Fire

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 7:50 pm

पटरीवर रेल्वे भोंगा वाजवत हळुहळु निघाली, धाड.....धुड....धाड.....धुड.....
रिजर्वेशन नाही मिळालं, जायचं अचानक ठरलं.
आम्ही पांढरपेशे, वरच्या शीटावर, पण जनरल बोगीत.
बिस्लरी घेतलीय, वरचा फ्यान चालतोय, डब्यात गर्दीच गर्दी.
आमचे मित्र सहपरिवार, मीही सुटाबुटातला, वरच्या शीटावर तिघचं.
बाकीची खाली, खेटून खेटून बसलेली, प्रवास लांबचा.
टवाळक्या, टपल्या, आणि गप्पा.

पुढच्या स्टेशनला गाडी थांबली, एक दाढीदारी पुरुष, लटांबर घेऊन आमच्याच बोगीत.
बायको न पोरं खालच्या शीटांच्या मधी, बाकीच्यांचे पाय आखडते.
मोठ्या पोरीला वरती बसण्याची खुण, खुण कसली हुकुमचं, तिला नव्हे आम्हाला.
चुळबुळ करत थोडी जागा दिली, शिडीवर चढत कडेला बसली.
दाढीधारी पुरुषाचा मोलाचा सल्ला, तिला, " अगर किसीने हात भी लगाया, तो सीधे कान के निचे खीच देना".
आम्ही सुन्न, सहपरिवार थोबाडीत दिल्यासारखा अलिप्त. मित्र हळुच कानात करवदला " आता घी, शेTT ". मी मुग गिळुन गप्प.
आम्ही पांढरपेशे, इज्जतदार, राडा करणे आम्हाला शोभत नाही, सहपरिवार सोबत असताना नाहीच नाही.
रेल्वेने आता तुफान वेग घेतलाय, धडाक् धुडूक्, धडाक् धुडूक्, धडाक् धुडूक्......

प्रवासप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Oct 2015 - 7:59 pm | बिपिन कार्यकर्ते

है शाब्बास!

रातराणी's picture

19 Oct 2015 - 8:34 pm | रातराणी

:)

चाणक्य's picture

19 Oct 2015 - 9:05 pm | चाणक्य

मित्र काय करवदला तेच कळलं नाही. 'आता घी, शे ाा' म्हणजे?

जव्हेरगंज's picture

19 Oct 2015 - 9:28 pm | जव्हेरगंज

डबल 'TT' आहे त्यात! (म्हणजे सगळ्या आनंदावर विरजन पडले अशा अर्थाने आहे ते)

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2015 - 12:05 am | टवाळ कार्टा

आग्गाग्गा

जव्हेरगंज's picture

20 Oct 2015 - 12:21 am | जव्हेरगंज

काब्रे., यापेक्षा खतरनाक शब्द वापरले गेलेत मिपावर..

(उदा. टाळतो लवलवती पाती, कोणता तांब्या घेऊ हाती फेम) ;-)

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2015 - 1:03 am | टवाळ कार्टा

अच्रत बव्लत

चाणक्य's picture

20 Oct 2015 - 6:26 am | चाणक्य

असं आहे होय ते.

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 12:19 am | प्यारे१

जव्हेरजंग तुम्ही विद्रोही साहित्य लिहित जा अधूनमधून. वाफ बाहेर पडेल. ;)

आनंद कांबीकर's picture

20 Oct 2015 - 1:21 pm | आनंद कांबीकर

...

शिव कन्या's picture

20 Oct 2015 - 8:22 pm | शिव कन्या

सभ्यतेला तोंड दाबून ......