अग, हसतेस काय? खरच सांगतो आहे मी. राजन म्हणाला मला की तू गिताशी बोलू नाकोस. ती काही ना काही कारणाने तुला आमच्यापासून तोडेल." विक्रांत गंभीरपणे गिताला सांगत होता आणि गिता हसत होती. " कमाल करतेस ह गिता. मी काहीतरी सिरीयसली सांगतो आहे. बर हे फक्त राजानच मत नाही; प्रकाश आणि हरीच सुद्धा हेच मत आहे." आता मात्र गिताला थोडा राग आला. "विकी मी का तोडेन तुला तुझ्या मित्रांपासून? आपण फक्त गेले काही दिवस झाले भेटायला लागलो आहोत. तेही कामाच्या संदर्भात. बर, आपली ओळख आत्ताची आहे आणि तुझे मित्र तर तुझ्याबरोबर लहानपणापासून आहेत ना? मग ते तुला ओळखत नाहीत का? मी भले प्रयत्न केला तुला त्यांच्यापासून लांब करण्याचा; पण तू अस कोणाच एकूण तुझी जुनी मैत्री संपवणार नाहीस याची त्याना खात्री कशी नाही?" ती थोडी वैतागून म्हणाली.
"त्यांना खात्री आहे ग की मी अस कोणाच एकून आमची मैत्री तोडणार नाही. पण मी आपल आमच डिस्कशन सांगितलं तुला. जाऊदे तुला राग आलेला दिसतो आहे. सोड तो विषय." विक्रांत म्हणाला. तरी गीताच्या कपाळावरच्या आठ्या गेल्या नाहीत. त्यामुळे तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या बटेला फुंकर मारत तो हळूच म्हणाला;"तशी तू वैतागलीस की अजून छान दिसतेस ह." त्याचा हा डायलॉग एकून गिता हसली आणि विक्रमने छेडलेला विषय तिथेच संपला.
गिताच्या घरी रात्रीचे जेवण सगळे एकत्र घ्यायचे. त्या निमित्ताने दिवसभर कोणी काय केले ते सांगितले जाते. म्हणून तिच्या वडिलांनीच हा नियम केला होता. स्पेशाली गिता मोठी झाल्यावर तर ते सुद्धा आवर्जून रात्रीच्या जेवणाला घरी पोहोचायचे. कारण ते हार्ट स्पेशालीस्ट होते आणि गीताची आई गाय्नाकोलोजीस्ट. गीताने मात्र साय्कोलोगिस्ट होण्याच्या निर्नार्य घेतला होता. त्याला तिच्या आई-बाबांनी कधीच विरोध केला नव्हता. विक्रमने विषय संपवला अस त्याला वाटत असल तरी गीताच्या मनातून मात्र संध्याकाळचा विषय पूर्ण गेला नव्हता. म्हणून मग तिने जेवताना तो विषय आई-बाबांकडे काढला.
"गिता अग कस कळत नाही तुला. विक्रमला तू आवडायला लागली आहेस. पण अजून बहुतेक त्याला तुझ्या मनाचा अंदाज येत नाही आहे म्हणून मग अस काहीतरी बोलून तो तुझी रिअक्शन बघत असेल." गिताची आई हसत म्हणाली. त्याला बाबांनी दुजोरा दिला. "खरच गिता बहुतेक त्याला तुला विचारायची हिम्मत होत नसेल. म्हणून मग हे अस, तुझ्या मैत्रीमुळे माझ्या जुन्या मित्रांपासून लांब जाईन... सारखे डाय्लोग्स तो बोलत असेल. याचा अर्थ स्पष्ट होतो ग... त्याला तू आवडतेस." अस म्हणून आई-बाबा दोघे हसले. पण गीताचं त्यांच्या बोलण्याने समाधान नाही झाल.
विक्रमची आणि गिताची ओळख अगदीच अलीकडची होती. गीताने नुकतच डॉक्टर खरातांच क्लिनिक जॉईन केल होत. विक्रम मात्र तिथे गेल एक वर्ष काम करत होता. गिता स्वतः साय्कोलोजीस्ट होती. विक्रम मात्र क्लिनिकमधल सगळ पेपर वर्क बघायचा. डॉक्टर खरात खूप मोठे साय्कोलोजीस्ट होते. त्यांच्याकडे अनेक पेशंट्स यायचे. प्रत्येक केस कॉन्फिडेन्शल असायची. त्यामुळे विक्रमशिवाय इतर कोणालाही डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केस पेपर्स मिळायचे नाहीत. खरात गिताच्या वडिलांचे मित्र असल्याने गिताला त्यांनी स्वतः आग्रहाने ट्रेनिंगसाठी ठेवून घेतलं होत. आणि तिथेच तिची विक्रमशी ओळख झाली होती. विक्रम स्वभावाने खूप चांगला होता. सरळ होता. गिताला कोणतेही केस पेपर्स पटकन काढून द्यायचा आणि अनेकदा एखादी जुनी केस तिला सांगायचा सुद्धा.
गिता त्याला एकदा म्हणालीदेखील होती;"विक्रम तू न साय्कोलोजीस्ट व्ह्यायला हवा होतास. तुला प्रत्येक केस नीट अगदी सगळ्या बारकाव्यांसहित माहित असते." त्यावर तो फक्त हसला होता.
"का बर विकीला अस वाटत की मी त्याला त्याच्या मित्रांपासून दूर करेन? आई-बाबा म्हणतात ते खर असेल का? पण मग मी जर आवडत असेन तर तो तस स्पष्ट सांगेल. त्याला उगाच गोल गोल नाही बोलता येत किंवा खूपस प्लानिंग करत असेल तो अस नाही वाटत. मुळात मी आवडण किंवा आमच एकत्र येण त्याला त्याच्या मित्रांपासून कस दूर करेल? का अस म्हणतात त्याचे मित्र? एकदा छेडून बघितल पाहिजे त्याला. जर त्याच्या मित्राना भेटता आल तर मस्तच. उगाच विकीच्या मनात अस काही भारावू नका हे सांगीन. मी असेन किंवा अजून कोणी दुसरी त्याच्या आयुष्यात. पण जर एकदा त्याच्या मनाने स्वीकारलं की त्याच्या आयुष्यात येणारी कोणीही मुलगी त्याला त्याच्या मित्रांपासून तोडेल तर मग हा विचार पुढे जाऊ शकतो. मग तर त्याला असे ही वाटायला लागेल की ती मुलगी त्याला त्याच्या घरच्या लोकांपासून पण तोडेल. अह! thats not right." गिता स्वतःशीच विचार करत होती. तिला तिच्या आई-बाबांचं मत फारस पटल नव्हत. पण दुसर कुठलही कारण तिच्या लक्षात येत नव्हत.
दुसऱ्या दिवशी तिने मुद्धाम विक्रमला छेडल. "काय मग विकी काल तुझे दोस्त काहीच म्हणाले नाहीत का माझ्याबद्धल." ती विक्रमकडे हसत बघत म्हणाली. पण विक्रम काहीच बोलला नाही. कामात busy आहे अस दाखवून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केल. गीतानेसुद्धा ठरवलं होत की उगाच घाई करायची नाही. पण एकूण हा प्रकार काय आहे त्याची माहिती मात्र घ्यायची. कारण तिला खरच विक्रम आवडायला लागला होता.
विक्रम तसा शांत मुलगा होता. त्याला त्याचे वडील क्लिनिकला सोडायला यायचे. बहुतेक तिथून ते त्यांच्या कामाला जात असावेत. क्लिनिक उघडायच्या अगोदर १५ मिनिट विक्रम यायचा आणि त्या दिवसाच्या सगळ्या अप्पोइन्त्मेन्त्स प्रमाणे सगळे पेपर्स लावून ठेवायचा. ऑफिस संपूर्ण फिरून सगळ निट आहे न याची खात्री करून आपल्या जागेवर जाऊन बसायचा. पण मग मात्र तो त्या जागेवरून अजिबात उठायचा नाही. दुपारी लंचदेखील तो तिथेच घ्यायचा. अजून एक रीसेप्शानिस्ट होती. पण तो तिच्याशी फारसा बोलायचा नाही. आणि तीसुद्धा स्वतःच्याच नादात असायची. पण गिताने क्लिनिक जॉईन केल आणि थोड्याच दिवसात तिची आणि विक्रमची मैत्री झाली. एक तर गिताला काही केसेसची माहिती हवी असायची. जुन्या कसेसचा ती अभ्यास करायची. त्यामुळे तीदेखील अनेकदा लवकर यायची. डॉक्टर येईपर्यंत मग अनेकदा गिता आणि विक्रम गप्पा मारायचे.
हळूहळू गिताला विक्रमची माहिती कळायला लागली. विक्रमची आई त्याच्या लहानपणीच गेली होती. घरात फक्त तो आणि त्याचे वडील होते. त्याची आजीदेखील होती. पण तिच आणि विक्रमच अजिबात पटायचं नाही. त्यामुळे ती त्यांच्याच बिल्डिंगमध्ये पण वरच्या मजल्यावर एकटीच राहायची. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. पण विक्रमला त्यात इंटरेस्ट नव्हता. त्याच्या वडिलांची डॉक्टर खरातांशी कधीतरी ओळख झाली होती आणि कॉलेज संपल्यानंतर एक वेगळा अनुभव मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी विक्रमसाठी डॉक्टरांकडे शब्द टाकला होता. डॉक्टरसुद्धा लगेच तयार झाले होते. कारण त्यांच्याकडे काम करणाऱ्या जुन्या जाणत्या कामातबाईना अलीकडे काम झेपत नव्हत. मग विक्रम यायला लागला आणि कामातबाईनी त्याला सगळ काम समजावलं. तो निट शिकला आहे याची खर्त्री झाली आणि मग कामातबाई यायच्या बंद झाल्या.
वडिलांचा एवढा व्यवसाय असूनही विक्रम हे अस इथे क्लारिकल काम का करायला येतो ते गिताला कळेना. पण मग तिने तो विषय तिथेच सोडला. तसा विक्रम थोडा मुडी होता. त्यामुळे जर त्याच्या मनाविरुद्ध जास्त प्रश्न विचारले तर तो गप्प व्हायचा. म्हणून मग गिता त्याच्या कलाकलाने घ्यायची आणि तो जेवढी आणि जी माहिती ओघात सांगायचा ती एकूण घ्यायची.
त्यादिवशी सकाळपासून विक्रम मस्त मूडमध्ये होता. तो यायच्या अगोदरच गिता आली होती आणि एका जुन्या केसचा अभ्यास करत होती. त्यामुळे तो आत आला तेव्हा स्वतःशीच हसत होता ते तिच्या लक्षात आल. तो पेपर्स लावत होता तेव्हा गिता त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हळूच विचारल;"काय विकी आज काही स्पेशल? एकदम मस्त मूडमध्ये दिसतो आहेस!"
तिच्याकडे वळत तो म्हणाला;"गिता काल खूप दिवसांनी राजन भेटला. मग आम्ही प्रकाश आणि हरीला जाऊन भेटलो. मस्त गप्पा मारल्या. मी त्याना आपल्याकडे आलेली ती नवीन केस आहे ना त्याबद्धल सांगितल. ती ग... १२ वर्षांची सिमरन येते ना तिची केस. poor girl! आई जाऊन ३ महिने झालेत पण अजूनही ती ते स्वीकारायला तयार नाही. तिला अजूनही वाटत की तिची आई घरी आहे आणि फक्त तिच्याशी बोलते कारण तिचे बाबा सारखे टूरवर असतात. हरी म्हणाला तिला भूत बाधा झाली असेल. मग मी त्याना समजावलं की भूत बित काही नसत. हा एक आजार आहे. त्याला परनोइड स्चीझोफेनिया म्हणतात. मग त्याचे सगळे सिम्प्तम्स सांगितले. एकूण सगळ समजावलं तर राजन खूष झाला. मला म्हणाला विकी तू ना डॉक्टरच व्हायला हवा होतास. किती व्यवस्थित स्माजावतोस तू हा इतका अवघड विषय. मी म्हणालो की आईच आजारपण मी खूप जवळून बघितलं आहे. त्यामुळे तेव्हापासूनच माला इच्छा होती डॉक्टर व्हायची. पण मग बाबा नको म्हणाले म्हणून मी नाही गेलो त्या फिल्डमध्ये. जाम खुश होते माझे मित्र माझ्यावर. मग आम्ही एकत्र जाऊन पार्टी पण केली. रात्री उशिरापर्यंत गच्चीवर बसलो होतो आम्ही. अगदी बाबा बोलवायला वर येईपर्यंत. बाबा आले आणि ते तिघे पळाले. पण खूप मज्जा आली काल." सगळ सांगताना विक्रम खूप खुश होता. हसत होता.
पण गिताला एक गोष्ट खटकली. विक्रम अत्यंत कॉन्फीडेनशल माहिती त्याच्या मित्रांबरोबर शेअर करत होता. ते बरोबर नव्हत. पण त्यावेळी ती विक्रमला काहीच बोलली नाही. डॉक्टर आले तेव्हा ती मुद्धाम काम काढून त्यांच्या केबिनमध्ये गेली आणि तिने त्याना सांगितल;"डॉक्टर काका विक्रम आपल्याकडे येणाऱ्या केसेस त्याच्या मित्रांशी डिस्कस करतो." डॉक्टर समोरचे पेपर्स बघण्यात गढले होते. त्यांनी मान वर करून गीताकडे बघितलं आणि विचारल;"कोणी सांगितल तुला अस गिता?" "काका तो स्वतःच मला सांगत होता आत्ता की त्याने काल त्याच्या मित्राना सिमरनची केस सांगितली."
डॉक्टर खरातानी तिच्याकडे चमकून बघितल आणि विचारल,"तुला सांगितल त्याने की तो त्याच्या मित्राना काल भेटला?" गिता म्हणाली;"हो!"
"अजून काय काय सांगितल त्याने गिता?" डॉक्टरांनी तिला बसायला सांगत विचारल.
आता गिताला थोड विचित्र वाटल हे सगळ. कारण तिच्या मते सिमरनची केस विक्रमने मित्रांमध्ये डिस्कस कारण अयोग्य होत आणि डॉक्टरांनी त्याला त्याबद्धल समज द्यायला हवी अस तिला वाटत होत. पण डॉक्टर खाराताना विक्रमला समाज देण्यापेक्षा त्याने काय काय सांगितल यात जास्त इंटरेस्ट होता अस तिच्या लक्षात आल. पण तिने शांतपणे तिच आणि विक्रमच एकूण झालेलं बोलण त्याना सांगितल.
"तो म्हणाला काल रात्री तो मित्रांबरोबर होता? हम! ok! या अगोदर कधी तुझ आणि त्याच त्याच्या मित्रांबाद्धाल बोलण झाल होत का?" डॉक्टरांनी तिला विचारल. मग गीताने मागे घडलेला प्रसंग त्याना सांगितला.
डॉक्टर खरात थोडावेळ विचार करत बसले आणि मग त्यांनी गीताकडे सरळ बघत तिला विचारल;"गिता, are you interested in vikram?"
अचानक डॉक्टर काकांकडून आलेल्या त्या प्रश्नाने गिता गोंधळली."काय काका? I mean, का?" तिने काकाना विचारल.
"गिता if so then I think i should tell you few facts about vikarm."
विक्रम बद्धलचे facts? आता मात्र गिता पुरती गोंधळली होती. "काय झाल काका?" तिने त्याना विचारल.
"गिता, विक्रम is a case of schizophrenia." डॉक्टर खरात म्हणाले आणि गिताला मोठा धक्का बसला. "पण काका त्याच्यात मला असे कोणतेच सिंतम्प्स दिसले नाहीत. तो शांत स्वभावाचा आहे हे मान्य. पण तो त्याच काम अगदी मन लावून करतो; माझ्याशी आणि आपल्या झाडू काढायला येतात त्या बाईंशी चांगला बोलतो. अस काही एकलकोंडा आहे किंवा लोकांपासून दूर रहायचा प्रयत्न करोत आहे अस काहीच दिसलं नाही काका. त्याच बोलण कधी मला irrational किंवा निरर्थक नाही वाटल." ती तिची मत पटापट मांडायला लागली.
डॉक्टर खरात हसले आणि म्हणाले;"बेटा तुला तो आवडायला लागला आहे न? माझच चुकल. मी तुला अगोदरच कल्पना द्यायला हवी होती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. नको गुंतूस त्याच्यात."
गिता डॉक्टरांकडे बघून हसली."काका, मला तो आवडायला लागला आहे हे खर आहे. स्मार्ट आहे. चांगला दिसतो आणि well mannered आहे तो. पण प्रश्न माझ्या आवडण्याचा नाही आहे आत्ता. काका मी देखील साय्कोलोजीचाच अभ्यास केला आहे. तरीही मला कळल नाही की तो actually एक पेशंट आहे आणि इथे ट्रीटमेट साठी येतो आहे; कमाल आहे माझी."
"बेटा विक्रम इथे ट्रीटमेटसाठी नाही येत. तो खूपच सुधारला आहे. infact त्याचा हा आजार खूप लवकर लक्षात आल्याने त्याची ट्रीटमेट लवकर सुरु झाली आणि eventually आम्ही त्याला विश्वासात घेतून सगळ समजावलं. सुरवातीला त्याने एकूणच सगळ नाही स्वीकारलं. पण मग कधीतरी त्याला पटल आमच सांगण आणि मग मात्र त्याची recovary खूपच पटकन झाली. गेली काही वर्ष तो माझ्या ओब्झार्वेशन खाली आहे. पण हळूहळू त्याचे स्चीझोफ्रेनियाचे सिम्पटम्स कमी झाले. त्यामुळे त्याची औषध मी स्वतःच त्याच्या वडिलांशी बोलून कमी केली. असे पेशंट्स कायामचे बरे होत नाहीत हे तुलाही चांगलाच माहित आहे. but slowly and eventually they can lead a reasonable normal life." काकांनी गिताला माहिती दिली.
"किती वर्ष झाली तो ट्रीटमेट घेतो आहे काका? आणि औषध कधी बंद केली?" गीताने काकाना विचारल. तिच्यातली सायकोलोजीस्ट आता बोलत होती.
डॉक्टर खरातानी गिताला माहिती दिली. ते म्हणाले;"गिता विक्रम १२ वर्षांचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. खर तर मिसेस राजे.... विक्रमची आई.... अनेक महिने आजारी होत्या. त्याना रक्तातली कावीळ झाली होती. आणि ते खूप उशिरा लक्षात आल. त्यांनी तो आजार अंगावर खूप काढला होता. त्यामुळे त्यातच त्यांचा अंत झाला. विक्रमने त्याच्या लहानपणी त्याच्या आईला फक्त औषध घेताना आणि आजारी असलेली बघितलं होत. विक्रमचे वडील कायम खूप busy असायचे. त्यामुळे विक्रम, त्याची आजारी आई आणि त्याची आजी असेच घरात असायचे. त्याची आजी कायम सुनेला टोचून बोलायची आणि विक्रमलासुद्धा त्याची आई आजारी असते त्यावरून बोलायची. विक्रमला खूप वाईट वाटायचं. पण तो खूप लहान होता त्यात आई आजारी असल्याने तो त्याच्या आजीवर जास्त अवलंबून होता. त्यामुळे आवडल नाही तरी त्यावर काय react करायचं ते त्याला कधी सुचायचं नाही. एक-दोन वेळा त्याने वडिलाना सांगायचा प्रयत्न केला. पण विक्रमसाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. आपल काम आणि आजारी पत्नीची ट्रीटमेट यातच ते अडकून गेले होते.
कधी लवकर आलेच घरी आणि विक्रमला घरात बघितल तर त्याला म्हणायचे की त्याच्या वयाच्या मुलाने घरात बसू नये संध्याकाळी. मित्रांबरोबर खेळावं. पण त्याना हे माहित नव्हत की त्यांच्या बिल्डिंगमध्ये विक्रमच्या वयाची मुलच नसतात. बाबांनी मित्र कर आणि बाहेर खेळत जा सांगितल म्हणून मग विक्रम रोज संध्याकाळी बाहेर जायला लागला.
हळू हळू तो घरात थोडा बोलायला लागला. त्याला काही मित्र मिळाले होते अस तो आईला सांगायचा. आम्ही खाली खेळतो अस म्हणायचा. त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटायचं. कारण तिला माहित होत की त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोणी मुलच नाहीत. त्यातूनही त्यांच्या मनात यायचं जर त्याला मित्र मिळाले असतील आणि ते खाली खेळत असतील तर आपल्याला आवाज कसा नाही येत; कारण ते लोकं पहिल्या मजल्यावारच राहात होते. त्यांनी ही गोष्ट विक्रमच्या बाबांच्या कानावर घालायचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी ते फारस मनावर नाही घेतल. काही दिवसांनी विक्रमची आई गेली. विक्रमने मात्र ते मान्य केल नाही. तो नेहेमी म्हणायचा त्याची आई त्याच्याशी बोलते. ती इथेच आहे. सुरवातीला त्याच्या वडिलाना वाटल की आई गेल्याच्या दुखःमुळे विक्रम अस बोलत असेल. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आल की विक्रमचा त्याच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण तो वडील घरात असतानादेखील आईशी बोलत असल्यासारखा स्वतःशीच बोलायचा. तो इतर कोणावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याच्या आजीने हे लक्षात आल्यावर घरात हंगामा केला. सुनेच्या नावाने बोट मोडली. त्यांच मत होत की नातवाला सुनेच्या भुताने पछाडल आहे. त्यामुळे विक्रमचे वडील दुपारी घरात नसताना एक दोन वेळा त्यांनी कोणा साधू बाबांना बोलावून होम-हवन करवले घरात. त्याचा अजून जास्त negetive effect झाला विक्रमवर. तो खूपच एकटा रहायला लागला. मुळात बाबा घरात नसताना तो बाहेरच रहायचा. कुठे असतोस अस विचारल तर म्हणायचा की मित्रांबरोबर होतो."
"अरे? काका याचा अर्थ विक्रमची केस बरीच complicated आहे." गिता मन लावून एकत होती. डॉक्टर थांबले तस तिने तिच मत सांगितल.
"गिता खरा प्रोब्लेम पुढे आहे." डॉक्टर म्हणाले.
"म्हणजे काय काका?" गीताने आश्चर्य वाटून विचारले.
"गिता, विक्रमची आई गेल्यानंतर साधारण सहा महिन्यानंतरची गोष्ट आहे. त्याचे वडील त्या दिवशी थोडे लवकर घरी आले. विक्रम घरात नव्हता म्हणून सहज त्याला शोधायला ते बाहेर पडले. त्यांना विक्रम बिल्डींगच्या मागच्या बाजूला पाण्याच्या टाकीवर कोणाशीतरी बोलतो आहे अस दिसलं. म्हणजे विक्रम एकटाच होता. पण लांबूनही हे कळत होत की तो कोणाशीतरी बोलतो आहे. मध्ये एक झाड असल्याने विक्रमला त्याचे बाबा दिसत नव्हते. ते अजून जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आल की विक्रम खरच बोलत होता कोणाशीतरी. पण त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हत. त्यांना वाटल लपाछापी खेळत असतील. पण तस नव्हत. विक्रम त्याच्या बाजूलाच कोणीतरी आहे अस बोलत होता. अगदी तावातावाने बोलत होता. त्याच्या वडिलांनी गोंधळून त्याला हाक मारली. विक्रम एकदम चमकला आणि त्याने वळून बघितल. बाबांना बघून तो धावत त्यांच्याकडे आला आणि म्हणाला... बघा ना बाबा मगासपासून मी हरीला सांगतो आहे की राजानला बोलावूया त्याशिवाय खेळायला मजा येणार नाही. राजन सांगतो तो खेळ खेळायला मजा येते. पण हरी एकतच नाहीये. म्हणे राजन नसला तरी आपण खेळूया. बाबा एकदम चक्रावले. त्यांनी परत विक्रम जिथे उभा होता तिथे बघितले. त्याना खात्री झाली की तिथे कोणीच नाही. त्यांनी विक्रमचा हात धरला आणि त्याला घेऊन घरी आले. त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे विक्रमच्या आजीला विचारल की विक्रमचे मित्र कधी घरी आले आहेत का? त्या म्हणाल्या मी त्याला म्हंटल अनेकदा घेऊन ये घरी. अलीकडे अंधार लवकर होतो; घरातच खेळा. मी कुठे तुला शोधायला येऊ. पण तो कधी त्याना घरी आणायला तयार होत नाही. हा एकूण प्रकार विक्रमच्या बाबांना लक्षात नाही आला. पण panic न होता त्यांनी त्यांच्या family डॉक्टरना गाठलं. ते सर्वात योग्य काम त्यांनी केल. त्या डॉक्टरांनी त्यांना माझ नाव रेकमेंड केल. आणि अशा प्रकारे विक्रमची केस माझ्याकडे आली." डॉक्टर खरात बोलताना थांबले. त्यांनी एकदा घड्याळाकडे बघितल आणि ते गीताला म्हणाले;"बेटा आपण दुपारी किंवा रात्री क्लिनिकच्या वेळेच्या नंतर बोलू. आता माझी अपोइन्त्मेन्त आहे. मुख्य म्हणजे विक्रमला अस अजिबात वाटायला नको की आपण त्याच्याबद्धल बोलतो आहोत इथे. त्यामुळे आता तू बाहेर जा आणि त्याच्याशी पूर्वीसारखीच वाग. ठीके?"
गीतानेदेखील घड्याळाकडे बघितल आणि बर म्हणून ती केबिनच्या बाहेर आली. ***
"इतकावेळ काय करत होतीस आत?" ती बाहेर येताच विक्रमने तिच्याकडे संशयाने बघत तिला विचारले.
"अरे आज जी केस येणार आहे ना त्याच डिस्कशन करत होतो आम्ही. पुढची सेशन्स मीच घ्यायची आहेत ना म्हणून. का रे?" मुद्धाम निट एकस्प्लनेशन देऊन मग गीताने विचारल. त्यावर हळूच मोकळा श्वास सोडत विक्रम म्हणाला;"काही नाही. मला वाटल तू आपल्या सकाळच्या गप्पा सांगायला गेलीस की काय." गिताने मुद्धाम गोंधळल्यासारखा चेहेरा केला आणि मग आठवल्यासारख करत विचारल;"कुठल डिस्कशन? ओह! तू तुझ्या मित्रांबरोबर मजा केलीस ते? अरे, हे मी डॉक्टरांना कशाला सांगू विकी? तू पण कमाल करतोस ह!"
"तस नाही ग! डॉक्टरांना उगाच गप्पा मारत बसलेलं नाही आवडत न. आपल्या गप्पा तू ओघात सांगितल्या असत्यास ना तर ते तुला आणि मग मला रागावले असते. म्हणून विचारल." विक्रम आता मोकळेपणे बोलला आणि त्याच्या कामाला लागला.
आपल्या जागेकडे येताना गीताने डॉक्टर काकांना मेसेज केला, 'आपण क्लिनिकमध्ये विक्रमबद्धाल नको बोलूया. त्याच्या लक्षात येऊ शकत.'
डॉक्टर खरातानी लगेच रेप्लाय केला, 'ठीक आहे. आज दुपारी मी तुला लंचसाठी बाहेर भेटतो.'
ठरल्याप्रमाणे गिता लंचच्या वेळी बाहेर पडली. दुपारी क्लिनिक बंद असायचं. परंतु विक्रम तिथे बसून सगळे रिपोर्ट्स टाईप करायचा. त्यामुळे गीता रोजच एकटी निघायची. त्यामुळे विक्रमला काही त्यात वेगळ नाही वाटल.
ठरल्याप्रमाणे गिता डॉक्टर खराताना भेटली. त्यांच्याबरोबर अजून कोणीतरी गृहस्थ होते. हॉटेलमध्ये बसल्यावर डॉक्टरांनी त्यांची ओळख गिताला करून दिली. ते विक्रमचे वडील होते. त्याना डॉक्टरांनी बोलावलेल पाहून गिताला खूप आश्चर्य वाटलं. पण डॉक्टर म्हणाले;"गिता, हे विक्रमचे वडील. सुहासजी तुझ्या बोलण्यात असा उल्लेख होता की विक्रम वडील बोलवायला येईपर्यंत गच्चीत मितांबरोबर बसला होता. बरोबर? तू ते सांगितलस तेव्हाच माझ्या मनात आल की अस काही जर विक्रम वेगळ वागला असेल तर त्याच्या वडिलांनी मला कस काहीच कळवल नाही? म्हणून मग मी त्याना फोन करून इथे बोलावून घेतलं. एकतर आपल बोलण त्यांच्या समोर झालेलं बर म्हणजे त्याना ही जर काही सांगायचं असेल तर ते सांगतील आणि मुख्य म्हणजे विक्रमच्या वागण्यात काही बदल झालेच असतील आणि त्यांना ते कळले नसतील तर आता ते निट ओब्सर्व करू शकतील.
तर मी तुला सांगितलं की विक्रमची केस माझ्याकडे कशी आली आणि तोवरचे त्याच्याबाबातीतले अनुभव त्याच्या वडिलांनी जे मला सांगितले होते ते देखील मी तुला सांगितले. विक्रम त्यावेळेस खूपच लहान होता. त्यामुळे त्याला कोणता मानसिक आजार आहे हे सांगूनही त्याला समजले नसते. आणि जर ही गोष्ट बाहेर पडली असती तर त्याचा त्याच्या एकूणच आयुष्यावर परिणाम झाला असता. त्यामुळे आम्ही अस ठरवलं की सुरवातीला विक्रमला अस नाही सांगायचं की त्याला जे त्याचे मित्र दिसत आहेत ते खरे नाहीत. कारण विक्रमच्या मनातले विचार जे तो मोकळेपणाने सांगू शकत नाही ते तो मित्रांच्या माध्यमातून सांगू शकतो."
"म्हणजे नक्की काय काका?" गीताने विचारले.
संभाषणात प्रथमच भाग घेत विक्रमचे वडील म्हणाले," मलाच ते लक्षात आल होत. त्याच अस झाल जेव्हा मी त्याला विचारले की, तू मित्राना घरी का नाही आणत खेळायला? तेव्हा त्याने असे उत्तर दिले की आजीला कदाचित माझे मित्र नाही आवडणार. कारण तिला माझी आईदेखील आवडत नाही. त्याच उत्तर एकून मला खूप आश्चर्य वाटल. आणि जेव्हा मी खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा माझी आई माझ्या पत्नीला जे बोलायची ते विक्रमने मला सांगितल. मी त्याला विचारल,'बेटा तू मला अगोदर का नाही सांगितलस हे सगळ?' तेव्हा तो म्हणाला,'बाबा, आईने सांगितल होत की तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी नाही सांगितल आणि आजीला पण आवडल नसत. मग ती मला खूप रागावली असती. मला आजीची भिती वाटते. तुम्ही नसताना मी घरी फार वेळ नाही थांबत. म्हणून तर राजन, प्रकाश, आणि हरीशी माझी इतकी मस्त मैत्री झाली.' त्याच हे उत्तर एकून मला वाटल की माझ्या आईमुळेच कदाचित माझ्या मुलाला असले भास होऊ लागले आहेत."
"त्यांचा हा गैरसमाज मी दूर केला." डॉक्टर खरात म्हाणाले. " हे खर आहे की अशा पेशंट्सवर आजुबाजूच्या लहान लहान भावनिक घटनांचा परीणाम होतो. पण अशा घटनांमुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे हा आजार होत नाही; हे सुहासाजीना सांगणे खूप महत्वाचे होते. कारण नाहीतर त्यांच्या मते त्यांची आईच दोषी ठरली असती."
"खरय डॉक्टर. मला अगोदर माझ्या आईचा खूप राग आला. परंतु तुमच्याशी बोलल्यानंतर मालाझ्या लक्षात आल की ती जुन्या पिढीतली स्त्री आहे. त्यामुळे सून कायम आजारी असते हे स्वीकारणे स्वीकारणे खूप अवघड आहे. कदाचित म्हणूनच ती कधी काही बोलली असेल. हे सर्वसाधारणपणे स्वाभाविक आहे. तिला बिचारीला हे कळलच नसेल की तिच्या अशा वागण्याचा लहानग्या विक्रमवर चुकीचा परिणाम होत असेल. कारण मला माहित होत की तिचा तिच्या नातवावर खूप जीव होता. परंतु जेव्हा मी तिला विक्रमच्या आजाराबद्धल सांगितल तेव्हा मात्र तिने एकून घ्यायची तयारीच नाही दाखवली. तिच्या मते विक्रमला त्याची आई दिसत होती आणि हे नसलेले मित्रही दिसत होते; याचा अर्थ त्याला भूताने पछाडल होत. आणि त्यासाठी कसलेसे तंत्र-मंत्र मी करावेत अस तिच म्हणण होत. ते ऐकल्यावर मात्र मला कठोर निर्णय घ्यावा लागला. आमचा मोठा flat विकला आणि थोड्या वेगळ्या लोकॅलीटी मध्ये दोन लहान flats घेतले. आता आई आमच्या वरच्याच flatमध्ये राहाते. तिच्या वयामुळे आता तिच्या सोबतीसाठी एक मुलगी मी ठेवली आहे. पण मग विक्रमला शाळेव्यतिरिक्त कुठे ठेवायचं हा प्रश्न उभा राहिला. त्याला सर्वसाधारण पाळणाघरात ठेवण शक्य नव्हत. कारण त्याचा आजार एका वेगळ्या दृष्टीने बघितला गेला असता. म्हणून मग मी माझी ऑफिसची जागा देखील विकली आणि माझ ऑफिस घरातच सुरु केल. त्यामुळे घरात असलेल्या कामाच्या बाईंवर देखील मला लक्ष ठेवण शक्य झाल."
"हे सगळे बदल सुहासजीनी माझ्याशी बोलूनच केले होते. मीच त्याना हे बदल करण्यासाठी प्रोत्साहन दिल होत. कारण विक्रम अजून बराच लहान होता. त्यामुळे change of place मुळे तो लवकर सुधारला असता. मुख्य म्हणजे त्याचे मित्र मागेच जुन्या घराजवळ राहिले आहेत आणि आता त्याने नवीन मित्र करावेत हे त्याच्या मनावर बिंबवणे सोपे झाले."***
"पण मग विक्रमने हा बदल सहज स्वीकारला का?"गीताने विचारले.
"नाही गिता. तुझा अंदाज बरोबर आहे. मुळात घर बदलण्यासाठी विक्रम तयार नव्हता. पण मग दोन एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला समजावले; आणि सांगितले की नवीन जागी नवीन मित्र मिळतील तेव्हा तो अनिच्छेने का होईना पण तयार झाला." डॉक्टर म्हणाले.
"आम्ही नवीन जागी राहायला आलो. मी त्याची शाळादेखील बदलली. असे अनेक बदल अचानक झाले होते त्याच्या आयुष्यात. पण सुरवातीचे दोन दिवस सोडले तर मग त्याने फारसा त्रास नाही दिला हे बदल स्वीकारताना. नंतर तो नवीन घरात आणि नवीन शाळेत छान रमला. मात्र या नव्या बिल्डिंग मधल्या मुलांशी मैत्री त्याने नाही केली. तसा तो मग आपल्यातच असायचा. अधून मधून खाली जायचा. बराचवेळ. पण डॉक्टर म्हणाले होते त्याला फार प्रश्न नका विचारू. किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता आहात अस त्याला कळू देऊ नका. त्यामुळे तो जोवर त्याच्या त्या जुन्या मित्रांचा उल्लेख करत नाही तोवर सगळ ठीक आहे अस समजायचं; अस डॉक्टरांनी सांगून ठेवाल होत.
नंतर त्याच दहावीच वर्ष होत. त्यामुळे शाळा, क्लासेस आणि अभ्यास यात तो busy झाला. त्याने परत कधी त्याच्या मित्रांचा उल्लेख नाही केला आणि त्याची आईदेखील देवाघरी गेली आहे हे स्वीकारलं होत त्याने. खूप शहाण्यासारखा वागायचा तो. infact म्हणूनच मग मला ते थोड विचित्र वाटायला लागल. दहावीचा रिझल्ट लागला. तो उत्तम मार्क्सनी पास झाला आणि जवळच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये आम्ही त्याची अडमिशन घेतली. सगळ सुरळीत होत. आणि एक दिवस तो घरी आला ते खूप खुश होऊन. मी त्याला कारण विचारल तेव्हा तो म्हणाला की राजन, प्रकाश आणि हरीसुद्धा त्याच्याच कॉलेजमध्ये आहेत. आणि जुने मित्र आता जास्तवेळ भेटणार म्हणून तो खुश आहे. त्याच्या 'जास्त वेळ' या शब्दांचा मला संशय आला. पण त्याक्षणी मी काहीच बोललो नाही. मात्र रात्री जेवताना त्याच्या कलाने घेत प्रश्न विचारले आणि माझ्या लक्षात आल की मला वाटत होत की माझा विकी बारा झाला आहे, परंतु तो जे कधी कधी बाहेर जायचा संध्याकाळी ते त्याच्यामते त्याचे जुने मित्र त्याला भेटायला यायचे म्हणून त्याना भेटायला जायचा. मग मी त्याला विचारले की आता तर आजीदेखील नाही आपल्याकडे. मग तू त्याना घरी का नाही आणलस कधी. त्यावर त्याच उत्तर मलाच निरुत्तर करून गेल... तो म्हणाला बाबा खर सांगा तुमचा विश्वास आहे का की माझे हे मित्र घरी आले तर तुम्ही त्यांच्याशी नित बोलू शकाल? मुळात त्याचे असे कोणी मित्र नव्हतेच. तर मग मी काय उत्तर देणार होतो त्याला."
"त्यांच्यातल्या या संभाषणा नंतर सुहासजी मला येऊन भेटले. याचा अर्थ विक्रम त्याच्या त्या विचारांमधून बाहेर पडला नव्हता हेच खरे होते. म्हणून मग मी सुहासजीना सांगितले की आता विक्रम एवढा मोठा आहे की त्याला त्याच्या आजाराची कल्पना आपण दिली पाहिजे. त्याना देखील हे पटले. मी त्याची सेशन्स घ्यायला लागलो. तुला तर माहीतच आहे आपला साय्कोलोगीकाल सेशन्सचा patorn कसा असतो. अगोदर त्याच सगळ एकून घेतल आणि मग एक एक कॉन्फुजन क्लिअर करत गेलो. सुरवातीला विक्रमला काही पटायचं नाही. तो माझ्याकडे यायला तयार नसायचा. पण मग वर्ष दीड वर्षानंतर त्याने एकूण सत्य स्वीकारायला सुरवात केली. meanwhile तो ग्राजुएट झाला होता. गिता तुला अंदाज आहेच, असे पेशंट्स मनाने खूप कमकुवत किंवा हळवे म्हणू हवे तर.... असे असतात. म्हणून मग मीच त्याला म्हंटल की तू माझ्याकडे कामाला यायला लाग. त्याने देखील ते मान्य केल. कारण by that time त्याला माझी सवय झाली होती आणि तोच म्हणायचा की त्याला इथे सुरक्षित वाटत. म्हणून मग सुहासजीनी देखील त्याला इथे जॉईन करायला हरकत घेतली नाही." डॉक्टरांनी सुहासजी सांगत होते त्यापुढचे details गिताला दिले.
हे सगळ एकून गीताने विचारले,"काका जर त्याने एकूणच स्वीकारले होते की त्याचे राजन, प्रकाश आणि हरी नावाचे मित्रच नाहीत; तर मग हे अचानक त्याने माझ्याकडे त्यांचा उल्लेख का केला? सुहास काका, तो मला म्हणाला होता की काल तो आणि त्याचे मित्र गच्चीत होते आणि तुम्ही आलात म्हणून त्याचे मित्र पळाले आणि विकी तुमच्याबरोबर घरी आला. काल नक्की काय झाल होत काका?"
"गिता हे खर आहे की विकी कुठे आहे आणि इतका वेळ का लावतो आहे हे बघण्यासाठी मी गच्चीत गेलो. विकी टाकीवर बसून कुठलस गाण गुणगुणत होता. मी हाक मारली तसा त्याने माझ्याकडे वळून बघितल आणि आलो म्हणून लगेच खाली उतरून आला आणि माझ्याबरोबर घरी आला. अग, मला कल्पनाच नव्हती की त्याला परत त्याचे ते मित्र दिसायला लागले आहेत, नाहीतर मी त्याला तिथेच छेडल असत." विक्रमचे वडील म्हणाले.
"बर मग आता पुढे काय काका?" गीताने डॉक्टर ख्रराताना प्रश्न केला.
"पुढे अस गिता की तू त्याच्याशी बोलत रहायचं. कारण त्याचा तुझ्यावर विश्वास बसला आहे. त्याच्या मित्राना तू आवडली नाही आहेस अस त्याच म्हणन आहे. पण तरीही तो तुझ्याशी बोलतो आहे याचा अर्थ तो तुला सगळ सांगणार. meanwhile मी त्याची औषध चालू करतो. सुहासजी आपण त्याची औषध चालू करोत आहोत हे मात्र त्याचा संशय आल्यामुळे नाही; हे त्याला सामाजावाव लागेल. ते मी बघतो." डॉक्टर खरात विचार करून म्हणाले.
"डॉक्टर साहेब का हो अस होत आहे माझ्याच मुलाबरोबर?" सुहासजीच्या डोळ्यात पाणी आल. "आता माझी शक्ती संपत आली आहे हो. जरा बारा झाला आहे अस म्हणे पर्यंत परत हा त्या कुठल्याश्या नसलेल्या मित्रांचा उल्लेख करतो आणि मी हताश होऊन जातो. त्याला कधीच नॉर्मल आयुष्य जगता नाही येणार का हो?" सुहासजी खूपच दुखी झाले होते. त्याना गिता खूप आवडली होती. अशी आपली सून असती तर; असा विचार मनात येऊन ते जास्त कष्टी झाले होते. कारण असे कधीच होणार नाही याची त्याना कल्पना होती. ****
डॉक्टर खरातांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं. पण ते काहीच बोलले नाहीत. कारण त्यांना खोटी आशा मिस्टर. राजेना दाखवायची नव्हती आणि त्याक्षणी तरी मिस्टर. राजे खर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पूर्वी गीताचा विक्रमकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. तिला तो मनापासून आवडायला लागला होता. पण आता मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तो एक पेशंट आहे हा विचार कायम जागा राहायला लागला.
गीतामाधली सायकोलॉजीस्ट तिला कायम आठवण करून द्यायची की विक्रम आजारी आहे. त्यामुळे ती त्याच्याशी बोलताना कायम अलर्ट राहायला लागली. पण तिच तरुण मन विक्रमकडे सारख ओढ घेत होत. तिची मनापासून इच्छा होती की तो पूर्ण बरा व्हावा.
एकदिवस घरी रात्रीच्या जेवणाच्यावेळी तिने तिच्या आई-वडिलांकडे विक्रमचा विषय काढला. तिने पूर्वी त्याना जेव्हा तिच्या मनातला संशय सांगितला होता तेव्हा त्यांनी तो विषय थोडा थट्टेवारी नेला होता. कारण साहजिक होत. गिता आता लग्नाच्या वयाची झाली होती. त्यामुळे तिच्यात जर कोणी मुलगा इंटरेस्ट दाखवत असेल तर त्यात तिच्या आई-वडिलाना काही वावग वाटत नव्हत.
परंतु जेव्हा गीताने विक्रमचा एकूण आजार आणि त्याच वागण सांगितल तेव्हा मात्र तिच्या आईचा पवित्रा बदलला. गीताने विक्रममध्ये जास्त इंटरेस्ट दाखवू नये अस त्यांना ठामपणे वाटायला लागल. मोकळ्या स्वभावाची आपली आई असा stand घेईल अस गिताला कधीच वाटल नव्हत. तिने तिच मन मोकळ केल होत तिच्या आई-वडिलांकडे.
"आई अस काय करतेस? अग त्याच्यात इंटरेस्ट घेऊ नको म्हणजे नक्की काय करू? तो मला रोज भेटतो आणि भेटणार आहे. मी काही त्याला अजून I love you म्हंटलेल नाही किंवा त्यानेही अस काही म्हंटलेल नाही. पण मला तो आवडतो हे सत्य मी किती दिवस डोळ्याआड करू? त्याच्याशी बोलताना तो पेशंट आहे हे कायम कस मनात राहील? बर एक त्याचे ते नसलेले मित्र हा विषय सोडला ना तर otherwise तो खूप नॉर्मल असतो ग. अग, त्याने डॉक्टर काकाना किंवा त्याच्या वडिलाना नाही सांगितल कधी. पण तो कविता करतो ग. आणि खूप भावूक असतात त्याच्या कविता. त्याने ते फक्त मलाच सांगितल आहे." गिता म्हणाली.
प्रथमच एकूण संभाषणात भाग घेत तिच्या वडिलांनी तिला विचारल;"गिता फक्त तुलाच सांगितल आहे? नक्की?"
"हो बाबा! मी का खोट बोलेन?" गिता वडिलांच्या प्रश्नाने दुखावून म्हणाली.
"गिता बेटा तू खोट बोलशील म्हणून नाही विचाल. बर मला सांग तो नक्की काय म्हणाला?" तिचे बाबा तिच्या जवळ जाऊन खांद्यावर थोपटत म्हणाले.
गिता म्हणाली;"बाबा, त्याने एकदा गप्पांच्या ओघात मला सांगितल की मी कविता करतो. मला खूप आश्चर्य वाटल. मी म्हणाले खरच? मग एखादी वाचून दाखव बघू. तर लगेच त्याने एक कविता वाचून दाखवली. मनावर होती ती कविता. खूप सुंदर होती हो! मी म्हणाले अरे, ही देव्हालपमेंट कधीची? तो म्हणाला अग खूप दिवस झाले... दिवस नाही वर्ष. मी करतो कधी कधी कविता. पण कधी बाबांना नाही सांगितल. मी विचारल म्हणजे तुझी कविता ऐकणारी मीच पहिली ना? त्यावर तो हसून म्हणाला; हो तूच पहिली मुलगी. तस राजन, प्रकाश आणि हरीला माहित आहे. पण ते फक्त एकून घेतात. तुझ्यासारखे त्यांचे डोळे चमकत नाहीत माझी कविता ऐकताना. मला एकदम लाजल्यासारख झाल बाबा. किती हळुवार आहे हो तो. प्रेमसुधा कस हळुवार व्यक्त करतो." गिता सांगताना हरवून गेली होती.
तिच्या वडिलांनी एकदा आईकडे बघितल आणि 'मी बघतो' अशी डोळ्यानीच खुण केली. ते गीताच्या जवळ बसले आणि म्हणाले;"गिता, अग तू त्याच्या कवितेत आणि त्याच्या हळूवारपणात इतकी अडकलीस की त्यामुळे तुला हे लक्षात आलच नाही विक्रम बोलता-बोलता म्हणाला,'त्याच्या त्या ३ मित्रांनी देखील कविता एकल्या आहेत. तू पहिली मुलगी आहेस.' गिता याचा अर्थ असा आहे की त्याने खरातची आणि त्याच्या वडिलांची कायम दिशा भूल केली आहे. तो कधीच बरा झालेला नाही. गिता, तुआ भले तो आवडत असेल, पण तू हे कधीच विसरून चालणार नाही की तो एक पेशंट आहे. अग त्या एका वाक्यातून त्याने तुला खूप काही सांगितले. त्याचे ते फक्त त्यालाच दिसणारे ३ मित्र त्याच्याबरोबर कायम आहेत. अगदी त्यांनी घर बदलल तरी आणि तो कॉलेजला गेला तरी... किंबहुना त्यानंतरही; अगदी आजपर्यंत! फक्त त्याने त्यांचा उल्लेख करण सोडून दिल होत. कारण त्याच अस मत झाल होत की खरात किंवा त्याचे वडील त्याच्या या मित्र असण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण तुझ्याबाबतीत थोड वेगळ घडल आहे. गिता, इतर त्याच्या मते तुला त्याची back history माहित नाही. अजून तू त्याच्या त्या मित्रांवर अविश्वास व्यक्त नाही केला आहेस. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला तू आवडायला लागली आहेस. तू म्हणतेस की अजून त्याने स्पष्ट शब्दात तुला अस म्हंटल नाही. पण कधीतरी भावूक झालाकी तो त्याच्या भावना इनडायरेक्टली तुला सांगतो. हो ना? गिता, सर्वात महत्वाच म्हणजे अजून तू त्याच्याकडे त्या मित्राना भेटण्याची इच्छा व्यक्त नाही केली आहेस. त्यामुळे त्याने स्वतः भोवती निर्माण केलेलं सुरक्षा कवच अजून अबाधित आहे.
बेटा, तुला तो आवडतो आहे आणि त्याला तू कदाचित मैत्रिण किंवा प्रेयसी किंवा अगदी सहचारिणी म्हणूनही हवी असशील. कदाचित् तुलाही त्याच्याबद्धल अशाच काहीशा भावना असतील मनात. पण तू हे विसरून कस चालेल की तो पहिल्यांदा एक पेशंट आहे आणि तू एक सायकालोजीस्ट."
गीताने एकदा वडिलांकडे बघितल. तिला त्यांच म्हणण पटत होत ही आणि नव्हत ही. तिने मान खाली घातली. तिच्या मनात विचार, 'आला खरच की. विकीच्या त्या एका वाक्यातून खूप काही अर्थ निघू शकतात. मला त्यावेळी लक्षात आल नाही. किंबहुना आत्ता बाबांनी सांगेपर्यंत हा मुद्धासुद्धा असू शकतो हे मनात आल नाही. खरच का मी इतकी त्याच्या प्रेमात अडकायला लागले आहे?'
ती शांत झालेली बघून तिच्या वडिलांनी तिला हाक मारली. "गिता.... बेटा.... काय झाल?"
"बाबा तुम्ही म्हणता ते खर आहे. माझ्या लक्षात नाही आल. नक्कीच विचार करण्यासारखा आहे हा मुद्दा. पण बाबा आता माझ म्हणण वेगळच आहे. हे मान्य की विकी एक पेशंट आहे. त्याने बर झाल्याची बतावणी बेमालूमपणे आजवर केली आहे. हे ही खर की जर त्याची संपूर्ण केस स्टडी केली तर असा अर्थ निघेल कधाचित की तो कधीच पूर्ण बारा होऊ शकत नाही. पण म्हणून तो एक भाऊक मुलगा आहे आणि तो मला आवडायला लागला आहे; या दोन गोष्टींकडे मी कस दुर्लक्ष करू?" गिता थोड्या दुखी आणि तरीही आपला मुद्दा न सोडण्याच्या तयारीने म्हणाली.
तिचे बाबा तिच्याकडे बघून हसले. "आईचा राग आला आहे ना तुला गीतू?"
"हो!" थोड्या घुश्श्यात गीताने उत्तर दिल.
बाबांनी तिच्या हातावर थोपटल. ते म्हणाले,"बेटा ती तुझी आई आहे. विक्रमची नाही. त्यामुळे ती फक्त तुझाच विचार करते आहे न."
"बाबा जर ती माझा विचार करते आहे तर मग तिला समजल पाहिजे की मला विकी आवडायला लागला आहे. तिने किती ठाम भूमिका घेतली आहे. तिला माझ्या भावना समजत नाहीत अस नाही मी म्हणत. पण ती विकिचा विचार करायलाच तयार नाही आहे, हे मला खटकत आहे."
"गिता तिच्या बाजूने जर विचार केलास ना तर तुला तिची भूमिका पटेल बेटा. अग, तूच आत्ता म्हणालीस ना की कदाचित विक्रम कधीच बारा होऊ शकणार नाही? अग, मग अशा कायमस्वरूपी पेशंट बरोबर तू तुझ संपूर्ण आयुष्य काढावास अस तिला कस वाटेल? बर, तिच जाऊ दे गिता. पण तूच सांग मला. एक साय्कोलोजीस्ट म्हणून सांग... जर विक्रम सारखी केस तुझ्याकडे आली आणि असच एखादी मुलगी तुला भेटायला आली. तिने जर तुला सांगितल की या मुलाबरोबर मला माझ संपूर्ण आयुष्य काढायचं आहे, तर तू तिला काय सांगशील? dont be bayas. answer me honestly." गीताचे बाबा तिला म्हणाले.
मग मात्र गिता एकदम शांत झाली. थोडा विचार करून ती म्हणाली;"बाबा तुम्ही म्हणता ते खर आहे. कदाचित मी अशा पेशंट बरोबर संपूर्ण आयुष्य घालवायला कोणा मुलीला सांगणार नाही. पण कोणा एका मुलीत आणि माझ्यात फरक नाही का बाबा? मी स्वतः साय्कोलोजीस्ट आहे. उलट त्यामुळे मी कायम विकिची ट्रीटमेंट निट चालू आहे की नाही यावर लक्ष ठेवू शकेन ना!" गिताच्या या बोलण्याने तिच्या वडिलांच्या एक लक्षात आल की गिता खरच बरीच इनवोल्व झाली आहे विक्रांतमध्ये. मग मात्र त्यांनी त्यांचा पवित्रा बदलला. त्याक्षणी गिता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे त्यांच्या लक्षात आल. ते म्हणाले;"ठीक आहे गिता. आपण यावर अजून काही महिन्यांनी बोलू. चालेल का?"
गितालासुद्धा विचार करायला थोडा वेळ हवा होता. कारण ती जरी वडिलांशी वाद घालत असली तरी तिलाही हे पटत होत की तिची बाजू थिटी आहे. त्यामुळे तिने लगेच ते मान्य केल.
तिचे बाबा म्हणाले;"गीतू पण मग तू मला प्रॉमिस केल पाहिजेस की तू तुझी इनवोल्वमेंट आणि तुझा पेशा याचा निट समतोल राखशील. बेटा अजून तर तुझी सुरवात आहे करियरची. त्यामुळे घाई करू नकोस कोणताही निर्णय घेण्याची; एवढच सांगेन."
गिताला वडिलांच हे सांगण पटल. ती म्हणाली;"बाबा, dont worry. मी असा एखादा निर्णय घेऊन तुम्हाला येऊन सांगितला अस करणार नाही. तुम्ही माझ्या लहानपणापासून घरातला प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला आहात; हे मी पाहिलं आहे. आणि माझे विचार आणि मत तुम्ही बायस न होता एकाल आणि मगच तुमच मत सांगाल याची मला खात्री आहे. खर सांगू का? मला पण थोडा वेळ हवा आहे विचार करायला."
तिच्या या समजूतदार बोलण्यावर तिचे बाबा हसले... तीसुद्धा हसली आणि बाबांना जाऊन बिलगली.
मध्ये दोन दिवस गिताची तब्बेत बिघडली. त्यामुळे ती क्लिनिकला गेली नव्हती. फारच बर नसल्याने गिता झोपूनच होती. तिच्या आईने तस कळवलं देखील होत क्लिनिकमध्ये. विक्रांतने गिताला त्याच्या मोबाईलवरून अनेकदा फोन केला होता. पण तापात असल्याने ती त्याचे कॉल्स उचलू शकली नव्हती. त्यादिवशी संध्याकाळी दरवाजाची बेल वाजली आणि तिने दार उघडल तर दारात विक्रम उभा होता. त्याला अस अचानक घरी आलेलं बघून तिला खूप आश्चर्य वाटलं.
"अरे विकी तू कसा काय आत्ता? क्लिनिकमध्ये नाही गेलास?" तिने त्याला आत यायला सांगून बसवल आणि विचारल.
"नाही गेलो. जावसच नाही वाटलं तू नसताना." अस म्हणून तो क्षणभर शांत बसला आणि मग अचानक तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला जवळ बसवलं आणि म्हणाला;"गिता मला तू खूप खूप आवडतेस ग. कस सांगू तुला? अग राजन, प्रकाश आणि हरीने अनेकदा सांगितल की मी तुझ्याशी बोलण सोडलं पाहिजे. कारण तू कदाचित त्याना स्वीकारणार नाहीस. पण मग आयुष्यात पहिलांदाच मी त्याना न सांगता तुझ्याशी बोलण चालू ठेवल आहे. गिता आजवर मी माझ्या मित्रांशी कधीच खोट बोललो नाही किंवा काही लपवल नाही. पण तुझा विचार आला ना की तुझ माझ्या आयुष्यात असण खूप महत्वाच वाटत मला."
विक्रमच्या अश्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे गिता गोंधळली होती. पण मग तिच्या लक्षात आल की हीच वेळ आहे की विक्रमशी काही गोष्टी बोलता येतील. ती म्हणाली,"विकी मलाही तू खूप आवडतोस. मला माहित आहे की तुला हे कळल आहे. पण हे जे तू सारख तुझ्या मित्राना घाबरून असतोस ना ते मला अजिबात आवडत नाही. मुळात तुला आणि तुझ्या मित्राना अस का वाटत की मी तुला त्यांच्यापासून तोडेन?" अस म्हणून गिताने त्याच्या डोळ्यात खोल बघितल आणि त्याला विचारल;"विकी, अस काही आहे का विकी जे तू माझ्यापासून लपवतो आहेस?"
विक्रमच्या मनाचा निर्णय होत नव्हता. खरच त्याचा जीव अणूमध्ये गुंतला होता. पण अजूनही त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता.
"ठीक आहे विकी. मी समजू शकते. हव तर तू तुझ्या वडिलांशी बोल. कारण शेवटी मी काय किंवा तुझे मित्र काय... आम्ही आज आहोत उद्या नाही... पण तुझे वडील कायम तुझ्याबरोबर होते आणि रहाणार आहेत. त्यामुळे तुमच्या घरातला काही विषय असेल जो मला सांगायचा की नाही असा तुझ्या मनात विचार येत असेल; तर ते चुकीचे नाही. मी थांबीन तू आपणहून बोलेपर्यंत." गीता मुद्धाम म्हणाली.
आता मात्र विक्रमच्या डोळ्यात तिला निश्चय दिसला. तो गीताकडे बघत म्हणाला;"गिता मी स्चीझोफ्रेनियाचा पेशंट आहे; अस डॉक्टर खरात आणि माझ्या वडिलांच म्हणण आहे."
तो अशी सुरवात करेल आणि इतके स्पष्ट बोलेल अस तिला वाटल नव्हत. पण म्हणूनच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, जे आवश्यक होत आणि खर देखील होत. अर्थात एका क्षणात गिता भानावर आली. आता तिची खरी कसोटी होती. तिने त्याच्याकडे बघितल आणि म्हणाली;"विकी माझी चेष्टा करतो आहेस का? अरे, मी स्वतः साय्कोलोजीस्ट आहे. मला नसत का कळल आतापर्यंत की तू पेशंट आहेस? मुख्य म्हणजे तुला माहित आहे ना की डॉक्टर खरात माझ्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितल नसत का?"
"गीता त्यांनी तुला तस सांगितल नाही कारण त्यांच्या मते मला स्चीझोफ्रेनिया हा आजार झाला होता. मग मी बरा झालो अस देखील त्यांनी माझ्या बाबांना सांगितल." हसत विक्रम म्हणाला.
"विकी आता मात्र हद्द झाली ह! मला वेड ठरवण्यासाठी आला आहेस का तू आज? अरे तुला आजार होता; मग तू बरा झालास. काय प्रकार आहे हा?" गीता त्याला बोलत करण्यासाठी म्हणाली.
"अस काय करतेस गिता? ऐकून तर घे माझ. अग माझी आई गेली ना त्यावेळी मी खूप डिस्टर्ब झालो होतो. अग कोणताही मुल डिस्टर्ब होईल न? अग सुरवातीला मला आधार द्यायला माझी आई यायची माझ्याजवळ. मला धीर द्यायची; म्हणायची बेटा असा रडू नकोस. तूच तुझ्या बाबाना आता आधार द्यायचा आहे. आजी काही करणार नाही. उलट ती त्यानासुद्धा बोलेल माझ्यावरून. तू रडत राहिलास तर तुला सुद्धा रागावेल. म्हणून रडू नकोस. बाबांना सांभाळ. मी काही अशी नेहेमी नाही येऊ शकणार तुला भेटायला. गिता, खर सांगू का... मी काही खूप लाहान नव्हतो माझी आई गेली तेव्हा. त्यामुळे मला सगळ कळत होत. पण हे देखील तितकच खर आहे की माझी आई यायची. आणि ती गेली की मला खूप रडायला यायचं. आजीला नाही आवडायचं मी रडलेल. म्हणून मग आई येऊन गेली की मी खाली जायचो मित्रांकडे. अगदी बाबा घरी येयीपर्यंत मी त्यांच्याबरोबर असायचो. त्या तिघांनी मला खूप सांभाळल ग. अग हरीला तर माझी आई एकदा घरातून बाहेर पडताना दिसलीसुद्धा होती. त्यामुळे मी जे सांगायचो त्यावर त्यांचा विश्वास बसला. पण मी कितीही सांगितल तरी माझ्या बाबांचा माझ्यावर विश्वास बसला नाही. अग माझी आई म्हणजे त्यांची पत्नी ना. पण तरीही ती मला भेटायला येऊ शकते; हे मान्य करायला ते तयार नव्हते. मग कधीतरी त्यांनी माझे मित्रदेखील नाहीत अस म्हणायला सुरवात केली. कुठूनतरी डॉक्टर ख्रराताना शोधून काढल आणि मला तिथे घेऊन गेले. डॉक्टर खरातानी अगोदर अस दाखवल की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे; आणि माझ्याकडून सगळ काढून घेतल. मग मात्र त्यांनीसुद्धा माझ्या बाबांसारख मला सांगायला सुरवात केली की माझी आई येतच नाही. काही दिवसांनी आम्ही घर बदलल. तोपर्यंत मला लक्षात आल की माझ्या बाबांना जर बर वाटायला हव असेल तर मी आई भेटते हे म्हणण बंद करायला हव. आईने पण तेच तर सांगितल होत मला. बाबांना सांभाळ. शिवाय नवीन घरात आम्ही आलो आणि आईच येण बंद झाल. अग मी तिला नवा पट्टा द्यायला विसरलो होतो. कदाचित ती जुन्या घरी आजही जात असेल. पण मला कल्पना नाही. मी आईच जाण स्वीकारलं आणि मग हळूहळू सगळ ठीक होत गेल."
गिता त्याच म्हणण एकूण घेत होती. आणि तिला धक्यांवर धक्के बसत होते. तिच्या लक्षात आल होत की विक्रम कधीच बरा झाला नव्हता. डॉक्टर ख्ररातांसारख्या अनुभवी आणि जुन्या डॉक्टरना ही विक्रमने सहज फिरवल होत. त्यांना खरच वाटल होत की विक्रम बरा झाला आहे.
विक्रम आपल्याच तंद्रीत बोलत होता. "गिता मी नवीन घरी रहायला आलो ना तेव्हा जस मी आईला नवा पत्ता द्यायला विसरलो होतो तसा माझ्या मित्राना पण पत्ता द्यायला विसरलो होतो. पण माझे मित्र खरच ग्रेट आहेत. त्यांनी मला शोधून काढल. ते अधून मधून थोडा वेळ मला भेटायला यायला लागले. पण यावेळी मात्र मी माझ्या बाबांना काही सांगतील नाही. एकतर त्यांनी परत घर आणि शाळा बदलली असती आणि परत मला सांगायला सुरवात केली असती की जशी आई नाही तसे हे मित्रदेखील नाहीत. पण मग त्या तिघांनी माझ्याच कॉलेजमध्ये अडमिशन घेतली. मी त्या दिवशी खूप खुश होतो. त्याच आनंदात मी बाबाना ती न्यूज दिली आणि मग माझ्या लक्षात माझी चूक आली. तरी राजन म्हणाला होता की बाबांना आमच्याबाद्धल सांगू नकोस. पण माझ्या चेहेऱ्यावरचा आनंद त्यांना सगळ सांगून गेला होता.
आणि मग बाबांनी पूर्वीप्रमाणे परत मला डॉक्टर खरातांकडे नेल. डॉक्टर खरातानी परत मला सांगायला सुरवात केली की माझे मित्र नाहीतच. त्यांच म्हणण खर करण्यासाठी त्यांनी मला सांगितल की मी आजारी आहे आणि माझ्या आजाराच नाव स्चीझोफ्रेनिया आहे. अगोदर मला खूप राग आला होता त्यांचा आणि एकूणच या प्रकाराचा. पण मग मी जेव्हा राजन, प्रकाश आणि हरीशी बोललो तेव्हा माझ्या मनातले प्रश्नच सुटले."
"अरे वा! सुटले तर! काय उपाय मिळाला तुला?" गीताने मुद्धाम त्याची तंद्री भंग करत त्याला डिस्टर्ब केल. त्याची लिंक तुटल्या नंतरची त्याची रीअक्शन तिला बघायची होती. तिच्या मते तो गोंधळायला हवा होता. किमान त्याची लिंक तोडली म्हणून तिच्च्यावर थोडा वैतागायला हवा होता. पण अस काहीच झाल नाही. विकाराम्ने तिच्याकडे बघितल आणि म्हणाला;"अग गिता अस बघ तुझ्या हातात आत्ता ग्लास आहे की नाही?" गिताने ग्लासकडे बघितल आणि म्हणाली;"हो विकी! तुलासुद्द्ध दिसतो आहे की नाही?" तिने मुद्धामच त्याला विचारल होत की त्यालासुद्धा तो ग्लास दिसतो आहे ना. त्यामुळे तिला कदाचित तिचा मुद्दा समजावता आला असता.
मात्र त्यावर विक्रमच उत्तर तिला पूर्णपणे अनपेक्षित होत. "गिता तुझ्या हातात ग्लास नाही आहे. मी फक्त कल्पना करतो आहे की ग्लास आहे."
गिताने एकदम रेफ्लेकट अक्शन मध्ये तिच्या हाताकडे बघितल. घ्लास तिच्याच हातात होता. क्षणभर तिला वाटल की तिने कदाचित तो समोरच्या टीपॉय वर ठेवला की काय. पण मग त्या ग्लाचा स्पर्श विक्रमला करत ती म्हणाली;"विक्रम अरे तुला स्पर्श जाणवत नाही का? हा बघ तुझ्या हाताला मी हा ग्लास लावला आहे."
"तू म्हणतेस तर हो... होतोय स्पर्श माझ्या हाताला." विक्रम म्हणाला.
आता त्याच्या अशा उत्तराने गिता निरुत्तर झाली. ती शांतपणे विक्रमकडे बघत बसून राहिली. कारण तिला लक्षात आल होत की जर विक्रम अस म्हणतो आहे तर त्याचा अर्थ त्याच्याकडे या सगळ्या बोलण्याच एकस्प्लानेषन नक्की असणार.*****
"विक्रम मला कळत आहे की तुला ग्लास दिसतो आहे. नाहीतर तू त्याचा उल्लेखच केला नसतास. पण तुला तुझा मुद्धा मला सांगायचा आहे. म्हणूनच तू हा ग्लास माझ्या हातात असण हे फक्त माझ म्हणण आहे अस म्हणतो आहेस. तू बोल विक्रम; मी एकते आहे." गिता म्हणाली आणि विक्रम हसला.
"गीतू तू ना मला ओळखायला लागली आहेस माझ्या मित्रांसारखी; अस मला वाटत. तर, तुझ्या हातात ग्लास आहे अस तू म्हणते आहेस. किंवा समजा आत्ता इथे अजून ४-५ माणस असती आणि त्यांनी म्हंटल असत... तर मग खरच तुझ्या हातात ग्लास आहे हे सिद्ध झाल असत. बरोबर? आणि समजा तू एकटीनेच म्हंटल असत की तुझ्या हातात ग्लास आहे पण बाकीच्यांनी म्हंटल असत की तुझ्या हातात अस काहीच नाही... तर मग पलीकडच्या खोलीतल्या लोकांना काय वाटल असत?" विक्रमने तिला विचारल.
गिता एकदम गोंधळली. "अरे काय म्हणतो आहेस तू?" तिने विक्रमला विचारल.
"अग अस काय करतेस? ok! परत सांगतो. थोड वेगळ्या पद्धतीने. तू जर एखादी गोष्ट या खोलीत आहे म्हणते आहेस आणि इतरांनी दुजोरा दिला, तर तू जे म्हणते आहेस ते खर ठरत; बरोबर? पण जर तू म्हणते आहेस त्याला दुजोरा नाही मिळाला तर मग तू कितीही ओरडून सांगितलस तरी ते खर ठरत नाही. त्यातून जे लोक अस एखाद संभाषण दुसरीकडून एकत असतील ते लोक तर अनेकांनी जे म्हंटल असेल तेच खर मानणार... हो की नाही?" विक्रमने परत एकदा त्याच म्हणण सांगायचा प्रयत्न केला.
गिताला आता त्याचा मुद्दा लक्षात आला. "विकी तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. पण मुळात माझ्या हातात ग्लास आहे हे इतराना दिसत असत. जर त्यांनी ते नाकारलं तर मी ते सिद्ध करू शकते न? त्या ग्लासचा स्पर्श त्याना करून. किंवा काचेचा ग्लास असल्याने तो जमिनीवर फोडून... त्यामुळे केवळ मी म्हणते म्हणून हे सिद्ध होत नाही की ग्लास आहे. तर त्याच्या अस्तित्वाला सिद्ध केल्यानंतर ते मान्य होत." गीताने एकूण चर्चेला तिला हव तस वळण द्यायला सुरवात केली. तिच्या एक लक्षात आल होत की विक्रमच्या विचारांना योग्य मार्गावर आणण; आणि तेही इतर कोणी नाही तर त्याने स्वतःच! हाच एक उपाय आहे त्याच्या बरे होण्याच्या मार्गाचा. पण अगोदर त्याच्या मनातल पूर्ण समजून घेण आवश्यक होत. म्हणून मग तिने एकूण संभाषण मागे फिरवल.
"विकी तो ग्लास आणि त्याच असण याबद्धल आपण नंतर बोलू. अगोदर तू मला जे सांगत होतास ते पूर्ण कर बघू. तुझ आणि तुझ्या मित्राचं अस काय बोलण झाल रे की सगळे प्रश्नच सुटले." तिने त्याला आठवण करून दिली.
"गिता तुलासुद्धा मी स्चीझोफ्रेनिक वाटतो आहे का?" अचानक विक्रमने तिला विचारल.
"विकी मी जे विचारते आहे ते सोडून तू अस मलाच का सारखे प्रश्न विचारतो आहेस? जर तुला नसेल सांगायचं की तू आणि तुझ्या मित्रांनी मिळून तो प्रश्न कसा सोडवला तर राहु दे. मी आग्रह करणार नाही. पण मी तुला उत्सुकतेपाई मी तुला विचारते आहे; एवढाच." त्याच्या प्रश्नाच उत्तर टाळत गीताने थोडा त्याच्या भावनांना हात घातला. आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला.
"अस नाही ग. पण तू अगदी डॉक्टरच्या भूमिकेतून विचारल्यासारख विचारते आहेस म्हणून मला वाटल." विक्रम नरमून म्हणाला आणि सांगायला लागला;"अग उत्तर सोप्प होत. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून ते शोधलं होत. मी पूर्वी सारख डॉक्टर ख्ररातांच म्हणण मान्य करायचं. ही पहिली गोष्ट. आणि त्याहूनही महत्वाच म्हणजे त्यांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे स्चीझोफ्रेनिया आजाराचा अभ्यास स्वतःच करायचा. उत्तर तर मिळाल होत. फक्त ते कस करायचं ते कळत नव्हत. कारण मी जरी अभ्यास करायचा म्हंटल तरी बाबांचं माझ्यावर बारीक लक्ष असणारत्यात डॉक्टर आता परत औषध सुरु करणार. म्हणजे एकतर मी थोडा जास्त झोपायला लागणार, जेवण-खाण नकोस होणार. उत्साह नाही वाटणार एकूणच. . हे माझ्या लक्षात आल होत. त्यामुळे काय कराव याचा मी विचारच करत होतो; आणि उत्तर डॉक्टर खरातानी दिल. त्यांनी मला विचारल की मी त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करेन का! मी लगच हो म्हणून टाकल. पण जर मला केसेसचा अभ्यास करायचा असला तर ते मी एकटा असतानाच शक्य होत. म्हणून मग मी पोस्ट ग्रजुएशन करणार आहे अस सांगून क्लिनिक बंद असताना आत थांबायची परवानगी घेतली.
गिता त्यानंतर मात्र मी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला या आजाराचा. केसेसचा खजिनाच होता डॉक्टर ख्ररातांच्या क्लिनिक मध्ये. शिवाय इंटरनेट होताच; थियरीसाठी.
त्या आभ्यासातूनच मला कळल की स्चीझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे. ही काही स्प्लिट पेर्सानालीटी नाही. किंवा हा आजार असणारी व्यक्ती डेंजरस नसते. अनेकदा हा आजार पिढ्यान मागून पिढ्या चालत आलेला असतो. म्हणजे किमान ७०% वेळा अस असत. मेंदूमधल्या काही केमिकल्सच्या imbalanceमुळे हा आजार होऊ शकतो. serotonin आणि dopaminc अशी त्या केमिकल्सची नाव आहेत. त्यांच्या imbalanceमुले मेंदू विचित्र react होतो. हा आजार असणाऱ्याना आवाज, वास, दृष्टी, चव या बाबतीत hallucinations होऊ शकतात. ही माहिती कळल्यानंतर मी स्वतःलाच एझामिन करायला लागलो. मुळात बाबांना गप्पानमधून विचारल की त्यांच्या किंवा आईकडच्या नात्यामध्ये मागच्या पिढीत हा आजार कोणाला कधी झाला होता का? पण तस काही नव्हत. मग मी स्वतःच्या serotonin आणि dopaminc टेस्ट्स करून घेतल्या. त्यात थोडा imbalance आला खरा. पण तो disturb मानास्तीथित होऊ शकतो. म्हणजे ही पोसिबिलीटी सुद्धा बाद झाली. बर वास, दृष्टी, चव, आवाज या बाबतीत मला hallucinations देखील नाहीत. डॉक्टर खरातांच्या क्लिनिककडे येताना ती कचऱ्याची पेटी आहे तिथून येताना मला खूप त्रास व्हायचा वासाचा. एकदा तिथून पास होताना मी मुद्धाम बाबांना म्हणालो किती छान वाटतय न? तर ते म्हणाले हा वास सोडला तर सगळ छान आहे. अशाच प्रकारे मी दृष्टी, चव आणि आवाजाच्या बाबतीत खात्री केली. गीतू मला जे जस जाणवत तसच ते इतराना जाणवत हे माझ्या लक्षात आल. आणि मग मी समजून चुकलो की मला असा कोणताही आजार नाही आहे." विक्रमच हे एकूण बोलण एकून गिताला काय बोलाव तेच कळेना.
एखाद्या अत्यंत हुशार आणि सयुक्तिक विचार करणार्या व्यक्ती सारखा विक्रम बोलत होता. मुख्य म्हणजे त्याचे मुद्दे खोडून काढण अवाघड होत हे गिताच्या लक्षात आल. कारण त्याने खरच स्चीझोफ्र्णियाचा खूप चांगला, खोलात जाऊन अभ्यास केला होता. त्याने सांगितलेले सगळेच simptumps बरोबर होते. फक्त एक खूप मोठ्ठा फरक होता; आणि तो म्हणजे विक्रमने हे पक्क स्वीकारलं होत की त्याचे मित्र खरच आहेत आणि म्हणूनच तो हे मान्य करायलाच तयार नव्हता की मुळात त्याला हा आजार झाला आहे हे म्हणण्याच मुळ ते मित्र नाहीत यात आहे.
आता गीता समोर एक खूप मोठ आव्हान उभ राहील होत. तिला विक्रमला संशय येऊ न देता हे समजावायचं होत की त्याचे मित्र मुळात नाहीच आहेत. कारण विक्रमने इतक्या बेमालूमपणे डॉक्टर खरात आणि त्याच्या वडिलाना फसवल होत आणि या विषयाचा अभ्यास इतका चांगला केला होता की तिची एखादी चूक खूप मोठ नुकसान करून गेली असती.
विक्रमला गीलाबद्ध्ल खूप विश्वास वाटत होता हे उघडच होत. म्हणूनच केवळ त्याने तिला सगळ अगदी सगळ सांगितल होत. जे आजवर त्याने कोणाशीच शेअर केल नव्हत. जर ह्या त्याच्या विश्वासाला तडा गेला असता, तर मग त्याला परत सामान्य जीवनात आणणं अवघड नाही तर अशक्य झाल असत. गिताला कोणत्याही परिस्थितीत विक्रमला हरवायचं नव्हत. म्हणून मग तिने त्याच्या कलाने घ्यायचं ठरवलं. त्याहूनही मोठा निर्णय तिने हा घेतला की जोवर ती काही निर्णयापर्यंत येत नाही तोवर डॉक्टरकाकांना किंवा बाबांना काही सांगायचं नाही.
गिता शांत झाली आहे हे बघून विक्रम अस्वस्थ झाला. "गिता तुझा पण माझ्यावर विश्वास बसत नाही ना?" त्याने तिला विचारल.
"तस नाही विक्रम. पण मला सारखा एकाच प्रश्न पडतो आहे की तू म्हणतोस ते सगळ बरोबर असेल तर मग तुला असा अवघड आणि मनाचा आजार झाला आहे, अस तुझे वडील का म्हणतील? कारण अजूनही आपल्या समाजाने मनाचे आजार शरीराच्या आजारांसारखे सहज स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे मनाचा आजार असलेल्या व्यक्तीला वेगळ्या नजरेने बघितल जात. सर्वसाधारणपणे 'वेड लागल आहे या व्यक्तीला,' अस सहज म्हंटल जात. अस असताना तुझे वडील का तुला डॉक्टर खरातांसारख्या well known डॉक्टरकडे आणतील? त्याना काही बर वाटत नसणार न, तुला मनाचा आजार आहे असा विचार करताना?" गीताने मुद्धाम विक्रमला विचारले.
त्यावर विक्रमने दिलेले उत्तर तिला काहीसे अपेक्षितच होते. तो म्हणाला;"माहित नाही ग. पण माझे बाबा कायम त्यांच्या कामात गुंतलेले असतात. त्यांना माझ्यासाठी कधी वेळच नव्हता आणि अजूनही नसतो. म्हणून मग कदाचित त्याना मनातून गिल्टी वाटत असेल. त्यात मी माझ्या मित्रांमध्ये जास्त रमतो हे आवडत नसेल. म्हणून मग त्यांच्यापासून तोडायला काही सबळ कारण हव, म्हणून मग मला आजार आहे अस सिद्ध केल की झाल अस त्याना वाटत असेल."
त्यावर गिता म्हणाली;"अरे ते तुझे वडील आहेत विकी. तुला आजार आहे अस सिद्ध झाल्याने त्याना आनंद कसा होईल? आणि तुझे मित्र तू म्हणतोस म्हणून आहेत अस कस म्हणता येईल? तुझ्या बाबांना तर ते दिसत नाहीत; पण त्यांच एकवेळ बाजूला राहुदे. बाकी कोणाला ते दिसतात का?"
ती असाच काहीस त्याला सांगायचा प्रयत्न करत होती आणि अचानक तिला थांबवून विक्रम म्हणाला;"गिता, अस तर नसेल की माझ्या बाबांनाच स्चीझोफ्रेनिया हा आजार असेल? ते म्हणतात की फक्त मलाच माझे मित्र दिसतात; पण कदाचित फक्त त्यांनाच ते दिसत नसतील. पण ते वडील आहेत.... मोठे आहेत... त्यामुळे आजार त्याना झाला आहे हे त्याना स्वीकारायचे नसेल. मग सोपा उपाय काय... तर मलाच आजार आहे अस म्हणायचं. काय वाटत तुला?"
त्याचे हे विचार एकून मात्र गिता आवाक झाली. क्षणभर तिला काय बोलाव सुचेना. पण मग तिने विचार करून म्हंटल,"विकी एकवेळ हे म्हंटल की तुझ्या वडिलानाच फक्त तुझे मित्र दिसत नाहीत, तर मग तुला हे सिद्ध करावा लागेल की त्यांच्या व्यतिरिक्त इतराना तुझे मित्र दिसतात. सांग कस सिद्ध करशील?" हे म्हणताना तिला इच्छा होती की विक्रमने म्हणावं की चल तुला माझ्या मित्रांची ओळख करून देतो.
पण त्यावर त्याचे उत्तर वेगळेच होते. तो म्हणाला;"गिता अग माझे मित्र इतराना दिसतात."
हे एकून गिता पुरती गोंधळून गेली. तिला माहित होत आणि खात्रीदेखील होती की विक्रम स्चीझोफ्रेनिक आहे. हा आजार त्याला झाला आहे. तरीही त्याच्या आत्मविश्वासपूर्ण वाक्याने ती पुरती गोंधळून गेली.
"कोणाला दिसतात तुझे मित्र विकी?" तिने आवाजावर ताबा आणत त्याला विचारले.
"अग आमच्या बिल्डिंगचा वॉचमन आहे ना त्याला नाक्कीत दिसतात. कारण आम्ही कधी कधी गच्चीवर बसतो ना तेव्हा जर मी वाकून बघितल आणि त्याचवेळी तो वर बघत असला तर खालूनच ओरडतो... तुम बच्चा लोग उप्परसे झुकता हे और गाली हमको पडती हे. चलो पिछे हो जाव." विक्रमने तिला सांगितले.
"विकी तुमच्या बिल्डिंगचा वॉचमन काय म्हणतो त्याचा काय संबंध विकी?" गीताणे थड वैतागून विचारले.
"अग गिता तुला कस समजत नाही? तो म्हणतो तुम बच्चा लोग... याचा अर्थ त्याला आम्ही सगळे दिसतो ना?" विक्रम तिला समजावत म्हाणाला.
त्याने असे म्हणताच गिताच्या लक्षात त्याचा मुदा आला. त्याक्षणी तिला वाटले, 'खरच जर तो वॉचमन अस म्हणत असेल तर त्याचा अर्थ त्याला मुल दिसत असतील नाही का? खात्री करून घेतली पाहिजे.' पण तिने हा विचार विक्रमला बोलून नाही दाखवला. उलट ती महाली,"त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे का विकी ज्यांनी तुझे मित्र बघितले आहेत?"
विक्रम विचारात पडला. निदान आता तरी तो तिच्या मनातल बोलेल अशी तिला आशा होती. आणि विक्रम तेच म्हणाला;"दुसऱ्या कोणाची साक्ष कशाला हवी गिता? चाल तुझीच ओळख करून देतो मी माझ्या मित्रांशी. त्याना मी सांगितलेल नाही अजून की मला तू किती जवळची वाटतेस. त्यामुळे अचानक तुला माझ्याबरोबर बघून त्याना पण आश्चर्य वाटेल. चल येतेस? तुझी भेट घालून देतो मी माझ्या मित्रांशी."
'finally!' गिताच्या मनात आल. तिला विक्रमने स्वतः अस म्हणायला हव होत की तो तिला त्याच्या मित्राना भेटायला घेऊन जाईल. कारण जर तिने उत्सुकता दाधावली असती तर तो घेऊनही गेला असता, आणि जर तिला कोणी दिसत नाही अस तिने म्हंटल असत तर कदाचित त्याने असा stand घेतला असता की 'मुळात माझ्या मित्राना तू आवडत नाहीस, त्यात मी त्याना न विचारता तुला घेऊन आलो, म्हणून तेच समोर यायला तयार नाहीत.'
परंतु विक्रम स्वतःच म्हणाला की तो गिताला त्याच्या मित्राना भेटवायला तयार आहे; हे एकून तिचा चेहेरा खुलला. विक्रमच्या एकूण आत्मविश्वासपूर्वक बोलण्यामुळे तिच्या मनात विक्रमच्या वडीलांबद्धल थोडा संदेह निर्माण झाला होता; त्यामुळे ती विक्रमबरोबर जायला उत्सुक होती. जर ते मित्र खरच तिला भेटले असते तर मोठाच प्रश्न उभा रहाणार होता. पण जर ते नाहीच भेटले किंवा दिसले तर मात्र तिला विक्रमला त्याच्या कलाने घेत समजावावे लागणार होते. पण त्याला तिची तयारी होती. तिचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता.
गीताने विक्रमला विचारले;"हे मस्तच झाल. कधी जाऊया आपण? मला आता बर वाटत आहे. उद्या चालेल का तुला? मी उद्या येणार आहे क्लिनिकला. मग तिथूनच एकत्रच जाऊ."
गिताला वाटल होत तो म्हणेल त्याना कधी वेळ आहे आणि मग आपण जाऊ. अर्थात तिलाही तेच हव होत. त्यामुळे तिला थोडा वेळ मिळाला असता डॉक्टर खरातांशी बोलायला. त्याना अनेक गोष्टी माहीतच नव्हत्या. त्याना ती सगळी माहिती देण अत्यंत आवश्यक होत. बर, विक्रमच्या वडीलाना काही प्रोब्लेम नाही ना ही दुसरी possibility तपासून बघणे देखील आवश्यक होते. या सगळ्यासाठी तिलासुद्धा थोडा वेळ लागणारच होता.
पण त्यादिवशी बहुतेक गिताला shocks मागून shocks बसावेत अस होत. कारण विक्रम घड्याळाकडे बघत म्हणाला;"चल आताच जाऊ. आता बाबा नसतील घराजवळ. त्यामुळे ते तिघे मोकळेपणाने भेटतील आपल्याला. तसा उशीर झाला आहे, मान्य आहे. पण तू काही लाहान बाळ नाहीस न. आणि अजून तुझे आई-बाबासुद्धा आलेले नाहीत. तू फक्त त्याना भेट आणि ये परत. मी थांबवणार नाही तुला. तस त्यानासुद्द्धा त्यांच्या घरी जायचं असत. पण अलीकडे आम्ही ठरवल आहे की रोज निदान पाच मिनिट तरी भेटायचं. कारण नाहीतर मला फार फार एकट वाटत. चल निघू. ते थांबले असतील माझ्यासाठी."
गिताला काय कराव सुचेना. नाही म्हणायची इच्छा होती. पण तस कारण सापडत नव्हत. तिनेच काही मिनिटांपूर्वी म्हंटल होत की आता तिला आता बर वाटत आहे. तिने क्षणभर विचार केला आणि मनाशी निश्चय करून ती उठली. म्हणाली;"चल विकी, येते मी. पाच मिनिटात तयार होते."
खरोखरच गिता पाच मिनिटात बाहेर आली. तिने आई-बाबांसाठी टेबलावर चिट्ठी लिहून ठेवली... मला बर वाटत आहे, म्हणून जरा फिरायला बाहेर जाते आहे. काळजी करू नका. जेवायच्या वेळेपर्यंत घरी येते.' आणि ती विक्रम बरोबर निघाली. मुद्धामच तिने कुठे जाते आहे आणि कोणाबरोबर ते लिहील नाही. कारण ते लिहील असत तर तिची आई उगाच घाबरली असती आणि सारखा मोबाईलवर फोन करत बसली असती.
गीताने लगेच आपल म्हणण एकल आणि ती यायला तयार झाली हे बघून विक्रम खुश होता. तो तिच्याबरोबर निघाला.
बाहेर पडताच त्याने रिक्षा थांबवली आणि स्वतःच्या घराचा पत्ता दिला. रिक्षात बसल्यावर गीताने त्याला विचारले;"अरे खात्री तर कर ते तिघे आहेत तिथे. एकदा मोबाईलवर फोन करून बघ की." तिचा त्यामागे एकाच उद्धेश होता; तिला बघायचं होत की विक्रम खरच फोन करतो का.
विक्रमला तिच म्हणण पटल. त्याने त्याचा मोबईल बाहेर काढला. पण त्याच चार्गिंग पूर्ण संपल होत. गिताला ते थोड अपेक्षित होतच. तिने लगेच स्वतःचा मोबाईल त्याला दिला आणि म्हणाली;"अरे माझ्या फोनवरून लाव." विक्रमने एकदा तिच्याकडे बघितल आणि तिचा फोन घेऊन नंबर लावला. क्षण दोन क्षण गेले आणि विक्रम बोलायला लागला;"राजन आहात न? हो रे! थोडा उशीर झालाय आज. पण तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतो आहे. थांबा ह. अरे? का? कसलं काम? नाही चालणार. थांबा म्हणजे थांबा." अस म्हणून त्याने फोन ठेवला.
गीताने फोन परत घेत विचारले;"काय झाल विकी? नाहीत का ते ठीथे?"
"अग आहेत की. फक्त त्याना थोडी घाई आहे. म्हणत होते उद्या दाखव तुझ सरप्राईज. पण मीसुद्धा सांगितल त्याना ते नाही चालणार. थांबाच तुम्ही." अस म्हणून विक्रमने गीताकडे बघितल. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला;"गिता, मला माहित आहे की तुझा माझ्यावर विश्वास आहे. पण तरीही खोल कुठेतरी तुझ्या मनातही डाऊट येत असेलच न? मला तू हवी आहेस गिता. मनात कुठलाही पण किंवा परंतु न घेता तू मला स्वीकारावास अस वाटत. म्हणूनच मी तुला आजच त्या तिघाना भेटवायचं ठरवलं."
गिता विक्रमकडे टक लावून बघत होती. तिच्या मनाचा पुरता गोंधळ उडाला होता. शेवटी तिने ठरवलं की जे जे होत आहे ते पहायचं. आता कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचण शक्य नव्हत. आणि ते योग्य ही नव्हत.
विक्रमच घर आल. त्याने रिक्षा थांबवली आणि खाली उतरून पैसे दिले. गीतादेखील त्याच्याबरोबर उतरली. विक्रमच्या घराची गल्ली डेड एंड असलेली होती. त्यामुळे रहदारी अजिबात नव्हती तिथे. त्यात त्यांची बिल्डिंग अगदी शेवटची. त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्याचा उजेडही गेटजवळ निट नव्हता. रिक्षा परत गेली. गीताने प्रश्नार्थक नजरेने विक्रमकडे बघितल. कारण आजू-बाजूला कोणीच दिसत नव्हत.
"विकी कुठे आहेत तुझे मित्र?" तिने विक्रमकडे बघत विचारल.
"गिता मनातला संशय दूर ठेव बघू. ते बिल्डींगच्या मागच्या टाकीवर बसले असतील. आमची ती ठरलेली जागा आहे. किंवा मग गच्चीत असतो आम्ही." विक्रम तिच्याकडे बघत म्हणाला.
गिताला त्याच अस रोखून बघण आवडल नाही. पण ती काहीच बोलली नाही. त्याला पुढे चालायची खुण करून ती त्याच्या मागून चालू लागली. दोघे बिल्डिंगला वळसा घालून मागे आले. पण तिथे कोणीच नव्हत. विक्रमने आजू बाजूला बघितल आणि म्हणाला;"वर गच्चीत असतील ते. चाल."
ते दोघे जिन्याकडे आले तेवढ्यात समोरून वॉचमन आला. विक्रमने पुढे होत गिता काही बोलायच्या आत त्याला विचारले;"चाचा, मेरे दोस्त उप्पर गये क्या?" वॉचमनने एकदा गीताकडे बघितले आणि मग विक्रमकडे बघत तो म्हणाला;"हां हां! उप्पर गये. जाव तुम आपने घर जाव." आणि गेटच्या दिशेने तो निघून गेला.
त्याला कल्पना नव्हती पण विक्रम जग जिंकल्याच्या नजरेने गीताकडे बघत होता आणि गीताचा चेहेरा प्रचंड मोठा धक्का बसल्यासारखा दिसत होता. विक्रमने तिचा हात धरला आणि तिला लिफ्टकडे नेले. दोघे लिफ्टमध्ये शिरले आणि विक्रमने शेवटच्या मजल्याचे बटन दाबले.
गिता थोडी शांत झाली आणि म्हणाली;"विकी, तुझ्या बाबांना माहित आहे का की वॉचमनला तुझे मित्र इथे येतात ते माहित आहे?"
तिच्याकडे बघत विक्रम म्हणाला;"नाही गिता. खर सांगायचं तर जे लोकं म्हणतात की माझे मित्र खरच आहेत त्यांच्याशी माझे बाबा बोलत नाहीत."
हे एकून गिता काहीच बोलली नाही. लिफ्ट शेवटच्या मजल्यावर पोहोचली. दोघे लिफ्टच्या बाहेर पडले आणि गच्चीवर जाण्याच्या जिन्याकडे वळले. गच्चीच्या दाराशी आल्यावर विक्रांतने गिताला हळूच कानात सांगितले;"तू २ मिनिटांनी आत ये. ते तिघे वर टाकीवर बसले असतील. आमची ती फेवरेट जागा आहे. मी त्याना खाली बोलावतो. मी टाळी वाजवली की तू आत ये. ठिक?"
गीताने हसून मान डोलावली आणि विक्रम गच्चीत गेला. विक्रम गिला आणि जिन्यात उभ्या असलेल्या गिताला परत्येक क्षण युगांसारखा वाटत होता. तशीच अजून २-३ मिनिट गेली. गच्चीतून काहीतरी बोलल्याचा आवाज आला आणि अचानक टाळी वाजली. गिताला लक्षात आल विक्रम तिला आत बोलावतो आहे. ती हसत हसत गच्चीत शिरली.
विक्रम दाराच्या उजवीकडे होता आणि तिच्याकडे हसत बघत उभा होता. त्याने हाताची घडी घातली होती. गिताला वाटल होत की त्याचे मित्र त्याच्या बाजूलाच असतील. पण तिथे कोणीच नव्हत. त्याने हसतच तिला खुण केली की तिने मागे वळून बघावं. गिता मागे वळली. आता तिची पाठ विक्रमकडे होती. पण तिला विक्रमचा आवाज एकू येत होता;"राजन, प्रकाश, हरी कस वाटल सरप्राईज? ही गिता. माझ्या आयुष्याची होणारी जोडीदार आणि गिता हे राजन, प्रकाश आणि हरी. माझे जीवाभावाचे मित्र. मी खरच खूप खूप लकी आहे. आज माझ्या मित्रांनी माझ्या होणाऱ्या सहचारिणीला स्वीकारलं आणि तिने देखील त्याना स्वीकारलं."
विक्रम असाच काहीस बोलत होता..... आणि गिताला आयुष्यातला मोठ्ठा धक्का कसा पचवावा हा प्रश्न पडला होता. कारण तिच्या समोर कोणीच नव्हत. कोणीही नव्हत!!!
विक्रमच्या मते राजन, प्रकाश आणि हरी तिथेच होते. गिता आणि विक्रमच्या समोर. तो खरच ते तिघे समोर उभे असल्यासारखा बोलत होता. मधून मधून थांबत होता. जणूकाही त्यांच्यापैकी कोणीतरी काहीतरी बोलत होत. त्याना तो replyदेखील करत होता.
गिता हतबल होऊन उभी होती. तिला काहीच सुचत नव्हत बोलायला. अचानक विक्रमने तिच्याकडे वळून बघितल. मग परत त्याच्या त्या कल्पनेतल्या मित्रांकडे बघत म्हाणाला;"नाही रे. तिला दिसता आहात तुम्ही तिघे. फक्त ती काय बोलायचं ते सुचत नसल्याने गप्प आहे. अरे तिला समजून घ्या रे. तिला असच वाटत होत खोल मनात की तुम्ही नसणारच. त्यामुळे तुम्ही आहात हे बघून थोडी गोंधळली आहे इतकच." गीताकडे वळत त्याने विचारल;"हो की नाही गिता?"
गीताने विक्रमकडे बघितल पण ती काहीच बोलली नाही. विक्रम एकदम शांत झाला. तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरून तिच्या डोळ्यात बघत त्याने तिला विचारले;"गिता तुला माझे मित्र दिसत आहेत न? राजन, प्रकाश आणि हरी इथे आहेत गिता. ते खरच आहेत. तुला पटत आहे न मी म्हणतो आहेत ते?"
गिता फक्त त्याच्याकडे बघत होती. तिला काय बोलाव सुचत नव्हत.
विक्रमने एकदम shock लागल्याप्रमाणे तिचा हात सोडला. दोन पावलं मागे जात त्याने गिताला विचारल;"गिता तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत न? तुला माझे मित्र नाही ना दिसत?"
गीताने स्वतःला सावरल. त्याच्या दिशेने पाउल उचलत ती म्हणाली;"विकी, हे बघ....."
"अह! नाही! फक्त माझ्या प्रश्नाच उत्तर गिता. बाकी काही बोलू नकोस." विकर्म म्हणाला.
"माझा तुझ्यावर विश्वास आहे विकी." त्याला शांत करण्यासाठी गिता म्हणाली.
"गिता जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तुला माझे मित्र दिसतील." विक्रम अजून दोन पावलं मागे सरकत म्हणाला. त्याने त्याच्या डाव्या बाजूला बघितल आणि कोणीतरी बोलल असेल त्याला उत्तर दिल्याप्रमाणे म्हाणाला;"हो! खरय तुमच. पण माझा गीतावर विश्वास आहे........... होता!" परत गीताकडे बघत तो म्हणाला;"बघ ते पण म्हणताहेत की तुझा माझ्यावर विश्वास नाही. तूदेखील माझ्या बाबांच्या आणि डॉक्टर खरातांच्या विश्वातली निघालीस गिता."
गिताला काय कराव सुचत नव्हत. विक्रमला शांत करण्यासाठी जरी ती म्हणाली की तिचा त्याच्यावर विश्वास आहे तरी तिला तिथे त्याचे मित्र दिसत नव्हते हे खर होत. आणि ते विक्रमच्या लक्षात आल होत. त्यामुळे तिला हेल्पलेस वाटत होत. तिने परत एकदा त्याला सामाजावायचा प्रयत्न केला.
"विकी, ऐक माझ. हे बघ........." ती म्हणाली.
"नाही गिता. तू माझ ऐक. गिता जा तू. खरच जा. मला तुझा राग नाही आलेला. फक्त वाईट वाटत ग की तू सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवलास."
आता मात्र विक्रमला सत्य परिस्थिती सांगावी अस गिताला वाटल. ती म्हणाली;"विकी माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर मी तू म्हणता क्षणी तुझ्याबरोबर निघाले न. तुझाच माझ्यावर विश्वास नाही आहे विकी. म्हणूनच तर तू माझ एकून घेत नाही आहेस."
विक्रम तिच्याकडे बघत उदासवाण हसला. म्हणाला;"गिता, जा तू. माझा तुझ्यावर विश्वास होता म्हणून तर तुला सगळ सगळ खर सांगितल मी. अगदी ते सुद्धा जे फक्त माझ्या मनात होत आणि माझ्या मित्राना माहित होत. जाऊ दे गिता. फक्त एकच प्रश्न विचारतो. मला उत्तर नको आहे, तुझ तूच ते शोध आणि स्वतःला दे. तुला माझे मित्र दिसत नाहीत. पण त्याना तू दिसतेस. बाबांना ते दिसत नाहीत. पण त्याना बाबा दिसतात. तुमच्या सगळ्यांचा मते मला स्चीझोफ्रेनिया हा आजार आहे. पण गम्मत म्हणजे तुम्ही सगळे माझे मित्र नाकारता आहात. मी मात्र तुम्हालाही स्वीकारतो आणि त्याना ही. ते देखील तुम्हाला स्वीकारायला तयार आहेत; पण तुमच्या नकारामुळे confused आहेत. त्यामुळे आता तूच ठरव गिता; आजारी नक्की कोण आहे? मी की तुमचा हा so called समाज? मला स्चीझोफ्रेनिया हा आजार आहे अस तुम्ही म्हणता ते तुमच मत आहे की तुमच पेर्सेप्शन? जा... गिता... प्लीज जा...." अस म्हणून त्याने तिच्याकडे पाठ केली.
गिता खूप खूप गोंधळली होती. गडबडली होती. ती धडपडत जीना उतरली आणि खाली आली. खाली गेटजवळ तिला वॉचमन बसलेला दिसला. तिने त्याच्याकडे बघितले आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारले;"चाचा, अभी में जीनाकडे साथ उप्पर गई उनको तो आप पेहेचानते हो न?"
वॉचमन उभा रहात म्हाणाला;"हा हा दीदी. वो तो विकी बाबू हे. क्यो क्या हुवा? फिरसे दौरा पडा क्या उनको? अभी सहाब नाही आये काय?"
गिता त्याच बोलण एकून अवाक झाली. "आप क्या केहेरहे हो चाचा?" तिने त्याना विचारले.
"अरे दीदी, वो विकीबाबू को उनके दोस्त दिखते हे ना.... तो वो मुझे पुछते रेहेते हे.... क्या मेरे दोस्त इधर हे? उनके पिताजीने मुझे बोलके रखा हे की मेने हा केहेना हे. क्यो की कभी कभी उनको दर होती हे आने को काम से. अगर विकी बाबू जो बोलते हे वो माना नाही तो वो काबू के बाहर हो जाते हे. इसिलीये आप लोग उप्पर जा राहे थे तो हमने हा भर दी जो वो केहे राहेथे उसको. और फिर आप थी ना साथ में. नही तो में खुद छोडने जाता हु विकी बाबू को घर पर." वॉचमन गिताला सांगत होता. आणि त्याच्या प्रत्येक वाक्याने गिता अजून अजून ढेपाळत होती.
ती गरकन मागे फिरली आणि लिफ्टची वाट न बघता दोन दोन पायऱ्या पार करत गच्चीत पोहोचली. तिने विक्रमला बेंबीच्या देठापासून हाक मारली. "विक्रम...... विकी.... विकी??? I TRUST YOU! कुठे आहेस विक्रम? विकी? बोल माझ्याशी......"
गिता हाका मारत होती. विक्रमला शोधत होती. पण तिच्या जगाच्या पेर्सेप्शन प्रमाणे विक्रम त्या गच्चीत नव्हता. त्यामुळे टाकीवर मित्रांबरोबर बसलेला विक्रम इच्छा असूनही तिला उत्तर देऊ शकत नव्हता.
प्रतिक्रिया
12 Sep 2015 - 1:51 am | एस
पुढच्या दोन महिन्यांच्या आत संपूर्ण कथा व प्रत्येक वाक्य नक्की वाचेन असे आश्वासन देतो.
12 Sep 2015 - 5:17 am | कंजूस
खरं आहे.संपूर्ण सावकाश लिहिल्यामुळेच या वेडाची खरी कल्पना येते.हे वेडे थंडपणे आणि शांतपणे दुसय्य्राला वेडे करू शकतात.जबरदस्त लेखन.
क्रौंचपक्षीही जोडीदाराचा वियोग सहन करू शकत नाहीत.
हे वेड जात नाहीच
12 Sep 2015 - 5:23 am | मदनबाण
लेख वाचुनच सिझोफ्रेनिया होइल ही भिती वाटल्याने फक्त स्क्रोल करुन भागवले ! :प
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja
12 Sep 2015 - 6:58 pm | वेल्लाभट
ए१ प्रतिसाद
12 Sep 2015 - 7:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही लेख नंतर वाचु. गृप डिस्कशन करु मग फर्मास प्रतिक्रिया देउ.
12 Sep 2015 - 8:05 am | रातराणी
बापरे! वाचायला घेतली होती पण स्क्रोल करूनच भोवळ आली! २-३ पार्टस मध्ये टाका जमली तर. काही परिच्छेद रिपीट झाले आहेत.
12 Sep 2015 - 9:03 am | रामदास
असे वाटणारा मी एकटाच नाहीय्ये हे समजून बरे वाटले.
12 Sep 2015 - 11:09 am | आदूबाळ
हे तुमचं पर्सेप्शन तर नाही?
14 Sep 2015 - 5:47 pm | बॅटमॅन
तो तुमचा भ्रम आहे. =))
12 Sep 2015 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरुवातीचा उतारा छड़ीचा मार खात खात वाचला.
लेखन खुप छान कानी माहितीपूर्ण असेल पण मी हे दिवाळीच्या सूट्टीत वाचायचं म्हणून वाचनखूण साठवली आहे.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
12 Sep 2015 - 10:20 am | मुक्त विहारि
स्क्रोलिंग करता-करताच दम लागला.
संपुर्ण कथा अजिबात वाचली नाही.
12 Sep 2015 - 10:29 am | असंका
आपण साहित्य संपादकांच्या सेवेचा वापर केलेला आहे का? माझ्या मते नसावा.
12 Sep 2015 - 4:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दया असावी कं.अ. येवढं सगळं वाचायला मणुक्षाकडे श्रीरंग जोशींचा पेशन्स पाहिजे =))
12 Sep 2015 - 6:27 pm | पिलीयन रायडर
पण मुळात "साहित्य संपादक" ही एक "सेवा" आहे हे ऐकुन फार बरं वाटलं.. कोणत्याही संपादकांना आपली सेवा करायला लावणं म्हणजे तर लाईफ टाईम ड्रीमच हो!!
12 Sep 2015 - 6:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सेवा आहे सत्यवचन. पण इट हॅज इट्स प्राईज
12 Sep 2015 - 11:50 pm | असंका
बास का सर....
:-))
13 Sep 2015 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
:'(
=))
13 Sep 2015 - 10:00 am | श्रीरंग_जोशी
सासंमं गेल्या साडेतीन महिन्यांपासून कार्यरत आहे. तोवर अन त्यानंतरही काही प्रमाणात सासंमं करत असलेली कामे संमंच करत असे व असते. लेख प्रतिसादातल्या टंकनचुका सुधारून देणे, फॉरमॅटिंग सुधारणे, फोटो प्रकाशनातल्या समस्या सोडवणे अन अशी कितीतरी .
वर्षानुवर्षे संपादक मंडळी मिपाची व मिपाकरांची सेवाच करत आहेत. कळत नकळत आपण सर्वांनीच त्यांच्या सेवेचा लाभ घेतला आहे.
12 Sep 2015 - 10:35 am | कंजूस
एक अशा पेशंटचा किस्सा-
पनवेलच्या ( वडाळे तलावाजवळच्या ) अशा एका रुग्णालयात भेटायला गेलो.सरकत्या दाराचे कुलुप काढून नर्सने आत घेतले आणि लगेच कुलुप लावून चावी लपवली.
" हे पेशंट पळून जाऊ नये म्हणून कुलुप लावता का?"
"नाही, तुम्ही पळून जाऊ नये म्हणून."
"?????"
" काही जण वेड्या पेशंटला इकडेच सोडून जाऊ नये म्हणून त्याच्या एका नातेवाइकाला डांबून ठेवावे लागते."
दुसरा कोणी आला तुम्हाला बदली की तुम्हाला सोडणार."
एक दोन दिवस पेशंटला दोरीने बांधून ठेवतात.तो असंबंद्ध ओरडत असतो.कमी व्होल्टेजचे दोन तीन शॅाक दिल्यावर आणि गोळ्या खाल्ल्यावर पेशंट शांत होतो.तोपर्यंत तीन नातेवाइक एपीसी गोळ्या खाऊन राहतात.
12 Sep 2015 - 10:37 am | कंजूस
एक अशा पेशंटचा किस्सा-
पनवेलच्या ( वडाळे तलावाजवळच्या ) अशा एका रुग्णालयात भेटायला गेलो.सरकत्या दाराचे कुलुप काढून नर्सने आत घेतले आणि लगेच कुलुप लावून चावी लपवली.
" हे पेशंट पळून जाऊ नये म्हणून कुलुप लावता का?"
"नाही, तुम्ही पळून जाऊ नये म्हणून."
"?????"
" काही जण वेड्या पेशंटला इकडेच सोडून जाऊ नये म्हणून त्याच्या एका नातेवाइकाला डांबून ठेवावे लागते."
दुसरा कोणी आला तुम्हाला बदली की तुम्हाला सोडणार."
एक दोन दिवस पेशंटला दोरीने बांधून ठेवतात.तो असंबंद्ध ओरडत असतो.कमी व्होल्टेजचे दोन तीन शॅाक दिल्यावर आणि गोळ्या खाल्ल्यावर पेशंट शांत होतो.तोपर्यंत तीन नातेवाइक एपीसी गोळ्या खाऊन राहतात.
12 Sep 2015 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही जण वेड्या पेशंटला इकडेच सोडून जाऊ नये म्हणून त्याच्या >>>>>>एका नातेवाइकाला डांबून ठेवावे लागते."
दुसरा कोणी आला तुम्हाला बदली की तुम्हाला सोडणार."
=)) डोळ्यासमोर चित्र येऊन हहपुवा झाली.
-दिलीप बिरुटे
12 Sep 2015 - 11:51 am | कापूसकोन्ड्या
मला पण आता वाटते आहे की माझे मित्र येतील आणि गप्पा मारतील.
जबरदस्त किक बसली. अजून सावरतो आहे.
काय हे?
12 Sep 2015 - 1:58 pm | असंका
सुरेख सांगितलीत गोष्ट...
धन्यवाद...!!
12 Sep 2015 - 2:20 pm | द-बाहुबली
फार दिर्घ अन कंटाळवानी कथा आहे पण माझ्या मित्रांना ही कथा फारच आवडली त्यांनी ती पुन्हा पुन्हा वाचली आपल्यासाठी कौतुकास्पद प्रतिसादही दिला आहे. तुम्हला त्यातील कोनाच प्रतिसाद आवडला ?
12 Sep 2015 - 4:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ज्योतीतै जरा कथा १५-१६ भागात विभाजित करुन टाकत जा ओ. अश्या विषयांवरचा एवढा मोठा लेख वाचत नाहित बरेचं लोक्स. त्यापेक्षा स्प्लिट करुन टाका कथा.
12 Sep 2015 - 4:20 pm | अभ्या..
हम्म. स्प्लिट पर्सनॅलिटीचीच आहे ना कथा. करा स्प्लिट.
12 Sep 2015 - 4:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
"आमची" तयारी नाही =))
12 Sep 2015 - 4:28 pm | नाखु
"बाबा" कृपेने याची शशक केलीत तर फार फार उपकार होतील. आग्रही मागणी !
पाल्म्हणूनडायनासोरपहावेलागलेल्यासंख्य्मिपावाचक्भोवळगरगर्मेंदूगिरमिटुर्ध्वधाप्दमछाक संघा तर्फे "भागो वाचक भागो" अभियान आर्त विनंती.
12 Sep 2015 - 5:34 pm | प्रियाजी
कथा एकावेळीच पूर्ण वाचली. आवडली. या विषयाचा काही कारणाने अभ्यास केला होता त्यामुळे उत्सुकताही होती. तुमच्या लिहीण्याच्या पेशन्सलाही सलाम. तुम्ही कथेतील पात्रंही छान रंगवली आहेत. अशा व्यक्तींना ह्या आजारामुळे किती प्रचंड यातना होत असतील (इतरांचे आणि ह्या लोकांचे परसेप्शन वेगळे असल्यामुळे)ह्या कल्पनेनेच खूप वाईट वाटले. ह्या विषयावर अजून वाचायला जरूर आवडेल.
12 Sep 2015 - 7:02 pm | बाबा योगिराज
एकाच बैखटित वाचायचा प्रयत्न केला..... अजुन समाधान झालेले नाही. परत एकदा वचावेच लागेल.........
समजायला थोड अवघड आहे.
12 Sep 2015 - 7:30 pm | मनीषा
पेर्सेपशन?
म्हणजे काय?
कथा अंम्मळ मोठी असल्याने वाचू शकले नाही.
सारांश सांगाल का?
12 Sep 2015 - 7:35 pm | स्रुजा
वाचली मी कथा पुर्ण, आवडली.
पुढच्या वेळेस खरंच २ भागात टाका एवढी मोठी कथा असेल तर, पुढील लेखनास शुभेच्छा.
12 Sep 2015 - 8:32 pm | एस
आज रिकामा वेळ होता म्हणून पूर्ण कथा वाचली. अपेक्षेपेक्षा खरंच छान निघाली. परिच्छेद दोनदा पडलेले जाणवले नाही. फक्त ही कथा किमान चार-पाच भागांमध्ये टाकायला हवी होती.
पुलेशु.
12 Sep 2015 - 8:46 pm | पैसा
नक्की काय डबल आहे शोधायला बराच वेळ लागला!
12 Sep 2015 - 8:59 pm | एस
अरे वा! मस्त.
बादवे, मग ह्या कथेचे वेगवेगळे भाग पाडून प्रसिद्ध केले तर अजून वाचकांपर्यंत पोहोचेल असे वाटते. सगळे भाग एकदमच प्रसिद्ध केलेत तरी चालतील.
12 Sep 2015 - 9:27 pm | पैसा
वेगळ्या विषयामुळे कथेची 'गोष्ट' आवडली. आपल्याकडे मानसिक आजार हे अजून आजार समजले जात नाहीत हाच मोठा प्रॉब्लेम आहे.
या Schizophrenia च्या रुग्णांबद्दल खूप हळहळ वाटते. बिचारे भलत्याच कोणत्यातरी जगात जगत असतात. आणि सतत औषधे घेत रहाणार्यांची अवस्था खूप कठीण असते असे ऐकले आहे.
फक्त अलवनी बाईंनी जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे. तर हे लिखाण जास्त परिणामकारक वाटेल.
12 Sep 2015 - 10:36 pm | ज्योति अळवणी
आपण सर्वानी दिलेल्या सूचना लक्षात ठेवेन. काहिनी कथा वाचले आणि त्यांना आवडली हे वाचून बरे वाटले.
13 Sep 2015 - 1:18 pm | द-बाहुबली
कथा मस्तच आहे. एकादमात वाचलीही पण त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते मिपाकर कसे आहेत हे आपणाला समजणे.
आणि आता ते आपल्या लक्षात आलेही असेल. असो, टीकाही (अगदी वैयक्ती भासली तरी) सकारात्मकतेने घ्यायचा आपला उमदा अॅटीट्युड मला आवडला. आता इथे अजिबात थांबु नका.. नवीन नवीन लिखाण मिपावर करतच रहा. मिपावरील काही दर्जेदार लिखाण करणार्यांत आपण लवकर सामावीष्ट व्हाल असा विश्वास आहे. पुढील लिखाणाला शुभेछ्चा. लिखाण करायला आपल्याला कंपुचा न्हवे विचारांचा आधार लागतो ही नक्किच स्फुर्तीदायक बाब आहे. धन्यवाद.
13 Sep 2015 - 7:40 pm | सामान्य वाचक
.
12 Sep 2015 - 11:08 pm | एस
स्किझोफ्रेनियावर इंग्रजीतील 'अ ब्यूटिफुल माइंड' आणि मराठीतील 'रात्रआरंभ' हे चित्रपट छान आहेत.
13 Sep 2015 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार
याचा विषया वरचा सुमित्रा भावे यांचा देवराई हा चित्रपट सुध्दा चांगला आहे. अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांनी सुरेख कामे केली होती. अतुलने साकारलेला शेष, त्याची स्वप्ने आणि त्याच्या बहिणीची, सीनाची, आपल्या भावासाठी होणारी तडफड आठवली की अंगावर अजूनही काटा येतो.
जोती ताई कथा आवडली. एका दमात नाही वाचता आली पण शेवटपर्यंत खिळवुन धरलेत.
पैजारबुवा,
12 Sep 2015 - 11:37 pm | वैभव.पुणे
वाच्ता वाच्ता अन्गावर काता येत होता.
pअन एक्क कलाले नाहि. नेम्को आजार कोनाला होता???
13 Sep 2015 - 7:12 am | मुक्त विहारि
अभिनंदन....
(अद्याप तरी पुर्ण कथा वाचू न शकलेला) मुवि
13 Sep 2015 - 1:43 pm | द-बाहुबली
ते त्याला दिसतात,
ते तुम्हाला दिसत नाहीत,
त्यांनाही तुम्ही दिसता.
पण ते तुम्हाला दिसत नाहीत,
ते तुम्हाला स्विकारतात,
पण तुम्ही त्यांना स्विकारत नाही,
म्हणून तुम्ही त्याला आजारी म्हणता,
मग सांगा खरे आजारी कोण ? हाच आपला प्रश्न आहे ना ?
उत्तर फार सोपं आहे... आपण वास्तवाच्या केंद्रीत असतो वास्तव आपल्या केंद्रीत कितीही भासले तरी. म्हणूनच त्यांच्या (त्या खोट्या मित्रांच्या) अस्तित्वाची अवस्था जर तुमच्या इतकीच वास्तव नाही म्हणजेच जी जी सामान्य गोष्टी तुम्ही करु शकता त्या त्या ते करु शकत नसतील तर त्यांचे असणे हे भासमय होय. उदा. त्या मित्रांच्या समोर कॉफीचा कप ठेवा तुम्ही ठेवु शकालच पण ते उचलु शकतील का ? उचलला तर त्यांना तो आपटुन फोडायलाही सांगा ;)
13 Sep 2015 - 7:34 pm | प्रभाकर पेठकर
संपूर्ण कथा एकाबसणी वाचली. मेंदूच्या चिंध्या झाल्या.
कदाचित रुग्णाच्या मनोवस्थेचे यथोचित भान वाचकाला यावे आणि विषय समजण्यात सुलभता यावी म्हणून लिखाण एकाच मुद्द्याभोवती इतके गिरक्या घेत राहिले असावे.
अशा रुग्णाच्या सानिध्यात कधी आलो नाही. त्यामुळे समस्येची तीव्रता अनुभवलेली नाही.
'ब्युतीफूल माईंड' पाहिला आहे. अतिशय आवडला होता.
कथा थोडीशी 'थोडक्यात' मांडली असती तर कदाचीत जास्त परिणामकारक झाली असती, असं वाटतं.
13 Sep 2015 - 7:37 pm | द-बाहुबली
जरा कथा ६ भागांमधे येणारच आहे तर हा धागा अद्रुश्य व्हायला जनमताची हरकत नसावी.
13 Sep 2015 - 8:30 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त कथा आहे.
फारच उत्तम रित्या लिहिलिय
शेवटचा परिच्छेद निव्वळ अप्रतिम......
14 Sep 2015 - 1:18 am | ज्योति अळवणी
हां धागा अदृश्य झाला तर बरेच आहे पण कसा करायचा याची कल्पना नाही. शोधून बघितले पण मिळाले नाही. असो! पुढील भाग येतिलच. हा धागा आपोआप मागे पडेल.
14 Sep 2015 - 4:38 pm | संजय पाटिल
अरे बापरे!!!
रच्याकने, संपुर्ण कथा एका बैठकित वाचलि, आवडली.
14 Sep 2015 - 4:59 pm | ब़जरबट्टू
एका दमात वाचली, आवडली.. अपून तुकडो -तुकडो मी नही जिते.. :)
14 Sep 2015 - 5:47 pm | बॅटमॅन
थोडीच वाचली अन आवडली.
14 Sep 2015 - 6:15 pm | विजुभाऊ
या विषयावर मराठीत "रात्रआरंभ" नावाचा दिलीप प्रभावळकर अभिनीत सुंदर चित्रपट आहे.
14 Sep 2015 - 8:18 pm | मनिमौ
फक्त मोठी असल्याने मधे मधे पळवली आणि वाचली.