(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात)
काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.”
पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे. न की एक हिंदु म्हणुन.जरी मी या दोन्ही व्यक्तींबद्दल थोडफार वाचलेलं असल तरी या दोघांबद्दल विशेष माहिती नव्हती म्हणुन मला वाटते कि मी नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पाहु शकलो( नसता पाहु पण शकलो नसतो. :) )
विषयात शिरण्याच्या अगोदर काही विचारात घेतल्या पाहिजेत जसेकी...
१) हा कार्यक्रम डॉ. झाकिर नाईक यांनी आयोजीत केला होता.
२) कमीत कमी ८०% प्रेक्षक मुस्लीम होते.
३) १००% प्रश्नकर्ते मुस्लीम होते.
४) मध्यस्थी करणारी व्यक्ती मुस्लीम होती.
वर नमूद केल्याप्रमाणे जसा व्हिडीओ चालु केला तसा मी स्तब्ध झालो डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती पाहुन. या व्यक्तीने याचा मेंदु तपासला तर निश्चीत हार्ड डिस्क सापडतील.( ALU सापडणे जरा अवघड आहे.) एकदा श्री श्री यांनी मान्य केल की त्यांच्या पुस्तकात चुका आहेत. त्यांनी ते पुस्तक वेगळ्या परिस्थीत वेगळ्या उद्देशाने लिहीले होते. तर परत परत डॉ. झाकिर नाईक यांनी त्या पुस्तकावरुन छेडायला नको होतं.
डॉ. झाकिर नाईक तेथे ईस्लाम वाढवण्याच्या उद्देशाने आले होते, वादविवाद करायला आले होते, श्री श्री यांना मुस्लीम बनवन्यासाठी आले होते. त्यांनी बरेचदा तसं सुचवलं देखील.पण श्री श्री तेथे आले होते कारण त्यांना हिंदु- मुस्लीम ऐक्य करायची ईच्छा होती. हा त्या दोघांमधल्या उद्देशात असलेला फरक होता.
डॉ. झाकिर नाईक यांच जे पहिले भाषण झालं त्यात त्यांनी त्यांच्या पाठांतराने व बोलन्याच्या शैलीने उपस्थितांना प्रभावित केले. त्यांनी त्यांचा "पंडीतपणाने " अक्षरशः मंत्रमुग्ध केले. श्री श्री यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कबीराच्या एका दोह्याने केली-
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई ||
ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई ||
या एकाच दोह्याने डॉ. झाकिर नाईक यांच्या संपुर्ण भाषणाची हवाच काढुन घेतली. पण असे वाटते की पुणेरी जोडा कळायलापण काही पात्रता लागते. पुढे पण डॉ. झाकिर नाईक त्यांचा पंडितपणा दाखवतच होते. मला असे वाटते की श्री श्री सहसा जास्त बोलत नसावेत पण जेवढे बोलले ते पुरेसे होते.
डॉ. झाकिर नाईक जेव्हा दुसर्यांदा बोलायला उभे टाकले तेव्हा त्यांनी लव या शब्दाचा विपर्यास करुन बराच हशा मिळवला. जे की केवळ पोरकटपणाचं वाटत होतं. मुलाचं आणि वडिलांच उदाहरण केवळ पोरकटपणा , टवाळखोरपणा दाखवित होते. श्री श्रींना दुस-या भाषणास पुरेसा वेळ मिळाला नाही. पण त्यांनीपण सदरील मुलाचेच उदाहरण देउन दोन पाउल खालिच उतरले होते. जेव्हा तुम्ही कमी पात्रतेच्या व्यक्तीबरोबर वादविवाद करतात तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर खेचुन नेतात हेच खरे.
त्यानंतर प्रश्न- उत्तराचा वेळ होता. सर्व प्रश्नकर्ते एकतर विकत घेतलेले वाटत होते अथवा डॉ. झाकिर नाईक यांचे भक्त वाटत होते. वर बावळटपणाचे प्रदर्शन करणारे प्रश्न विचारीत होते.
एक गोष्ट पुर्ण कार्यक्रमात लक्षात येत होती की श्री श्री पुर्ण कार्यक्रम होईपर्यंत दुस-या धर्माचा आदर वगैरे विषय बोलत होते तर डॉ. झाकिर नाईक एकच धर्म वगैरे वगैरे. श्री श्री तेथे काही तरी चांगला संदेश लोकापर्यंत पोचावा अश्या उद्देशाने आल्यासारखे दिसत होते तर डॉ. झाकिर नाईक फक्त वादविवाद करन्यासाठी. असं वाटत होतं की डॉ. झाकिर नाईक यांच्या साठी श्री श्रींची विचार करन्याची पद्धत खुप उच्च होती.
डॉ. झाकिर नाईक संस्क्रुत ग्रंथाचा श्लोक पान नंबर सहीत सांगुन असे दाखवत होते की त्यांना खुप ज्ञान आहे पण मला असे वाटते कि नुसते पाठांतर म्हणजे ज्ञान नव्हे. त्यांना वाटत असेल की त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचा पुष्कळ अभ्यास केला पण डॉ. झाकिर नाईकच काय पण कुणालाही हिंदु धर्मग्रंथांचा संपुर्ण अभ्यास करणे अतिशय अवघड आहे. किंबहुना जवळजवळ अशक्य आहे.डॉ. झाकिर नाईक यांनी तिथे हिंदु धर्मग्रंथापैकी बरेच ग्रंथ दाखवले. पण ते केवळ हिंदु साहित्याचा एक छोटा भाग होता. विकिपेडीयाच्या संदर्भावरुन सांगु ईच्छीतो कि केवळ ॠग्वेद हा १० ग्रंथात आहे. असे चार वेद, उपनिषदे, आरण्यके, पुराण, सुक्त , स्म्रुती इत्यादी सोडुन द्या माझ्या आवडीचं फक्त महाभारत जरी घेतलं तरी विकिपेडीयाच्या संदर्भानुसार सर्वात मोठी ज्ञात कविता आहे. ज्यात १००,००० श्लोक आहेत. आणी भगवत गीता जे की या महाभारताचा छोटासा भाग आहे ज्यावर लोकमान्य टिळक, विनोबा भावे , पांडुरंग शास्त्रि आठवले यांसारख्या कित्येक विभूतींनी जिवन समर्पीत केली आहेत . आणि हि व्यक्ती असे भासवते की तिचा हिंदु साहित्याचा अभ्यास झाला. माझ्या मित्रा एक जिवन अपुर्ण आहे केवळ महाभारताचा अभ्यास करायला. बाकी तर दे सोडुन. फक्त पाठांतर म्हणजे ज्ञान मिळवणे नाही. चिंतन मनन केल्याशिवाय त्या विषया संदर्भातले ज्ञान मिळनार नाही. ज्याप्रमाने स्पंज पाणी शोषुन घेते त्याप्रमाणे ज्ञान मिळाले पाहिजे. हिंदु संस्क्रुती म्हणजे समुद्रावरचा हिमनग होय. वर उभ राहुन आकाराचा अंदाजच येउ शकत नाही.
हिंदु धर्मात प्रार्थनेच्या विविध पद्धती आहेत , सगुणवाद, निर्गुणवाद इत्यादी ईतकेच काय तर चार्वाक सारखा वेगळा मतप्रवाह पण हिंदुने त्यागला नाही. हिंदु धर्म म्हणजे पुर्णत्व- ज्याला जसा समजतो तसा घ्या . परंतु कुणिच पुर्ण घेउ शकत नाही कारण पुर्णातुन पुर्ण काढलं तरी पूर्ण उरणारच(पुर्णात पुर्ण मुदच्युते) डॉ. झाकिर नाईक यांनी सांगितले त्याप्रमाणे हिंदु व मुस्लीमांमध्ये काही साम्यता असु शकते नव्हे आहेच कारण - विश्व संच (Universal set) आणी उपसंच (subset) मध्ये काही तरी समानता असनारच ना ?
मी मान्य करतो की डॉ. झाकिर नाईक यांना मिळालेली प्रतीभा ही दैवी आहे. पण त्यांनी ती केवळ ईस्लामच्या वाढीसाठी न वापरता संपुर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे.
हे मान्य कराव लागेल कि डॉ. झाकिर नाईक यांच्या विचारात ब-याच चुकिच्या गोष्टी वाटतात(contradiction). आहेत जसेकी ईस्लाम हा पैगंबरच्या अगोदर होता वगैरे. त्यांच्या तर्कामध्ये पण बरेच गोष्टी चुकीच्या वाटतात जसे़की हिंदु धर्मामध्ये पैगंबराबद्दल लिहिलेल आहे वगैरे ( जे पुस्तक त्यांच्या जन्माच्या बरेच अगोदर लिहिल्या गेलं त्या पुस्तकात त्यांच्या बद्दल उल्लेख कसा असु शकतो) द्या सोडुन मला ईथे फक्त वादविवादासाठी वादविवाद करायचा नाही. मला असा म्ह्णायचय की ईतक्या प्रमाणात धर्मग्रंथाचे वाचन केल्यावर सुद्धा तुम्ही धर्माच्या वर उठुन विचार करु शकत नाही तर काय फायदा ? ईतके वाचन करुन पण तुम्ही दुस-या धर्माचा आदर करु शकत नाहीत, दुस-या धर्माचा व्यक्तिंना स्वत:च्या धर्मात खेचु ईच्छीतात तर काय फायदा ?
ईतका अभ्यास झाल्यानंतर तुम्ही केवळ ज्ञानाच्या शोधात, ख-या ज्ञानाच्या शोधात असाल.
प्रतिक्रिया
3 Oct 2014 - 3:53 pm | धन्या
तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समधून पदवी घेतली आहे का हो?
स्मृती आणि विदा पृथक्करण समजावताना जेव्हा संगणकाचे उदाहरण दिले जाते तेव्हा सर्वसाधारणपणे लोक CPU हा शब्द वापरतात. इलेक्ट्रॉनिक्समधून शिक्षण झालेली व्यक्तींशिवाय सहसा कुणी ALU ही संज्ञा वापरत नाही.
3 Oct 2014 - 5:18 pm | उगा काहितरीच
इलेक्ट्रॉनिक्स नाही . पण विज्ञान शाखेची पदवी आहे. शिवाय अभियांत्रीकी शाखेतुन पदव्युत्तर पदवी पण आहेच की.
3 Oct 2014 - 3:58 pm | पैसा
असं घडलं यात काहीच आश्चर्य वाटत नाही. नरहर कुरुंदकरांची पुस्तके वाचा म्हणजे असे का आहे या प्रश्नाची सर्व उत्तरे मिळतील.
3 Oct 2014 - 5:21 pm | उगा काहितरीच
नरहर कुरुंदकरांच भरपुर नाव ऐकलं पण त्यांनी लिहिलेला जास्त वाचु शकलो नाही. ( त्यांच्या जन्मगावापासुन थोड्या अंतरावर बरेच दिवस वास्तव्य असुनदेखील) सध्या तर वेळेअभावी शक्यच नाही.
3 Oct 2014 - 4:01 pm | मुक्त विहारि
ही एक महान व्यक्ती आहे.
3 Oct 2014 - 4:11 pm | काउबॉय
Generate Organize Destroy. उत्पत्ती, स्थिती, लय. यापलिकडे कोणताही अर्थ नाही धर्म नाही. विज्ञान तर अजिबात नाही, बाकी जाणकार बोलतिलच.
3 Oct 2014 - 4:18 pm | प्यारे१
उगा काहितरीच.
असे प्रचंड विद्वान, तल्लख बुद्धी, अमोघ वक्तृत्व, चारित्र्य संपन्न इ.इ.इ. लोक प्रत्येक 'कल्ट' मध्ये सापडतात.
(प्रत्येक स्वल्पविरामाजागी आणि/ अथवा वाचावं)
त्यांचा उपयोग ती कल्ट पुढे नेण्यासाठी होतो, केला जातो. सारासार विचार केला जावा. स्वबुद्धी वापरुन स्वकल्याण साधावं. 'खरा' मुसलमान होता आलं तर उत्तमच असेल असा प्राथमिक अंदाज आहे. अभ्यासू लोक भर घालतीलच.
3 Oct 2014 - 5:02 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे दोघांचं म्हणणं काय आहे ते समजू शकेल.
3 Oct 2014 - 5:24 pm | उगा काहितरीच
माफ करा मला PD मध्ये भेटले ते व्हिडीओ . लींक नाही देउ शकत. (पुण्यात असाल तर भेटा प्रत्यक्ष देतो. :) )
3 Oct 2014 - 5:37 pm | संजय क्षीरसागर
झाकीरश्रींचं म्हणणं दुसरी लिंक असेल, ती तिथेच मिळेल.
3 Oct 2014 - 10:53 pm | उगा काहितरीच
काय वाटलं ऐकल्यानंतर ?
3 Oct 2014 - 5:38 pm | निनाद मुक्काम प...
ह्या नाईक नावाच्या माणसाला हिंदू धर्मा विषयी एवढी साधी माहिती नाही मुस्लिम ,ख्रिस्ती व यहुदी व हिंदू धर्म ह्यांच्यात
प्रमुख फरक म्हणजे ह्या तिन्ही धर्माचे प्रमुख व एकमेव ग्रथ आहेत व त्यातील शब्द हि काळ्या दगडाची रेख
हिंदू धर्माला असा अधिकृत धर्म ग्रथ नाही , वेद व गीता अशी अनेक ग्रथ हे एक आपल्या धर्मात अनुकरणीय आहेत पण सक्ती नाही
हा माणूस तुमच्या ऋग्वेदात स्त्रियांच्या विषयी असे लिहले आहे म्हणून महिलांनी असे वागावे असे म्हणतो ते बाष्कळ पणाचे ठरते
एकदा पाकिस्तानी वाहिनीवर मुस्लिम धर्माच्या विषयी कुराणाचा दाखला देऊन एक गमतीदार गोष्ट कळली त्या बद्दल सविस्तर माहिती कोणास असेल तर जरू सांगा
मी तो शब्द किंवा संकल्पनेचे नाव विसरलो पण त्या मते मुस्लिम हा ख्रिस्ती व यहुदी धर्माच्या व्यक्तीशी लग्न करू शकतो पण हिंदू नाही कारण ह्या ज्या धर्मांचा अधिकृत धर्म ग्रथ आहे त्यांच्याशी ते लग्न करू शकतात ह्यात शीख पण आले , माझ्या समजण्यात काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करावी कारण चर्चा अत्यंत शुद्ध उर्दूत होती ,
3 Oct 2014 - 5:43 pm | नाव आडनाव
तो शब्द आहे "अह्ले किताब" - म्हणजे एक धर्म ग्रंथ फॉलो करणारे.
3 Oct 2014 - 5:51 pm | निनाद मुक्काम प...
@नाव आडनाव
धन्यवाद
@नाव आडनाव
धन्यवाद
ह्या व्याख्येत nisht
हा नाईक उठसुठ वेदात हे लिहिले ह्या पानावर हे त्या पानावर ते असे सांगून उगाच डोके खातो.
मात्र तो टू नेशन थिअरि मनात नाही त्याच्यामते
अखंड भारत म्हणजे आजचे भारतीय मुसलमान अधिक पाकिस्तानी अधिक मुस्लिम मुसलमान व अश्या परीस्थित मुस्लिम हे प्रमुख राजकीय शक्ती म्हणून ह्या देशात उदयास आली असती जी आज तीन देशात विखुरली आहे.
माझ्यामते हे तार्किक योग्य आहे
पाकिस्तानी हा बांगला देशी व भारतीय मुसलमानांना पाण्यात पाहतो हा स्वानुभव आहे.
3 Oct 2014 - 6:19 pm | एस
ह्या विषयावर आधी भरपूर चर्चा झाली आहे. जिज्ञासूंसाठी दुवे:
"झाकिर नाईक" - प्रेषक, आनंदयात्री, Sat, 19/06/2010
"मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक" - प्रेषक, आशु जोग, Mon, 21/05/2012
"पुण्यात धर्मांतर" - प्रेषक, गणा मास्तर, Fri, 29/05/2009
3 Oct 2014 - 10:56 pm | उगा काहितरीच
बरं झालं सगळ्या लिंक एकत्र मिळाल्या . धन्यवाद.
3 Oct 2014 - 7:22 pm | अत्रुप्त आत्मा
@मी मान्य करतो की डॉ. झाकिर नाईक यांना मिळालेली प्रतीभा ही दैवी आहे. पण त्यांनी ती "केवळ ईस्लामच्या वाढीसाठी न वापरता" संपुर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे.>>> त्यांना अस करता येण अशक्य आहे. कारण तस केल तर इस्लाम नुसार ती व्यक्ती मुस्लिम रहात नाही.
3 Oct 2014 - 8:51 pm | रामपुरी
असल्या मुर्ख विधानांवर चर्चा करण्याएवढी त्यांची (विधानांची आणि त्याहून जास्त माणसाची) लायकी नाही. त्याला एवढी किंमत देण्याचे कारण नाही.
बाकी वर एका प्रतिसादात "झाकिरश्री" वाचून दिग्विजय सिंगचे "हाफिज सईदजी" आठवले आणि मिपाच्या भाषेत ड्वाले पाणावले.
3 Oct 2014 - 10:51 pm | उगा काहितरीच
पण अशाने त्यांना वाटते कि लोक त्यांना प्रतिवाद करु शकत नाहीत.
3 Oct 2014 - 9:35 pm | श्रीगुरुजी
>>> बाकी वर एका प्रतिसादात "झाकिरश्री" वाचून दिग्विजय सिंगचे "हाफिज सईदजी" आठवले आणि मिपाच्या भाषेत ड्वाले पाणावले.
दिग्विजयने "ओसामाजी" असा आदरपूर्वक उल्लेख केला होता. सुशीलकुमार शिंद्यांनी "हाफिज सईद साब", "श्री हाफिअ सईद" असा आदरभाव दाखविला होता.
3 Oct 2014 - 10:58 pm | रामपुरी
असले लोक लक्षात ठेवण्याजोगे नसल्याने तपशिल आठवत नाहीत.
चुकिची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद!
3 Oct 2014 - 11:29 pm | श्रीरंग_जोशी
हा विषय आवडीचा नसला तरी तुमचे विचार आवडले.
4 Oct 2014 - 3:04 pm | उगा काहितरीच
धन्यवाद .
4 Oct 2014 - 1:36 am | काउबॉय
संजय क्षीरसागर यांच्याशी संवाद साधुन दाखवावा तरच ही इज वर्थ असे मी समजेन.
4 Oct 2014 - 5:58 am | खटपट्या
:)
4 Oct 2014 - 3:55 pm | संजय क्षीरसागर
झाकिरजींना इथे बोलवा, माझी केंव्हाही तयारी आहे.
रविशंकरजी वादात निष्प्रभ झालेत कारण त्यांच्याकडे `प्रेम' हा सगळ्या गोष्टींवर `एकमेव' उपाय आहे. त्यांच्या कार्याविषयी प्रश्नच नाही पण विवादात जी क्लॅरिटी लागते ती त्यांचाकडे नाही.
`देव म्हणजे काय' या संकल्पनेवर उपनिषदाचा सुरेख दाखला त्यांनी सुरुवातीला दिला आहे. आणि मजा म्हणजे इस्लामचं पण तेच म्हणणं आहे ! परंतु `स्पेस अँड लव्ह' यांची त्यांना ज्याम सांगड घालता येणार नाही, कारण त्यांना स्वतःला स्पेसचा उलगडा झालेला नाही. तो जर झाला असता तर झाकिरश्रींना निरुत्तर करणं केवळ दोन मिनीटांच काम आहे.
झाकिरभाईंना (सुद्धा स्पेसचा अनुभव नसला तरी) `अल्ला अरुप आहे' हा त्यांचा `एकमेव मुद्दा', कोणताही विवाद जिंकायला पुरेसा आहे. कारण स्पेसशिवाय आकाराची निर्मितीच ( थोडक्यात, हिंदूंची `देव' ही संकल्पना) असंभव आहे.
झाकिरजींना निरुत्तर करायचं असेल तर एक साधा युक्तिवाद आहे, तो असा की आकाराच्या निर्मितीनं निराकार नष्ट होत नाही. (खरं तर हा मुद्दा रविशंकरजींनी मांडला होता पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःलाच त्याची खात्री नाही, त्यामुळे विवादात, ते तो पुढे नेऊ शकले नाहीत). वास्तविकात, निराकार हा आकार व्यापूनही अलिप्त आहे.
तस्मात, आकार आणि निराकार दोन्ही मिळून देव आहे. निराकाराला स्वत:ला जाणायचं असेल तर आकार धारण करण्याशिवाय पर्यायच नाही.
आणि मी म्हणतोयं ती उघड गोष्ट आहे, त्यासाठी कोणत्याही उपनिषदाची, वेदाची किंवा कुराणाची गरज नाही. सारं अस्तित्वच निराकार आणि आकार यांनी मिळून बनलंय.
उदाहरणार्थ, बिल्डींग निराकारातच तयार होईल आणि प्रत्येक ठिकाणी स्पेस नसेल तर त्या बिल्डींगला अर्थच उरणार नाही, त्या बिल्डींगमधे तुम्ही वावरणार कसे? तद्वत, स्पेस आहे हे सिद्ध करण्यासाठी बिल्डींगची मर्यादा असावीच लागेल, बिल्डींग बांधावीच लागेल, त्याशिवाय स्पेस या `स्टँड अलोन स्थितीला' स्वतःचा उलगडा होणार नाही.
थोडक्यात, अल्ला डिफाईन व्हायला इंस्ट्रक्शन मॅन्युअल (कुराणची) गरज नाही तर त्या अमर्याद निराकारत, आकार निर्माण होण्याची गरज आहे. आणि आकाराला देव (किंवा सार्वभौम) मानणं ही हिंदूंची संकल्पना, कोणताही हिंदू धर्मग्रंथ जस्टीफाय करु शकणार नाही, कारण निराकाराशिवाय आकाराची निर्मितीच शक्य नाही.
अत्यंत संक्षेपात, आकार आणि निराकार हे परास्परावलंबी आहेत, त्यामुळे दोन्ही मिळून अस्तित्त्व तयार झालंय आणि अखिल अस्तित्व हाच देव आहे.
5 Oct 2014 - 1:48 am | काउबॉय
पण हे सर्व मला का प्रतिसादत आहात ?
अल्ला डिफाईन
व्हायला इंस्ट्रक्शन मॅन्युअल (कुराणची)
गरज नाही तर त्या अमर्याद निराकारत, आकार
निर्माण होण्याची गरज आहे.
आणि लेट्स होप की तुम्हाला या विनोदातला विरोधाभास समजतोय.
5 Oct 2014 - 10:25 am | संजय क्षीरसागर
त्याबद्दल आभार!
पुन्हा असा विरोधाभास झाला तर त्याला (त्यानुसार) योग्य उत्तर मिळेल.
5 Oct 2014 - 12:10 pm | काउबॉय
पोथी पोथी जग मुवा | पंडीत
भया न कोई ||
ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई ||
थोडक्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा.
4 Oct 2014 - 1:48 pm | काळा पहाड
अशा बाबतीत प्रतिवाद वगैरे करायचा नसतो. अमेरिकेचं उदाहरण पहा. डोस्क्यावरून पाणी जायला लागलं तर सरळ बाँब टाकून मोक्ळे होतात. या लोकांना पण तसंच करायचं असतं. सरळ एन्काऊंटर करून खलास. जा तिकडे स्वर्गात ७२ कुमारिका मिळवायला.
4 Oct 2014 - 6:13 pm | विजुभाऊ
झकीर नाईक हा तद्दन फालतु माणूस आहे . पण तो पाकिस्तानात ज्याम प्याप्युलर आहे.
4 Oct 2014 - 11:54 pm | शिद
कोण झाकीर नाईक?
धन्यवाद.
5 Oct 2014 - 10:24 am | जेपी
+७८६
5 Oct 2014 - 8:21 am | हुप्प्या
ह्या माणसाचे एक गृहितक आहे. कुराणात लिहिले आहे ते आणि तेच अंतिम सत्य आहे. त्यातले काहीही कालबाह्य वा त्याज्य असूच शकत नाही. असा ग्रंथ ज्याचा मार्गदर्शक आहे तो धर्म म्हणजे इस्लाम हा सर्वश्रेष्ठ आणि आदर्श धर्म आहे. हे सडके गृहितक केंद्रस्थानी ठेवून त्यावर अफाट पाठांतराचा आणि खोट्या विद्वत्तेचा मुलामा देऊन काही लोकांवर जोरदार प्रभाव पाडण्यात हा इसम यशस्वी झाला आहे.
अरबी देशातून अशा तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी येणारा पैसा, त्यावर पोसलेले दीनदार गुंड वेळप्रसंगी विरोधी विचारांचा खातमा करायला बाह्या सरसावून तयार असतात. ह्या भांडवलावर ह्या माणसाचे दुकान तेजीत चालले आहे ह्यात शंका नाही.
5 Oct 2014 - 10:06 am | नाव आडनाव
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई ||
ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई ||
श्री श्रीं नी दिलेल्या या उत्तरापेक्षा चांगलं उत्तर असूच शकत नाही या माणसासाठी.
5 Oct 2014 - 2:52 pm | संचित
विद्या विवादाय धनं मदाय, खालस्य शक्ती: परापीडनाय|
साधो: परी विपरीम एतत, ज्ञानाय दानाय च रक्षणाय ||
इस्लामी शक्तीचे असेच आहे, त्यांचे बल जिहाद करण्यासाठी तर विद्या आणि धन हे धर्मांतरासाठी वापरले जात आहे.
6 Oct 2014 - 12:30 pm | प्रसाद१९७१
श्री.श्री मधे पिपंरी चिंचवड च्या सोन्याच्या शर्ट घालणार्या नगरसेवका कडे पाहुणचारासाठी आले होते. ते बघुन त्यांच्या बद्दल अजिबात आदर राहीला नाही. अश्या लोकांचा धर्म स्वार्थ आणि प्रसिद्धी इतकाच असतो.