'भडास (कादंबरी)' वरील साहित्यिक प्रतिक्रीयांची ज्ञानकोशीय दखल घेण्याच्या दृष्टीने एक उहापोह

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
11 Nov 2015 - 2:01 pm

या वर्षीच्या एका ऑनलाईन दिवाळी अंकाने नव्वदोत्तरी साहित्य अशा स्वरूपाची थीम त्यांच्या दिवाळी अंकासाठी निवडली. या धागालेखाचा उद्देश नव्वदोत्तरी साहित्याचीपर्यंतचा मर्यादीत नाही, (लेखविषयात नमुद 'भडास (कादंबरी)' मात्र नव्वदोत्तरी साहीत्यातील महत्वाची कादंबरी असल्याच्या किमान काही प्रमाणावर साहित्यिक प्रतिक्रीया असाव्यात. (असाव्यात हा शब्द एवढ्यासाठी की खाली नमुद केल्या प्रमाणे साहित्यिक प्रतिक्रीया मराठी विकिपीडियावर वाचण्यात आल्या पण अद्याप मी त्यांच्या संदर्भांच्या (दुजोर्‍यांच्या) प्रतिक्षेत आहे.)मी ललित साहित्याचा वाचकही नाही, खरचं सांगायच तर
एखाद्या विषयावर ज्ञानकोशात साक्षेपी दोन किंवा अधिक वेगवेगळ्या बाजूंच्या मतांची दखल घेत लिहिणे ज्ञानकोशीय संपादकास बर्‍यापैकी समाधान देऊ शकते तसे या कादंबरीतील भाषाशैलीबद्दल परस्पर विरोधी मते लिहिण्यास उपलब्ध झाल्याने नाही म्हटले तरी जराशी रुची मलाही उत्पन्न झाली.

मराठी विकिपीडियावरील प्रगल्भ अथवा असभ्य शब्दांना त्यांच्या ज्ञानकोशीय प्रस्तुततेसाठी टिपणार्‍या एका संपादन गाळणीतून 'भड' हा शब्द टिपला जाऊन माझे लक्ष गेले नसते तर असंख्य ललित साहीत्याकडे माझे जसे लक्ष जात नाही तसेच भडास (कादंबरी)वरील लेखाकडेही माझे लक्ष गेले नसते. अर्थात या कादंबरीतील एका शब्दाचा 'भड' हा अल्पांश असल्यामुळे त्याच्या अप्रस्तुततेचा तसा संबंध नाही आणि तो या धागा लेखाचा मुख्य विषयही नाही.

मी खाली जो परिच्छेद देतो आहे त्यात काही सुपरिचीत लेखक/समिक्षक नावांचे ते उपरोक्त कादंबरी संदर्भात काय म्हणाले याचे उल्लेख आहेत पण त्यांनी केव्हा आणि कुठे (म्हणजे पत्रात, लेखात नेमके कोणत्या माध्यमातून) मत व्यक्त केले याचा संदर्भ मराठी विकिपीडियावर लिहिणार्‍या लेखकाने नमुद केला नाही, म्हणजे समजा या पैकी एकाही लेखकाने मी असे कधी म्हटलोच नाही असे म्हटले तर मराठी विकिपीडिया आणि त्यातील लेखात लिहिणारे सारेच संपादक तोंडावर उलटे पडावेत. खासकरुन साक्षेपी टिका असतात तिथे (या भडास कांदंबरी लेखासाठी विशेष चिंतेची बाब नसली तरीही) बदनामी कायद्यांच्या परिघात पोहोचू नये म्हणून तसेच ज्ञानकोशाची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने पडताळण्या जोग्या संदर्भांची नितांत आवश्यकता असते, म्हणूनच खालील वाक्ये उल्लेखनीय असूनही प्रत्येक वाक्या गणिक त्या लेखकु महोदयाने असे केव्हा आणि कुठे म्हटले असा प्रश्न कंसात मुद्दाम दिला आहे. या निमीत्ताने अशा प्रतिक्रीयांची/विषयांची ज्ञानकोशीय दखल घेताना येणार्‍या अडचणींचा उहापोह करणे असा या धागा लेखाचा उद्देश आहे.

'''व्यक्तींनी केव्हा आणि कुठे उल्लेख केले आहेत याचे संदर्भ उपलब्ध झालेतर खालील भाग [[भडास (कादंबरी)]]''' ज्ञानकोशीय लेखात घेता येऊ शकेल(किंबहूना असा लेख मराठी विकिपीडियावर कदाचित विकिपीडिया म्हणजे सोशल नेटवर्कसाईट समजून बनवला गेला आणि तो मी तुर्तास धूळपाटीवर स्थानांतरीत केला.):

"''भडास ही कादंबरी छोटेखानी, ‘भिकाऱ्या’विषयी सांगणारी आहे. प्रेमानंद गज्वी यांच्या मतानुसार तसा विचार केला तर सारेच ‘भिकाऱ्या’ असतात. (असे प्रेमानंद गज्वी केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}})

भालचंद्र नेमाडे यांच्या मतानुसार एकाच्या जीवाची तगमग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड घेते.(असे भालचंद्र नेमाडे केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}}) प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्यामते ‘भडास’ मध्ये संस्कृतीचं, विविध समाजाचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये उदात्तीकरणाचा लवलेशही नाही हे अत्यंत महत्वाचं आहे, प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळेयांच्या मते परंपरा नाकारण्याची परंपरा ‘भडास’ मध्ये येते. ‘भडास’ने दलित साहित्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या मतानुसार कादंबरीत दाखवलेला गावातील जो सवर्ण समाज आहे, त्याची चिकित्सा केली आहे , त्याच तटस्थपणे गावातील महारवडयाचीही चिकित्सा केलेली आहे. (असे प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}}) सदानंद देशमुख यांच्या मते कादंबरीतून देव नाकारण्याचा विद्रोह खूपच प्रभावीपणे मांडला आहे (असे प्रा. डॉ. सदानंद देशमुख केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}})

प्रज्ञा लोखंडे यांच्या मते ऐतिहासिक आणि समकालीन संदर्भात यातले अंतर्विरोध अधोरेखित करणारी ‘भडास’ ही एक महत्त्वाची सांस्कृतिक कृती आहे. विचारप्रणालीचा (जी सेक्टेरीयन असण्याच्या पलीकडे नेते) स्वच्छ आणि थेट प्रकाशात माणूस असणं म्हणजे नेमकं काय काय असणं आणि काय काय असू शकणं हे या कादंबरीतून अधोरेखीत होते.(असे प्रज्ञा लोखंडे केव्हा आणि कुठे म्हणाल्या {{संदर्भ हवा}})

===शैली===
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या मतानुसार 'सामाजिक व्यंगावर subtle पणे बोट ठेवणे, तिचा कल्पनाविलास, कथानकातील संरचना, लिखाणातील (narration) सहजता यासारख्या साहित्यिक गुणांमुळे ‘भडास’ कादंबरी मराठी साहित्यात खचितच उल्लेख्खनीय ठरते, किंबहुना अलीकडच्या मराठी साहित्यात ती एक सृजनात्मक आदर्श ठरेल. (असे डॉ. आनंद तेलतुंबडे केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}}) प्रज्ञा लोखंडे यांच्या मते कादंबरीकार स्वत:च्या कथा शैलीस आणि क्षमतेस अजमावताना सुद्धा भडास कादंबरी संपेपर्यंत आशयाचं केंद्रतत्त्व कुठेही विचलित होत नाही, कादंबरीचा शेवट ओरीजनल वाटतो. (असे प्रज्ञा लोखंडे केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}})

प्रा. डॉ. राजन गवस यांच्या मतानुसार कादंबरीचे निवेदनतंत्र आणि कादंबरीत उभे राहणारे गावगाडयाचे पूर्ण चित्र या दोन्ही गोष्टींमुळे ही कादंबरी उल्लेखनीय ठरते. राम बापट यांच्या मतानुसार भडास’ मराठीतील नव्या दमाची महत्त्वाची साहित्यकृती असून विविध मेटॅफरचा ही कादंबरी शोध घेते. कामूच्या ‘आऊटसायडर’ मधला ‘आऊटबर्स्ट’ जसा उभा राहतो तसा प्रत्यय येथे येतो.(असे प्रा. डॉ. राजन गवस आणि राम बापट केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}}) डॉ. आनंद तेलतुंबडे कादंबरीतील सृजनाची नोंद घेतानाच कादंबरीत भाषेची अडचण असल्याचे सुद्धा नोंदवतात, प्रेमानंद गज्वी यांच्या मतेसुद्धा भाषा समजण्यास अडचण येते श्रम पडतात (असे सदानंद देशमुख केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}}). डॉ. विश्वनाथ शिंदे, सदानंद देशमुख आणि सतीश काळसेकर यांच्या मतानुसार कादंबरी समृद्ध भाषिक वैशिष्ट्याने संपृक्त असून भडास कादंबरी वाचताना ग्रामीण बोली भाषेतही खूप सूक्ष्म, प्रयोगशीलपणे लेखन झाल्याने लेखकाच्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन होते. (असे डॉ. विश्वनाथ शिंदे, सदानंद देशमुख आणि सतीश काळसेकर केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}})

* आता या उपरोल्लेखीत परिच्छेदात प्रत्येक वाक्यासरशी (असे अमुक तमूक केव्हा आणि कुठे म्हणाले {{संदर्भ हवा}}) एवजी नेमके संदर्भ असते किंवा उपलब्ध झाले तर मला संबंधीत लेख धूळपाटीवर न्यावा लागला नसता) आणि परिच्छेद लेखन वर प्रमाणे व्यवस्थीत जमू शकले असते. लोक सोशल नेटवर्क सोशल नेटवर्क म्हणतात ना मग इतर सोशल नेटवर्क प्रमाणेच मराठी विकिपीडियावर माहितीची जाहीरात(किंवा समकक्ष) करू असा बर्‍याच व्यक्तींचा सूर असतो. असेच काहीसे मराठी विकिपीडियावर भडास कादंबरी विषयी झाले असावे. पण परिणामी अशा लेखांवर पहिला शिक्का जाहीरात नावाचा साचा लावून दिला जातो, कुणी जर स्वत:हून स्वतःच्या कार्याबद्दल लिहिले तर लेखन औचित्याचा साचा अशा लेखांवर बराच काळ दिसत राहतो. जाहीरात अथवा लेखन औचित्य विषयाने लेख काँप्रमाइज झाला असेल तर पारदर्शकतेचा भाग म्हणून असे साचे लावणे विकिपीडिया संपादकांना भाग असते. एकुण जाहीरात अथवा सेल्फ प्रमोशन दूरच विकिपीडियासारख्या संस्थळावरून जाहीरात अथवा लेखन औचित्य साचा संबंधीत लेखांवर लागणे एकादृष्टीने नामुष्कीची गोष्ट ठरते. आणि खूप नाही पण थोडीफार तरी लेखक आणि पत्राकार मंडळी विकिपीडियावर सातत्याने या नामुष्कीस स्वतःहून सामोरी जात रहातात. स्वतःबद्दल लिहिण्यापेक्षा, दुसर्‍यांबद्द्ल संदर्भासहीत लिहू अवघे धरू सुपंथ हा विकिपीडियाचा मंत्र व्यवस्थीत समजून घेऊन पाळला तर सर्वांचाच फायदा व्हावा. असो वर मी जे परिच्छेद लेखन करून दाखवले ते मराठी विकिपीडियावर संबंधीत लेख पानावर खालील प्रमाणे दिलेले होते. (आपसूकच त्यावर जाहीरात अथवा लेखन औचित्य असे साचे लावले गेले)

"भडास" विषयी महत्त्वाच्या काही प्रतिक्रिया -

कादंबरी मला आवडली. आपल्या कादंबरीच्या परंपरेला काहीतरी नवे दृश्य दाखवणारी आहे. एकाच्या जीवाची तगमग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड घेते.

... भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)

‘भडास’ मराठीतील नव्या दमाची महत्त्वाची साहित्यकृती असून विविध मेटॅफरचा ही कादंबरी शोध घेते. कामूच्या ‘आऊटसायडर’ मधला ‘आऊटबर्स्ट’ जसा उभा राहतो तसा प्रत्यय येथे येतो.

... राम बापट

या कादंबरीचे निवेदनतंत्र आणि कादंबरीत उभे राहणारे गावगाडयाचे पूर्ण चित्र या दोन्ही गोष्टींमुळे ही कादंबरी मला महत्त्वाची वाटते. माझ्यासारख्या लिहिणाऱ्यालाही वाटतं की, अरे आपण आपल्या ज्या काही लेखनशक्यता आहेत त्या एकदा आपल्यापरीने आपल्यात शोधणं, तपासणं आवश्यक आहे ही माझी प्रतिक्रिया ‘भडास’ या कादंबरीच्या वाचनानं माझ्या मनातही सुरु झाली, हे ‘भडास’ चं यश आहे.

... प्रा. डॉ. राजन गवस.

‘भडास’ मध्ये संस्कृतीचं, विविध समाजाचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये उदात्तीकरणाचा लवलेशही नाही हे अत्यंत महत्वाचं. ज्या अलिप्तपणे आणि ज्या तटस्थपणे गावातील जो सवर्ण समाज आहे, त्याची चिकित्सा केली पाहिजे, त्याच तटस्थपणे गावातील महारवडयाचीही चिकित्सा केलेली आहे.

... प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात.[१]

परंपरा नाकारण्याची परंपरा ‘भडास’ मध्ये येते. अनिल सपकाळ यांच्या ‘भडास’ने दलित साहित्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

... प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे. Sharankumar Limbale

नव्या आधुनिक वाङ्मयाच्या वेगवेगळ्या रूपाच्या क्षमता समजावून घेऊन त्यांचा उपयोग आपल्या लेखनात अतिशय चांगल्या पद्धतीने डॉ. अनिल करत आहेत हे ‘भडास’ च्या निमित्ताने मला मोलाचे वाटते.

... प्रा. अविनाश सप्रे.[२]

समृद्ध भाषिक वैशिष्ट्याने संपृक्त झालेली ही कादंबरी आहे. अन्य दलित कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी वेगळा जीवनआशय व्यक्त करणारी आहे.

... डॉ. विश्वनाथ शिंदे

‘भडास’ वाचली. भाषा समजत नव्हती. वाचताना अडचण येत होती. बरेच श्रम पडलेत, पण त्या श्रमाचे चीज झाले. कादंबरी छोटेखानी, ‘भिकाऱ्या’विषयी सांगणारी. तसा विचार केला तर आपण सारेच ‘भिकाऱ्या’ आहोत.

... प्रेमानंद गज्वी

एकूण मला जाणवलं कथनात्मक शैलीच्या अंगभूत उर्जेला तुमचं भिडू पाहणं. एका अर्थाने चांगल्या कादंबरीकाराने गंभीरपणे स्वतःची ताकद अजमावण्याचाच हा शोध. अधिक महत्त्वाचं वाटलं, या सगळ्या प्रोसेसमध्ये आशयाचं केंद्रतत्त्व कुठेही विचलित न होणं. अगदी ‘भडास’ जिथे संपते त्या शेवटपर्यंत. विशिष्ट इझमचे ठसे आणि शिक्के या दृष्टीने तुम्ही व्यक्तीरेखा ‘वापरत’ नाही म्हणून मला ‘भडास’ चा शेवट अत्यंत ‘ओरिजिनल’ वाटला. विचारप्रणालीचा (जी सेक्टेरीयन असण्याच्या पलीकडे नेते) स्वच्छ आणि थेट प्रकाशात माणूस असणं म्हणजे नेमकं काय काय असणं आणि काय काय असू शकणं, ऐतिहासिक आणि समकालीन संदर्भात यातले अंतर्विरोध अधोरेखित करणारी ‘भडास’ ही एक महत्त्वाची सांस्कृतिक कृती ठरावी.

... प्रज्ञा लोखंडे (Pradnya Daya Pawar)

बोलीचा आधार घेत तू जे व्यक्त केले आहेस, त्यांत तुझ्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन आहे.

... सतीश काळसेकर.[३]

‘भडास’ ही माझ्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे. देव नाकारण्याचा विद्रोह खूपच प्रभावीपणे मांडला आहे. ग्रामीण भाषेतही खूप सूक्ष्म, प्रयोगशील लिहिता येते याचा प्रत्यय ‘भडास’ वाचताना येतो.

... सदानंद देशमुख (Sadanand Deshmukh)

तिसऱ्या पिढीचे कादंबरीकार म्हणून डॉ. अनिल यांचे महत्त्व ‘भडास’मुळे अधिकच गडद होते.

... प्रा. डॉ. कृष्ण किरवले.[४]

भाषेची अडचण असतानासुद्धा तिच्यातील सृजन जाणवल्याशिवाय राहत नाही. त्याशिवाय तिचे सामाजिक व्यंगावर subtle पणे बोट ठेवणे, तिचा कल्पनाविलास, कथानकातील संरचना, लिखाणातील (narration) सहजता यासारख्या साहित्यिक गुणांमुळे ‘भडास’ मराठी साहित्यात खचितच उल्लेख्खनीय ठरेल. किंबहुना अलीकडच्या मराठी साहित्यात ती एक सृजनात्मक आदर्श ठरेल.

... डॉ. आनंद तेलतुंबडे. (Anand Teltumbde)

आता या उपरोक्त माहितीला चार संदर्भ जोडले आहेत पण चारही संदर्भ वर पै़की प्रतिक्रीया देणार्‍या चार व्यक्ती कोण आहेत याची माहिती देतात. पण त्यांनी तसे कुठे आणि केव्हा म्हटले याचे संदर्भ नेमके टाळतात कि जे ज्ञानकोशासाठी महत्वाचे आहे (बहुधा अनवधानाने अथवा माहित नसल्यामुळे टाळतात). खरे सांगावयाचे तर कोणतीही पुस्तक विक्री विकिपीडियावरील लेखावर अवलंबून नसते. मराठी विकिपीडियावर पुस्तक विषयक लेख अत्यल्प असूनही गेली दहावर्षे मराठी छापिल ग्रंथांच्या विक्रिचा आलेख चढता आहे म्हणजे वाचक मराठी विकिपीडियावर अवलंबून नाहीत हे खरे. पण त्याच वेळी मराठी विकिपीडियावरूनच माहिती प्रथम शोधणारा मोठा वाचक वर्ग असतो जो साक्षेपी आणि विश्वासार्ह माहितीत रुची ठेवतो. मी वर जसे परस्पर विरोधी मतांची दखल घेत परिच्छेद लेखन केले तसे करण्याची आणि अनेकांनी मिळून सातत्याने अद्ययावत करण्याची विकिपीडिया फॉर्मॅटची स्वतःची क्षमता आहे तीही अंडरएस्टीमेट करण्यात कितपत पाँइंट असावा ? किंवा मग इतर कुणीतरी विकिपीडियावर लिहिते आहे, स्वतः बद्दल अथवा स्वतःचे व्यक्तीगत विचारही मांडण्यावर मर्यादा येतात तर मी तिकडे का बघू असाही दृष्टीकोण असावा. परंतु विकिपीडियावर तसाही लेखक संपादक वर्ग कमी पडतो त्यातही ललित साहित्याबद्दल ज्ञानकोशीय लेखकांची रुची मर्यादीत असते लिहिण्यास घेतले तर पुरेसे संदर्भ सापडत नाहीत (जसे उपरोक्त पुस्तकाच्या बाबतीत झाले). म्हणूनच संदर्भांच्या उपलब्धतेसाठी मिपा-मायबोली सारख्या मराठी संस्थळांवरून पुरेशी पुस्तक परिक्षणे प्रसारीत होणे गरजेचे आहे. यात प्रकाशक आणि मराठी संस्थळांचा आर्थिक फायदा आहे परंतु मराठी प्रकाशक मग पुस्तकांचे असोत वा मराठी संस्थळांचे यांनी अद्यापी व्यावसायिक दृष्ट्या एकमेकांना व्यवस्थीत जमवून घेतलेले दिसत नाही. विकिपीडियासारख्या ज्ञानकोशांचे काम सहसा संदर्भ उपलब्ध झाल्यानंतर चालू होते. विकिपीडियावरील मर्यादीत लेखक-संपादक कुठे कुठे पुरे पडतील हाही एक भाग आहे, एकुण 'स्वतःबद्दल लिहिण्यापेक्षा, दुसर्‍यांबद्द्ल संदर्भासहीत लिहू अवघे धरू सुपंथ' हा मंत्र लक्षात न घेतल्यामुळे एक चक्र अद्यापी चालू राहीले आहे, असो.

याच भडास कादंबरी विषयक लेखाच्या सद्यस्थितीच्या चिकित्सेकडे मी वापस येतो.

सध्याच्या लेखात 'साहित्य क्षेत्रातील जाणकारांनीही या कादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे नमुद केले' असल्याचे नमुद केले आहे, हि गोष्ट जमेची असलीतरी वेळीच हे स्पष्ट केलेले बरे की ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेसाठी कादंबरीचे अधोरेखीत होणे महत्वाचे आहे, आणि काय अधोरेखीत केले आहे हे महत्वाचे आहे, संदर्भ नमुद करण्यासाठी कुणी, केव्हा आणि कुठे अधोरेखीत केले याची माहिती ज्ञानकोशीय लेखातून दिली जाणे अत्यंत महत्वाचे आहेच; पण त्याच वेळी अधोरेखीत करणाऱ्या व्यक्तीचे जाणकार असणे उपयूक्त असले तरीही अत्यावश्यक नाही. गीतेचा भावार्थ अनुवाद करणारे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी लिहिली जाण्यापुर्वी जाणकार म्हणून परिचीतही नव्हते, समजा ज्ञानेश्वर गीतेवरील जाणकार म्हणून विशेष परिचीत नाहीत पण त्यांनी त्यांची गीतेवरील टिका प्रकाशित केलेली आहे. 'गीता' या लेख विषयाची ज्ञानकोशीय दखल घेताना गीता अधोरेखीत केली गेली आणि त्यातील काय अधोरेखीत केले हे महत्वाचे आहे, ज्ञानकोशीय दखल घेताना कुणी म्हणजे ज्ञानेश्वरांनी (सर्वसामान्य व्यक्ती गृहीतधरून सुद्धा), केव्हा: १३व्या शकतात आणि कुठे त्यांच्या भावार्थ दिपीका या ग्रंथातून अधोरेखीत केले हे ज्ञानकोशासाठी पुरेसे आहे,(ज्ञानेश्वरांचे गीतेवरील भाष्यकार अथवा जाणकार म्हणून ज्ञानेश्वरी लेखनाच्या उतरकाळात स्विकारले जाणे हे ज्ञानकोशीय नोंदीसाठी उपयूक्त आहे अत्यावश्यक नाही) ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी सध्या आहेत तेवढे प्रसिद्ध न राहता अनुल्लेखीत राहीले असते तरीही गीतेवरील ज्ञानकोशीय लेख लिहिताना ज्ञानकोशीय संपादकासाठी ज्ञानेश्वरांनी गीता अधोरेखीत केली आहे, गीते बद्दल काय अधोरेखीत केले आहे आणि ज्ञानकोशात दखल घेण्या इतपत ज्ञानेश्वरांच्या नोंदी आणि भाष्य पुरेसे तर्कसुसंसगत अथवा संबंध आहे का हे महत्वाचे आहे.

या लेखातील नमुद चारही संदर्भांची सध्याची स्थिती पाहता, प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात, प्रा. अविनाश सप्रे, सतीश काळसेकर, प्रा. डॉ. कृष्ण किरवले कोण आहेत याची माहिती मिळते (या सर्व व्यक्ती कोण आहेत हे ज्ञानकोशीय लेखाच्या दृष्टीने केवळ संदर्भ नमुद करण्याच्यासाठी ऊपयूक्त आहेत, या विशीष्ट लेखापुरते त्यांनी अधोरेखीते विषय लेखाशी संबंधीत आहेत का हे पुरेसे आहे, अबकड व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे यावर ज्ञानकोशीय उल्लेखनीयता सहसा अवलंबून नाही), काय अधोरेखीत केले याची माहितीही अल्पांशानेका होईना मिळते आहे; केव्हा आणि कुठे (पत्र, वृत्तपत्र, पुस्तक, अथवा समारंभ?) अधोरेखीत केले याची माहिती या लेखात दिलेल्या संदर्भातून मिळत नसल्याने या लेखाची स्थिती जराशी विचीत्र झाली आहे. काही उपयूक्त माहिती आहे केव्हा आणि कुठे याची माहिती नसल्याने त्याबद्दल दुजोरा नसल्यामुळे ती माहिती परिच्छेद लेखनासाठी विश्वासार्ह म्हणून वापरताना मर्यादा येतात आणि सारा मजकुर केवळ जाहीरात उद्देशाने लिहिल्या सारखा वाटतो. दिग्गज व्यक्तींची नावे केवळ जाहीरातीसाठी वापरली असे होते.

सतीश काळसेकर, यांच्या "''बोलीचा आधार घेत तू जे व्यक्त केले आहेस, त्यांत तुझ्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन आहे.''" वाक्यातून लेखकाच व्यक्तीगत कौतुक आहे, सतीश काळसेकर ह्यांनी असे केव्हा आणि कुठे म्हटले याचा संदर्भ असेल तर त्यांच्या या कौतुकाची दखल [[अनिल तानाजी सपकाळ]] या लेखातून अवश्य घेता येईल. सतीश काळसेकरांचे अवतरणाचे मुल्य मुख्यत्वे एका प्रमाणपत्राचे सर्टीफिकेटचे वाटते 'भडास' या कादंबरीतून काय अधोरेखीत झाल याची काहीच माहिती मिळत नाही. असाच काहीसा प्रकार प्रा. डॉ. कृष्ण किरवले यांच्या प्रतिक्रीयेचाही आहे, "तिसऱ्या पिढीचे कादंबरीकार म्हणून डॉ. अनिल यांचे महत्त्व ‘भडास’मुळे अधिकच गडद होते." इथे त्यांना ठळक होते म्हणावयाचे असावे पण, मुख्य म्हणजे हेही अवतरण प्रमाणपत्र सर्टीफिकेट समकक्ष आणि केव्हा आणि कुठे याचा संदर्भ मिळाल्यास [[अनिल तानाजी सपकाळ]] या व्यक्ती विषयक लेखातील साहित्यिक कारकीर्द विभागातून घेता येईल. 'भडास' कादंबरीवरील ज्ञानकोशीय लेख हा [[अनिल तानाजी सपकाळ]] यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा नव्हे म्हणून या दोन्ही प्रतिक्रीया [[भडास (कादंबरी)]] या ज्ञानकोशीय लेखासाठी गौण ठरतात.

सदानंद देशमुखांची प्रतिक्रीया अभ्यासली तर "...देव नाकारण्याचा विद्रोह खूपच प्रभावीपणे मांडला आहे. ग्रामीण भाषेतही खूप सूक्ष्म, प्रयोगशील लिहिता येते याचा प्रत्यय ‘भडास’ वाचताना येतो." याची दखल (त्यांनी तसे केव्हा आणि कुठे म्हटले आहे ह्याचा संदर्भ मिळाल्यास) 'भडास' कादंबरीबद्दलच्या ज्ञानकोशीय लेखातून निश्चित घेता येते, पण त्याच वेळी... "भडास’ ही माझ्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे." हा सदानंद देशमुख यांच्या वाक्याचा भाग त्यांचा व्यक्तीगत अनुभव आहे सदानंद देशमुखांच्या व्यक्तीगत अनुभवाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेवर मर्यादा येऊन वाक्याचा तेवढा भाग ज्ञानकोशीय लेखात ठेवणे साशंकीत होते. सदानंद देशमुखांनी "भडास’ ही वाचकांच्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे." इतरांचा दुजोरा देऊन असे लिहिले त्याला अजून एखादा दुजोरा मिळाला तर "भडास’ ही वाचकांच्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे." या वाक्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्राप्त होऊ शकते अन्यथा असे वाक्य ज्ञानकोशात ठेवण्यावर मर्यादा येतात.

आता ऐसी अक्षरे संस्थळाच्या यंदाच्या दिवाळी अंकातील लेखक - जी. के. ऐनापुरे यांच्या कादंबरी विरोध आणि द्वेषावर उभी राहते. या लेखात नवद्दोत्तरी साहित्यातील उल्लेखनीय म्हणून इतर साहित्यासोबत 'कुमार अनिल (भडास)' असाही एक उल्लेख आहे. आता हे 'कुमार अनिल' कोण ? डॉ. अनिल सपकाळ आणि 'कुमार अनिल' ह्या एकच व्यक्ती असून भडास ही एकच कृती आहे का ? (हे अधिक संभवनीय) असले तरी जो पर्यंत दुजोरा मिळत नाही तो पर्यंत ज्ञानकोशीय संपादकाला विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने दोन्ही व्यक्ती आणि कृती वेगवेगळ्या असण्याची शक्यता गृहीत धरूनच चालावे लागते किंवा कसे. दोन्ही कृती एकच असतील तर जी. के. ऐनापुरे यांचा लेख इतर संदर्भांचा अभाव असे पर्यंत भडास कादंबरीच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच बुडत्याला काडीचा आधार तसा आधारतरी देऊ शकेल, केवळ काडीचाच कारण जी. के. ऐनापुरे यांच्या लेखातून कादंबरीचा अल्पही स्वतंत्र मुल्यमापन उपलब्ध नाही. तो एक केवळ सूचीत असल्याप्रमाणे उल्लेख येऊन जातो एवढेच.

असाच काहीसा नोंदींचा संदर्भांचा अभाव इतर अनेक भारतीय व्यक्तींच्या व्यक्ति विषयक ज्ञानकोशीय लेखन करतानाही जाणवत राहतो तसेच काहीसे अनिल तानाजी सपकाळ यांच्या बद्दल ज्ञानकोशीय दखल घेताना व्यक्तीगत माहिती आणि इतर कारकीर्द (व्यवासायाची) माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अलिकडे. व्यक्तीपर लेखांसाठी व्यक्तीगत माहितीचा शोध आणि नेमकेपणा त्यांच्या कारकीर्द आणि साहित्या बद्दल अधिक नेमकेपणा आणि विश्वासार्हतेचा मार्ग प्रशस्त करण्यास साहाय्यभूत ठरतात. - आताच्या दिवाळी अंकांसहीत- मराठी संस्थळांवरून मुलाखती घेण्याचा पायंडा पडतो आहे तो एक स्तुत्य उपक्रम म्हटला पाहीजे अर्थात तेथेही माहितीस दुजोरा घेण्यासारख्या संस्कृतीचा विकास होण्याची गरज आहे पण त्या विषया बद्दल चर्चा स्वतंत्र धागा लेखातून करूयात.

* मराठी विकिपीडियावरील तुर्तास धूळपाटीवर असलेल्या लेखाचा संदर्भ

वाङ्मयसाहित्यिकविचारसमीक्षाअनुभव

प्रतिक्रिया

मारवा's picture

11 Nov 2015 - 2:47 pm | मारवा

तुमचा लेख पुर्ण वाचला समजायला फार कठीण वाटला ही अर्थातच माझी मर्यादा आहे.
तुमचा प्रश्न नेमका काय आहे हे समजुन घेत होतो
तुम्हाला
१- या कादंबरीला ज्या वरील समीक्षकांच्या प्रतिक्रीया मिळाल्या त्या खरोखर मिळाल्या आहेत की नाहीत हे तपासावयाचे आहे काय ?
२- त्या प्रतिक्रीया अपुर्ण संदर्भ तोडुन वापरलेल्या आहेत अशी तुमची शंका आहे का ?
३- तुम्ही ज्ञानकोशीय समिक्षा हा जो शब्द वापरत आहात तो अनाकलनीय आहे कारण अस कस म्हणजे जर तुम्ही माहीतगार एक टीपण लीहीत आहात ज्ञानकोशावर मराठी विकीपीडीयावर तर तो तुमच व्यक्तीगत मत समीक्षा आहे ना ?
मग तुमची व्यक्तीगत समीक्षा ही तुम्ही ज्ञानकोशीय समिक्षा म्हणुन का संबोधत आहात ते कळल नाही म्हणजे लेखाच शीर्षक तस सुचवत आहे म्हणून
४- तुमच्या माहीतीसाठी सांगतो श्री मकरंद साठे यांचा ऐसी अक्षरे वरील एका मुलाखतीत देखील मी याच कादंबरीचा उल्लेख नुकताच वाचलाय. आता मकरंद साठे सारख्यांना ही जर ही कादंबरी दखल घेण्यासारखी वाटली असेल तर अशी दाट शक्यता आहे की वरील मान्यवर समीक्षकांना ही त्यात रस वाटला असावा असे मानण्यास जागा आहे.
५- माफ करा मला तुमचं म्हणण कदाचित समजत नाहीये थोडी स्पष्टता आणली तर बरे होइल.

माहितगार's picture

11 Nov 2015 - 3:20 pm | माहितगार

त्वरीत प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद, आपला क्रमांक तीनचा आ़क्षेप समजला, ज्ञानकोशीय संपादकाच्या दृष्टीकोणातून समिक्षा असे काहीसे हवे हे पटले शीर्षकात जरासा बदल केला आहे किंवा अजून काही बदल सुचल्यास(सुचवल्यास) तसे करण्याचा प्रयत्न असेल.

१- या कादंबरीला ज्या वरील समीक्षकांच्या प्रतिक्रीया मिळाल्या त्या खरोखर मिळाल्या आहेत की नाहीत हे तपासावयाचे आहे काय ?

इथे अशा प्रकारच्या प्रतिक्रीया असण्याचीच अधिकतम शक्यता आहे, खरोखर मिळाल्या शिवाय सहसा कुणी तसा उल्लेख करणार नाही अगदीच अविश्वसनीय प्रकार असता तर हा लेख प्रपंच न होता विकिपीडियावरील लेख परस्पर वगळला गेला असता. बरोबर असण्याची अधिकतम शक्यता असताना सुद्धा, ज्ञानकोशीय संपादकाच्या भूमिकेतून, मुख्य उद्देश अचूक संदर्भांची उपलब्धता आणि संदर्भ नमूद करण्याच्या महत्वाकडे लक्ष वेधणे आहे. (संदर्भांच्या अभावा बाबत काहिशी अशाच स्वरुपाची समिक्षा मी पौराणिक ग्रंथांच्या बाबतीत मागे केली असल्याचे काही जणांना स्मरत असेल) समिक्षा शब्द कदाचित परफेक्ट बसत नसेल पण निव्वळ टिका शब्द वापरण्या पेक्षा समिक्षा शब्द बरा वाटला.

२- त्या प्रतिक्रीया अपुर्ण संदर्भ तोडुन वापरलेल्या आहेत अशी तुमची शंका आहे का ?

बहुधा संदर्भ तोडून नसाव्यात, प्रामाणिकते बद्दल शंका घेण्यासारखे काही नाही. बहुधा पुस्तक भेटी दाखल पाठवले की पत्राद्वारे प्रतिक्रीया येतात त्या पैकी अथवा आंतरजालावर माहिती नसलेल्या नियतकालीकातून अथवा टिव्हीवरूनही आल्या असू शकतात. इथे जर पत्रांनी आल्या असतील तर अशी पत्रे मिपा-मायबोली सारख्या मराठी संस्थळांवर समिक्षे सहीत आल्यास त्यांचा विश्वासार्ह संदर्भ म्हणून उल्लेख करणे सोपे व्हावे.

४- मकरंद साठेंचा लेखाचा दुवा मिळेल का कारण गूगल सर्चात तरी नाही आला. मान्यवर समीक्षकांना ही त्यात रस वाटला असेल ते पाहून मी सुद्धा मराठी विकिपीडियावर लेख सुधारण्यास घेतला पण पडताळण्याजोग्या संदर्भासाठी गाडी अडते आहे हे लक्षात आले आणि असे मराठी विकिपीडियावर बर्‍यापैकी लेखांच्या बाबत घडते लोकांना विकिपीडियाच्या पद्धतीची माहिती/सजगता झाल्यास भविष्यात सुधारणेस हातभार लागेल हा उद्देश.
५- माफ करा मला तुमचं म्हणण कदाचित समजत नाहीये थोडी स्पष्टता आणली तर बरे होइल.

पहिला आणि मुख्य भाग संदर्भ हवा असल्याचा आहे. अल्प भाग काही वाक्ये मराठी विकिपीडियावरील पुस्तक विषयक लेखात न वापरता लेखकाच्या व्यक्ती विषयक लेखात वापरावी लागतील.

माहितगार's picture

11 Nov 2015 - 3:39 pm | माहितगार

वरील साहित्यिकांच्या वरील प्रतिक्रीयांना तुर्तास संदर्भ नाही परंतु सर्वांनी उल्लेख कादंबरी म्हणून केला आहे. तर बुकगंगा डॉटकॉमवर या पुस्तकाचे वर्गीकरण 'माहितीपर' असे झाले आहे. तुर्तास इतर संदर्भ प्राप्त होईपर्यंत बुकगंगा डॉटकॉमचा संदर्भ स्विकारला जातो तसे मराठी विकिपीडियाच्या लेखातही दुसर्‍या एका संपादकाने या पुस्तकाचा उल्लेख माहितीपर असा केला. मराठी विकिपीडियावर एक ज्ञानकोश म्हणून एखाद्या विषयावर लेखन करताना येणार्‍या रोज दररोज येणार्‍या अनेक अडचणींपैकी काही अडचणींचे उदाहरण असा या धागालेखाचा उद्देश आहे.

विशाखा पाटील's picture

12 Nov 2015 - 3:37 pm | विशाखा पाटील

समीक्षकांच्या प्रतिक्रियेचा संदर्भ हा मुद्दा असेल तर (लेख वाचायला थोडा अवघड आहे) बऱ्याचदा अशा प्रकारची चर्चा परिषदांमध्ये होणाऱ्या पेपररीडिंगमध्ये होते. त्याचे संदर्भ मिळत नसतील, तर ते घ्यावेत का? इंग्रजी विकिपेडियावर असे पूर्ण संदर्भ नसलेले घेतले जाते का? माझ्या मते ते तसेच ठेवल्यास विश्वासार्हता कमी होण्याचा धोका आहे. मग कुणीही अबक असेअसे म्हणाले असे घुसवेल.
बाकी, बुकगंगाचे वर्गीकरण वापरू नये. एकाच पुस्तकाला ते माहितीपर, कादंबरी, प्रवासवर्णन असे सर्व प्रांतात नेऊन ठेवतात, हा स्वानुभव :)

माहितगार's picture

14 Nov 2015 - 10:42 am | माहितगार

बऱ्याचदा अशा प्रकारची चर्चा परिषदांमध्ये होणाऱ्या पेपररीडिंगमध्ये होते.

हि चांगली गोष्ट आहे. उर्वरीत लेखक वर्गातही ही जागरुकता पोहोचणे गरजेचे आहे. परंतु आजचा प्रस्थापित लेखक आणि प्रकाशक वर्ग मराठी संस्थळांपासून अजूनही दूर असावा त्यामुळे त्यांच्या पर्यंत अशी चर्चा कितपत पोहोचेल माहित नाही, पण अशा चर्चा धाग्यातून किमान नवीन पिढीत याबाबत सजगता येईल अशी आशा करता यावी अशी आशा.

माझ्या मते ते तसेच ठेवल्यास विश्वासार्हता कमी होण्याचा धोका आहे. मग कुणीही अबक असेअसे म्हणाले असे घुसवेल.

सहमत आहे. आपण इंग्रजी विकिपीडियावरील लेखांचा उल्लेख केलात, एक उदाहरण घ्यायचे झालेतर इंग्रजी विकिपीडियावरील फ्लोरा फाऊंटेन लेखातील संदर्भ विषयक त्रुटींबद्दल मी तिथल्या चर्चा पानावर जवळपास १६ त्रुटींची यादी ३० एप्रील २०१३ला नमूद करुन ठेवली आहे, गेल्या दोन वर्षात तेथील केवळ एक संदर्भ वगळला गेला. युरोमेरीकनांचेही असे होते नाही असे नाही पण त्यांचा भर संकेतांची सोईस्कर अंमलबजावणीवर अधीक असतो, भारतीय लोक संदर्भ नमुद करणे शक्य असते तेव्हाही वर प्रमाणे नमुद करत नाहीत म्हणून अडचणीची परिस्थिती असते.

काही वेळा आपण भारतीय केवळ नव्या माध्यमातून नवी पुराणे लिहितो आहोत का; असा प्रश्न मला पडत असतो त्याची चर्चा बखरींच्या सांगाव्यांचे अन पुराणातली वांग्यांचे नवे पुराण या मागच्या एका धागा लेखातून केली आहे.

भारतीय पार्श्वभूमीत नोंदीच उपलब्ध नसणे जेणे करून संदर्भांची अनुपलब्धता ही एक मोठी समस्या आहे, म्हणूनच दुजोरा अथवा संदर्भ मिळवण्यासाठी मिपा-आणि मराठी संस्थळांवरून आवाहन करणे हा एक मार्ग उरतो. ग्रामीण भागतून येणार्‍या माहिती बाबत शक्य तेथे लवचिकताही बाळगत असतो. तरीपण प्रत्येकठिकाणी अशी लवचिकता बाळगणे शक्य नसते, भाडास हि कादंबरी कदाचित ग्रामीण असेल पण लेखक-प्रकाशकांना आधूनीक माध्यमांचे एक्सपोजर नाही असे नसावे, भडास (कादंबरी) कितीही चांगली असो इतर माध्यमांतून पुस्तक परिक्षणेच झाली नाहीत अथवा अशी परिक्षणे ज्ञानकोशीय संपादकांना संदर्भासाठी उपलब्ध झाली नाहीत तर ज्ञानकोशीय संपादकांना कितीही इच्छा असेल तरीही खुपसे काही काही करण्यावर मर्यादा येतातच. उदाहरणार्थ हुतात्मा चौक लेखावर काम करून मराठी विकिपीडियावर मुखपृष्ठावरनेण्याची इच्छा होती पण नि:संदिग्ध संदर्भ उपलब्ध झाले नाहीत तर बर्‍याचदा काहीच करता येत नाही. तेच गाहा सत्तसई, गीत रामायण विषयक लेख विवीध मराठी संस्थळांवरील धागा लेखांचे संदर्भ देऊन मराठी व्किपीडियावर लिहिले तर खूप उत्तम झाले आहेत त्यामुळे, मिपा मायबोली सारखी संस्थळे एक चांगली भूमिका निभावत आहेत परंतु प्रस्थापित लेखकांचा - प्रकाशकांचा एक वर्ग अद्यापी मराठी संस्थळापासून दूर उभा आहे असे वाटते. असो.

प्रतिसादासाठी आभार