शीर्षक पाहून धागा जरी राजकारणाशी संबधित वाटत असला तरी तो नाही
---------------------------------------------------------------------------------------------------------
काल ख्वाडा पाहिला , प्रदर्शनापूर्वीच काही चित्रपटांना खूप पुरस्कार मिळतात त्या पैकीच हा १ चित्रपट. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सपाटाच लावलाय , माफ करा मी अजूनही राष्ट्रीय पुरस्काराचा विचार करतोय .. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलाय .
ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट मात्र सारखी आहे , ते एकतर एखाद्या जातीच्या राहणीमान , त्यांची होणारी फरफट ह्यावर तरी भाष्य करतात नाहीतर त्या जातीत क्रांती उठाव कसा झाला आणि कसे ते अन्यायाविरुद्ध पेटून उठले वगैरे तरी मांडता.
ते पुरस्कार वगैरे ठीक आहे पण प्रश्न हा पडलाय की जाती व्यवस्थेवर भाष्य का?
पुरस्कार मिळवण्यासाठी तुम्हाला एखाद्या जातीची कहाणी मांडवी लागावी आणि तेही आपल्या महाराष्ट्रात जिथे जाती धर्म ह्यांच्या सीमा जाणवणार हि नाहीत अश्या झाल्या आहेत .
जोगवा , ख्वाडा किंवा fandry ह्या सगळ्या नंतर विचार हा करावासा वाटतो की पुरस्कार चित्रपटाला आहे कि ह्या जाती कशा अजूनही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मागासलेल्या आहेत ह्याला ?
बिहार मधली यादवी , हरियाणातल्या खाप पंचायती , मुस्लीम लोकांमधले फतवे यावर नाही तिकडच्या दिग्दर्शकांनी चित्रपट काढला ? का त्यांना पुरस्कार नकोयेत ? शेवटी आपल्या राज्याची बदनामी होतेय कि बदनामी जरी होतेय तरी पुरस्कार तर मिळतोय न ह्याचा विचार एकदा करायला हवा .
मान्य आहे अजूनही ठेलारी किंवा भटक्या (आदिवासी ) ह्यांचे जीवन खुपसे तसच आहे ते लोक आजही सावकारांकडून कर्ज घेतात , शासनाच्या योजना त्यांच्या पर्यंत पोचत नाहीत (भलेही कोणी कितीही दावा केला तरी ) , लहान वयात लग्न करतात . पण एक वास्तव हे हि आहे कि ते लोक हि आज शिक्षण घेऊ पाहत आहेत त्यांनाही चांगले कपडे घालायचे आहेत त्यांना शहरातल्या लोकांसारखे जीवन जगायचे आहे .आदिवासी आणि तत्सम जाती आहेत ज्यांचे शिक्षण कमी आहे किंबहुना नाहीय पण ते TV बघतात, आधीसारखे न राहता दवाखान्यात जातायेत.
बाबा आमटे सारख्या महान व्यक्तीने हे अगोदरच ओळखून त्यावर चित्रपट काढला असता त्यात नुसते पुरस्काराच नाही तर जगातून देणग्या पण मिळाल्या असत्या पण त्यांनी बदल घडवण्याचा प्रयत्न केला आणि आज आनंदवन उभे आहे तिथल्याच लोकांच्याच सहभागातून .
हे सगळे लिहिण्या मागचा हेतू हाच की ह्या जातींची होणारी फरफट दाखवण्यापेक्षा त्या जातीतली एक नवीन पिढी दाखवण्याचा प्रयत्न करावा कदाचित त्यालाही पुरस्कार मिळेल त्यांचा आशीर्वादाचा , अभिमानाचा .
आपले अभिप्राय जरूर कळवावेत .
प्रतिक्रिया
31 Oct 2015 - 9:25 pm | एस
तुम्ही काढा चित्रपट. नक्कीच स्वागत करू. त्यात काय एव्हढं!
31 Oct 2015 - 10:26 pm | nasatiuthathev
निर्माते म्हणून तुमचे नाव नक्की समजू का ? ;) :p
31 Oct 2015 - 11:24 pm | एस
अंहं. फायनान्सर म्हणून. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर. दोन तिकिटांचा फायनान्स जरूर केला जाईल! :-D