फोटो ओळखा.

Primary tabs

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
5 Mar 2015 - 12:26 pm

नमस्कार.

मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.

जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.

काही सोपे नियम -

एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया

तिथे दारावरच लिहिलंय की चेक कॅसल म्हणून?

पैलवान's picture

7 Mar 2015 - 12:04 pm | पैलवान

ती जाहिरात आहे, तेथे त्यावेळी चालू असलेल्या प्रदर्शनाची .
बांधणीवरून हिमाचलप्रदेश्/लद्दाख्च्या बाजूचं बांधकाम वाटतं.

लेह पॅलेस..

खंडेराव's picture

7 Mar 2015 - 12:35 pm | खंडेराव

हो। हा लेहचा पलेस..

:-)

मीपण गुगललं होतं...पण उत्तर सांगणं मंजे कॉपी केल्यासारखं वाटत होतं म्हून कायतरी टैम्पास लिवलं...

पैलवान's picture

7 Mar 2015 - 1:52 pm | पैलवान

:)
असु द्या हो...

@गूगलः जरी बाप सार्‍या जगाचा तरी तू आम्हा लेकरांची सर्च माउली...

पुणेकर भामटा's picture

6 Mar 2015 - 9:10 pm | पुणेकर भामटा

क्र. ३ हा दिल्लि मधिल असावा... मेट्रो च्या आसपास पाहिल्या सारखा वटतो....

विनोद१८'s picture

6 Mar 2015 - 11:37 pm | विनोद१८

..उत्तर प. मधला आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Mar 2015 - 2:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

@ विनोद१८

मला असे वाटतय की फोतो क्र ३ मधला हनुमान पंजाबमधल्या पठाणकोट च्या जवळपास कुठेतरी आहे.

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2015 - 10:15 pm | श्रीरंग_जोशी

Guess the place

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Mar 2015 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार

अखिलविश्वाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या विश्वविख्यात ऐतिहासिक पुणे शहरातला सुप्रसिध्द तळ्यातला गणपती असलेल्या सारसबागेजवळचे, सावरकर पुतळ्याच्या पाठीमागे, मित्रमंडळ चौकातुन थोडे पुढे आले की लागणार्‍या मुठा उजव्या कालव्याच्या बाजूला पुणे महानगर पालिकेने विकसीत केलेले नाला पार्क आहे हे.

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2015 - 9:39 am | श्रीरंग_जोशी

एकदम बरोबर, पैजारबुवा.

पुणे मनपाने केलेल्या सौंदर्यीकरणाला 'नाला' पार्क असे म्हणणे जरा बरोबर वाटत नाही पण चालायचेच.

काय बरोबर ते तरी सांगा मग जोडीला...

बागुल उद्यान, सहकारनगर, पुणे ९

(पण सगळं जग त्याला नाला पार्कच म्हणतं.
बाकी तीन वर्ष तिथं शेजारी राहून मला नाला पार्क नाय वळखता आली म्हण्जे लानत हाय राव.... )

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 10:50 am | श्रीरंग_जोशी

:-)

नाला पाक म्हणून एक दक्षिणी उपहारगॄह पाहिले आहे ;-).

Olkha Pahu

ओळखा पाहू

पैजारबुवा,

सुनिल पाटकर's picture

8 Mar 2015 - 3:36 pm | सुनिल पाटकर

शिवाजी महाराज समाधी रायगड

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2015 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी

या फोटोमध्ये माझा एक मित्र व त्याच्या मातोश्री आहेत.

Guess the place

खंडेराव's picture

9 Mar 2015 - 9:38 am | खंडेराव

पश्चिम महाराश्त्रातील किल्ला आहे? पन्हाळगड?

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 9:46 am | श्रीरंग_जोशी

पश्चिम महाराष्ट्रातील किल्ला आहे पण पन्हाळगड नाही.

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 10:05 am | प्रचेतस

अजिंक्यतारा आहे का?

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 10:09 am | श्रीरंग_जोशी

नाही हा अजिंक्यतारा नाही.

पुण्यापासून जवळच आहे.

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 10:11 am | प्रचेतस

मग नक्कीच मल्हारगड असेल.

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 10:23 am | श्रीरंग_जोशी

२००७ साली मनोगतावरील हा लेख वाचून लगेच मल्हारगडाचा ट्रेक केला होता.

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 10:26 am | प्रचेतस

मल्हारगड खूप पूर्वी पाहिला असल्याने अतिशय पुसटसा असा लक्षात होता.

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 10:25 am | प्रचेतस

a

अन्या दातार's picture

9 Mar 2015 - 10:34 am | अन्या दातार

भाजे?

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 10:34 am | प्रचेतस

नै ब्वा. :)

हे मंजे फार मंजे फारच अति जालं....ते टीवीवाले करतात तसं...सिरीयल बघा आणि आम्ही इंटरवल मध्ये विचारू त्या प्रश्नांची उत्तरे द्या.... :-))

अहो आपल्याच एका धाग्यातल्या आपल्याच एका प्रतिसादातला फोटो आहे हा... लिंक ही देणार होतो..पण शोध्णार्‍यांना शोधू द्या म्हणून देत नै...

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 11:17 am | प्रचेतस

हाहा. :)

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 3:41 pm | कपिलमुनी

भंडारा डोंगराच्या मागच्या वाटेने खाली उतरताना काही गुफा आहेत तिथेच आहे.

आपला फोटो...? मंजे कुठली जागा ओळखायची असेल त्याचा हो...टाका की लवकर...

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 4:20 pm | प्रचेतस

बरोबर मुनिवर.:)

ह्या गुहा अगदी अलिकडच्या काळापर्यंत कुणालाच माहित नव्हत्या. ह्यांना उजेडात आणण्याचे श्रेय दामोदर कोसंबींचे.

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 4:25 pm | कपिलमुनी

म्हणजे कधीपर्यंत ?

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 4:33 pm | प्रचेतस

साधारण ५०/६० च्या दशकात.

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2019 - 5:22 pm | चौथा कोनाडा

बेडसे ?

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 4:15 pm | कपिलमुनी

apsara

माझ्यासाठी खूपच सोपं दिलंय.

सुरसुंदरी शालभंजिका - गोंदेश्वर मंदिर, सिन्नर :)

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 4:43 pm | कपिलमुनी

तुझा एक्सपर्ट प्रांत आहे :)
रुमाल टाकून दम धरायचास की ;)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2015 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा

@रुमाल टाकून दम धरायचास की ;)>>> +++१११ :-/

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 6:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हय, व्हय. वल्लींना दिलेला हा दम ब्ररोब्र हाय ;)

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 4:50 pm | प्रचेतस

ओळखा पाहू

a

असंका's picture

9 Mar 2015 - 4:58 pm | असंका

मुंबई..?

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 4:59 pm | प्रचेतस

मला ठिकाण हवंय.
शहर नकोय ;)

असंका's picture

9 Mar 2015 - 5:29 pm | असंका

:-(

पण मुंबईतलं ठिकाण हे तरी नक्की झालं...

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 5:50 pm | कपिलमुनी

एस्सेल वर्ल्ड ?

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 5:53 pm | प्रचेतस

नाही.

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 6:00 pm | कपिलमुनी

मधली ३ ठिकणे आठवतात
१ गोराईअच्या टे़कड्या
२. बोरीवली नॅशनल पार्क
३. पवई

पण असे उत्तर योग्य नाही सो माझा पास !

२ क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे.

न्याशनल पार्कातल्या कान्हेरी लेणीसमूहाच्या डोंगरावरुन दिसणाऱ्या बोरीवतील इमारती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

तरी म्हटलं की वल्ली आणि असा फोटो ???

पण लेण्याचा नसला तरी लेण्यातून घेतलेला फोटो आहे... त्यामुळे माफ आहे ;)

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 6:12 pm | प्रचेतस

:)

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 6:40 pm | कपिलमुनी

palace

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 6:49 pm | प्रचेतस

थिबा राजवाडा, रत्नागिरी

खंडेराव's picture

9 Mar 2015 - 11:29 pm | खंडेराव

बराच निट केलेला दिसतोय। २ सालापुरवि पाहिला तेव्हा पार वाइट अवस्था होती।

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 2:34 pm | कपिलमुनी

फोटो ५ वर्षापूर्वीचा आहे

म्हणजे आता खराब झालाय. आम्ही गेलो तेव्हा काही भागात वरुन लाकडेही पडत होती.

खंडेराव's picture

10 Mar 2015 - 11:45 am | खंडेराव

nn

vishalk's picture

10 Mar 2015 - 3:37 pm | vishalk

नुब्रा व्हॅली, लडाख

खंडेराव's picture

10 Mar 2015 - 4:21 pm | खंडेराव

बरोबर. हे हुडेंर चे वाळवंट

प्रचेतस's picture

10 Mar 2015 - 4:27 pm | प्रचेतस

ओळखा पाहू

a

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 6:36 pm | कपिलमुनी

विशाखापट्टणमचे मत्सालय ?

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 6:40 pm | कपिलमुनी

मत्स्यालय

असुद्द्लेकनाबद्दल स्वारी

हायला मुनिवर...कमाल आहे. अचूक ओळखायलात.

पाठीमागे आहे तो रामकृष्ण बीच.

त्रिवेणी's picture

10 Mar 2015 - 6:11 pm | त्रिवेणी

चेन्नई

प्रचेतस's picture

10 Mar 2015 - 6:11 pm | प्रचेतस

नै ब्वा

त्रिवेणी's picture

10 Mar 2015 - 6:15 pm | त्रिवेणी

ओ नो.

नांदेडीअन's picture

11 Mar 2015 - 11:23 am | नांदेडीअन

ओळखा...
hgsb

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 12:34 pm | कपिलमुनी

काहीच अंदाज येइना :(

नांदेडीअन's picture

11 Mar 2015 - 12:46 pm | नांदेडीअन

इतरांनासुद्धा ओळखायला अवघड जात असेल, तर १-२ क्ल्यू देतो नंतर.
मंदिर दक्षिणेतले आहे एव्हढे तर कळाले ना ?

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 12:38 pm | कपिलमुनी

कर्नाटकामधल गोपालस्वामी किंवा वेणु गोपाल स्वामी मंदीर आहे का ?

आजकाल अशी मंदीरे फार आहेत म्हणून खात्री नाह्ये

नांदेडीअन's picture

11 Mar 2015 - 12:48 pm | नांदेडीअन

बाब्बोऽऽऽ
बरोबर आहे उत्तर.

गोपालस्वामी बेट्टा !

_मनश्री_'s picture

11 Mar 2015 - 12:46 pm | _मनश्री_

गोपाळस्वामी मंदीर ,चामराजनगर कर्नाटक
बांदीपूर अभयारण्य परिसर

नांदेडीअन's picture

11 Mar 2015 - 12:48 pm | नांदेडीअन

ब्रोबर

कपिलमुनी's picture

11 Mar 2015 - 12:52 pm | कपिलमुनी

याला म्हणतात परफेक्ट उत्तर !!

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2015 - 8:20 pm | श्रीरंग_जोशी

Guess

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Mar 2015 - 12:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

काहीतरी क्लु द्या रंगराव,

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

16 Mar 2015 - 5:43 pm | श्रीरंग_जोशी

ज्यांचा हा पुतळा आहे ते भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री होते.

पैलवान's picture

17 Mar 2015 - 10:33 am | पैलवान

सौदिंडियन वाटतंय..

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2015 - 8:49 pm | श्रीरंग_जोशी

आपल्याच राज्यातले पुढारी होते हे.

लुंगी वगैरे नसताना तुम्हाला दक्षिणी कसे काय वाटले?

कपिलमुनी's picture

17 Mar 2015 - 11:08 pm | कपिलमुनी

???

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2015 - 11:15 pm | श्रीरंग_जोशी

खाली प्रफुल्ल पा यांनी उत्तर दिले आहे.

प्रफुल्ल पा's picture

17 Mar 2015 - 10:40 pm | प्रफुल्ल पा

पन्जाब राव देशमुख चौक अमरावति

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2015 - 10:46 pm | श्रीरंग_जोशी

या चौकाला स्व. पंजाबराव देशमुख यांचे नाव दिले असले तरी तो पंचवटी (पाच रस्ते एकत्र येतात अन तेथे पंचवटी उपहारगृह पण आहे) चौक म्हणून अधिक ओळखला जातो. या पुतळ्यासमोरची त्रिकोणी बागही सुंदर आहे.

रच्याकने, आपण मिसलीड केलंत. पहिल्या कॅबिनेटचे हे सदस्य नव्हते....

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2015 - 7:08 pm | श्रीरंग_जोशी

स्व. पंजाबराव स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री होते म्हणून मी तसे लिहिले. कॄषीमंत्री असा उल्लेख केला असता तर उत्तर दिल्यासारखेच झाले असते.

कपिलमुनी's picture

16 Mar 2015 - 4:30 pm | कपिलमुनी

guess

प्रचेतस's picture

16 Mar 2015 - 4:48 pm | प्रचेतस

सांगू का? ;)

कपिलमुनी's picture

16 Mar 2015 - 5:17 pm | कपिलमुनी

सोपा आहे :)

प्रचेतस's picture

16 Mar 2015 - 5:28 pm | प्रचेतस

अगदी :)

पेडगावच्या किल्ल्यातील लक्ष्मीनारायण मंदिर असावे.

प्रचेतस's picture

16 Mar 2015 - 8:56 pm | प्रचेतस

नै ब्वा.
पेडगावचा गजथर अगदी लहान आहे.

खंडेराव's picture

16 Mar 2015 - 5:36 pm | खंडेराव

?