स्थापत्य - एक कला भाग १

प्यारे१'s picture
प्यारे१ in तंत्रजगत
21 Oct 2015 - 3:14 am

डिस्क्लेमरः मी एक मारुन मुटकून स्थापत्य अभियंता आहे. लेखात मांडलेली मतं ही इंजिनिअरींगच्या थोड्याफार अभ्यासात व आतापर्यंतच्या अनुभवावरुन मांडलेली असून ती जशीच्या तशी खरी असण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. या उप्पर जाणकार व्यक्तींना या मध्ये अधिक भर घालायची असल्यास अथवा दुरुस्त करावयाची असल्यास सप्रमाण मांडून व्यक्त केल्यास त्यांचे स्वागत आहे. या लेखमालेमध्ये जमेल तशी भर घालत राहण्याचा प्रयत्न आहे मात्र त्या लेखमाला सोडून इतर पालथे धंदे करताना आढळल्यास हिणवू नये ही नम्र विनंती. आमचा तोच मुख्य व्यवसाय आहे.
लेखमालेमध्ये आनुषंगिक इंग्रजी शब्द येतील. अनुवाद सुचवावेत.
-------------------------------------

प्रास्ताविकाचाच भाग थोडा अधिक सविस्तर आणि सविस्तार मांडण्याचा प्रयत्न मुद्दाम करत आहे. याचं कारण पुढं येईलच.

कुठलीही इमारत बांधताना आधी पाया नि नंतर कळस हाच जगत्मान्य क्रम वापरला जात असला तरी तिचं डीझाईन करताना आधी कळसाचं वजन पासून ते पाया असाच विषय येतो. कारण सगळ्याचीच भारवाही आपली भूमाता असली तरी वरुन येणारं वजन हे हळूहळू एका मेम्बरकडून दुसर्‍या मेम्बरकडे स्थानांतरीत होऊन नंतर ते जमिनीकडे स्थलांतरीत होत असतं.

इमारती वर येणार्‍या भारांमध्ये
१.इमारतीचं स्ववजन किंवा डेड लोड (Dead Load) : इमारत ज्यापासून बनली ते सगळे घटक म्हणजे दगड, वाळू, वीट, छप्पर आणि छप्परावरचा वॉटर प्रूफींगसाठी वापरलेला भाग, पाण्याची टाकी बांधलेली असली तर त्या टाकीमधल्या पाण्याचं वजन विचारात घेऊन एकूण वजन इ.इ.
२.लाईव्ह लोड (Live load) :माणसं, फर्निचर, अनेक इकडून तिकडे हलू शकणार्‍या वस्तू इत्यादी,

३. वार्‍याचा दाब किंवा विन्ड लोड (Wind Load): त्या त्या भागातल्या हवामानानुसार हा अनेक दिशांतून विचारात घ्यावा लागतो

४. भूकंपप्रवण क्षेत्रानुसार भूकंपामुळं येणारा ताण किंवा सीस्मिक लोड (Seismic Load) : हा अत्यंत आगंतुक विषय असला तरी तो विचारात घ्यावाच लागतो. प्रत्येक देशातल्या भूकंपाच्या इतिहासानुसार कुठे कुठे अधिक तीव्रतेचे भूकंप झाले आहेत याचा अभ्यास करुन काही 'झोन' ठरवले गेले आहेत. त्यानुसार कमी तीव्रतेच्या क्षेत्रतेसाठी अमुक एक लोड विचारात घेतला जातो.

५. ठराविक भागातल्या हवामान नि वातावरणानुरुप :
अ. स्नो लोड (Snow Load) जिथं जिथं बर्फवृष्टी होते अशा सर्व ठिकाणी
ब. पुरामुळं निर्माण होऊ शकणारा दाब (Flood Load)
क. जमिनी च्या प्रॉपर्टीजमुळं- दलदलीची वगैरे (Earth Load)

अशा रितीने इमारतीला कोणकोणत्या दाबांना तोंड द्यावं लागणार आहे या सगळ्याचा प्रामुख्यानं विचार केला जाऊन इमारत डीझाईन केली जाते.
.एका साध्या खोली सारख्या डिझाईनमध्ये काय क्रमानं लोड ट्रान्सफर होतं ते आपण पाहू

.

सगळ्यात वर असलेला इमारतीचा भाग आपल्या लगतच्या खालच्या मेम्बरकडे लोड ट्रान्सफर करतो. सुरुवातीच्या भागात पाहिलं तसं मुख्यत्वे जो आपला वावरण्याचा भाग ज्याला (फरश्यांखाली) स्लॅब म्हणतात त्यामध्ये विविध दिशांनी लोड ट्रान्सफर होत असतं. हे लोड ट्रान्सफर आधी सेकंडरी बीम (Secondary Beams) व त्यावरुन प्रायमरी बीम (Primary Beam) वर (तुळयांवर) येऊन या तुळया ज्या उभ्या खांबांवर (Columns) टेकलेल्या असतात त्यावरुन खाली फाऊन्डेशन वर म्हणजे पायाकडं स्थलांतरीत होतं.

पायाचं महत्त्व काय हे सगळ्यांनाच माहिती आहे तरीही
पाया म्हणजे उगाच एक ठोकळा ज्या द्वारे वरचं वजन खाली स्थलांतरीत होतं असं नाही.
ज्या मार्फत इमारतीचं वजन सुरक्षेचा विचार करुन (कॉलम्स व वरच्या मेम्बरमधून खाली स्थलांतरीत होऊन) तसेच कुठल्याही प्रकारे इमारतीला कमीअधिक प्रमाणात खचण्यापासून किंवा इमारत कलणं टाळणं साधलं जाऊन खालच्या जमिनी च्या ग्रहण क्षमतेचा विचार करुन डिझाईन केलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाया असं मानता येईल.

.

इमारतीचा पाया कसा असावा हे मुख्यत्वे जमिनीच्या किंवा मातीच्या तोलून धरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. याशिवाय किंवा याबरोबर इमारतीची उंची, रचना आणि त्यामुळं ठरणारं तिचं वजन हे घटक देखील पाया कसा असावा हे ठरवतात.

पाया किंवा फाऊन्डेशन बनवण्याचे साहजिक वेगवेगळे प्रकार असतात.
खोलवर जाणार्‍या किंवा न्याव्या लागणार्‍या प्रकाराला डीप फाऊन्डेशन (Deep Foundations) असं प्राथमिक नाव आहे
तर जिथं फारसं खोल जावं लागत नाही अशा प्रकाराला शॅलो फाऊन्डेशन (Shallow Foundations) असं नाव आहे.

डीप फाऊन्डेशन मध्ये पाईल फाऊन्डेशन (Pile Foundation) तसेच पियर फाऊन्डेशन (Pier Foundation) असे उपप्रकार आहेत.

पाईल फाऊन्डेशन हे मुख्यत्वे जमिन जिथं काहीही कारणानं वजन पेलून धरायला अक्षम आहे अशा ठिकाणी वापरलं जातं. खूप खोलपर्यंत काळी माती आहे, खडक नाही, मुरुम सुटत आहे, दलदल आहे, वाळू आहे अशा ठिकाणी खोलवर पाईल खणल्या जाऊन किंवा ड्रेन केल्या जाऊन त्यात लोखंडाच्या सळया सोडून त्यात काँक्रीट ओतून किंवा तयार काँक्रीटचे खांबच्या खांब त्या पोकळी मध्ये खुपसले जाऊन त्यावर फाऊन्डेशन उभं केलं जातं. यामध्ये पाईल्स खालच्या कठिण स्तरापर्यंत तरी नेल्या जातात (End Bearing) किंवा अशा पद्धतीनं आतपर्यंत रुतवल्या जातात जेणेकरुन त्या खाली आणखी जाणं शक्य होणार नाही. (Friction Piles)

.
समुद्रातले मोठेले पूल, खाडीसारख्या पाणथळ किंवा दलदलीच्या जागा यामधल्या पाईपलाईन्स किंवा इमारती, डोंगर पर्वतांमध्ये उभे राहणारे इलेक्ट्रिक टॉवर, घरं या सगळ्याच्या पायांसाठी पाईल नि पियर फाऊन्डेशन म्हणजे वरदान आहे.

शॅलो फाऊन्डेशन हे मुख्यतः जिथं जमिन योग्य प्रकारे वजन पेलू शकते अशा प्रकारच्या जमिनीसाठी वापरलं जातं. यात देखील अनेक प्रकार आहेत ते पुढच्या भागात पाहू.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

21 Oct 2015 - 3:22 pm | कपिलमुनी

लेखमालेची पायाभरणी जोरदार !
(लहानपणापासून नदीमधे , समुद्रामधे पिलर कसे बांधत असतील याचे आश्चर्य वाटायचे )

नीलमोहर's picture

21 Oct 2015 - 4:05 pm | नीलमोहर

लेख सहज सोप्या भाषेत असल्यामुळे समजत आहे.
एकूणच या विषयातले तांत्रिक ज्ञान कमी असलेल्यांसाठी अत्यंत उपयोगी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Oct 2015 - 4:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्यारे भाय,

ससुरे जित गइस भैबा!! का लिखावट बा साधू साधू!!!, एकर उपलक्ष में हमहू गांव में जलेबी बटवारा करूँगा! लूट लेइस महफ़िल रे!!

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 4:37 pm | प्यारे१

आप जैसों की शुभ कामनाएं और बड़े बूढोका आशीष हो तो हो जात है भइया| अबई बड़ा मुकाम पर पहुंचना है

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 6:11 pm | स्वप्नांची राणी

ते विंग्रजीमधलं पिडीएफ लयच **पीडी व्हायलय. त्यापेक्षा आपल्याला हा वरचा स्थापत्य फॉर डम्बर्स लेख फारच आवडला. मस्त सुरुवात!! मेगास्ट्रक्चर्स ह्या कार्यक्रमाची आठवण झाली. मलाही बरेच प्रश्न आहेत. त्यातला एक म्हणजे reclaimed जमिनीवर वसवलेली शहरच्या शहरं आहेत हल्ली. आपलं बीकेसी, दुबईत आहे, आमच्या पिटूकल्या कतारलाही आहे एक. तर यासाठी पाया कसा घेतात? त्यात तर कितीही भराव टाकला तरी खाली अंतहीन समुद्रच आहे ना?

पुभाप्र...

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 6:25 pm | प्यारे१

>>> अंतहीन समुद्रच

हे असं नाही. समुद्राचा तळ गाठता येतोच की आणि जिथं पाण्याखालचा भूभाग उथळ पातळीवर आहे अशाच ठिकाणी असे भरावाचे प्रयोग होताना दिसतात. (आखिर बात पैसे पर ही आती है यार)

समुद्र सुरु झाला रे झाला की खोल पाणी सुरु असं सर्व ठिकाणी नसतं. अनेक ठिकाणी एका ठराविक मंद उतारानं जमिन पाण्यात शिरताना दिसते किंवा पाणी जमिनीवर आलेलं दिसतं. अशा ठिकाणी हजारो घनमीटर मोठे मोठे दगड माती टाकून भराव बनवले जातात. दुबईचं बुर्ज अल अरब किंवा सध्या बंद किंवा स्लो डाऊन असलेलं 'द वर्ल्ड' हे त्यातलेच प्रकार. भराव बनवण्यामध्ये भरावाला विशिष्ट ताकद मिळवण्याची प्रक्रिया असते.

मी व्यक्तीशः या सगळ्याच्याच विरोधात आहे. असो!

मी व्यक्तीशः या सगळ्याच्याच विरोधात आहे.

कारण?

माणसाची अतिहाव आहे ही. बीकेसी वगैरे मोस्टली बिल्डर लॉबी मुळे बनलेले आहेत. बुर्ज अल अरब, द वर्ल्ड वगैरे तर 100% धनिकां साठीच. (imagine हां प्रोजेक्ट अरबी समुद्रात कोकण किनार्यावर सुरु व्हायचा असता तर मान्य झालं असतं का?)
गरजा निर्माण करुन त्या भागवायच्या हे कुठलं लॉजिक?

बॅटमॅन's picture

23 Oct 2015 - 12:54 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

भारतातली उदाहरणं चर्चेत घ्या +1
१) पुर्वी बांधकामं पडू लागली की "बळी" द्यायची प्रथा होती.हा शतकी विषय होईल.
२) गोव्याच्या झुआरी नदीवरचा पूल पडायचा सारखा.
३) कोनार्कची कथा तर प्रसिद्धच आहे.
४) हल्ली मोठे पुल युपी श्टाइल बांधतात.
५) आता २०१८मध्ये पुर्ण होणारी श्रीनगर रेल्वे घ्या.
६ ) कांडला बंदर निर्मिती.
७) आपलं स्पेस स्टेशनला विसरू नका.

प्यारे१ आता तुम्हाला फॅकल्टीच भरती करावी लागेल.

असे विषय आले तर ट्रोलिंग आणि डुआइडी विषय लोकं विसरतील.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 9:35 pm | चांदणे संदीप

+111

आता सर्व फोटो दिसताहेत हे सांगायचं राहिलं.

मांत्रिक's picture

21 Oct 2015 - 8:44 pm | मांत्रिक

प्यारेबुवांनी अगदी अभ्यासाद्वारे सदर लेख लिहिलाय हे जाणवतंय! मस्तच प्यारूबुवा. काही कन्सेप्ट कधीच कळणार नाहीत तरीपण म्हणतो मस्त सोपं सुलभ लिवलंय!!!

पैसा's picture

21 Oct 2015 - 8:54 pm | पैसा

जरा उदाहरणे देऊन अजून मनोरंजक होऊ दे.

अभ्या..'s picture

21 Oct 2015 - 9:53 pm | अभ्या..

प्यारेलाल, चांगली चाललीय लेखमाला. चालू दे शिस्तीत.
घर बांधून होत आले की रंगवायला बोलीव. जरुर येऊ. हाय एक डिप्लोमा ईंटेरिअर डेकोरेशनचा पण. ;)

हाय एक डिप्लोमा ईंटेरिअर डेकोरेशनचा पण.मग तो लेख तुम्ही चालू करा .डेकोरेशनसाठी लागणारा मोठा हॅाल,उंच सिलींग ,गार्डन बाथरूम अगोदरच बांधून घेऊ की. नंतर तोडाफोडी नको.कस्सं?

आतिवास's picture

22 Oct 2015 - 10:22 am | आतिवास

या(ही) विषयातलं मला काही कळत नाही.
वाचते आहे, समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

पद्मावति's picture

22 Oct 2015 - 11:07 am | पद्मावति

रोचक लेखमाला. वाचतेय. पु.भा.प्र.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Oct 2015 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार

प्यारे गुरुजिंमूळे ज्ञानाचे अजून एक कवाड आमच्या साठी किलकिले झाले.

लेखमाला पुर्ण केल्यावर प्यारे गुरुजींना, आमच्या तर्फे एक मोठा ग्लास भरुन, मस्तानी नावाचे पेय, आमच्या खर्चाने, पाजण्यात येईल.

पैजारबुवा,

विलासराव's picture

29 Oct 2015 - 4:34 pm | विलासराव

फक्त प्यारेंनाच् मस्तानी का?

प्यारेबाबा आध्यात्मिक विषयाकडून इंजीनियरिंग कड़े.
लगे रहो!!!!

प्यारे१'s picture

29 Oct 2015 - 4:40 pm | प्यारे१

शेयर करु ओ मस्तानी. (पेय)
पैजार बुवांनी देऊ तरी दे.

मला कोल्ड कॉफी पाजलिय बुवांनी.
म्हणजे आता हाफ मस्तानी पक्की.

मित्रहो's picture

29 Oct 2015 - 4:42 pm | मित्रहो

अभियंत्रिकीची अजून एक पदवी होइल.
छान लेखमाला आहे. सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले.