वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा
बीड जिल्ह्यातील माजलगावतालुक्यातील तालखेड हे छोटेशे गाव. निजामकालीन तालुका म्हणून त्याची ओळख आजही टिवूâन आहे. दहा हजार लोकवस्तीच्या या गावात नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. शेतकNयांची मिटींग घ्यावयाची होती. बोळातून जाणाNया छोट्या रस्त्यावरुन आत शिरलो तसे समोर घडीव दगडात बांधलेला भला मोठा दरवाजा समोर आला. दगडाचा उंबरवठा ओलांडून आत शिरलो तसे दिडशे वर्ष जुन्या खाणा खुणा अंगावर खेळवत आणि समकालीन बांधकामाशी दोस्ती करत एक वाडा उभा होता.
तालखेड गावात अजूनही जुने वाडे दिमाखात उभे आहेत. त्यातले समोरासमोर तोंड करुन असलेले दोन वाडे सर्वात मोठे. वंशपरंपरेने गावात वडीलकीचा मान असलेल्या चांडक कुटुंबियांचे हे दोन वाडे. एक कुटुंब कायमस्वरुपी औरंगाबादला स्थायिक झाले असले तरी त्यांनी वाड्याचे घरपण आजही जपून ठेवलेले दिसले. दिवाळीच्या निमित्ताने चांडक कुटुंब वर्षातून एकदा येथे येत असल्याचे गावकNयांनी सांगितले. त्यांचेच चुलत बंधू असलेल्या हरिप्रसाद चांडक यांचा समोरच वाडा. दोन्ही वाडे जणू जुळे भाऊ. हरिप्रसाद आणि त्यांचा एक मुलगा आजही या वाड्यात राहतात.
उंबरवठा ओलांडताच समोरच घरातल्या कत्र्यापुरुषाची तसबीर टांगलेली होती. तसबीरिचे रंग फिके झालेले होते तरी चेहNयावरचे कर्तृत्व अजूनही झळकत होते. ओसरीवरच पुरुषांची बैठक होती. येथे घरातील काही जणांचे पदवी हातात घेतलेले आणि काळा कोट घातलेले फोटो टांगले होते. भिंतीवर देवादिकांची चित्रे रेखाटलेली होती. ती किमान पन्नास वर्षापूर्वीची तरी असावीत. त्यांचे रंग फिके पडले होते तरी चित्रातील रेखीवता कायम होती. ओसरीवरच्या भल्या मोठया कोनाड्यातील जुनाट तिजोरी वाड्याने उपभोगलेल्या संपन्नतेचे दर्शन घडवीत होती. समोररासमोरच्या दोन पैकी एका ओसरीतून माडीवर जाण्याच्या दगडी पायNया होत्या. ओसरी ओलांडताच मोठ्ठे अंगण. त्यातून समोरच्या माडीवर चढणाNया दगडी पायNया, अंगणाला लागून छोट्या छोट्या खोल्या होत्या. अंगणातच दहा बारा वर्षाचा मुलगा सहज लपून बसू शकेल असा पंचधातूचा हंडा, एका कोपNया घातलेले दगडी जाते त्याच्याच बाजूला लाकडी संदूक.
.
.
.
.
.
.
वाड्यात माणसांचा वावर नसला तरी त्याचे जागलेपण कायम होते. समोरच्या वाड्यात मात्र माणसांबरोबरच चिमण्यांचाही जोरात कालवा चालला होता. अंगणातील वृुंदावनातील हिरवीगार तुळस वाड्याच्या जिवंतपणाची साक्ष होती. गरजेनुसार या वाड्याच्या अंगाखांद्यावर आधुनिक सुखसोयीचे साज चढले होते तरी त्याची भव्यता आणि जुनेपण कायम होते. सिमेंटच्या जंगलांमधून अशा जुन्या वाड्यांमध्ये काही काळ जरी घालवला तरी मनाला आणि शरिराला शांत वाटते. आधुनिक सुखसोयींनी दैनंदिन आयुष्य सुखर होईलही कदाचित पण अशा वाड्यांमधून मिळणारी मनाची शांतता लाखो रुपये खर्चूनही मिळणार नाही हे मात्र खरे.
प्रतिक्रिया
29 Oct 2015 - 8:37 pm | पैसा
छान वाटले बघायला! या मंडळींनी वाडा अजून जपून ठेवलाय हे विशेषच!