हलले "दु"कान
गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी !
राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!!
सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर !
मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा!
दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी !
जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका !
द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण !
दिव्यमराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी !
भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !
होत असे डोक्याची मंडई !जुनाच तांब्या नवी कल्हई !
तिखट मुळा गोड गाजर !चिवट खुळा घोडं लाजर !
विसू :
- हा माझा प्रांत नाही,
- हे विडंबन नाही,नक्कल नाही
- यापूर्वी आणि या नंतरही कुठे प्रकाशीत नाही
प्रतिक्रिया
11 Sep 2015 - 9:41 am | प्रचेतस
येकदम झक्कास.
11 Sep 2015 - 3:54 pm | द-बाहुबली
11 Sep 2015 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार
शरदिनी ताईंचॆ आठवण करुन देणारी कविता.
पैजारबुवा,
11 Sep 2015 - 12:08 pm | प्रसाद गोडबोले
काहीही कळाले नाही
...
फक्त एक रेफरन्स कळाला .... दुत्त दुत्त नाखु काका ... आमच्या भावणा डुखावल्या :-\
पुढील कट्ट्याला आपल्याला अजिबात चकार एक शब्दही बोलण्याची मनाई करुन ह्याचा सुड उगवण्यात येईल .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
11 Sep 2015 - 3:29 pm | सस्नेह
काही कळले नाही. मराठीत भाषांतर करावे.
..(मठ्ठ) स्नेहा.
11 Sep 2015 - 3:39 pm | होबासराव
अर्रारा बाटग्याचा पार बाजार उठवला
11 Sep 2015 - 4:31 pm | अजया
:)
11 Sep 2015 - 5:52 pm | नया है वह
:)
11 Sep 2015 - 6:21 pm | जेपी
चांगलय.
11 Sep 2015 - 6:32 pm | दमामि
दुदुदुदुदुदुदुदुदु
11 Sep 2015 - 6:59 pm | शब्दानुज
माफ करा पण काहिच कळाले नाही.
11 Sep 2015 - 7:07 pm | सूड
लयबद्धता असती तर शरदिनी ताईंच्या काव्यमालेत शोभून बसेलशी रचना होती...टँजंट जाणारी!! =))
11 Sep 2015 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
=))
12 Sep 2015 - 12:04 am | रातराणी
मलाच नाही कळली का?
12 Sep 2015 - 11:12 am | मुक्त विहारि
असो,
पुढल्या भेटीत ह्या विषयावर एकदा चर्चा करू या.
12 Sep 2015 - 5:12 pm | नाखु
पहिलाच प्रयत्न होता कळला नाही म्हणून.: (मीच नीट माडण्यात ऊणा पडलो खरा)
मिपावर व मिपाबाहेरही विचारवंत म्हणतात जात-पात नको, जात-आरक्षण सोडा त्या वर हे भाष्य.
रेकर जिथे तिथे अगदी चांगल्या चर्चा धाग्यात जुन्या नव्या ओकार्या काढून किळस आणतात त्यावर
१२मती जाणता,आणि आत्ता मोर्चाची भाषा करीत आहेत.
देवेंद्राने जलयुक्त शिवार योजना थेट+समर्थ्पणे राबीवली आणि लोकप्रतीनिधींचा हस्तक्षेप-नियंत्रण टाळले त्याचे चांगले परीणाम झाले जलयुक्त शिवार योजना
पण लोक्प्रतीनिधींना मलीदा लाटता आला नाही.त्यांची कोल्हेकुई दोन महिन्यांपूर्वी आली होती.सकाळ्+पुढारीत.
लाटकरांनी दिव्यमराठीतून केलेली उसन्वारी आणि त्यांना मिळालेले मिपा प्रेमाचे आहेर.
गेल्या आठवड्यात आलेल्या जुन्याच विषयांवरील आक्रस्ताळी धुमाळी धागे त्यावर हे भाष्य.
अंतीम कडवे हे भंगार कवन कुणी रचलंय त्याची त्याला तरी याद रहावी म्हणून नाम निर्देशन.
होबासरावांच्या पारख्या नजरेला दाद.
12 Sep 2015 - 5:54 pm | प्यारे१
नाखून काकांचा कवितेच्या सपाटीकरणाबद्दल
जाहीर णि आनी शे आनी ढ.
कवीने आपली प्रसूति झाल्यावर कवितेबद्दल बोलू नये. दुर्बोधतेच्या जंगलाच्या भासामध्ये वाचकाला रसिकाला फिरू देत राहावं. त्यामुळे वाचकाच्या आकलनाच्या जाणिवा उंचावण्यास मदत तर होतेच त्याशिवाय ते कवीला साहित्यविश्वाच्या चौफेर क्षितिजाच्या अल्याड शोधन्याचा जोरकस प्रयत्न करत राहतात. असं केल्यानं त्यांची साहित्यिक खोली ऊंची आणि जाडी देखील वाढते.
वेळे अभावी सविस्तर प्रतिसाद राखून ठेवून पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो.
12 Sep 2015 - 6:32 pm | अभ्या..
हा ना.
न जाणो एखादे वेळेस दखल पण घेतली जायची. ;)
13 Sep 2015 - 10:35 am | प्यारे१
दखल-
लंगड़ा त्यागी बाहुबली, बाहुबली बाहुबली
बाहुबली लंगड़ा त्यागी असं ओरडणारा दीपक डोब्रायल आणि नैतर अपणा बच्चा है समझ जाएगा म्हणनारा ओमकारा अजय देवगण आठवले.
कइसन हो लंगड़ा?
ह घे रे.
14 Sep 2015 - 8:32 am | नाखु
सुचवण्यांची अंमल्बजावणी केली जाईल.
दुर्बोध चारोळीकर
13 Sep 2015 - 10:15 am | मदनबाण
नाखुरावांनी कवितेचे पोस्ट मार्टम केल्यावरच अर्थ कळला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
13 Sep 2015 - 1:48 pm | विशाल कुलकर्णी
खिक्क्क ...