कन्फ्युजन त्याचे नव्हते.. पण लेखामध्ये कोण कुठे राहते आहे आणि कुठे चालले आहे ह्याचे कन्फ्युजन झाले होते. मुलाची आई/आईची मैत्रीण कॅलीफोरनियात आहेत मुलगा शिकायला भारतात चालला आहे असेच ना? मग जाताना वडिलांसाठी जॅक डॅनियल घेउन जातो म्हणजे वडिल भारतात का? इ.इ. असे कन्फ्युजन झाले. आणि खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणासुद्धा न आल्याने एकूणच रेसिपी फसली एवढेच आमचे मत हो. तसे तुम्ही उत्कृष्ट लिखाण करता ह्या तात्यांच्या मतांशी आम्ही सहमत आहोत हा!

बेसनलाडू's picture

22 Nov 2007 - 3:18 am | बेसनलाडू

तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऍक्सेन्टवर का ओढवून घेताय बॉ?! ऑसम्, कूल् वगैरेंमधले चांदण्यात न्हालेले ऍक्सेन्ट ऐकायला ते तुमच्याच तोंडून ऐकायला हवेत, असे थोडेच आहे? तुमच्या ऍक्सेन्टबाबत आमचे मत, अनुभव शून्य. सबब, आम्ही त्यावर काही कमेन्ट करू इच्छितच नाही.
फॉलमध्ये युनिवर्सिटी चालू होणे, स्प्रिंगमध्ये चालू होणे, मग दोन दिवस बंद राहून पुन्हा समर सेमेस्टर वगैरे प्रकार भारतात नाही बॉ! तिथल्या युनिवर्सिट्या दिवाळी, स्वातंतत्र्यदिन, नाताळच्या सुट्ट्या अशा वेळी ठराविक दिवस बंद असतात; बाकी सदासर्वकाळ या ना त्या कारणाने चालू असतात. पोरगा वेगळ्याच राज्यात शिकायला, आईबाबा वेगळ्याच राज्यात वास्तव्यास/कामास (एकत्र/वेगवेगळे) असे अमेरिकेतच दिसले बॉ! आणि मग सेमेस्टर संपल्यावर स्वतःच्याच आईबाबांच्या घरी येताना पाहुण्यासारखे भेटवस्तू वगैरे घेऊन येणे!
(अमेरिकास्थित, अमेरिकाशिक्षित)बेसनलाडू

सर्किट's picture

22 Nov 2007 - 3:22 am | सर्किट (not verified)

पोरगा वेगळ्याच राज्यात शिकायला, आईबाबा वेगळ्याच राज्यात वास्तव्यास/कामास (एकत्र/वेगवेगळे) असे अमेरिकेतच दिसले बॉ!

काय सांगताय ? भारतातल्या कॉलेजात होस्टेल कशाला असते मग ?

आणि मग सेमेस्टर संपल्यावर स्वतःच्याच आईबाबांच्या घरी येताना पाहुण्यासारखे भेटवस्तू वगैरे घेऊन येणे!

खरंच ? हे भारतात दिसले नाही तुम्हाला ?

अहो, मग पंचविशीत कसले आत्मचरित्र लिहिताय ? अधिक अनुभवी व्हा आधी !

- (अचंभित) सर्किट

भारतातील युनिवर्सिट्यांची हॉस्टेले, खाजगी कॉलेजांची व संस्थांची हॉस्टेले, इतकेच काय पी जी म्हणून राहणारे सगळ्या प्रकारचे मित्र होते कंपूत, आताही आहेत. पण तिथले वसतिगृहातले जीवन आणि अमेरिकेतले यातला फरकही कळलाच इकडे आल्यावर; चांगलाच जाणवला. सुटीत घरी जाताना भेटवस्तू घेऊन जाण्यातली आत्मीयता आणि औपचारीकता/परंपरा/रिवाज न कळण्याइतकेही आम्ही अननुभवी नसल्याने आत्मचरीत्र नक्कीच लिहू शकतो, असे वाटते.
(अनुभवी)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

22 Nov 2007 - 10:53 am | आनंदयात्री

तिच्यायला ते आत्मचरीत्र कि काय .... म्हातारे झाल्यावर परत आत्मचरीत्र लिहावेसे वाटले तर आपण परत लिहु हो !! "बे.ला. रिटर्न्स" हे नाव कसे वाटेल ?

कोलबेर's picture

22 Nov 2007 - 9:56 pm | कोलबेर

तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऍक्सेन्टवर का ओढवून घेताय बॉ?! ऑसम्, कूल् वगैरेंमधले चांदण्यात न्हालेले ऍक्सेन्ट ऐकायला ते तुमच्याच तोंडून ऐकायला हवेत, असे थोडेच आहे? तुमच्या ऍक्सेन्टबाबत आमचे मत, अनुभव शून्य. सबब, आम्ही त्यावर काही कमेन्ट करू इच्छितच नाही.

ठीक. नाही घेत ओढवून. पण हे सुद्धा तुम्हीच म्हणाला होतात त्याचे काय मग??

बाकी सर्कीटकाकांनी बाण योग्य लक्षाकडे वळवला आणि तुम्हाला एन्जॉय करायची इच्छा आहे, हे वाचून बरे वाटले.

तसेच मूळ कथेचे हे वाक्यशः विडंबन असल्याने मूळ कथेतील मुलगा जसा शिकायला/नोकरीला अमेरिकेला जातो तसा विडंबनातील मुलगा भारतात जायला हवा ना? तरच त्याला भेटायला आईवडील भारतवारी काढणार.

बेसनलाडू's picture

23 Nov 2007 - 10:33 am | बेसनलाडू

आणि मुलाला आलेले डिप्रेशन; त्याला आवश्यक असलेला चेन्ज , तसेच जुन्या विचारांच्या सासूसासर्‍यांना भारतात परत टाकणाए इ. नाटकी, फिल्मी कारणे लेखातच नमूद केलेली आहेत. पुन्हा लेख वाचलात तर बरे होईल, असे वाटते.
(सूचक)बेसनलाडू

कोलबेर's picture

22 Nov 2007 - 1:16 am | कोलबेर

शिव्यांचा डेटा अपडेट करावा लागेल बहुदा :-) (त्यातच आज ड्राय बुधवार ;-)) चांदण्यांचे डीकोडींग खूप डोके फोडूनही झाले नाही.
सर्किटकाकांचा डेटा मात्र अपडेटेड दिसतोय त्यांना डिकोडींग जमलेले दिसते. :-)))
-कोलबेर

बकुळफुले's picture

12 Nov 2009 - 12:31 pm | बकुळफुले

अरे व्वा हा लेख वाचलाच नव्हता.
वेगळाच आहे जरा.........