छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो.
परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात 'शिवाबावणी' आणि 'शिवराज भूषण' चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले.
आज शिवजयंती निमित्त त्यातील काही इथे देण्याचा प्रयत्न करेन. या कवितेतील बऱ्याच शब्दांचा अर्थ मला माहिती नाही कारण त्या भाषेशी माझी इतकी जवळीक नाही. परंतु, कवितांचा साधारण अर्थ या निमित्ताने सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन.
१.
ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल. टीवी मालिकेतील शीर्षक गीतामध्ये हा छंद वापरला होता.
इंद्र जिमी जंभ पर । बाडव सुअम्भ पर ।
रावण सदंभ पर । रघुकुलराज है ।।
पौन बारीबाह पर । संभू रतिनाह पर ।
ज्यों सहस्रबाह पर । राम द्विजराज है ।।
दावा द्रुमदंड पर । चीता मृगझुंड पर।
भूषन वितुंड पर । जैसे मृगराज है ।।
तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर।
त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।।
अर्थ: जसा इंद्र जम्भ्रासुरास, जसा वडवानल सागरास, जसा राम रावणास, जसा वायू मेघास, जसा शिव मदनास, जसा द्विजराज राम सह्स्रार्जुनास, जसा वणवा द्रुमांस, जसा चित्ता हरणांच्या कळपास, जसा प्रकाश अंधारास, जसा कृष्ण कंसास, तसेच शिवाजी महाराज म्लेंछास आहेत.
२.
अश्याच प्रकारची दुसरी एक कविता आहे.
सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर ।
बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये ।
राम दशकंध पर । भीम जरासंध पर ।
भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये ।
हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर ।
कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये ।
बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये ।
३.
साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढी सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है।
भूषण भनत नाद बीहद नगारन के नदी नद मद गैबरन के रलत है ।
ऐल फ़ैल खैल-भैल खलक में गैल गैल, गजन की ठैल फ़ैल सैल उसलत हैं।
तारा सो तरनि धुरी धारा में लगत जिमि थारा पर पारा पारावार यो हलत है ।
शिवाजी महाराजांच्या चतुरंग सेनेचे वर्णन यात आहे. या सेनेमध्ये हत्तीही आहेत ज्यांचे मद, ज्याप्रमाणे नदी वाहते, तसे वाहत आहे.
या हत्तींच्या चालण्याने पर्वतांचे आसनही डळमळीत झाले आहे. ही चतुरंग सेना जात असताना इतका धुरळा उडाला कि सुर्य पण एक छोटासा तारा भासू लागला, समुद्र हा थाळीत ठेवलेल्या पाऱ्याप्रमाणे हलू लागला आहे.
४.
प्रेतिनी पिशाचरू निशाचर निशाचरेहू, मिली मिली आपस मे गावत बधाई है।
भैरो भूत प्रेत भुरी भुदर भयंकरसी, जुत्थ जुत्थ जोगिणी जमाती जुरी आई है।
किलकी किलकी के कुतूहल करती काली, डीम डीम डमरू दिगंबर बजाई है।
सिवा पुंछे शिव सो, समाज आजू काहु चाले, काहु पे शिवनरेश भृकुटी चढाई है ।
राक्षस, भूत, भैरव हे सर्वजण आज खूपच आनंदी झाले आहेत. तेव्हा पार्वती महादेवाला विचारते कि हा सर्व समाज कुठे चालला आहे? आज शिवाजी महाराजांनी कुठे युद्ध छेडले आहे? ( जिथे भरपूर नरसंहार होऊन प्रेतांवर ताव मारायला मिळेल म्हणून हा समाज खूपच आनंदित झाला आहे. )
५.
किल्ले रायगडचे वर्णन.
जा पार सही तनै सिवराज सुरेस कि ऐसी सभा सुभ लाजे ।
जो कवी भूषण जंपत है लखी संपती को अलाकापती लाजे ।
जा मधी तीनहू लोक कि दिपती ऐसो बढो गढराय बिराजै ।
वारी पाताल सी माची मही अमरावती कि छबी उपर छाजै ।
रायगडची सभा हि देवसभेतुल्य आहे तर रायगडावरील संपती पाहून कुबेरही लाजेल. त्रिलोकातील सर्व कांती या गडामध्ये सामावलेली आहे (खंदक म्हणजे पाताळ, माची म्हणजे पृथ्वी आणि त्याच्यावर अमरावती)
६.
सुरतेच्या हल्ल्याचे वर्णन
दिलीय दलन दबाई करी, सिव सर्जा निरसंक
लुटी लियो सुरत शहर बंकक्करी अति डंक
बंकक्करी अति डंकक्करी संकक्कुली खल
सोचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चखजल
तठ्ठठ्ठइमन कठ्ठठ्ठीक सोई रठ्ठठ्ठील्लिय
सद्दद्दिसि दिसी भद्दद्दीबीभई रद्दद्दील्लिय।
(वरील कवितेतील सगळे शब्द हे अर्थपूर्ण आहेत. जेव्हा हि कविता मी वाचली होती तेव्हा यातील शब्दांचा अर्थही मी लक्षात ठेवला होता पण कालांतराने तो विसरून गेला. पण हे काव्य म्हणताना जी लय आहे ती सुरतेच्या हल्ल्याइतकीच वेगवान आहे. शब्दांचा अर्थ जरी माहिती नसला तरी हि कविता म्हणताना आपण स्वतःच त्या युद्धाचे वर्णन करत आहोत असा फील येतो. याच अंगाने जाणारी साल्हेरीच्या युद्धाची पण कविता आहे पण ते पुन्हा केव्हातरी.)
प्रतिक्रिया
19 Feb 2015 - 2:30 pm | प्यारे१
समयोचित लेख.
महाराजांना मुजरा!
19 Feb 2015 - 4:30 pm | सुहास झेले
कवी कलशांचे छंद अक्षरशः वेड लावतात...त्यांच्या ५८६ छंदांचे निनादरावांनी मराठी भाषांतर केले आहे. शिवभूषण असे नाव आहे पुस्तकाचे. नक्की वाचा :)
19 Feb 2015 - 4:44 pm | सव्यसाची
नक्कीच. छंद अगदीच वेड लावून सोडतात.
मी पण निनाद बेडेकर यांच्याकडूनच पहिल्यांदा हे छंद ऐकले होते. या पुस्तकाबद्दल ते आम्हाला बोलले होते पण पुस्तक प्रकाशित झाले आहे हे माहिती नव्हते.
माझ्या वाचनात एक काव्यरूपी अनुवाद आला होता 'शिवराज भूषण' या पुस्तकाचा. वृत्त तेच नसेल पण अनुवादातील कविता मात्र वृत्तातच होत्या. बर्याचश्या मंदारमाला मध्ये. ते मला आवडले होते मला.
'कट्यार काळजात घुसली' या संगीत नाटकातही कवीचे जे पात्र आहे ते कवी भूषण यांचे वंशज दाखवले आहे. त्यातही एक छंद संवाद म्हणून आलेला आहे.
19 Feb 2015 - 6:36 pm | प्रचेतस
कवी भूषणाचे छंद ना झेलेअण्णा?
अर्थात कवी कलशांचे संभाजीराजांविषयक छंद पण लाजवाब आहेत.
सव्यसाची: लेखन आवडले.
19 Feb 2015 - 7:45 pm | सुहास झेले
यप्प...
19 Feb 2015 - 7:01 pm | गणेशा
अप्रतिम ...
19 Feb 2015 - 11:24 pm | बॅटमॅन
सव्यसाची साहेब, लेख एक नंबर आवडला. त्या निमित्ताने तुम्ही उद्धृत केलेले छंद खालीलप्रमाणे:
कट्यार काळजात घुसली मधला छंदः
(बांकेबिहारी त्रिपाठी खाँसाहेबांच्या दोन चेल्यांसमोर आवेशाने म्हणतो)
चकित चकत चौंकि उठे बार बार दिल्ली दहसति चित चाहे खरकति है |
बिलखि बदन बिलखात बिजेपुर पती फिरत फिरंगन की नारी फरकति है |
थत थर कापत कुतुबशाह गोलकुंडा, हहरि हवस भूप भीर भरकति है |
राजा शिवराज के नगारन कि डाक सुनि केते पातसाहन की छाती थरकति है!!!!!
साल्हेरीच्या युद्धाबद्दलचा छंदः (हा पूर्ण आठवत नाहीये, अधले मधले विसरतो आहे.)
गतबलखान दलेल हुव खान बहादुर मुद्ध
शिव सरजा सल्हेरि ढिग्ग क्रुद्धद्धरिकिय युद्ध
मुंडड्डुरितहुं रुंडड्डुकरत उड्डंडुग भरि
छेद्दिद्दरबर......म्लेच्छच्छय.....
जंगग्गति सुनि रंगग्गलि अवरंगग्गतबल.
शिवाजीराजांच्या हल्ल्यामुळे शत्रूस्त्रियांची झालेली वैट्ट हालतः
ऊंचे घोर मंदर में रहनवारी ऊंचे घोर मंदर के अंदर रहती है
तीन बेर खाती ते बे तीन बेर खाती है
नासपाति खाती ते बनासपाती खाती है
इ.इ.
इतर सर्व राजे हे जणू विविध फुले आणि औरंगजेब हा त्यांमधून कर/पैसारूपी मध गोळा करणारा भुंगा, शिवाजी मात्र चाफ्याचे फूल आहे. (भुंगा त्याच्या वाटेलाच जात नाही.)
(इथले विसरलो. विविध राजांची तुलना फुलांशी केलीये.)
भूषन भनत मुचकुंद बडगूजर है
बधेले बसंत सब कुसुम समाज है
लेइ रस एतेनको बैठि न सकत है
अलि नवरंगजेब, चंपा सिवराज है!!
बाकी मग आद्य हिंदुत्ववादी अशा शेर्यास पात्र होऊ शकणारा छंदही आहेच.
गर सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी इ.इ.
भूषणावर निनाद बेडेकरांनी लिहिलेले पुस्तक सुंदर आहे. सव्यसाची साहेब तसेच आमचे अन्य मित्र यांसकट रायगडी गेलो असताना साक्षात बेडेकरांच्या मुखातून भूषणाचे छंद ऐकण्याचे भाग्य आम्हांसही मिळालेले आहे. तेव्हापासून मित्रमंडळींत थोडे थोडे छंद पाठ करावयाचा नाद लागला.
भूषणाला हिंदी साहित्यातही खूप मानतात. विशेषतः वीररसाचा प्रणेता म्हणून. याच्या काव्यात अगदी छेकापन्हुतिसारखे खतरना़ अलंकारही आहेत. पुस्तक हाताशी आले की ते छंदही इथे पेस्टवतो.
शिवजयंतीनिमित्त भूषणाची आठवण करून दिल्याबद्दल सव्यसाची साहेबांचे अनेक आभार!
जाता जाता: 'इंद्र जिमि जंभ पर' चे लताबाईंनी केलेले गायन अगदी फुळकवणी आहे. कुठे तो उसळी मारणारा वीररस आणि कुठे लताबाईंचा तो शांतरसवाला गायकी अंदाज? इंद्र आणि जंभ जणू लाडाने एकमेकांना टपली मारताहेत असे वाटते त्यांच्या आवाजातील व्हर्जन ऐकून. तेच शिवाजीमहाराजांच्या सीरियलीच्या सुरुवातीचे टायटल साँग पहा- तिथे कसा आवेश दिसतो. ती चाल एकदम फिट्ट बसते तशा वीररसपरिप्लुत रचनेला.
(शिवपंखा आणि भूषणफॅन) बुरुसोबा वायणेपाटील.
20 Feb 2015 - 12:11 am | सव्यसाची
धन्यवाद!
कविराज बांकीबिहारींचा आवाज परफेक्ट जमलाय त्या ठिकाणी.
----------------------------------------------------------------------
साल्हेर चा छंद दिलाच आहात तर पूर्ण छंद असा:
गतबलखान दलेल हुव खान बहादुर मुद्ध
शिव सरजा सल्हेरि ढिग्ग क्रुद्धद्धरिकिय युद्ध
कृद्धद्धरी किय युद्धद्धुव अरी अद्धद्धरी धरी ।
मुंडड्डुरितहुं रुंडड्डुकरत डूंडड्डग भरी
खेदिद्दर बर छेदिद्दय करी मेदाद्दधी दल
जंगग्गति सुनि रंगग्गलि अवरंगग्गतबल.
-------------------------------------------------
नेहमी आपण शब्दांचा श्लेष पाहतो पण इथे कवी भूषण यांनी कवितेच्या ओळींचा श्लेष केला आहे.
उंचे घोर मंदर के अंदर रहनेवाली उंचे घोर मंदर के अंदर रहती है।
कंद मुल भोग करे, कन्द मुल भोग करे, तिनी बेर खातीसो तो तिनी बेर खाती है।
भूषण शिथिल अंग भूषन शिथिल अंग, बिजन डुलाती तेब बिजन डूलाती है।
भूषण भनत शिवराज वीर तेरे त्रास, नगन जडाती तेब नगन जडाती है।
अर्थ : आज पर्यंत उंचच मंदिरात राहणाऱ्या रान्यांवर आता पर्वतात (मंदार) जाऊन राहायची वेळ आलीय. आजपर्यंत काजू कंद खाणार्या राण्या आता आपले जीवन कंदमूळा वर व्यतीत करताहेत. आतापर्यंत दिवसातून ३ वेळा (तीन बेर) खाणार्या राण्या आता फक्त ३ बोरे (३ बेर ) खून जीवन कंठत आहेत. आजपर्यंत अंगावरच्या दागदागिन्यांचे ओझ्याने त्यांचे अंग शिथिल व्हायचे पण आता भूखेने(भूषण= भूखन*) त्यांचे अंग शिथिल झालय. आजपर्यंत पंखे त्यांच्या साठी डूलायचे पण आता त्या विजनवासात आहेत. भूषण म्हणतो कि हे राजा तुमच्या त्रासाने नखशिखांत (नगन) जडणार्या राण्यांना आता कपडेही मिळेनसे झाले आहेत.
---------------------------------------------------------
कुरम कमल कम्धुज कदम फूल गौर हे गुलाब राणा केतकी विराज है।
पांढूरी पवार जुही सोहत है चंद्रावल, सरस बुन्देलो सो चमेली साज बाज है।
भूषन भनत मुचकुंद बडगूजर है बधेले बसंत सब कुसुम समाज है
लेइ रस एतेनको बैठि न सकत है अलि नवरंगजेब, चंपा सिवराज है!!
20 Feb 2015 - 12:19 am | बॅटमॅन
पूर्ण छंद आणि अर्थाबद्दल बहुत धन्यवाद! तो बाकेबिहारींचा आवेश बाकी एकदम बाका! ;)
श्लेषही निव्वळ अप्रतिम जमलाय.
लोकांच्या माहितीकरिता शिवबावनी इ. ग्रंथांचे नेटवरील दुवेही कॄपया द्यावेत म्हणजे तेवढीच रेफरन्सला मदत होईल.
20 Feb 2015 - 10:00 am | नाखु
साद प्रतीसादासाठी +१११ *i-m_so_happy*
आणि "राजां"बद्दल काय बोलू - पामराने फक्त आशीर्व मागायचे, तेच मागीन शिवरायांकडे!
बॅट्याला प्रत्यक्ष भेटीत मस्तानी (पेय) *drinks* गरीब नजराणा देणेत येईल.
फलकबाजीचा तिटकारावाला मावळा नाखु.
20 Feb 2015 - 1:22 am | खटपट्या
_/\_
19 Feb 2015 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
समयोचित आणि सुंदर काव्यांजली : लेखातली आणि प्रतिसांदातलीही !
20 Feb 2015 - 11:54 am | अत्रन्गि पाउस
धागा आणि वरील प्रतिसाद !!!
तथापि एक तुच्छ शंका : कवी भूषण / कलुषा / कलुषा कब्जी / कवी कलश (संभाजी महाराजांबरोबर मारले गेलेले) ...हे सगळे एकच व्यक्ती का वेगवेगळे ?
20 Feb 2015 - 7:40 pm | सव्यसाची
२ कवी वेगळे आहेत.
अतिशय संक्षिप्त अशी माहिती विकी वर उपलब्ध आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Kavi_Bhushan
http://en.wikipedia.org/wiki/Kavi_Kalash
20 Feb 2015 - 12:36 pm | पहिला राजा
कवी भूषण हे शिवाजी महाराजांचे राजकवी
& कवी कलश हे संभाजी महाराजासोबत होते
जाणकारांनी माझी चूक - असल्यास - सुधारावी
20 Feb 2015 - 5:55 pm | पामर
मी शाळेत असताना कविराज भुषणानी मला अक्षरश: वेड लावलं होतं.त्याचे अनेक छंद आणि कविता मी पाठ करुन शाळेत सादर केल्या होत्या, आणि त्याचमुळे आमच्या इतिहासाच्या सरांनी मला बाबासाहेब पुरंदर्यांच्या ८५ व्या वाढ्दिवसानिमित्त विश्रामबाग वाड्यात झालेल्या समारंभात त्यांच्या समोर ह्या कविता सादर करायला सांगितले होते..अतिशय भारावलेल्या मनस्थितीत मी तो कार्यक्रम सादर केला.अतिशय रोमांचक आठवण...आता नोकरीमुळे, इतर जबाबदारींमुळे आत-मनात कुठेतरी हरवुन गेलेल्या ह्या कवीला परत शोधुन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद!
भुषणाची माझी एक आवडती कविता देतो-
जय जयन्ती जय अदिशक्ती, जय काली कपर्दिनी|
जय मधुकैट्भ छलीनी देवी, जय महिषविमर्दिनी||
जय चमुण्ड जय चण्ड्मुण्ड भण्डासुर खंडीनी|
जय सुरक्त जय रक्तबीज बिड्डाल विहंडीनी||
जय निशुंभ जय शुंभ द्लिनी, भनि भुषण जय जय भननी|
सरजा सम सिवराज कहे, देही विजय जय जगजननी||
20 Feb 2015 - 8:02 pm | पैसा
अतिशय समयोचित धागा. कवि भूषणच्या कविता अत्यंत प्रेरणादायक आणि समर्थ शब्दात लिहिलेल्या. सुरेख उदाहरणे आणि भाषांतर. बॅटमनलाही धन्यवाद!