(एक कवी संपून गेला ..)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
4 Aug 2008 - 9:03 pm

स्वातीताईंची 'एक क्षण निसटू गेला..' ही कविता वाचून आमच्या मनातला विचारांचा कल्लोळ थांबेना! ;)

लांबलचक विचारांच्या तोंडाशी..
थांबून राहिलेली कविता,
पांढर्‍या शुभ्र कागदावर..
थेंबभर शाईसारखी,
टप्पकन पडली...
एक लाट उंच उसळली..
कागदावर आणि मनात!
एकाच वेळी!!
क्या बात है!!!
भावनेचा आविष्कार
अजून एक काव्य
लगोलग आत गेलो..
वाट बघत बसलेले ताव गोंजारले..
हळूच खिडकीची झापे उघडी केली..
आणि गेलो..
पांढर्‍यावर काळे करण्यापुरतं पेन आणायला..
ते 'पेन' तो क्षण!!!
येव्हढ्यात येऊन गेला..
छ्या!!!
जाऊदे!
जमतं नाही आज!
म्हणताच विरस झाला...
अजून एक कवी संपून गेला..

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

ओम's picture

4 Aug 2008 - 9:08 pm | ओम

आत्ता मला कौल दे!

मानव's picture

4 Aug 2008 - 9:22 pm | मानव

राजन खान यानची एक लेखक सन्पुन गेला ही कथा वाच ! फार छान आहे

काहि चुकल्यास माफि असावि !

बेसनलाडू's picture

4 Aug 2008 - 9:38 pm | बेसनलाडू

विचारांचा कल्लोळ आवडला.
(विचारमग्न)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

4 Aug 2008 - 10:04 pm | प्रमोद देव
विसोबा खेचर's picture

5 Aug 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

जमतं नाही आज!
म्हणताच विरस झाला...
अजून एक कवी संपून गेला..

वा! क्या बात है रंगा...!

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Aug 2008 - 1:32 am | ब्रिटिश टिंग्या

छ्या!!!
जाऊदे!
जमतं नाही आज!
म्हणताच विरस झाला...
अजून एक कवी संपून गेला..

अरेरे! :)

सर्किट's picture

5 Aug 2008 - 4:57 am | सर्किट (not verified)

एकाच वेळी!!
क्या बात है!!!
भावनेचा आविष्कार
अजून एक काव्य

इतिहासाची पाने चाळल्यास भावनेच्या आविष्कारामुळे रंगाशेठ का जिभल्या चाटतात, हे सहज लक्षात येते.

- (स्मरणशील) सर्किट

शितल's picture

5 Aug 2008 - 8:35 am | शितल

विडंबन मस्त आहे.
छ्या!!!
जाऊदे!
जमतं नाही आज!
म्हणताच विरस झाला...
अजून एक कवी संपून गेला..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2008 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबन आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती फडणीस's picture

5 Aug 2008 - 11:07 am | स्वाती फडणीस

:)

नारदाचार्य's picture

5 Aug 2008 - 3:48 pm | नारदाचार्य

सकस कवितेचे सुरस विडंबन