भाग १
"अग, हसतेस काय? खरच सांगतो आहे मी. राजन म्हणाला मला की तू गिताशी बोलू नाकोस. ती काही ना काही कारणाने तुला आमच्यापासून तोडेल." विक्रांत गंभीरपणे गिताला सांगत होता आणि गिता हसत होती. " कमाल करतेस ह गिता. मी काहीतरी सिरीयसली सांगतो आहे. बर हे फक्त राजानच मत नाही; प्रकाश आणि हरीच सुद्धा हेच मत आहे." आता मात्र गिताला थोडा राग आला. "विकी मी का तोडेन तुला तुझ्या मित्रांपासून? आपण फक्त काही दिवस झाले एकमेकांना ओळखायला लागलो आहोत. तेही कामाच्या संदर्भात. बर, तुझे मित्र तर तुझ्याबरोबर लहानपणापासून आहेत ना? मग ते तुला ओळखत नाहीत का? मी भले प्रयत्न केला तुला त्यांच्यापासून लांब करण्याचा; पण तू अस कोणाच एकूण तुझी जुनी मैत्री संपवणार नाहीस याची त्याना खात्री कशी नाही?" ती थोडी वैतागून म्हणाली.
"त्यांना खात्री आहे ग की मी अस कोणाच एकून आमची मैत्री तोडणार नाही. पण मी आपल आमच डिस्कशन सांगितलं तुला. जाऊदे तुला राग आलेला दिसतो आहे. सोड तो विषय." विक्रांत म्हणाला. तरी गीताच्या कपाळावरच्या आठ्या गेल्या नाहीत. त्यामुळे तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या बटेला फुंकर मारत तो हळूच म्हणाला;"तशी तू वैतागलीस की अजून छान दिसतेस ह." त्याचा हा डायलॉग एकून गिता हसली आणि विक्रमने छेडलेला विषय तिथेच संपला.
विक्रमने विषय संपवला अस त्याला वाटत असल तरी गीताच्या मनातून मात्र संध्याकाळचा विषय पूर्ण गेला नव्हता. म्हणून मग तिने जेवताना तो विषय आई-बाबांकडे काढला. गिताच्या घरी रात्रीचे जेवण सगळे एकत्र घ्यायचे. त्या निमित्ताने दिवसभर कोणी काय केले ते सांगितले जाते; म्हणून तिच्या वडिलांनीच हा नियम केला होता. स्पेशाली गिता मोठी झाल्यावर तर ते सुद्धा आवर्जून रात्रीच्या जेवणाला घरी पोहोचायचे. कारण ते हार्ट स्पेशालीस्ट होते आणि गीताची आई गाय्नाकोलोजीस्ट. दोघेही busy असायचे दिवसभर. मग एकमेकांना एकमेकांची खबरबात कशी कळणार? म्हणून हा नियम होता. गीताने साय्कोलोगिस्ट होण्याच्या निर्नार्य घेतला होता; त्याला तिच्या आई-बाबांनी कधीच विरोध केला नव्हता. एकूणच समजूतदार परिवार होता तो.
"गिता अग कस कळत नाही तुला. विक्रमला तू आवडायला लागली आहेस. पण अजून बहुतेक त्याला तुझ्या मनाचा अंदाज येत नाही आहे; म्हणून मग अस काहीतरी बोलून तो तुझी रिअक्शन बघत असेल." गिताची आई हसत म्हणाली. त्याला बाबांनी दुजोरा दिला. "खरच गिता बहुतेक त्याला तुला विचारायची हिम्मत होत नसेल. म्हणून मग हे अस, तुझ्या मैत्रीमुळे माझ्या जुन्या मित्रांपासून लांब जाईन... सारखे डाय्लोग्स तो बोलत असेल. याचा अर्थ स्पष्ट होतो ग... त्याला तू आवडतेस." अस म्हणून बाबा आणि आई दोघे हसले. पण गीताचं त्यांच्या बोलण्याने समाधान नाही झाल.
विक्रमची आणि गिताची ओळख अगदीच अलीकडची होती. गीताने नुकतच डॉक्टर खरातांच क्लिनिक जॉईन केल होत. विक्रम मात्र तिथे गेल एक वर्ष काम करत होता. गिता स्वतः साय्कोलोजीस्ट होती. विक्रम मात्र क्लिनिकमधल सगळ पेपर वर्क बघायचा. डॉक्टर खरात खूप मोठे साय्कोलोजीस्ट होते. त्यांच्याकडे अनेक पेशंट्स यायचे. प्रत्येक केस कॉन्फिडेन्शल असायची. त्यामुळे विक्रमशिवाय इतर कोणालाही डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केस पेपर्स मिळायचे नाहीत. त्याच फायालीलंग तो खूप व्यावास्थित करून ठेवायचा. खरात गिताच्या वडिलांचे मित्र असल्याने गिताला त्यांनी स्वतः आग्रहाने ट्रेनिंगसाठी ठेवून घेतलं होत. आणि तिथेच तिची विक्रमशी ओळख झाली होती. विक्रम स्वभावाने खूप चांगला होता. सरळ होता. गिताला कोणतेही केस पेपर्स पटकन काढून द्यायचा आणि अनेकदा एखादी जुनी केस तिला सांगायचा सुद्धा.
गिता त्याला एकदा म्हणालीदेखील होती;"विक्रम तू न साय्कोलोजीस्ट व्ह्यायला हवा होतास. तुला प्रत्येक केस नीट अगदी सगळ्या बारकाव्यांसहित माहित असते." त्यावर तो फक्त हसला होता.
"का बर विकीला अस वाटत की मी त्याला त्याच्या मित्रांपासून दूर करेन? आई-बाबा म्हणतात ते खर असेल का? पण मग मी जर आवडत असेन तर तो तस स्पष्ट सांगेल. त्याला उगाच गोल गोल नाही बोलता येत किंवा खूपस प्लानिंग करत असेल तो अस नाही वाटत. मुळात मी आवडण किंवा आमच एकत्र येण त्याला त्याच्या मित्रांपासून कस दूर करेल? का अस म्हणतात त्याचे मित्र? एकदा छेडून बघितल पाहिजे त्याला. जर त्याच्या मित्राना भेटता आल तर मस्तच. उगाच विकीच्या मनात अस काही भरवू नका हे सांगीन. मी असेन किंवा अजून कोणी दुसरी त्याच्या आयुष्यात. पण जर एकदा त्याच्या मनाने स्वीकारलं की त्याच्या आयुष्यात येणारी कोणीही मुलगी त्याला त्याच्या मित्रांपासून तोडेल तर मग हा विचार पुढे जाऊ शकतो. मग तर त्याला असे ही वाटायला लागेल की ती मुलगी त्याला त्याच्या घरच्या लोकांपासून पण तोडेल. अह! thats not right." गिता स्वतःशीच विचार करत होती. तिला तिच्या आई-बाबांचं मत फारस पटल नव्हत. कारण तिच्यातली साय्कोलोजीस्ट वेगळा विचार करत होती. पण दुसर कुठलही कारण तिच्या लक्षात येत नव्हत.
दुसऱ्या दिवशी तिने मुद्धाम विक्रमला छेडल. "काय मग विकी काल तुझे दोस्त काहीच म्हणाले नाहीत का माझ्याबद्धल." ती विक्रमकडे हसत बघत म्हणाली. पण विक्रम काहीच बोलला नाही. कामात busy आहे अस दाखवून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केल. तिला ते थोड विचित्र वाटलं. पण गीतानेसुद्धा ठरवलं होत की उगाच घाई करायची नाही. एकूण हा प्रकार काय आहे त्याची माहिती मात्र घ्यायची. कारण तिला खरच विक्रम आवडायला लागला होता.
विक्रम तसा शांत मुलगा होता. त्याला त्याचे वडील क्लिनिकला सोडायला यायचे. बहुतेक तिथून ते त्यांच्या कामाला जात असावेत. क्लिनिक उघडायच्या अगोदर १५-२० मिनिट विक्रम यायचा आणि त्या दिवसाच्या सगळ्या अप्पोइन्त्मेन्त्स प्रमाणे सगळे पेपर्स लावून ठेवायचा. ऑफिस संपूर्ण फिरून सगळ निट आहे न याची खात्री करून आपल्या जागेवर जाऊन बसायचा. पण मग मात्र तो त्या जागेवरून अजिबात उठायचा नाही. दुपारी लंचदेखील तो तिथेच घ्यायचा. अजून एक रीसेप्शानिस्ट होती. कारण फोन्स अटेंड कारण किंवा नवीन येणाऱ्या पेशंट्सशी बोलणं अशी काम विक्रम करत नसे. विक्रम त्या रीसेप्शानिस्टशी पण फारसा बोलायचा नाही. आणि तीसुद्धा स्वतःच्याच नादात असायची. पण गिताने क्लिनिक जॉईन केल आणि थोड्याच दिवसात तिची आणि विक्रमची मैत्री झाली. एक तर गिताला काही केसेसची माहिती हवी असायची. जुन्या कसेसचा ती अभ्यास करायची. त्यामुळे तीदेखील अनेकदा लवकर यायची. डॉक्टर येईपर्यंत मग अनेकदा गिता आणि विक्रम गप्पा मारायचे.
हळूहळू गिताला विक्रमची माहिती कळायला लागली. विक्रमची आई त्याच्या लहानपणीच गेली होती. घरात फक्त तो आणि त्याचे वडील होते. त्याची आजीदेखील होती. पण तिच आणि विक्रमच अजिबात पटायचं नाही. त्यामुळे ती त्यांच्याच बिल्डिंगमध्ये पण वरच्या मजल्यावर एकटीच राहायची. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. पण विक्रमला त्यात इंटरेस्ट नव्हता. त्याच्या वडिलांची डॉक्टर खरातांशी कधीतरी ओळख झाली होती आणि कॉलेज संपल्यानंतर एक वेगळा अनुभव मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी विक्रमसाठी डॉक्टरांकडे शब्द टाकला होता. डॉक्टरसुद्धा लगेच तयार झाले होते. कारण त्यांच्याकडे काम करणाऱ्या जुन्या जाणत्या कामातबाईना अलीकडे काम झेपत नव्हत. मग विक्रम यायला लागला आणि कामातबाईनी त्याला सगळ काम समजावलं. तो निट शिकला आहे याची खर्त्री झाली आणि मग कामातबाई यायच्या बंद झाल्या. आर्थात हे सगळ विक्रमने गिताला सांगितल होत.
वडिलांचा एवढा व्यवसाय असूनही विक्रम हे अस इथे क्लारिकल काम का करायला येतो ते गिताला कळेना. पण मग तिने तो विषय तिथेच सोडला. तसा विक्रम थोडा मुडी होता. त्यामुळे जर त्याच्या मनाविरुद्ध जास्त प्रश्न विचारले तर तो गप्प व्हायचा. किंवा चक्क दुर्लक्ष करायचा. म्हणून मग गिता त्याच्या कलाकलाने घ्यायची आणि तो जेवढी आणि जी माहिती ओघात सांगायचा ती एकूण घ्यायची.
प्रतिक्रिया
13 Sep 2015 - 5:47 pm | ज्योति अळवणी
आपणासर्वांच्या प्रतिसादांवरून हे लक्षात आल की संपूर्ण कथा एका बैठकीत वाचणे अवघड आहे. म्हणून ६ भागांमध्ये परत प्रकाशित करते आहे.
13 Sep 2015 - 5:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गुड वर्क!!
13 Sep 2015 - 6:19 pm | पद्मावति
मस्त!
खूप छान केलं तुम्ही. खरंतर ही कथा मी वाचायला सुरूवात केलीसुद्धा होती. खूप इण्टरेस्टिंग वाटत होती पण कथेच्या विस्तारा मुळे ती एका वेळेस वाचता येत नव्हती, त्यामुळे इतके चांगले लिखाण फक्त त्याच्या लांबीमुळे मला वाचायला होणार नाही की काय असे वाटत होते. आता मात्र छान सुटसुटीत झालीय कथा. छान लिहिलीय. सगळे भाग अर्थातच वाचणार आहे.
13 Sep 2015 - 5:50 pm | द-बाहुबली
कथा मस्तच आहे. अगदी एकादमात वाचलीही होती.
टीकाही (अगदी वैयक्ती भासली तरी) सकारात्मकतेने घ्यायचा आपला उमदा अॅटीट्युड मला आवडला. आता अजिबात थांबु नका.. नवीन नवीन लिखाण मिपावर करतच रहा. मिपावरील काही दर्जेदार लिखाण करणार्यांत आपण लवकर सामावीष्ट व्हाल असा विश्वास आहे. पुढील लिखाणाला शुभेछ्चा. लिखाण करायला आपल्याला कंपुचा न्हवे विचारांचा आधार लागतो ही नक्किच स्फुर्तीदायक बाब आहे. नवसदस्यांनी आपल्याकडुन शिकण्यासारखेही बरेच काही आहे.
कथा रोचक. धन्यवाद.
13 Sep 2015 - 5:50 pm | कविता१९७८
प्रतिसाद सकारात्मकरीत्या घेउन छोटे छोटे भाग टाकताय , छान केल
13 Sep 2015 - 6:02 pm | ज्योति अळवणी
द बाहुबली आपल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. आवड म्हणून लिहिते. जमेल तेव्हा... त्यामुळे जसे जमेल तसे मिपा वर टाकीनच.
13 Sep 2015 - 6:52 pm | कंजूस
मागचे अभिप्रायही इकडे कॅापी पेस्ट करा.छान.
14 Sep 2015 - 12:05 pm | असंका
आधीचा धागा उडला का?
मग काय , पुन्हा म्हणायला हवं-
सुंदर सांगतलीत गोष्ट!
धन्यवाद!
14 Sep 2015 - 12:13 pm | असंका
विक्रम / विक्रांत दुरूस्त करता आलं असतं....