विकासाची भारतीय संकल्पना-३

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
10 Oct 2013 - 3:20 pm
गाभा: 

थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे !
अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम !
धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो. याचा सरल सरळ अर्थ असा की, संयमित अथवा प्रमाणित उपभोग माणसाला सुखापर्यंत नेऊ शकतो !
ही सुखे प्रामाणित करण्यसाठी चार आश्रमांची मांड्णी करुन एकात्म सुख मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य करु शकतो , नव्हे असे मिळवता येते हे भारतीय संस्कॄतीने सिद्ध केले आहे. या प्रमाणीकरणाला पुरुषार्थाची जोड दिली आहे म्हणजे रस्ता ( आश्रम ) आणि गंतव्य ( पुरुषार्थ ) दोन्हीही सांगितले आहेत. मोक्ष हे नरदेहाचे अंतिम गंतव्य आहे आणि जन्म ते मृत्यु या सार्या प्रवासात सारे लक्ष्य तिकडेच असले पाहीजे, म्हणजे प्रत्येक कर्म हे त्याच्याच अनुसंधानात असले पाहीजे.
धर्म या पुरुषार्थाच्या मर्यादेत अर्थ आणि काम या पुरुषर्थाची आखणी केली आहे. आयुष्याचा जीवन प्रवाह हा धर्माचे तीर सांभाळून अर्थ आणि काम पुरुषार्थांने प्रवाहित केले पाहिजेत , म्हणजे मोक्षाप्रत जाता येते !
अर्थ आणि काम हा पुरुषार्थ फक्त गॄहस्थाश्रमातच असल्याने आपोआपच उपभोग मर्यादित झाला. धर्माचे बंधन ही आपोआप प्राप्त झाले. वान्प्रस्थ आणि संन्यासाश्रमात समाजोपयोगी ( आत्मन मोक्षार्थ जगद हितायच ) व मोक्षाप्रत नेणारीच कामे करायची आहेत.
या चार पुरुषार्थ आणि चार आश्रमांच्या रचनेमुळे , राष्ट्राचे सर्वात शेवटचे एक़क - मनुष्य हा सुखी होऊ शकला. अशा सुखी लोकांचा समूह म्हणजेच सुखी समाज !
याचाच व्यत्यास असा की केवळ शरिर उपभोगाच्या सुख - सुविधा उपलब्ध करुन आणि भौतिक गोष्टी निर्माण करुन सुखी होता येणे अवघड आहे. त्यामुळे मनुष्य केवळ अर्थ आणि कामाचा अतिरेक करुन दु:खीच होईल !

यापुढे जाऊन भारतीय दार्शनिक समाजाच्या पुरुषार्थाच्याही संकल्पना मांडल्या आहेत.
( क्रमशः)

प्रतिक्रिया

अजिबात नाही...

लालू आणि बापू दोघेही जनतेच्या पैशांनी मस्त आराम करत आहेत...

मला एक सांगा, मोक्ष हेच ध्येय का असलं पाहिजे? मी शंका म्हणून विचारते आहे. वादासाठी नव्हे.

विटेकर's picture

15 Oct 2013 - 6:18 pm | विटेकर

मोक्ष हेच ध्येय का असलं पाहिजे?

प्रत्येक मनुष्याचे जीवनध्येय हे सुख मिळव्णे हेच असते.( अन्य जाणिवा पुरेश्या विकसित झाले नसल्याने प्राणि सुद्धा शारिरिक सुखासाठीच धडपडत असतात !)आणि आपल्या पूर्वसूरिनी जन्म- मृत्युच्या पल्याड जाणे हे परम सुखाचे आहे हे शोधून काढले आहे.. हाच तो मोक्ष , जिथले सुख अविनाशी, चिरस्थायी आणि पूर्ण आहे. म्हणून तिथे जाणे हीच परमावधी !
समजा , तुम्हाला एकदम वाईट्ट स्वप्न पडले , तुम्ही स्वप्नात असेपर्यंत तुम्ही अगदी अस्वस्थ, दु:खी असता! जागे झाल्यावर तुम्हाला हायसे वाटते ! किंवा, तुम्ही अगदी रंगून जाऊन सिनेमा / नाअटक पहात असता, नायकाच्या जागी स्व तः ला पाहात असतो त्याची दु: खे आप्ली असतात ,सिनेमा संपल्यावर मात्र आपण भानावर येता आणि मनाशी म्हणता , हट, ये तो सब झूट है !
एकदा ज्ञान झाल्यावर हे सारे जग ही एक नाटक शाळाच आहे आणि आपण वेगे वेगळ्या भूमिका करत आहोत हे ध्याणात येते. नाट़कात जसे भूमिका करताना नटाला पूर्ण जाणीव असते की ही भूमिका म्हणजे मी नव्हे , मी कुणीतरी वेगळा आहे ! तद्वत ज्ञानी माणसे आपली भूमिका या जगात जगत असतात. त्यात कसले सुख आणि दु: ख !
हे ज्ञान होण म्हणजेच मो़क्ष !
समर्थांच्या काळी सिनेमा नव्हता , म्हणून त्यानी चित्रांची उप्मा दिली आहे !

उडन खटोला's picture

30 Jan 2014 - 4:29 pm | उडन खटोला

ग्रेट