शिर्षकविहीन
*************************************************************************************************
आज चार आठवड्यांनी तो परत येत होता. ह्या काळात 'कधी, काय करायचं' ह्याच्या हजारो रिहर्सल्स झाल्या होत्या त्याच्या मनातल्या मनात..
तीची प्रतारणा आठवून एसीतही डोकं तापलं त्याचं.. तिची रक्ताळलेली धडपडदेखील डोळ्यांसमोर नाचून गेली. कासावीस झाला तो..
..पण सगळं सेट होतं !
आणखी आठवड्याभरात 'मिसींग कंप्लेंट' द्यायची. मग एक निनावी फोन.. बॉडी सापडेलच.. इन्श्युरन्स क्लेमचं घबाड. लाईफ सेट है, बॉस !
...बेलच्या आवाजानं तंद्री भंगली त्याची. कोण तडमडलंय, च्यामायला?
..त्याला ढकलतच आत येत इंस्पेक्टर बोलले, "चार दिवस झाले बॉडी सापडून, साल्या.. मग कालपर्यंत चॅटींग कोण करत होतं बे तिच्या नावानं तुझ्याशी? आणि तेपण एकाच आयपी अॅड्रेसवरुन? पारच #@त्या समजतोस होय रे पोलिसांना, भडव्या?"
प्रतिक्रिया
5 Aug 2015 - 11:38 am | म्हया बिलंदर
मी पयला
5 Aug 2015 - 11:42 am | चिगो
इतक्या लवकर 'सिक्वल' का टाकली मी? तर कारण हे.. माझ्या शतशब्दकथेवर बर्याच जणांनी ती 'स्वयंपुर्ण' नसल्याबद्दल शंका व्यक्त केली. नसेलही बापडी. मला वाटतं, 'अबक' करत कथा समजवण्यासारखी परीस्थिती मिपावाचकांची नसावी. आता ही कथा वाचून पहील्या कथेचं 'रिव्हर्स रिडींग' करुन बघा, ही विनंती..
असो. ह्या सिक्वलचा आनंद घ्या. ह्या व्यतिरीक्तही अनेक प्रकारे ही कथा फुलवता येईल. संशयकल्लोळ/ त्याचं प्रेमप्रकरण/ इस्टेटीचं लफडं आणी बरचं इतर काही.. आणि काहीही न करताही प्रथम कथा एन्जॉय करता येईल, असं मला वाटतं. ट्राय टू एन्जॉय..
5 Aug 2015 - 11:47 am | मृत्युन्जय
सिक्वेल टाकायची घाई कशाला रे केली? काही लोकांना स्वयंपुर्ण नाही वाटली तसेच काही जणांना उत्कंठावर्धकही वाटलीच की.
5 Aug 2015 - 11:50 am | चिगो
पण त्या कथेचा दुसरा सिक्वल नसेलच, असं कशावरुन? पिक्चर अभी बाकी हें, मेरे दोस्त.. ;-)
5 Aug 2015 - 11:53 am | मी-सौरभ
उरलेल्या सिक्वल्स ची वाट पाहू
5 Aug 2015 - 12:34 pm | प्यारे१
उरलेला सीक्वल?
ट्रिक्वेल म्हणायचं का?
5 Aug 2015 - 11:51 am | मी-सौरभ
:)
5 Aug 2015 - 12:29 pm | एस
आवडली!
5 Aug 2015 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही सिक्वेल तर आवडलीच... आणि स्पर्धेच्या एक आणि इतर अनेक सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत :)
5 Aug 2015 - 12:50 pm | gogglya
+१
5 Aug 2015 - 1:02 pm | तुषार काळभोर
स्पष्टीकरणासाठी सिक्वेल आता देण्याची आवश्यकता नव्हती, अस माझं वैयक्तिक मत आहे. मूळ कथासुद्धा 'अॅज अ स्टॅण्ड अलोन' चांगली कथा आहे.
5 Aug 2015 - 1:05 pm | रातराणी
भारी आहे. कशाला टाकला लगेच?
6 Aug 2015 - 2:42 pm | निर्धार
एकदम झकास..!!!
लय भारी...!!!
6 Aug 2015 - 8:48 pm | राघवेंद्र
आवडली.
22 Aug 2015 - 9:41 am | नूतन सावंत
मस्त चिगो.
22 Aug 2015 - 9:43 am | नूतन सावंत
छन आहे.
22 Aug 2015 - 9:59 am | उगा काहितरीच
पहिला भाग छान होता.
23 Aug 2015 - 9:56 pm | बोका-ए-आझम
मी तो दुसरा सीक्वेल वाचला. तो जास्त आवडला. हाही छानच आहे.
24 Aug 2015 - 11:57 am | चिगो
अतर्क्य काय हो त्यात?
24 Aug 2015 - 3:45 am | रेवती
सिक्वल आवडला.
25 Aug 2015 - 2:28 pm | अन्या दातार
अगायायाया!!! काय ते सिक्वेल्स! भन्नाट. लवकरच टाकलेस सिक्वेल तेच छान झाले. नाहीतर आमची अवस्था "कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा?" सारखी झाली होती :D