भाग २ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
28 Oct 2013 - 7:25 am

मागील अंकाचा दुवा:-
http://www.misalpav.com/node/25982
तिथून पुढची कथा आता देतोय.
हा भाग २ आहे
नोटः-
जवळपास निम्म्या जगात मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सध्याच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.)
.
इस ६५० पर्यंत आपण मागच्या वेळेस पाहिलं. त्यानंतर दीडेक्शे वर्षे हळूहळू अरबी सत्तेने आपली पकड सर्वत्र घट्ट करत नेली. जिथे तिथे अरबी संस्कृतीचा प्रसार प्रचार सुरु झाला. आधीच्या गोष्टी जम्तील तितक्या पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. दूरदूरच्या गावांत आता सत्तेचे मजबूत जाळे पोचले होते.
आधीची लिपी नष्ट होत आली होती. भाषा बदलत चालली होती. वर्णसंकर वाढत होता. तशातच उमय्याद खिलाफत जाउन अब्बसिद खिलाफत सत्तेवर आली होती.पण एकूण पगडा अजूनही बराचसा अरबीच होता. पारशी साम्राज्य नष्ट झाल्यावर अनेक पारशी सामंत, पारशी मांडलिक व तुर्क अ‍ॅलिज् ह्यांनी अरबी सत्ता मान्य केली होती. ह्यांच्याच आश्रयाने अरबपूर्व संस्कृती थोडाफार श्वास टिकवून होती.पण एकएक करुन त्यांची ती दुबळी संस्थाने संपवत उरला सुरला पारशी प्रभाव संपवला जात होता.
.
.
बाबक ची राणा प्रतापाशी तुलना इतक्याचसाठी की आसपासच्या सर्वच सत्ता एकापाठोपाठ एक मोथ्या साम्राज्याच्या छायेत जात असताना राणा प्रतापानं इवलसं राज्य स्वतंत्र ठेवलं होतं. त्याची जबरदस्त किंमतही दिली. भलेही त्याच्यानंतर हे राज्य स्वतंत्र म्हणून टिकलं नसेल.
तर हा बाबक खुर्रामुद्दिन; हा पारशी लोकांचा राणा प्रताप म्हणता यावा.
.
.
अझरबैजान ह्या देशातला. हा देश म्हणजे विसाव्या शतकात ussr चा भाग होता. इराणी पठारालगतचा हा देश. इराणी पठार आणि प्रत्यक्ष इराण देश ह्यात गल्लत करु नये. इराण हा देश इराणी पठाराचा केवळ एक भाग आहे. इराणच्या आसपासचे कैक देश इराणी पठारात मोडतात. त्सिसिफोन ह्या गतवैभवी , एकेकाळच्या साम्राज्याची राजधानी असलेल्या शहरातील तेलाचे एक मोठे व्यापारी म्हणजे बाबकचे वडील.
हे शहर आजच्या बगदादपासून तीस्-चाळिस किमीवर असावं. ते वायव्य (उत्तर्-पश्चिम ) इराणच्या मयमध जिल्ह्याच्या ठिकाणी येउन राहिले. तिथेच त्यांनी विवाह केला. त्यांना तीन मुले झाली.बाबक सर्वात ज्येष्ठ. तो पुरता अठरा वर्षांचा होइपर्यंतच वडीलांचे निधन झाले. व घरची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आली. परंपरेने त्याला व्यापराचा अनुभव होताच. आता त्याने शस्त्र व्यापारही सुरु केला.
ह्या निमित्तानं त्याचं अरब जगतात, मध्य पूर्व आशियात फिरणं झालं. रशियाच्या आसपासचा कॉकेशस पर्वताचा भाग नि एकेकाळचं बलाढ्य पण आता जडत्व येउ लागलेलं बायझेंटिअन साम्राज्यही त्यानं पाहिलं. हे बायझेंटिअन साम्राज्य म्हणजे रोमन साम्राज्याचीच एक शाखा. पश्चिम आशिया नि पूर्व युरोप ह्यातील रोमन भागावर सत्ता ह्यांची होती. इस ७५५ मध्ये अबु मुस्लिम ह्याचा खून झाला. ह्या अबु मुस्लिम ह्यानं खरं तर उमय्याद खलिफांना हटवून अब्बासिद सत्ता आणण्यास मदत केली होती. पण राजाज्ञेवरून त्याला मारण्यात आलं. हा काळ लक्षात घ्या. इराणचे अरबीकरण आणि पर्यायाने इस्लामीकरण झपाट्याने सुरु होते. पूर्वीच्या इराणी साम्राज्यावर सर्वत्र अरबी साम्राज्यानं विजय मिळवला होता. सत्ता अधिकृत मानलेला धर्म आपोआप झपाट्याने पसरतो, कधी सत्तेच्या लोभाने काही
स्थानिक स्वतःहून तो धर्म स्वीकारत सत्तेच्या पायर्‍या चढायचा प्रयत्न करतात; तर कधी बळजबरीही होते. ह्याच इतरत्र आलेल्या अनुभवाम्नुसार तिथेही सुरु होते. पारशी लोक खुद्द पर्शियन साम्राज्याच्या भूमीवर अल्पसंख्य बनले होते. शिल्लक राहिलेल्यांतीलही कित्येक झपाट्याने धर्म बदलत होते.खुद्द राजसत्ता निरंकुश म्हणता यावी अशी होती.
अशावेळी मुख्य शब्द चाले तो अरब मंडळिंचा . त्यानंतर अरब हीन समजत असले तरी त्यातल्या त्यात गैर्-अरब मुस्लिमांना प्रशासनात स्थान देत.गैर मुस्लिम मंडळिंची पंचाइतच असे. पण तरीही कित्येक गैर मुस्लिम घराणी शिल्लक होती. त्यातली कित्येक अजूनही प्रभावशाली होती. कुणी व्यापारामुळे आपली ताकद राखून होते.कुणी उत्तम संपर्क राखून होते सत्ताधार्‍अयंशी आणि इतर परकियांशीही आणि कुणी विद्वान होते. इस्लाम पूर्व कालातील नासधूस
होण्यापूर्वीचे काही अंशाने का असेना शिल्लक राहिलेले ज्ञान, कला ह्यांच्याकडे होती. तर अशा गैर मुस्लिमांबद्दल अबु मुस्लिम ह्या राजमंडळातील प्रभावशाली व्यक्तिची भूमिका मवाळ होती.(पाकिस्तानमध्ये आता हिंदू म्हटल्यावर "चलाख बनिया" अशीच इमेज आहे. कारण सरळ आहे. व्यापारी वर्गाने फार कुणाला न दुखावता स्वतःपुरता स्वतःचा धर्म टिकवला. तो टिकवण्याइतपत पैसा असलेला वर्गच हिंदु म्हणून टिकला. इतरांना धर्मांतर करणे भाग पडले/पाडले गेले किंवा संपवण्यात आले. कधी हाकलून दिले गेले तर कधी जिवे मारले गेले. एकुणात काय, मूळ धर्मातील शिल्लक राहणारे लोक हे सहसा पैसेवाले आणि उत्तम संपर्क मेन्टेन करु शकणारे चतुर वृत्तीचे लोकच असतात. असो. ) तो त्यांच्यात लोकप्रिय होता. पण बहुदा हेच काहींच्या डोळ्यात सलत असल्याने त्याचा काटा काढण्यात आला. आपला हितचिंतक मारला गेलाय, परिस्थिती प्रतिकूल होत चाललेली बघून साम्राज्यातील कित्येक भागात उठाव सुरु झाले. बंडे झाली. कित्येक दशके ती सुरु राहिली.ह्या घडामोडींकडे अर्थातच शस्त्रांच्या व्यापार्‍याचे, बाबक चे लक्ष जाणार. ते तसे गेलेच.व खुर्रामी चळवळीत तो सामील झाला. जविदान शहराक हा त्याचा गुरु.त्याच्याच तालमीत बाबक इतिहास, युद्धनीती, शस्त्रकौशल्य आदी शिकला.इस ८१६ ला जविदान मृत्यू पावल्यावर चळवलीची सूत्रे बाबककडे आली. आता त्याने खलिफाविरुद्ध उघड संघर्ष करायचे ठरवले. फौजफाटा उभारुन झटपट मोक्याच्या जागा काबीज केल्या. वायव्य इराण मधील उम्चावरील कित्येक किल्ले घेणे स्थानिकांना सोपे होते(शिवकाळातील तोरणा- पुरंदर ह्यांची आठवण होते. ) ते त्यांनी घेतले.
आपण धडाक्यानं उघडलेल्या मोहिमेत लोकांना सामील होण्याचे आवाहन तो करु लागला. ह्यापूर्वीही असे उठाव झाले होते. मोठे साम्राज्य एका झटक्यात जिंकले, तरी त्याच्या गौरवशाली स्मृती लागलिच जात नाहित. त्यामुळे ह्यापूर्वीही उठाव झाले होतेच. पण त्यातला कुठलाच बाबकच्या उठावाइतका यशस्वी नव्हता;
वीस्स पंचवीस वर्षे यशस्वी, स्वतंत्र सत्ता ह्यापूर्वी उमय्याद किंवा अब्बासिद खलिफांसमोर कुणी उभी करु शकले नव्हते.
८१६ मध्ये त्यानं स्वतःचं स्वतंत्र शासन सुरु केलं. याह्या इब्न मुआध ह्यास खलिफानं बाबकला चिरडण्यास पाठवलं. पण तो अपेशी ठरला.
दोनच वर्षांनी इसा इब्न मुहम्मद इब्न अबु खालिद ह्याचाही सडकून पराभव ह्या न्वजात राज्यानं केला.आता मात्र खलिफाला ह्या प्रकरणाचं गांभीर्य जाणवलं असावं. इस ८२४ मध्ये बरीच फौज देउन त्यानं अहमद इब्न अल जुनैद ह्या मातब्बर सेनापतीस रवाना केलं. तोही पराभूत झला. कैद झाला.
मुहम्म्द इब्न हुमेद तुस्सी ह्याला ८२७ ला बाबकविरुद्ध पाठवण्यात आलं. त्यानं प्रथमच मर्यादित प्रमाणात यश मिळवलं. चकमकी जिंकला. पण बाबक त्याच्या हाताला लागला नाही. त्यानं मोहिम सुरुच ठेवली. ही मोहिम दोनेक वर्षे चालली. इस८२९ मध्ये बाबकनं एका लढाईत त्याचा निर्णायक पराभव केला. तो मारला गेला. त्याच्या सैन्याची धूळधाण उडाली.अब्बासिद साम्राज्य ह्याच वेळी इतर राज्याशींही युद्धमान होतं.
तशात ह्या आघाडीवर सपाटून मार खावा लागल्यानं पुढील सहा सात वर्ष त्यांनी काहिच हालचाल केली नाही.
इस ८३६ ला अफशिन ह्या दिग्गज, मुत्सद्दी सरदाराची अजून एक प्रयत्न म्हणून रवानगी करण्यात आली. त्यानं
काळजीपूर्वक रसद पुरवठा व संपर्क यंत्रणा मजबूत करण्यावर प्रथम भर दिला. त्याचा रसद पुरवठा तोडण्याचा
बाबक ने वारंवार प्रयत्न केला. क्वचित यशही मिळवले. पुढील वर्षी अफशिनच्या सहकारी बुघा अल कबिर ह्यास
परास्त केले. खलिफा अल मुतासिम ह्याने तहाची तयारी असल्याचे कळवण्यास अफशिनला सांगितले. बाबकला
अभयदानही देण्याचे आश्वासन दिले. पण उपयोग झाला नाही. त्याने लढा सुरुच ठेवला. सातत्याने लधत राहून
त्याच्या राज्यकोशावरही ताण पडला असावा. त्यातच त्याचे महत्वाचे शहर बद्द हे ही अफशानच्या हाती लागले. तिथे
बाबकचा पराभव झाला. तो साहेल इब्न सुन्बात ह्या लगतच्या राजाच्या नियंत्रणाखालील प्रदेशात निघून गेला. हा
साहेल इब्न सुन्बात तोच आर्मेनियन राजा होय ज्याने सुरुवातीस बाबकचे साह्य घेउन स्वतःचा आसपासच्या
टापूवरील प्रभाव वाढता ठेवला व खलिफाविरुद्ध उपद्व्याप केले होते. पण इथेच गणित चुकले.
बाबक ला एकेकाळच्या सहकार्‍याने, साहेल इब्न सुन्बातने बंदी बनवले. मोठी रक्कम घेउन अफशान ह्या सरदराच्या ताब्यात दिले."तुला काहीही होउ देणार नाही. फक्त शांती तह करुयात."असे आश्वासन देणार्‍या अफशानने आपल्या मालकाच्या, खलिफाच्या ताब्यात बाबक ला दिले.
बाबकचे हातपाय तोडून हाल हाल करुन मारण्यात आले. त्याची वीसेक वर्षांची कारकीर्द अशी संपुष्टात आली. तो एक दंतकथा बनला.

--मनोबा

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 10:07 am | प्रचेतस

हा भागही माहितीपूर्ण रे पण जरा तोकडा वाटतोय. बाबक्च्या लढायांबाबत अधिक माहिती यायला हवी.
रशिदुन, अब्व्बासी खिलाफतींबद्दलही अधिक माहिती असल्यास दे. रशिदुन बाबत तर बरेचसे माहित आहेच. पण पहिल्या चार खलिफांनंतरचा इतिहास फारसा ज्ञात नाही, नंतर हे खिलाफतीचे केंद्र तुर्कस्तानकडे कसे सरकले वैग्रे.

बापु देवकर's picture

28 Oct 2013 - 3:36 pm | बापु देवकर

अजुन महिती आवडली असती...

बाबकचे हातपाय तोडून हाल हाल करुन मारण्यात आले. त्याची वीसेक वर्षांची कारकीर्द अशी संपुष्टात आली.
मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे कुठल्या इस्लामी आक्रमकाने आपल्या शत्रुला हालहाल करुन ठार न मारता जीवदान देउन सोडुन दिले आहे का ? ह्या कॄतीचे कोणते उदाहरण आहे का ?

उद्दाम's picture

28 Oct 2013 - 11:20 am | उद्दाम

काय करणार ते घेऊन ? शत्रू , आग, कर्ज इ ना शक्य तेंव्हा कायमचे संपवून टाकावे, असे सुवचन आहे.

( राम, कृष्ण, कालीमाता यानीही त्यांच्या शत्रूना असेच ठार मारले आहे. )

यात किमान माझ्यामते तरि श्रीरामाचा अपवाद होता त्याने लढाईच्या अगोदर शत्रुला शरण येउन लढाई टाळण्याचा प्रयत्न केला होता,तसेच युद्ध जिन्कल्या नन्तर सुद्धा त्यानी तिथे राज्य न करता ते विभीषणाच्या स्वाधीन करुन ते अयोध्येला परतले होते.

उद्दाम's picture

28 Oct 2013 - 2:28 pm | उद्दाम

लढाई टाळणे, राज्य दुसर्‍याला देणे या घटना वेगळ्या आहेत.त्या घडल्या हे जरी मान्य केले तरी मूळ मुद्दा आहे, शत्रूला ठार मारले का? त्याचे उत्तर हो असेच येते.

मुसलमानही शत्रू आपल्या धर्मात आला की त्याला माफ करत होते, असे ऐकून आहे.

अनिरुद्ध प's picture

28 Oct 2013 - 2:39 pm | अनिरुद्ध प

टळली असती तर ठार मारण्याचा प्रष्णच कुठे उरतो? पण लढाई करण्याची खुमखुमी ही रावणालाच जास्त होती म्हणुनच त्याने लढाई टाळली नाही,आणि वरती श्री चित्रगुप्त यानी आधीच तुमच्या प्रष्णाचे सुयोग्य उत्तर दिले आहे.

बळंच? खुमखुमी दोन्ही बाजूंना होती. बायको पळवल्यावर युद्ध करणे रामाला जसे भाग पडले तसेच रामाने स्वारी केल्यावर प्रतिकारासाठी युद्ध करणे हे रावणालाही भागच पडले.

अनिरुद्ध प's picture

28 Oct 2013 - 2:59 pm | अनिरुद्ध प

माझ्या वाचनानुसार श्री रामानी स्वारी केली होती हे चुकीचे विधान आहे,श्रीराम हे ससैन्य जरी लन्केला पोचले होते,तरी त्यानी आधी सलोख्याचा प्रयत्न केला होता,तो रावणाने न मानल्यामुळे पुढे युद्धाला सुरवात झाली ती सुद्धा रावणाने स्वताच पहिल्या दिवशी येवुन केली होती.

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 3:18 pm | बॅटमॅन

पाहिले पाहिजे. रामायणाचा संदर्भ दिल्यावर याबद्दल अजून विचार करता येईल.

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 5:07 pm | प्यारे१

गावातला पार मोड ऑन >
अंगदाला पाठवलेला की बे आधी.
त्याला बसायला शीट नाही दिली म्हणून अंगदानं शेपटी मोट्टी करुन गुंडाळी करुन रावणाच्या पण उंच शीट बनवली नि बसला. काय अस्तंय,पाटलाच्या उंच कोन बसू शकत नाय. तरी अंगद बस्ला.
म्हनला बोल! सीतेला सोड उगा भांडान नको असं रामानं सांगिटलंय.
रावन उंच शीट बगून चाट. तरीबी उसनं अवसान आनून म्हनला जा, सोडत नाय सीतेला.
असं झालं.

म्हाभारतात पन किसन्द्येव गेला. कुनाच्या घरी काय खाल्लं नाय. विदुराकडं तेवडा थांबला. दुर्योधनाला म्हन्ला ५ गावाची पाटी लकी दे पाच भावांना. दुर्योधन म्हने जा घरी. सुईवर घावल यवडी पन माती देत नाय. आनि तुलाच डांबून घाल्तो. तवा किसन द्येवानं काय गा चेटूक केलं नि बल्ल्याच केला त्या दुर्योधनाचा. म्हन्ला आज म्हनलास ते म्हनसास, परत म्हनलास तर बोल्नार नाय, करुनच दाकवीन. मोट्ट्या भीष्म पाटलानं माफी मागून येक डाव माफ करा म्हनून मग त्याला सोडला.

> मोड ऑफ.

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 5:13 pm | बॅटमॅन

रैट्ट.

बाकी त्ये उच्च शेपटीवाला किश्शामदि आंगद क हण्मान?

अनिरुद्ध प's picture

28 Oct 2013 - 5:35 pm | अनिरुद्ध प

आंगदच होता नाव नीट आठवना म्हनुन न लिन्याचा शानपना केला,(प्यारे काका मदतीला आले म्हनुन जरा बरं वाटलं)

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 5:39 pm | प्यारे१

अंगद. वालीचा पोरगा.
आदी रावनाला वालीनं दाबला हुता ना! त्याची आटवन करुन द्याची होती रावनाला.
तुला ज्यानं दाबला तेला मी मारलाय आनि तरी त्याच्या पोरालाच हाताशी घेटलाय. तर तुजी काय गत होईल ह्याचा इचार कर असा इषय.

हनुमान गप्प बसायलंय व्हय. त्या अशोकाच्या बागंत राडा घाल घाल घालून शेवटी त्या रावनाच्या पोरानं मोट्टी दंबूक काडली तवा उगा चला आता रावनाला भेटू म्हनून गेला की हा. ततं तुजी शेपटीच जाळतो म्हनून रावनानं पेटवली. आनि आक्खी लंका की वो जळाली.

बर, त्ये मनोबा कावंल. इषय काय हुता नि हितं काय सुरु झालंय म्हनून. ;)

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 6:12 pm | प्रचेतस

हाच रे बघ तो अंगद. =))

a

उद्दाम's picture

29 Oct 2013 - 1:24 pm | उद्दाम

वाडवडिलार्जित अयोध्या इतकी मोठी असताना तिकडे कोपर्‍यात लंकेत रामभाउ कशाला हो बसतील ? म्हणून ते राज्य बिभीषणाला देऊन ते परत आले.

शिवाय, वालीला मारलं की सुग्रीवाला राज्य द्यायचं ही त्यांची मांडवली आधीच ठरली होती. तशीच मांडवली रावण मेला की बिभीषण राजा , अशी त्याही दोघात ठरली असेल्च की. त्यामुळं राज्य परत दिलं यात नवल नाही.

राज्याचा मोह नसता तर मग नंतर अश्वमेध कशाला घातला? घोड्याला गवत मिळावे म्हणून की काय?

राम युपी तून आला तर विजिगिषू राम पराक्रम गाजवत आला, असे वर्णन असते.

आणि मुसलमान कोणत्याही देशात आक्रमण करत गेले, असे ऐतिहासिक वर्णन असले की क्रूरकर्मा टोळी आक्रमण करत गेली, असे वर्णन असते.

असा 'बायस' असू नये इतकेच आमचे मत.

उद्दाम's picture

28 Oct 2013 - 12:04 pm | उद्दाम

त्यानी तर हातपाय तोडले हो! पण शंकराने तर मदनाला डायरेक्ट जाळूनच टाकले होते ना? :)

पण शंकराने तर मदनाला डायरेक्ट जाळूनच टाकले होते ना?
ते लढाईत नाही. मदन शंकराला लगीन कर असा सल्ला देत होता म्हणून.
लक्ष्मणाने तर शूर्पणखेने प्रपोज केले म्हणून तीचे नाक कान कापून पाठवून दिले होते. रावणाने त्याचा राग म्हणून रामाची बाईल पळवून नेली. लक्ष्मणाची बाईल तिथे नव्हती म्हणूण शूर्पणखेला वाटले की तो मोस्ट इलीजीबल ब्याचलर आहे. तीचे काय चुकले. तरी बरं रावणाने कुठल्या बाईचे नाक कान कापले नाहीत. तो तेवढा सुसंकृत होता. कपडे वगैरे घालायचा. उगं रामासारखा हातात धनुश्य घेवून झाडाचे कपडे घालून पंक फ्याशन करत फिरत नव्हता.

लक्ष्मण येडाच म्हटला पाहिजे. नाहीतर महाभारतात हिडिंबेने भीमाला प्रपोज केल्यावर तो जरी बावचळला तरी वनवासात कुंती सोबत असल्याने तिने योग्य तो सल्ला दिल्याने बरे झाले. "आपणहून आलेल्या स्त्रीचा अव्हेर करू नये" इ.इ. आता यामागे राजकीय विचार नक्कीच होता. त्याशिवाय का घटोत्कच नंतर उपयोगी ठरला? शिवाय, कुणा स्त्रीला आकर्षिणे तुमसे ना हो पायेगा त्यामुळे ही आलीच्चे तर होऊन जाऊदे असाही रिअलिस्टिक विचार असेल =)) अर्जुनाची केस वेगळी. तो डूड होता. धनुष्यबाण म्हटले की कसे कूल एलेगंट वगैरे वाटते. गदाबिदा इज सोऽ ग्रॉस यू नो! ऑल दॅट ब्लड यू सी. यक्क! वगैरे वगैरे.

असा सल्ला देणारी आई तिथे नसल्याने बथ्थड लक्ष्मणाने शूर्पनखेचे नाक कापले. बिच्चारी शूर्पनखा.

मदन शंकराला लगीन कर असा सल्ला देत होता म्हणून.

आँ....मदनाने पुष्पबाण सोडून शंकराचे ध्यान मोडले असेच आम्ही ऐकत होतो. ;)

लक्ष्मणाने तर शूर्पणखेने प्रपोज केले म्हणून तीचे नाक कान कापून पाठवून दिले होते, तीचे काय चुकले

काय राव विजुभौ. रामायण जरा नीट वाचा की.

सा रामं पर्णशालायां उपविष्टं परंतपम् ।
सीतया सह दुर्धर्षं अब्रवीत् काममोहिता ||

एनां विरूपामसतीं करालां निर्णतोदरीम् ।
वृद्धां भार्यामवष्टभ्य मां न त्वं बहु मन्यसे ॥

अद्येमां भक्षयिष्यामि पश्यतस्तव मानुषीम् ।
त्वया सह चरिष्यामि निस्सपत्ना् यथासुखम् ॥

इत्युक्त्वा मृगशावाक्षीं अलातसदृशेक्षणा ।
अभ्यधावत् सुसङ्क्रुद्धा महोल्का रोहिणीमिव ॥

तां मृत्युपाशप्रतिं आमापतन्तीं महाबलः ।
निगृह्य रामः कुपितः ततो लक्ष्मणमब्रवीत् ॥

क्रूरैरनार्यैः सौमित्रे परिहासः कथञ्चन ।
न कार्यः पश्य वैदेहीं कथञ्चित् सौम्य जीवतीम् ॥

इमां विरूपामसतीं अतिमत्तां महोदरीम् ।
राक्षसीं पुरुषव्याघ्र विरूपयितुमर्हसि ॥

इत्युक्तो लक्ष्मणस्तस्याः क्रुद्धो रामस्य पार्श्वतः ।
उद्धृरत्य खड्गं चिच्छेद कर्णनासे महाबलः ॥

ती काममोहिता पर्णशालेत सीतेसह बसलेल्या शत्रुसंतापी दुर्जय वीर श्रीरामचंद्रांच्या जवळ परत आली आणि म्हणाली
रामा, तू या कुरूप, तुच्छ, विकृत, खपाटीस गेलेल्या पोटाच्या आणि वृद्धेचा आश्रय घेऊन माझा विशेष आदर करीत नाहीस.
म्हणून आज तू पहात असतानाच मी या मानुषीला खाऊन टाकीन आणि या हिच्या नाहीसे होण्यानंतर मी तुझ्याबरोबर, सुखपूर्वक विचरण करीन.
असे म्हणून फुललेल्या निखार्‍यांप्रमाणे नेत्र असलेली शूर्पणखा अत्यंत क्रोधाने भडकून मृगनयनी सीतेकडे झेपावली, जणु काही कुणी फार मोठी उल्का रोहिणी नामक तारकेवर तुटून पडत आहे.
महाबली श्रीरामांनी मृत्युच्या पाशाप्रमाणे येणार्‍या त्या राक्षसीला हुंकाराने रोखून कुपित होऊन लक्ष्मणास म्हटले
हे सौमित्रा, क्रूर कर्मे करणार्‍या अनार्यांशी कुठल्याही प्रकारचा परिहास ही करता कामा नये. या समयी सीतेचे प्राण कुठल्याही प्रकारे फार मुष्किलीने वाचले आहेत.
तू या कुरूप, कुलटा, अत्यंत उन्मत्त आणि मोठे पोट असणार्‍या राक्षसीला कुरूप करणे आवश्यक आहे.
श्रीरामानेया प्रकारे आदेश दिल्यावर क्रोधाने संतप्त झालेल्या लक्ष्मणाने ते पहात असतांनाच म्यानातून तलवार उपसली आणि शूर्पणखाचे नाक- कान कापून टाकले.

मूळ संहिता वाचली पाहिजे नीट एकदा. या मिशनची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद वल्ली!!!

चित्रगुप्त's picture

28 Oct 2013 - 11:38 am | चित्रगुप्त

शत्रू , आग, कर्ज इ ना शक्य तेंव्हा कायमचे संपवून टाकावे

कारण तुम्ही त्यांना संपवले नाही, तर ते तुम्हाला संपवतील, त्यापेक्षा तुम्हीच आधी संपवा.
कृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले ?

शत्रुशेषमृणशेषं शेषमग्नेश्च भूनृप | पुनर्वर्धेत संभूय तस्माच्छेषं न शेषयेत् ||

मूळ सोर्स मात्र विसरलो. गीतेत नाही बहुतेककरून. पण महाभारतातच अन्यत्र कुठेतरी आहे आय गेस.

गजानन५९'s picture

28 Oct 2013 - 3:21 pm | गजानन५९

मुळ लेख आणि लेखाच्या उद्देशापासून चर्चा भरकटत आहे असे वाटत आहे.
:(

आता पुन्हा राम – कृष्णावर चर्चा होणार,
काही जन म्हणणार राम होता,
तर काहीजण त्याला अफवा ठरवणार,
मग पुराव्यांची मागणी होणार,
मग ते दिले जाणार,
मग काही जन ते ग्राह्य धरणार नाहीत,
दोन कटू वाक्य हिकडून जाणार
दोन कटू वक्ये तिकडून येणार
चर्चा आणि वाद आहे तिथेच राहणार

काय रे देवा... :)

अनिरुद्ध प's picture

28 Oct 2013 - 4:40 pm | अनिरुद्ध प

म्हणणे सर्वथैव योग्यच आहे,पण आपण जर आधीचे काही धागे वाचले असतील तर आपल्याला समजले असेल की ट्रोलिन्ग्ची सुरुवात कोण करत आहे ते,बाकी लेख उत्तम पण जरा त्रोटक वाटला.

इतिहास हा आवडता विषय असल्याने अधाशासारखे वाचून काढले दोन्हीही लेख, बरीच नवीन माहिती मिळाली तुमच्यामुळे.

कपिलमुनी's picture

28 Oct 2013 - 3:55 pm | कपिलमुनी

आवडला ..

प्रसाद गोडबोले's picture

28 Oct 2013 - 5:35 pm | प्रसाद गोडबोले

पण शिवाजी महाराज म्हणता येणार नाही .( हे कोणत्याही अभिनिवेशाने म्हणुत नाहीये )

राजा मेल्यावर , विस्कळीत निर्नायकी सैन्य तब्बल २७ वर्ष लढा देतं आणि आलमगीर म्हणवणार्‍याला धुळीत मिळवतं असं उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेही नाही !!

येस्स! राणाप्रतापच म्हणता येईल. शिवाजी म्हणायचे असेल तर राजराजा चोऴ, शेरशहा, इ. मंडळींनाच तुलले पाहिजे-नुसते पराक्रम पाहिले तर अर्थात.

बाकी जगाच्या पाठीवर आजपर्यंत ते तसं उदाहरण कुठेच नाही. एक नाही म्हणायला ग्रीको-पर्शियन युद्धे त्या तोडीची आहेत खरी-उदा. मॅराथॉनची लढाई, ३०० वाली थर्मोपिलीची लढाई, प्लाटेआची लढाई आणि सालामिस बेटाजवळची तुंबळ आरमारी लढाई. पण मुघल-मराठा संघर्षातली काही परिमाणे उदा. शत्रूचे आपल्याच प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य असणे, चेन ऑफ कमांड फार गंडायच्या बेतात असूनही नीट म्यानेज करणे, ही ग्रीकोपर्शियन युद्धांपेक्षाही सरस ठरतात. तितके जबरी उदाहरण कुठेच दिसत नाही.

आमच्या गौतमीपुत्राला विसरलास काय बे.
नाशिकच्या गोवर्धन पर्वतानजीकची लढाई. १५ दिवसांत नहपानाचा स्मूळ वंशविच्छेद. त्यानंतर लगेचच अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इत्यादी प्रांतांवर ताबा.

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 6:26 pm | बॅटमॅन

पण हा सामना किती विषम होता? ही अचीव्हमेंट महान आहेच-पण राष्ट्रकूट राजांचे पराक्रम यापेक्षा भारी आहेत की. उत्तरेला यूपी, पूर्वेला बंगाल तर दक्षिणेला पार रामेश्वरम पर्यंत मारामार्‍या केल्या यांनी. मुद्दा तसा नाहीये रे. गौतमीपुत्रासारखे दणदणीत विजय तसे इतरही लोकांनी मिळवलेत. पण मुघल-मराठे तोडीचा सामना दिसत नाही इथे. नहपान आणि सातकर्णी यांच्या सैन्यबळातही फार फरक नसावा. म्हणून म्हणतोय. नाहीतर तू म्हणतोस तशी चिकार उदाहरणे देता येतील.

-राष्ट्रकूटांचे यूपी-रामेश्वरम-बंगालादि ठिकाणचे पराक्रम.
-चोऴ राजांच्या कोल्हापूर, बंगाल आणि इंडोनेशिया वरच्या स्वार्‍या.
-मलिक काफूरचे दिल्लीहून पार मदुरैपर्यंत विजय मिळवीत जाणे.
-समुद्रगुप्ताच्या अख्ख्या उत्तर भारतभरच्या खतरनाक क्यांपेन्स.

ही झाली शत्रूच्या प्रदेशात जाऊन मारामारी करून तो प्रदेश स्वतःच्या राज्याला जोडण्याची उदाहरणे. परकीय आक्रमकांना थोपवण्याचीही मोप उदाहरणे आहेत पण ते इथे अवांतर ठरेल.

हा सामना किती विषम होता याची नेमकी कल्पना नै. पण सातवाहनांचे राज्य फक्त पैठण आणि त्या खालच्या थोड्याफार दक्षिणी प्रदेशाइतकेच मर्यादित झाले होते. तर नहपान मात्र क्षत्रपाचा महाक्षत्रप झालेला होता. गौतमीपुत्राने तयारीत बरीच वर्ष घालवली आणि एकदाचा रेटून हल्ला चढवला.

बाकी मुघल-मराठे तोडीचा प्रश्नच नै. युगपुरुषच तो.

येस्स! ते खरेय. त्या बाबतीत तुलना करायची तर नंतरच्या गुर्जर-प्रतिहारांशी किंवा राष्ट्रकूटांशी काही प्रमाणात करता यावी.

बाकी मूळ मुद्द्याला सुसंगत असे अजून एक उदाहरण आठवले मॉडर्न काळातले- व्हिएतनाम युद्धाचे. तोपण एकदम जबर्‍या एपिसोड आहे. इस्राएलची सगळी युद्धेही तशीच-विशेषतः स्थापनेपासून १९७० पर्यंतची तरी किमान.

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 5:45 pm | प्यारे१

मला वाटतं शाळेत मराठीच्या पुस्तकात कुरुंदकरांचा धडा होता ह्याबाबत.
शिवाजी महाराज इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे म्हणून.

दहावी किंवा नववीला होता. नक्की आठवेना.

पैसा's picture

28 Oct 2013 - 11:44 pm | पैसा

माहितीपूर्ण भाग आवडला. विश्वासघात, हाल करून मारणे इ. प्रकार मध्ययुगीन काळात इस्लामने जेवढे केले तेवढे इतिहासात नोंदले गेले आहेतच. त्यासाठी स्पेशल डिस्क्लेमरची गरज नव्हती. (मनोबाने त्याच्या आधीच्या "आपण असे का वागतो" या धाग्याची सिद्धता इथे दिली आहे! ;))

कुतुहल म्हणून विचारते. या बाबकच्या लढ्याची नोंद आजच्या इराणच्या इतिहासात आहे/असेल का? की गोव्याच्या इतिहासातून छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांचे अस्तित्व पुसण्याचे पद्धतशीर प्रयत्न पोर्तुगीजांनी केले तसेच इथेही झाले?

बाबकला शिवाजी महाराज तर म्हणता येणार नाही, पण राणा प्रताप नक्कीच म्हणता येईल. ध्रुवतारा आणि उल्का यातला फरक आहे तो.

मन१'s picture

29 Oct 2013 - 7:23 am | मन१

सर्व प्रतिसादकांचे, वाचकांचे,वाचनमात्रांचेही आभार.
@प्यारे:- ष्ट्यालित लिहिलेले प्रतिसाद अवांतर आहेत खरे. पण भन्नाट आहेत. योगप्रभूंच्या भन्नाट प्रतिसादांची आठवण झाली. त्यातून अस्सल ग्रामीण बाज जाणवला. उगीच "गावातल्या लोकांसारखं बोलायचा प्रयत्न" असं वाटलं नाही.
.
http://www.misalpav.com/node/21332 हा तो धागा.
आणि इथेच योगप्रभूंचा प्रतिसाद डकवतोय.
.
.
भीम गदायुद्धात दुर्योधनापेक्षा कमी दर्जाचा होता. त्याची सगळी दांडगाई ही त्याच्या शारीरिक बळावर आणि धिप्पाडपणावर होती. दोघेही एकाच गुरुकडे म्हणजे बलरामांकडे उच्च पातळीचे गदायुद्ध शिकले आणि त्यात नैपुण्य संपादन केलेला दुर्योधन हा बलरामांचा लाडका शिष्य होता. त्यांची अखेरची लढाईही गुरु बलरामांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी भीमाला दुर्योधन आटपेनासा झाल्यावर श्रीकृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार करण्याचा इशारा केला. गदायुद्धात कमरेच्या खाली प्रहार करायचा नसतो. त्यामुळे बलराम प्रचंड संतापला आणि त्याचे नेहमी खांद्यावर असलेले नांगर हे शस्त्र उगारुन भीमावर चालून गेला.

(सुसंस्कृत भाषेत जास्त वेळ बोलणे जड पडत असल्याने पुढील वर्णन लोकभाषेत)

...मंग चिडलेला बळीराम भीम्याला म्हनला, 'भाड्या! येवड्यासाटीच शिकिवलं का रं तुला? नियम मोडून ख्येळतोस व्हय रं नामर्दा? दम ह्यो नांगरच घालतु तुज्या टकुर्‍यात.' तसा भीम घाबरला. बळीभाऊचा नांगर पडला असता तर भीम्या काय जित्ता वाचत नव्हता. मंग त्यानं आधारासाटी किसनदेवाकडं बघिटलं. किसनद्येवाला पयल्यापासून पांडवांचा लय पुळका. तवा त्यो फुडं झाला आन् भावाची समजूत काडली,का 'दादा! जौं दे. ह्ये कौरव पांडवांच्यातलं भांडान हाय. आपन यादव हावोत. आपन कशाला पडायचं लफड्यात? माज्याकडं बगा. येवडं युद्ध झालं, पर म्या लडलो का? रथ चालविला, उपदेश केला, शंख वाजिवला पन हत्यार न्हाय उगारलं. तुमी तरी डोक्याला कशाला हेडेक करुन घेताव? मरु दे दोगंबी. तुमी आपलं तुमची घोषयात्रा कम्प्लिट करायचं बगा.' आसं काईबाई सांगून भोळ्याभाबड्या बळीभाऊला साफ गुंडाळलं किसनद्येवानं.

प्यारे१'s picture

29 Oct 2013 - 1:22 pm | प्यारे१

योगप्रभू

__/\__.

थॅन्क्स मनोबा.