पिंपळ (रहस्य कथा) - भाग १

खोंड's picture
खोंड in जनातलं, मनातलं
25 Oct 2014 - 7:28 pm

करकर आवाज करीत आणि कच्च्या रसत्यावरील पांढरा धुरळा उडवीत एस टी थांबली. रसत्याच्या कडला बसलेले दोघं तिघं उठून एस टी च्या मागच्या बाजू जवळ आली.
"आली बाबा शेवटली बस " ९.३० झाले म्हणलं आता काय येत नाय वाटतं " एक म्हातारा बाबा
खाट करून खटक्याचा आवाज झाला आणि एखाद्या पुराणी हवेलीचा दरवाजा उघडावा तसा आवाज करीत वाहकान दरवाजा ढकलला.
२ बाया उतरल्या त्यांच्या पाठोपाठ एक इसम उतरला. हातातली हिरव्या रंगाची लोखंडी ट्रंक सांभाळत तो उतरला. काखेत एक कवी लोक वागवतात तशी पिशवी.
गाडीन यु टर्न घेतला. ३-४ जन एस टी मध्ये चढले आणि गाडी परत धुराळा उडवीत करकर आवाज करीत निघाली.
तो इसम तसाच रसत्या च्या बाजूला थबकला. पांढऱ्या धुराळ्यात समोरचा पिंपळ अस्पष्ट दिसत होता. भला मोठा पिंपळ. पिंपळाच्या भोवती एक भव्य असा दगडाचा पार. थंडीचे दिवस होते. हवा तशी स्तब्ध होती.
मधेच झुळूक येउन पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. जरा धुराळा कमी झाल्या वर समोर हिरव्या रंगातली पाटी दिसली "देवपिंपळे ".
दूर गावाच्या बाजूला नजर टाकली पिंपळा पासून जवळ जवळ अर्ध्या मैलावर दिवा लुकलुकत होता. म्हणजे गाव तिथून सुरु होत असावं. त्या लुकलुकत्या प्रकाशात धुरकट काही दिसत होतं. धुकं असावं किंवा शेकोटीचा धूर असेल. रसत्यावरची धूळ असण्याची शक्यता पण नाकारता येत न्हवती.
एव्हाना एस टी ची करकर कमी झाली होती.
त्या इसमाने ट्रंक उचलली आणि चालू लागला. मध्येच एका हाताने दगड धोंड्यान मुळे फाटू नये म्हणून तो धोतर सावरत होता. सफेद नेहरू. अंगात काळा कोट. डोक्यावर काळी टोपी. पायात काळं वजनदार पायतान. उंची जेमतेम ५.८ असावी. पोट सोडले तर बाकी तब्येत किरकोळच. छपरी मिशा. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. त्याला काळ्या रंगाची दोरी.
रात किड्यांची किरकिर आणि त्यांच्या लयीला साथ देणारा पायतानांचा आवाज. मध्येच एखादा दगड ट्रांकेला लागून त्याचा आवाज होत होता. बाकी भयाण शांतता.
पहिल घर अर्धा फर्लांग राहिल असेल. इसम एकाएकी थांबला. ट्रंक खाली ठेऊन त्यावर विसावला. आधी डाव्या खिशात हात घातला. पुन्हा उजव्या खिशात हात घातला. खिशातून तम्भाखू ची डबी काढली आणि मळू लागला. चुना शोधण्या साठी म्हणून परत उजवा हात कोटाचे खिसे चापू लागला.
तेवढ्यात मागून एक हात पुढे आला. "घ्या … चुना घ्या "
चुना न घेता तो इसम मागे वळून उभा राहिला. "घ्या … घ्या … " जड आवाजात पुन्हा हुकुम आला .
काही न बोलता त्याने चुना घेतला.
"कोण पाव्हणं म्हणायचा … " जड आवाजात पहिला प्रश्न पडला.
"मी …. " एवढं बोलून तो थांबला.

कथालेख

प्रतिक्रिया

जेपी's picture

25 Oct 2014 - 7:32 pm | जेपी

लै लहान टाकला भाग.
किमान तंबाकु तरी मळु द्याची की *wink* पुभाप्र.

खोंड's picture

25 Oct 2014 - 8:34 pm | खोंड

होऊ दे सावकाश

खोंड's picture

26 Oct 2014 - 11:34 am | खोंड

हे पुभाप्र काय आहे?

पुभाप्र-पुढिल भागाच्या प्रतिक्षेत,
आणखिन काही:
पुलेशु-पुढिल लेखनास शुभेच्छा.
ह.घ्या.-हलकेच घ्या.

पैसा's picture

2 Nov 2014 - 10:32 am | पैसा

वातावरण निर्मिती चांगली केलीय.