गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
9 Mar 2015 - 6:31 pm

आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय.

आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ. शेवटी एका जवळच्या गल्लीबोळात एक झेरॉक्स कम चहा कम सिमकार्ड कम फोन रिचार्ज कम फॉल पिको कम परकर पोलकं कम अंडीविक्याचं दुकान सापडलं. त्याला दोन फोटोकॉपीज मागीतल्या. ह्यानी कॉपीज काढल्या आणि मशिनच्या मागच्या पिशवीमधे दोन कागद खुपसले. नेमके खुपसता खुपसता मला माझ्या पॅनकार्डची कॉपी खुपसली जातीये असा भास झाला. त्यानी माझ्या हातात माझ्या प्रती टेकवल्या. मला शंका आली म्हणुन मी त्याला पिशवी उघडायला सांगितली. तो उघडायला काही तयार होईना. म्हणे खराब झालेल्या प्रतिंची पिशवी आहे. माझी सटकली. गचांडी धरल्यावर त्यानी पिशवी उघडली. त्यामधुन माझ्या पॅनकार्डच्या दोन सुस्पष्ट प्रती निघाल्या. त्याचबरोबर इतर अनोळखी लोकांच्या पॅनकार्ड्स, ड्राईव्हिंग लायसन्स, वीजबिल वगैरेच्या जवळजवळ २५-३० प्रति होत्या.

त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले. पोलिसात जायची धमकी दिली. गयावया करायला लागला म्हणुन आत्ता सोडुन दिलाय. आता परत तिकडे गेलो की मित्राला किंवा दुसर्या कोणालातरी प्रत काढायला पाठवणार. जर त्यानी परत तसाचं प्रकार केला तर तो गेला बाराच्या भावात.

लिहायचं तात्पर्य असं की ह्या अश्या दुकानामधे फोटो़कॉपीज काढताना सावधान. आपल्या कागदपत्रांचा वापर कुठल्या कामासाठी केला जाईल ह्याचा काय भरवसा? आपल्या नावाने सिमकार्ड्स उचलुन किंवा अजुन काही कारभार करुन आपण अडकले जाणार नाही कशावरुन? इथुन पुढे मी जास्तीच्या अनावश्यक प्रती काढणार नाही आणि रिसिव्ह्ड चा शिक्का मारुन घेतल्याशिवाय कुठेही देणार नाही. एवढचं नव्हे तर फोटोकॉपी मशिनवाल्यावर जास्तीचं लक्ष राहिल इथुन पुढं माझं.

ह्या सगळ्या प्रकारावरुन आधी घडलेल्या एका प्रकाराचीही आठवण झाली. एअरटेलला मी नंबर जवळ जवळ पाच वर्ष वापरल्यावर लक्षात आलं की माझी के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हरवलीत ते. ही डॉक्युमेंट्स जमा नं केल्यास ४८ तासात फोन बंद करु असा नोटिसवजा फोन त्यांनी केला. एअरटेल सेंटर मधे ह्या प्रकाराची चौकशी करायला गेल्यावर तिथे माझ्यासारखेचं ४-५ जणं आलेले दिसले. आम्ही सेंटर मॅनेजरला के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हवी आहेत हे लेखी मागितलं. ते द्यायला तो टाळाटाळ करायला लागला. मग गरमागरमी झाल्यावर त्यानी लेखी मागणी लिहुन ४-५ जणांना त्याच्या कॉपीज दिल्या त्यानंतरचं मी ते डॉक्युमेंट्स परत दिले. खरं खोटं माहित नाही पण आयडिया बद्दल एक अशी गोष्ट ऐकली होती की अमहाराष्ट्रीयन मंडळी ज्यांच्याकडे निवास पुरावा नसतो त्यांना ही कागदपत्र लागतात म्हणुन जाणुन बुजुन असे प्रकार केले जातात.

तेव्हा पुढच्या वेळी अशी महत्त्वाची कागदपत्र प्रत काढायसाठी द्याल तेव्हा नक्की डोळ्यात फोडणी घालुन लक्ष द्या. दिवस खराब आहेत. आपल्या कागदपत्रांचा बेजबाबदार वापर झाल्यास तुम्हालाचं जबाबदार धरलं जाउ शकतं. प्रिव्हेंशन इज बेस्ट मेडिसिन.

मांडणीतंत्रअर्थव्यवहारप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2015 - 6:42 pm | पिलीयन रायडर

आई शप्पत!! असं होऊ शकतं हे कधी लक्षात नाही आलं.. धन्यवाद..

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2015 - 7:05 pm | अत्रन्गि पाउस

पण हल्ली कोणत्याही झेरोक्स मशीनवर शेवटच्या डॉकुमेंत ची 'स्कॅंन्द' कॉपी मशीन मध्ये असते असे वाटते ...
खरंय का ते ??
तसं असेल तर मुख्य काम झाल्यावर एक फालतू झेरोक्स मुद्दाम शेवटी काढली पाहिजे

असंका's picture

9 Mar 2015 - 7:08 pm | असंका

म्हणून तर

पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं

असावं...

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2015 - 7:29 pm | अत्रन्गि पाउस

हे प्रत्येक वेळी रिसेट कसे करणार ??
काय साला डोक्याला ताप आहे ...जरा म्हणून कुठे विसंबून राहता येत नाही ...
फसवणुकीचे दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकार येतातच आहेत ...

सौन्दर्य's picture

9 Mar 2015 - 7:14 pm | सौन्दर्य

खूपच उपयुक्त आणि काळजी घेण्यासारखी माहिती. कॅप्टन आभार.

बापरे! धक्कादायक आहे. यापुढे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार.
धन्यवाद हो साहेब!

सुहास झेले's picture

9 Mar 2015 - 7:29 pm | सुहास झेले

खोटे लोन करून देणारे साक्षीदार असेच जमवतात... जेव्हापासून मशीन्स अधिकाधिक डिजिटल झाल्या तेव्हापासून मी ओळखीच्या दुकानातच झेरॉक्स वगैरे काढतो...

एक एकटा एकटाच's picture

9 Mar 2015 - 7:34 pm | एक एकटा एकटाच

साले पैश्यासाठी कुठल्याही थराला जातील ही लोकं

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 7:36 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या देशात हे सगळं घडते कारण बहुतांश सरकारी प्रक्रीयांमध्ये अविश्वासाचे धोरण. या मुद्द्यावर श्री संदीप वासलेकर यांनी उत्तम भाष्य केले आहे - विश्वास ठेवायला शिका.

अमेरिकन सोशल सिक्युरिटी नंबरप्रमाणे कधी एकदा आधार कार्ड क्रमांक तोंडी सांगून किंवा अर्जावर भरून कुठलेही कागदपत्र न दाखवता भारतात सामान्य माणसांची कामे होतील तो सुदीन.

उदाहरण म्हणून सांगतो - अमेरिकेत कुठल्याच ठिकाणी छायाप्रती घेऊन जावे लागत नाही. मुळात सोशल सिक्युरिटी क्रमांकच पुरेसा असतो (त्याचाही पुरावा दाखवावा लागत नाही). व्हिसावर राहणार्‍या परदेशी नागरिकांना व्हिसाची प्रत द्यावी लागते. परंतु मूळ कागदपत्र त्या कार्यालयात न्यायचे तेथील कर्मचारी आपल्यासमोर छायाप्रत काढतो / काढते अन मूळ कागदपत्र आपल्याला लगेच परत केले जाते.

सध्याच्या केंद्र सरकारने सेल्फ अटेस्टेशन अधिकॄत करून या दिशेने चांगली सुरुवात केली आहे.

चला इथून पुढे ऑफिसात प्रिंट काढत जाईन. आणि घरी ज्यादा प्रती ठेवेन.

मलाहि सकाळि पेट्रोल पम्पावर असाच फसवेगिरिचा अनुभव आला. २०० चे पेट्रोल टाकायला सन्गित्ल्यावर ५० चेच टाकले आणि लक्शात आल्यावर त्यातच १५० करुन म्हन्तो आधिचे ५० आणि आता १५० मन्जे २०० चे झाले त्याने त्यातच १०० चे एड केले त्यातच दुसरा विचार्तोय कार्ड पेमेट करनार कि काय(लक्श विचलीत करण्यासाठि). जेव्हा झापला तेवा लगेच म्हन्तो २०० पुर्ण करतो.पेट्रोल पम्पावर पैसे डायल केल्याशिवाय पेत्रोल घेवु नये.

चौकटराजा's picture

10 Mar 2015 - 10:10 am | चौकटराजा

ही मोडस ऑपरेंडी कॉमन आहे. अगोदर पेट्रोल टाकीचे झाकण उघडून ठेवणे . मग शून्याची खात्री करून घेणे. व मग मोठ्या
खणखणीत आवाजात आपल्याला किती पेट्र्रोल हवे ते सांगणे. दरम्यान त्याने काहीही घाई केली तरी भीक न घालणे. हा क्रम
ध्यानात असू द्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2015 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या कागदपत्रांचा दुसरा वापर करणार नाही याची दक्षता घ्यायला लावणारा अनुभव.
आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

स्वैर परी's picture

9 Mar 2015 - 8:14 pm | स्वैर परी

फसव्यान्चि दुनिया अजुन काय!

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Mar 2015 - 8:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

सामान्यतः आपण या गोष्टी फार गंभीरपणे घेत नाही आणि लोक त्याचा नेमका फायदा उचलतात जसे की हे लेखातले उदाहरण. अजुन एक उदाहरण म्हणजे कुठल्याही ऑफिसात प्रिंटरशेजारी पडलेले अनावश्यक प्रिंट आउट..कितीवेळा त्यात पॅन कार्ड ,पासपोर्ट, फॉर्म १६,सॅलरी स्लिप अशी महत्वाची कागदपत्रे असतात. ऑफिसात स्टाफ शिवाय ईतरही लोक जात येत असतात, त्यांना ही कागदपत्रे सहज मिळु शकतात आणि त्याचा दुरुपयोग होउ शकतो.शेवटी आपली काळजी आपल्या हाती.
इन्फोर्मेशन सिक्युरिटी या विषयात असे बरेच काही कव्हर होते. सी. आय.एस्.एस्.पी. ही त्यासठीची परिक्षा आहे/ किंवा सर्टीफिकेशन आहे.
डोअर सिक्युरिटी (गार्ड),अक्सेस सिक्युरिटी,इंटरनेट सिक्युरिटी, पासवर्ड सिक्युरिटी, डिव्हाईस सिक्युरिटी,डाटा सिक्युरिटी असे अनेक विषय आहेत. असो...सध्या ईतकेच

वेल्लाभट's picture

9 Mar 2015 - 8:28 pm | वेल्लाभट

पोलीसात का नाही गेलात? तडीस लावायचा होतात प्रयत्न. उगीच लोकमत, झी २४ तास वगैरेंना ट्वीट करून कळवायचं. फुल वाट लावायची.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मलाही आता तसचं वाटायला लागलयं. काही प्रॉब्लेम नाही. २-३ दिवसात पत्रकार मित्राला लावीन कामाला. जर असा प्रकार परत केला त्यानी तर त्याला पोलिसात नक्की देणार.

पॉइंट ब्लँक's picture

9 Mar 2015 - 8:41 pm | पॉइंट ब्लँक

पोलिसात माहिती द्यायला हवी होती. कमित कमी एक निनावी फोन तरि ठोकायचा.

संदिप एस's picture

9 Mar 2015 - 8:37 pm | संदिप एस

एक खबरदारीचा ऊपाय म्हणून, झेरॉक्स देतांनाच तेथे खाली सही आणी तारिख लिहील्यावर Submitted For..... ( To get New Airtel connection/to Issue Citibank Credit Card only) असे सेल्फ डिक्लेअर करून द्यावे असे बँकेतीत्ल एका मित्राने सांगितले होते.

प्रभाकर पेठकर's picture

10 Mar 2015 - 11:31 am | प्रभाकर पेठकर

येस. प्रत्येक छायाप्रत कशासाठी दिली आहे ते कारण आणि तारीख टाकूनच द्यावे. आपल्या कागदपत्रांचा वापर नविन सीमकार्ड घेण्यासाठी अतिरेक्यांकडूनही होतो. आणि नंतर सापडल्यावर आपल्या मागे उगीचच पोलीसांचे शुक्लकाष्ट लागू शकते.

रवीराज's picture

11 Mar 2015 - 10:22 pm | रवीराज

उपाय चांगला आहे

मराठी_माणूस's picture

9 Mar 2015 - 8:44 pm | मराठी_माणूस

त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले

हे सगळे त्याने का केले हे त्याच्या कडुन वदवुन घेतले का नाही ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Mar 2015 - 8:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो कॅप्टन हे तरी एकवेळी समजले की डॉक्युमेंट फ़ेकिंग करुन कशी फोर्ज सिमकार्डस उचलली जातात मुख्य भीती सिमकार्डसचीच असते ! इंफॉर्मेशन ब्लास्ट च्या ह्या युगात सेल्फ आइडेंटिटी (शब्दशः) जपणे हे बी एक महतकार्य होय!!!

रच्याकने, अगदी रेल्वेत पण तत्काल बुकिंग करताना कधीही पॅनकार्ड आयडी प्रूफ म्हणून देऊ नये!! कारण बरेच लोकं बेनामी ट्रांसेक्शन ची नवी पद्धत म्हणुन हे पॅनकार्ड नंबर्स बोगी बाहेर चिकटवलेल्या रिजर्वेशन चार्ट्स वरुन नोट करुन नेतात अन ती कार्ड्स फोर्ज करुन कॅश ट्रांसेक्शन ला वापरतात (नेमके कसे ते नाही माहिती पण आम्हाला सुद्धा इंट विंग कडून अश्या इंस्ट्रक्शन आल्या होत्या)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 9:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. डिजिटल वाटमारीचीच जास्त चलती आहे सद्ध्या.

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 May 2015 - 7:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

हा प्रकार मुंबईत घडलेला. बेनामी व्यवहार, सोने खरेदी यांसाठी सर्रास टोळ्या चार्टवरून ते सराफ आणि इतर ठिकाणी द्यायच्या. पण हल्ली रेल्वेने पॅन क्रमांक पूर्ण छापणे बंद केलेय. फुल्या मारून देतात ते.

hitesh's picture

9 Mar 2015 - 9:06 pm | hitesh

माझ्या नावे कुणीतरी अएअर सेल चे कनेक्शन घेतले होते. मला खुप त्रास झाला

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 9:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डु-कनेक्शन इज ऑफेन्स.

पक्के पुणेकर दिसता चिमणराव.. या गोंधळात पण टोमणा मारायचे परमकर्तव्य काही विसरला नाहीत.. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 9:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही. पिंपरी चिंचवडकर =))

टोमणा नै ओ....खरचं सांगतोय.

Impersonating what you are not is a severe crime. :D :D :D

चिउ, आता काउने ऐकलंच तुमचं. :))))

(तुम्ही सांगताय त्याच्याशी सहमतच, तरी पण )

बादवे, पिंचिंकर काय.. ब्वॉरर्र.. ;)

बाप रे!मला ही सवय आहे कधीही कुठेही झेराॅक्स काढायची.आता न कंटाळा करता घरीच प्रिंट मारत जाईन.

मंदारपुरोहित's picture

9 Mar 2015 - 9:10 pm | मंदारपुरोहित

इथे USA मध्ये पण असे प्रकार होतात. माझ्या एका मित्राचे Tax Return कोणीतरी IRS ला भरून टाकले आणि माझा मित्र भरायला गेला तर त्याचा duplicate म्हणून reject झाला. USA मध्ये Tax Refund बराच मिळतो त्यामुळे तो आता टेंशन मध्ये आहे. त्या ज्या कोणी Tax Return भरला त्याने रिफंड साठी स्वताचे अकौंट दिले तर त्याला पैसे मिळतील. माझा मित्र आता IRS च्या वारया करतोय

योगी९००'s picture

9 Mar 2015 - 9:43 pm | योगी९००

खूप चांगली माहीती दिलीत. आता यानंतर क्षेरॉक्ष ओळखीच्या कडून नाहीतर ऑफिसमधूनच काढीन...

या लेखाची लिंक "whatsapp" वर देऊ काय? म्हणजे उगाच फालतू जोकपेक्षा अशी information सगळ्यांना वाटली तर हा awareness वाढेल असे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नक्की द्या.

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2015 - 10:34 pm | अत्रन्गि पाउस

मी पण देतोय

अत्यंत उपयुक्त कीस्सा, माहीती आणि प्रतीसाद !

धन्यवाद कॅप्टन !!

झकास's picture

9 Mar 2015 - 11:44 pm | झकास

बाप रे. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद. आता इथून पुढे लक्ष ठेवावे लागणार!

पण कधी कधी लोक फारच गलथान असतात. मागल्या महिन्यात एका restaurant मध्ये क्रेडीट कार्ड चा पिन enter करण्यासाठी गेले असताना तिथला waiter म्हणाला "तुम्ही स्वतः आलात होय? लोक आम्हाला card देताना pin सुद्धा सांगतात. आम्हीच enter करतो."

आता बोला!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कार्ड स्वाईप रुल १

कोणालाही पिन सांगु नका. :D

अशा आळशी लोकांना फटका बसायलाच हवा.

सांगलीचा भडंग's picture

10 Mar 2015 - 2:18 am | सांगलीचा भडंग

आत साधे फोटो कॉपी करताना पण लक्ष ठेवावे लागणार :-(. बर्याच दुकानात मशीन थोडे आत पण असते

स्पंदना's picture

10 Mar 2015 - 3:14 am | स्पंदना

अत्यंत उपयुक्त माहिती. एका आय्डी कार्डवर खरतर सगळी माहीती मिळाली पाहिजे, नाहीतर यांच्या पुढ्यातले ते कंप्युटर्स काय कामाचे?

देशपांडे विनायक's picture

10 Mar 2015 - 4:18 am | देशपांडे विनायक

सगळे प्रतिसाद वाचून अस वाटतय की CRIME PATROL DASTAK
पाहणे TIME PASS नाही तर !!
कारण प्रतीसादामधील आणी मूळ लेखातील प्रसंग मी येथे पाहिले

संदीप डांगे's picture

10 Mar 2015 - 5:23 am | संदीप डांगे

धाग्याचं शिर्षक वाचून वाटलं उघडकीस आलेल्या चौर्यकर्माबद्दल आहे की काय? :-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 7:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चोरीचं पकड्या मालक...वो भी रंगे हाथं...!!

नाखु's picture

10 Mar 2015 - 8:58 am | नाखु

भारी काम केल्त की !
तरी म्हटल विनासायास ह्या बांग्ल्या/उ.भा. घुसखोरांना सगळे सरकारी पुरावे कशे मिळ्तात ते!
भेंडी आता फकस्त चोक्कस ठिकाणी कॉपी काढावी. आर टी ओ,राशन विभाग्,कोर्ट याच्या आसपास नक्कोरे बाबा!
व्यनीत नाव दे जरा त्या महान ठिकाणाचे (भेट देईन जरा)

चौकटराजा's picture

10 Mar 2015 - 10:17 am | चौकटराजा

समजा माझी पॅन झेरोक्स वा आधार कार्ड झेरोक्स एखाद्याने आधार म्हणून घेतले. तरी मुख्य व्यवहारासाठी काहीतरी दस्त
झाला असणारच ना त्यावर माझी सही नसेल तर मला कोणता धोका संभवतो ? माझ्या नावाने सिमकार्ड घेतले जाउ शकते ? मग त्याच्या अर्जाच्या पानाला जास्त कायदेशीर अर्थ असेल की झेरोक्स ला ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 10:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते व्हेरिफाय होईपर्यंत मनस्ताप तर होणारचं ना पण. शिवाय बनावट सह्या वगैरे प्रकारही आहेतचं की.

मी तर चक्क प्रत्येक ठिकाणच्या सह्या वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. कंपनीतली सही बँकेत नाही, बँकेतली सही दुसरीकडे कुठे नाही. कुरियर, डिलिव्हरी व्हाउचर्स वगैरेंवर वेगळी सही. कोणावरही विश्वास टाकता येणार नाही अशीच परिस्थिती आहे.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2015 - 5:38 pm | अत्रन्गि पाउस

जरा एक वेगळा धागा काढून लिहा कि ह्यावर ...
म्हजे हे सगळे सुचले कसे ...काही प्रॉब्लेम्स आले का ...नवीन जर कुणाला करायचे असेल तर काय करावे ...फायदे तोटे ...

२००७ मधे एक रिलायन्स डाटाकार्ड घेतले. ते ५ वर्ष वापरुन बंद केले. नंतर पेंडिग बिलाचा तगादा सुरु. त्याना डाटाकार्ड चा नंबर विचारला तो दुसराच! कागदपत्रे मागवली तेव्हा कळाले कि मी दिलेली कागदे दुसर्या कार्ड साठी वापरण्यात आली होती, आणि सही चुकिची. अजुनही फोन येतात.

सर्वसाक्षी's picture

10 Mar 2015 - 12:25 pm | सर्वसाक्षी

परदेशात हॉटेल सोडताना कधीही चाविपत्र परत देउ नका, दिलेतच तर मोडुन द्या किंवा त्यावर चुंबक फिरवुन द्या.

हॉटेलात दाखल होताना पारपत्र आणि ज्याने देयक चुकते करणार ते पतपत्र दिल्यावर मगच खोली ताब्यात देतात. आपल्या चावीपत्रावर आपले पारपत्र आणि आपले पतपत्र यांचा तपशिल नोंदलेला असतो. अनेकदा पंचतारांकित हॉटेलचा कचरा हे चोरांचे धन ठरते. आपले चावीपत्र आपण परत केले तर कदाचित त्याचा गैरवापर केला जाऊन आपला तपशिल चोरला व वापरला जाऊ शकतो. हल्ली हॉटॅलवालेही चावीपत्र परत मागत नाहीत.

अरे देवा! ही आणखी नवी माहिती.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2015 - 5:39 pm | अत्रन्गि पाउस

+१

आदिजोशी's picture

10 Mar 2015 - 8:13 pm | आदिजोशी

समजेल अशा मराठीत लिहिलेत तर बरं होईल.

आपण जे लिहिलंय या प्रकारचे दावे अन माहिती पूर्वी ढकलपत्रांतून सर्रासपणे पसरविली जायची. उदा. ATM Pin Reversal Myth. हि माहिती इथे देण्यामागचा उद्देश इतरांना सावध करणे आहे याबाबत कसलीही शंका नाही. परंतु असे काही वेगळे वाचले ऐकले की प्रथम त्यावर अधिक शोध घेणे इष्ट.

या मुद्द्यावर जालावर शोध घेतला असता ते सत्य असल्याबाबत एकही दुवा मिळाला नाही. पण अफवा असल्याबाबत बरेच मिळाले.

चाविपत्र = Key Card; पारपत्र =Passport; पतपत्र = Payment (Debit / Credit) Card

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2015 - 6:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एटीएम पिन रिव्हर्सल एवढा मुर्ख पर्याय कधीही पाहिलेला नाही. एखाद्याचा पिन "मिरर नंबर" असेल तर काय करणार उदा. १००१, ६८८६ वगैरे वगैरे.

रॉजरमूर's picture

8 May 2015 - 12:26 am | रॉजरमूर

चावीपत्र म्हणजे ?

नाही समजले .

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2015 - 12:41 am | श्रीरंग_जोशी

स्मार्टकार्ड स्वरुपातली रूम की.

1      2      3

नन्दादीप's picture

10 Mar 2015 - 12:56 pm | नन्दादीप

ह्म्म्म्म्म्म.... वाचल चे.पु. वर... आपणच का ते???

नन्दादीप's picture

10 Mar 2015 - 12:56 pm | नन्दादीप

चे.पु. वरची तात्यांची ओसरी...

अरेरे ,हाफशेंच्युरी झाली अजुन कुणी सत्कार केला नाय.असो ,हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.चिमणरावांचा सत्कार सलामी देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी समस्त मिपा संन्यासी कार्यकर्ते

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 10:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

संन्यस्थ लोकांना संसार आणि सत्कार दोन्ही करायची पर्मिशण णसते ह्याची समस्त संण्याशी वर्गाणे णोंद घ्यावी :)

खटपट्या's picture

10 Mar 2015 - 10:05 pm | खटपट्या

आणूमोदने !!

नाखु's picture

13 Mar 2015 - 10:34 am | नाखु

फक्त फ्लेक्ष लावलाय प्रत्यक्ष सत्कार सन्यासांतून आल्यावर भगव्यावस्त्रांसहीत करणार असा आमचा सत्कारवाडीचा वार्ताहर कळवतो.
दै:अंद्या का आनंद

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 11:17 pm | कपिलमुनी

सोसायटीच्या बॉक्स मध्ये टाकलेली लाईट बिले फोन बिले क्रेडिटकार्ड बिले चोरून वापरतात

यशोधरा's picture

12 Mar 2015 - 5:56 am | यशोधरा

बापरे!

ह भ प's picture

9 May 2015 - 6:11 pm | ह भ प

त्यामुळं मी सगळ्या कागदपत्रांना स्कॅन करुन त्यांच्या सॉफ्ट कॉपीज मेल वर ठेउन घेतल्या आहेत. गरज लागेल त्या वेळेला कॅफे मधे जातो अन प्रिंट्स घेतो.. झंझट नक्को..शिवाय घरात एक सेट तयार करून ठेवला आहे.. अडीअडचणीला कामाला येतो. :)

चौथा कोनाडा's picture

9 May 2015 - 10:56 pm | चौथा कोनाडा

तुमचे मेल अकाउंट हॅक झाले तर चोरट्यांच्या हाती आयते घबाड मिळणार !
काही दिवसांपुर्वी अश्याच आशयाची एक बातमी वाचल्याचे स्मरते !
मेनी थिंग्ज ऑन नेट आर सोशल नाऊ डेज !