स्थापत्य - एक कला भाग १

प्यारे१'s picture
प्यारे१ in तंत्रजगत
21 Oct 2015 - 3:14 am

डिस्क्लेमरः मी एक मारुन मुटकून स्थापत्य अभियंता आहे. लेखात मांडलेली मतं ही इंजिनिअरींगच्या थोड्याफार अभ्यासात व आतापर्यंतच्या अनुभवावरुन मांडलेली असून ती जशीच्या तशी खरी असण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. या उप्पर जाणकार व्यक्तींना या मध्ये अधिक भर घालायची असल्यास अथवा दुरुस्त करावयाची असल्यास सप्रमाण मांडून व्यक्त केल्यास त्यांचे स्वागत आहे. या लेखमालेमध्ये जमेल तशी भर घालत राहण्याचा प्रयत्न आहे मात्र त्या लेखमाला सोडून इतर पालथे धंदे करताना आढळल्यास हिणवू नये ही नम्र विनंती. आमचा तोच मुख्य व्यवसाय आहे.
लेखमालेमध्ये आनुषंगिक इंग्रजी शब्द येतील. अनुवाद सुचवावेत.
-------------------------------------

प्रास्ताविकाचाच भाग थोडा अधिक सविस्तर आणि सविस्तार मांडण्याचा प्रयत्न मुद्दाम करत आहे. याचं कारण पुढं येईलच.

कुठलीही इमारत बांधताना आधी पाया नि नंतर कळस हाच जगत्मान्य क्रम वापरला जात असला तरी तिचं डीझाईन करताना आधी कळसाचं वजन पासून ते पाया असाच विषय येतो. कारण सगळ्याचीच भारवाही आपली भूमाता असली तरी वरुन येणारं वजन हे हळूहळू एका मेम्बरकडून दुसर्‍या मेम्बरकडे स्थानांतरीत होऊन नंतर ते जमिनीकडे स्थलांतरीत होत असतं.

इमारती वर येणार्‍या भारांमध्ये
१.इमारतीचं स्ववजन किंवा डेड लोड (Dead Load) : इमारत ज्यापासून बनली ते सगळे घटक म्हणजे दगड, वाळू, वीट, छप्पर आणि छप्परावरचा वॉटर प्रूफींगसाठी वापरलेला भाग, पाण्याची टाकी बांधलेली असली तर त्या टाकीमधल्या पाण्याचं वजन विचारात घेऊन एकूण वजन इ.इ.
२.लाईव्ह लोड (Live load) :माणसं, फर्निचर, अनेक इकडून तिकडे हलू शकणार्‍या वस्तू इत्यादी,

३. वार्‍याचा दाब किंवा विन्ड लोड (Wind Load): त्या त्या भागातल्या हवामानानुसार हा अनेक दिशांतून विचारात घ्यावा लागतो

४. भूकंपप्रवण क्षेत्रानुसार भूकंपामुळं येणारा ताण किंवा सीस्मिक लोड (Seismic Load) : हा अत्यंत आगंतुक विषय असला तरी तो विचारात घ्यावाच लागतो. प्रत्येक देशातल्या भूकंपाच्या इतिहासानुसार कुठे कुठे अधिक तीव्रतेचे भूकंप झाले आहेत याचा अभ्यास करुन काही 'झोन' ठरवले गेले आहेत. त्यानुसार कमी तीव्रतेच्या क्षेत्रतेसाठी अमुक एक लोड विचारात घेतला जातो.

५. ठराविक भागातल्या हवामान नि वातावरणानुरुप :
अ. स्नो लोड (Snow Load) जिथं जिथं बर्फवृष्टी होते अशा सर्व ठिकाणी
ब. पुरामुळं निर्माण होऊ शकणारा दाब (Flood Load)
क. जमिनी च्या प्रॉपर्टीजमुळं- दलदलीची वगैरे (Earth Load)

अशा रितीने इमारतीला कोणकोणत्या दाबांना तोंड द्यावं लागणार आहे या सगळ्याचा प्रामुख्यानं विचार केला जाऊन इमारत डीझाईन केली जाते.
.एका साध्या खोली सारख्या डिझाईनमध्ये काय क्रमानं लोड ट्रान्सफर होतं ते आपण पाहू

.

सगळ्यात वर असलेला इमारतीचा भाग आपल्या लगतच्या खालच्या मेम्बरकडे लोड ट्रान्सफर करतो. सुरुवातीच्या भागात पाहिलं तसं मुख्यत्वे जो आपला वावरण्याचा भाग ज्याला (फरश्यांखाली) स्लॅब म्हणतात त्यामध्ये विविध दिशांनी लोड ट्रान्सफर होत असतं. हे लोड ट्रान्सफर आधी सेकंडरी बीम (Secondary Beams) व त्यावरुन प्रायमरी बीम (Primary Beam) वर (तुळयांवर) येऊन या तुळया ज्या उभ्या खांबांवर (Columns) टेकलेल्या असतात त्यावरुन खाली फाऊन्डेशन वर म्हणजे पायाकडं स्थलांतरीत होतं.

पायाचं महत्त्व काय हे सगळ्यांनाच माहिती आहे तरीही
पाया म्हणजे उगाच एक ठोकळा ज्या द्वारे वरचं वजन खाली स्थलांतरीत होतं असं नाही.
ज्या मार्फत इमारतीचं वजन सुरक्षेचा विचार करुन (कॉलम्स व वरच्या मेम्बरमधून खाली स्थलांतरीत होऊन) तसेच कुठल्याही प्रकारे इमारतीला कमीअधिक प्रमाणात खचण्यापासून किंवा इमारत कलणं टाळणं साधलं जाऊन खालच्या जमिनी च्या ग्रहण क्षमतेचा विचार करुन डिझाईन केलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाया असं मानता येईल.

.

इमारतीचा पाया कसा असावा हे मुख्यत्वे जमिनीच्या किंवा मातीच्या तोलून धरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. याशिवाय किंवा याबरोबर इमारतीची उंची, रचना आणि त्यामुळं ठरणारं तिचं वजन हे घटक देखील पाया कसा असावा हे ठरवतात.

पाया किंवा फाऊन्डेशन बनवण्याचे साहजिक वेगवेगळे प्रकार असतात.
खोलवर जाणार्‍या किंवा न्याव्या लागणार्‍या प्रकाराला डीप फाऊन्डेशन (Deep Foundations) असं प्राथमिक नाव आहे
तर जिथं फारसं खोल जावं लागत नाही अशा प्रकाराला शॅलो फाऊन्डेशन (Shallow Foundations) असं नाव आहे.

डीप फाऊन्डेशन मध्ये पाईल फाऊन्डेशन (Pile Foundation) तसेच पियर फाऊन्डेशन (Pier Foundation) असे उपप्रकार आहेत.

पाईल फाऊन्डेशन हे मुख्यत्वे जमिन जिथं काहीही कारणानं वजन पेलून धरायला अक्षम आहे अशा ठिकाणी वापरलं जातं. खूप खोलपर्यंत काळी माती आहे, खडक नाही, मुरुम सुटत आहे, दलदल आहे, वाळू आहे अशा ठिकाणी खोलवर पाईल खणल्या जाऊन किंवा ड्रेन केल्या जाऊन त्यात लोखंडाच्या सळया सोडून त्यात काँक्रीट ओतून किंवा तयार काँक्रीटचे खांबच्या खांब त्या पोकळी मध्ये खुपसले जाऊन त्यावर फाऊन्डेशन उभं केलं जातं. यामध्ये पाईल्स खालच्या कठिण स्तरापर्यंत तरी नेल्या जातात (End Bearing) किंवा अशा पद्धतीनं आतपर्यंत रुतवल्या जातात जेणेकरुन त्या खाली आणखी जाणं शक्य होणार नाही. (Friction Piles)

.
समुद्रातले मोठेले पूल, खाडीसारख्या पाणथळ किंवा दलदलीच्या जागा यामधल्या पाईपलाईन्स किंवा इमारती, डोंगर पर्वतांमध्ये उभे राहणारे इलेक्ट्रिक टॉवर, घरं या सगळ्याच्या पायांसाठी पाईल नि पियर फाऊन्डेशन म्हणजे वरदान आहे.

शॅलो फाऊन्डेशन हे मुख्यतः जिथं जमिन योग्य प्रकारे वजन पेलू शकते अशा प्रकारच्या जमिनीसाठी वापरलं जातं. यात देखील अनेक प्रकार आहेत ते पुढच्या भागात पाहू.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Oct 2015 - 7:28 am | मुक्त विहारि

सुरुवातीलाच षटकार....

ही लेखमाला जोरदार होणार....

बाद्वे,

फूल्ल बॉटल लेमनवॉटर पिवून रेकणार्‍या, गहनविचारांच्या हितोपदेशांच्या प्रतिक्षेत.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 7:52 am | चांदणे संदीप

प्यारेदादा पायाभरणी उत्तम(एकदम पाईल फौडेशनच!) झालेली आहे. मजबूत लेखमाला यावर उभी राहणार यात शंकाच नाही!

पुभाप्र
Sandy

बाबा योगिराज's picture

21 Oct 2015 - 8:10 am | बाबा योगिराज

घर बांधतांन्ना इतके कूटाने असतील अस वाटल नव्हतं. मस्त सुरुवात झालिये. और दिखाओ और दिखाओ.

फुटू कामुन दिसनात???

एस's picture

21 Oct 2015 - 8:20 am | एस

फोटो दिसत नाहीत. पाईल फाउंडेशन म्हणजे काय ते कळलं. पीअर फाउंडेशन म्हणजे काय ते सांगा.

लेखाला वाळवी ,उंदीर यांनी पोखरलं तरी चालेल का?
काही विकीपिडिआछाप न सांगता दुसरं काही गंमतीदार येऊ द्या प्यारेकाका.
घरबांधणीत हलकं घेऊन चला पटणार नाही ना?
( मजा )

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 11:33 am | चांदणे संदीप

कंजूसकाका!

लेखनाला थोडा गमतीशार टच देऊन सांगता येऊ शकेल, पण तुमच्या

काही विकीपिडिआछाप न सांगता

या वाक्याशी असहमत! अतिशय सोप्या भाषेत लिहील गेल आहे अस माझ मत आहे. आणी हे मी गेली १० वर्षे याच क्षेत्रात (Structural Design) काम करत असल्याच्या अनुभवावरून सांगू शकतो!

एक तर ज्युनिअर्सना कसंही सांगा त्यांच्या डोक्यावरूनच जात असत बरयाचदा असा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे विकिपिडीया छाप नसून उलट ज्युनिअर लोकांना चटकन समजेल यासाठीच आदर्श लिखाण आहे हे असं मला वाटत!

जुनिअर्सना शिकवून दमलेला!
Sandy

एक एकटा एकटाच's picture

21 Oct 2015 - 1:47 pm | एक एकटा एकटाच

पूर्णत: सहमत

फारच उत्तम आणि सोप्या भाषेत लिहिलाय लेख

कारण civil engineering ह्या विषयाचा अवाका फार मोठा आहे.
त्यानुसार लेख खरच उत्तम जमतोय.

वर्गात शिकवता ते नकोय.एखादे उदाहरण द्या.तुमचा अनुभव स्थापत्याचा द्या.जे पाठ्यपुस्तकात आहे ते पुन्हा नकोच.इथे कोणी असं म्हणणार नाही हे तर सिविलचं/आर्किटेक्टचं आहे यात नको वगैरे.

आता मी थेट प्रश्नालाच भिडतो.
१ ) व्हेनिस शहर बघायला जातात.तिथे पाचशे वर्षांपुर्वी ड्रेनेजची काय व्यवस्था केली आहे? आमच्याकडे अजूनही किनाय्रावरचे लोक अंधारात बीचवरच zxxxz करतात.
२) दुसय्रा महायुद्धातले बंकरस ,काही किल्ल्यातले सैन्य रहाणयाची तळघरं यांची रचना.
३) मेट्रोसाठीचे वरचे आणि भुयारी मार्ग.
४) रेल्वेचे बोगदे कसे आज खणतात.पुर्वी कल्का- शिमला मार्गावर बोगदा खणताना दोन्हीकडून बोगदा खणत आल्यावर अलाइअनमेंट एक फुटाने चुकल्यावर त्या सिविल एंजिनिअरने लगेच राजीनामा दिला शरमेने.

अशी बरीच उदाहरणे टाका आणि मजेदार करा.त्या व्याख्या टाका फाउंडेशनमध्ये.

बॅटमॅन's picture

21 Oct 2015 - 5:28 pm | बॅटमॅन

जमल्यास भारतातलीही काही उदाहरणे टाकावीत अशी आग्रहाची विनंती.

भारतातलं एक तर पांडवकालीन (त्यामुळे अर्थातच कलियुगात समजून घेणे अशक्य) तरी असतं किंवा मध्ययुगीन असलं तरी "पूर्वीचा भारत राहिलेला नसतो". त्यामुळे अडाण** लोक काहीही बरळत असतात. जे समोर दिसतंय त्याचं साधंसोपं शास्त्रीय स्पष्टीकरण सोडून पाहिजे ते बोंबलत बसतात हे स्वयंघोषित संस्कृतिरक्षक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2015 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतातले सद्याचे प्रचंड मोठे स्थापत्याचे उदाहरण म्हटल्यावर सर्वात प्रथम डोळ्यासमोर आला... काश्मीरमधला चेनाब पूल. मार्च २०१६ मध्ये वाहतूकीस खुला होण्याची अपेक्षा असलेल्या या पूलाची लांबी १३१५ मीटर, उंची ३५९ मीटर असेल व तो जगातला सर्वात ऊंच रेल्वेपूल असेल...

.

भारतिय तंत्रज्ञ बांधत असलेला हा पूल एक जागतिक स्तराचे स्थापत्यआश्चर्य समजले जाते. त्याच्या बांधणीसंबंधी माहिती सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत वाचायची प्रचंड उत्सुकता आहे.

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 5:29 pm | प्यारे१

नोटेड.

सध्या मूलभूत बाबींवर माहिती देऊन पुढे अशा गोष्टीबाबत विचार करावा म्हणतो. इन्शाल्लाह वो भी लिख पाएंगे.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 5:32 pm | चांदणे संदीप

आमेन!

एक एकटा एकटाच's picture

21 Oct 2015 - 9:44 pm | एक एकटा एकटाच

तेच म्हणतोय

सध्या ह्या लेखा द्वारे थोड्या सिव्हिल इंजिनिअरिंग च्या मूलभूत गोष्टींची तोंड ओळख करून घ्या. जेणेकरुन जे "mega structures" आहेत त्याची निर्मीती प्रक्रिया समजुन घेताना जास्त कष्ट पडणार नाहीत.

बाक़ी काही नाही.

आणि हो
तुमच्या रहात्या वास्तुला समजुन घेण्यासाठी ह्या लेखाचा उपयोग सर्वाधीक होईल अस मला वाटते.

माहितीपूर्ण लेख.फोटो दिसत नाहीत पण.

पिकासा/फेबु/ फ्लिकर न वापरता डायरेक्ट गुगल इमेजेस टाकल्या आहेत का?

फोटो मला एकट्यालाच दिसत आहेत काय म्हणजे मग?
चेकवतो दुपार पर्यन्त.

@कंजूस काका, नेमकं कसं अपेक्षित आहे ते समजेल का?

नाव आडनाव's picture

21 Oct 2015 - 11:01 am | नाव आडनाव

आधी एकही फोटो दिसत नव्हता. बाजूच्या टॅब मधे जीमेल लॉगिन केलं, तरी फोटो दिसत नव्हते पण आयकॉन बदलले. क्रोमचं 'इनस्पेक्ट एलेमेंट' केल्यानंतर ४०३ कोड दिसत आहे. ४०३ म्हणजे फॉर्बिडन. तुम्ही पब्लिक अ‍ॅक्सेस द्या फोटोला, नंतर दिसतील.

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 1:06 pm | प्यारे१

आता दिसायला हवेत फोटोज.

खटपट्या's picture

21 Oct 2015 - 2:06 pm | खटपट्या

ईल्ले !! હું જોઈ પોકળ વાણી

गंमतीदार करा एवढच म्हणतो.अथवा काही प्रसिद्ध इमारतीमधली वाखाणण्यासारखी गोष्ट.

प्रचेतस's picture

21 Oct 2015 - 11:16 am | प्रचेतस

लेखन उत्तम पण कंजूसकाकांशी सहमत. थोडंसं विकीपेडियाछाप झालंय. प्यारेटच जाणवत नाहिये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2015 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात !

दुबईचा बुर्ज खलिफा बांधला जात होता तेव्हा स्थापत्यशास्त्राबद्दलच्या चर्चा मोठ्या चवीने ऐकत वाचत होतो... अर्थात त्या विषयातले ज्ञान शून्य आहे तरी त्यातला शास्त्रिय व तार्किक भाग मनोरंजक वाटतो.

जेद्दात सद्या बांधकाम चालू असलेल्या किंगडम टॉवरचा आराखडा चालू होता तेव्हा ती जगातील सर्वात ऊंच इमारत होणार म्हणून बरीच उत्सुकता होती. आराखड्यात प्रथम त्याची ऊंची १ मैल (१६० मीटर) ठरवली होती. पण नंतर जमिनीची पाहणी झाल्यावर तेवढ्या उंच/मोठ्या इमारतीचे वजन त्या स्थानावरची भूमी सहन करू शकणार नाही असे तज्ञांचे मत झाले आणि एकूण ऊंची कमी करत करत १ किमी (१००० मीटर) पर्यंत कमी केली गेली आहे, ते आठवले.

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2015 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्रांना पब्लिक अक्सेस दिल्यास ती इतरांना दिसतील असे वाटते.

'पिंक' पॅंथर्न's picture

21 Oct 2015 - 12:31 pm | 'पिंक' पॅंथर्न

प्यारे१

पाईल फाऊंडेशनच्या पाईल जमिनित खुप खोलवर नेलेल्या असतात. भुगर्भातील नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला काही प्रोब्लेम होवु शकतो का ? किंवा ही शक्यता किती आहे ?

कारण हे प्रवाह पण मार्ग बदलत असतात. त्यामुळे खोदताना जरी त्या ठिकाणी प्रवाह नसला तरी नंतर त्या ठिकाणी प्रवाह येवुन धोका निर्माण होवु शकतो, असं ऐकलं आहे ते कितपत खरं आहे ?

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 1:44 pm | प्यारे१

काही परिणाम दीर्घकालीन स्वरुपात निश्चित आढळून येतील.
परिणाम करणारे घटक
१. प्रवाहाचा स्त्रोत किती गतीनं वाहतो आहे (हळूहळू पाईलच्या भोवतालचा भाग सुटा करणं/ पोखरणं)
२. पाण्यातले क्षार (खुद्द पाईलच्या काँक्रीट अथवा त्यातल्या लोखंडाशी रासायनिक प्रक्रिया होऊन ताकद कमी होणं.)
३. पाईल चं डिझाईन (मूळातच डिझाईन किती ताकदीचं आहे )

या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

अपेक्षेप्रमाणे जबरदस्त लीखाण. बाकीच्यां लोकांसारखे मलाही फोटो दीसत नाहीत. नाहीतर अजुन मजा आली असती.
प्रश्न क्र. १ - मी जेथे रहातो तीथुन पाउण कीलोमिटरवर बेकायदा रेती उत्खनन चालू असते. रेती उत्खननाच्या जागेपासुन अर्धा किलोमीटर अंतरावर ३० माळ्यांचा टॉवर उभारणे योग्य आहे का? माती/जमीन परीक्षण केले असेलच. पण ३० माळ्याच्या इमारतीच्या एका बाजुला ५० मीटरवरून रेल्वे जाते. आणि दुसर्‍या बाजूला अर्धा किलोमीटरवर रेती उत्खनन. मला माहीत आहे की एवढ्या तुटपुंज्या माहीतीवरुन अंदाज वर्तवणे कठीण आहे. तरी तुमचा अनुभव काय सांगतो? सततच्या रेती उत्खननामुळे आजुबाजुच्या इमारतींना कीती धोका उद्भवतो? आपण कट्टा केला त्या अमीत गार्डनच्या बरोबर समोर रेती उत्खनन चालू आहे आणि अमीत गार्ड्नच्या मागे थोड्याच अंतरावर ३० माळ्याचा टॉवरचे काम चालू आहे. हे बरोबर आहे का?

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 1:45 pm | प्यारे१

डिझाईन योग्य असल्यास त्रास होणार नाही.

खटपट्या's picture

21 Oct 2015 - 5:46 pm | खटपट्या

ओके, धन्यवाद

चाणक्य's picture

21 Oct 2015 - 12:42 pm | चाणक्य

पुभाप्र

चित्रगुप्त's picture

21 Oct 2015 - 1:57 pm | चित्रगुप्त

जबरदस्त लेखमाला होणार असे दिसते आहे. यात मी प्राचीन इमारतींविषयी प्रश्न विचारले तर चालेल ना? जसे की पाया पासून शिखरापर्यंत बांधकाम करताना प्रत्येक वेळी हल्ली बारीक रबरी नळी वापरून वॉटर लेव्हल चेक केली जाते. पार्थेनॉन, ताजमहाल वगैरेचे काळात हे कसे केले जायचे?

'पिंक' पॅंथर्न's picture

21 Oct 2015 - 2:19 pm | 'पिंक' पॅंथर्न

सर बॅनिस्टर फ्लेचर यांच एक पुस्तक आहे ( पुस्तक नव्हे ग्रंथच म्हणा ) "हिस्ट्री ऑफ आर्कीटेक्चर", या पुस्तकात अगदी पुरातन काळा पासुन मॉडर्न आर्कीटेक्चर पर्यंत जगातील बहुतेक ऐतिहासिक आणि प्रसिध्द इमारतीबद्दल माहिती आहे.
विविध कालखंडानुसार विविध प्रकारच्या इमारतींची " कंस्ट्रक्शन टेक्नॉलोजी" कशी विकसित होत गेली याची माहिती या पुस्तकात मिळु शकेल.

पुस्तकाच्या नावासाठी धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 3:22 pm | चांदणे संदीप

इथे हे पुस्तक पीडीएफ स्वरूपात मिळू शकेल! :)

https://ia801409.us.archive.org/25/items/historyofarchite00fletuoft/hist...

बॅटमॅन's picture

21 Oct 2015 - 3:24 pm | बॅटमॅन

अरे वा, हे तर लयच झ्याक काम झालं, अनेक धन्यवाद सँडी सर.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 3:31 pm | चांदणे संदीप

आआरर्र्रर्र!!! :(

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 3:26 pm | प्यारे१

एकच नंबर काम केलं आहेत मालक.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 3:33 pm | चांदणे संदीप

अस का म्हणून राह्यले दादा!

तुम्ही लिहून एवढ भारी काम करून राह्यले…तेच्यापुढ कायतरी हाय का हे?

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 3:38 pm | प्यारे१

या मग जॉईन करा आम्हाला.

तुम्चे अनुभव देखील वाचायला आवडतीलच. व्यनि मध्ये बोलुया.

आणखी कुणी या क्षेत्रातलं असेल - सिव्हील इंजिनिअर, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनिअर, डीझायनर, इन्टेरियर डेकोरेटर, पर्स्पेक्टीव्ह बनवणारे, चित्रकार आणखी कुणीही- तरी त्यांनी लेखमाला छान करण्यासाठी भाग घ्यावा असं आवाहन करतो.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 3:45 pm | चांदणे संदीप

जमेल तस सांगण्याचा प्रयत्न करीन!

अजया's picture

21 Oct 2015 - 4:27 pm | अजया

अरे वा!पुस्तक पिडिएफसाठी धन्यवाद.

अरे वा . मी शिकत असताना , हे पुस्तक सहा जणांत मिळून विकत घेतले होते :)

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 1:15 am | चित्रगुप्त

वरती विचारलेला वॉटर लेव्हल बद्दलचा प्रश्न मला फार वर्षांपासून पडलेला आहे, पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. कृपया यावर प्रकाश टाकावा. वाचकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेल्यास धाग्यातील रूची कायम राहील आणि स्थापत्य विषयीच्या सर्वांच्याच माहितीत भर पडेल.
ओळंब्याने जशी 'उभी' पातळी राखली जाते, तशीच 'आडवी' पातळी राखण्यासाठी पूर्वी कोणती पद्धत वापरली जात असे ?

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 1:25 am | चित्रगुप्त

'रबरी नळी' चा शोध लागण्यापूर्वीच्या काळात हे कसे केले जायचे ?
.
..

खटपट्या's picture

23 Oct 2015 - 1:04 pm | खटपट्या

बाकी ठीकाणी कसे करतात ते माहीत नाही पण गावी घर बांधताना आडव्या पातळीसाठी ओळंब्याच्या उभ्या दोरीला लोखंडाचा काटकोन्या लावत असत व आडवी लेवल बरोबर आहे की नाही बघत असत. ही पध्दत अगदी तंतोतंत बरोबर आहे असे म्हणू शकत नाही. कारण ओळंब्याची दोरी कींचीत हलत असे आणी काटकोन्या धरलेला मानवी हातही थोडा हलत असे. पण गावचे सुतार अंदाजे काम करत असत.

खालील लींकवर चित्र पाहू शकता.

http://www.timetrips.co.uk/pyra-acttool3.jpg

कंजूस's picture

23 Oct 2015 - 5:24 am | कंजूस

पूर्ण सहमत. याचं उत्तर मिळाल्या शिवाय पुढचा भाग टाकू नका.

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 2:28 pm | तर्राट जोकर

फटू कुटं गेल्येत... आमी नंतर परतीसाद द्येऊ..

खेडूत's picture

21 Oct 2015 - 2:33 pm | खेडूत

आवडला.पुभाप्र..
चित्रं दिसायलीत आता!

वाचताना पहिल्या वर्षी शिकलेला अ‍ॅप-मेक नामक विषय आठवला.

सस्नेह's picture

21 Oct 2015 - 3:06 pm | सस्नेह

उत्तम तांत्रिक माहिती.
पहिल्या वर्षात शिकलेले स्थापत्यशास्त्र आठवले. इंटरेस्टिंग आहे...

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 3:17 pm | तर्राट जोकर

फोटोंमुळे समजण्यास सोपे गेले. छान माहिती आहे.