फार दिवसांपासून हा विषय मनात घोळत होता , खरेतर १५ तारखेच्या दरम्यान च लिहिणार होतो पण मुहूर्त लागला नाही.
गेल्या दोन वर्षांत भारतीय राजकारणामध्ये मोदी नावाच्या नव्या आशावादाचा जन्म झाला आहे आणि " विकासपुरुष" असा श्री . मोदी यांचा उल्लेख होत असतो आणि तो रास्त ही आहे.
या निमित्ताने " विकास" म्हणजे नेमके काय याचा थोडा विचार करावा म्हणून हा लेखन प्रपंच !
मध्ययुगाच्या शेवटी शेवटी युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि विकास या शब्दाचे परिमाण बदलले. माणसाने दैवजात तैल बुद्धी वापरून माणसाच्या सुख- सुविधांसाठी नव-नवीन शोध लावले , आणिअधिकाधिक सुख मिळवण्याचा मार्ग स्वीकारला. अगोदर या सार्या साठी त्याने प्राण्यांची मदत घेतली ( घोडा / बैल / याक ) आणि मग यंत्रांची !
घोडागाडीच्या ऐवजी अगोदर वाफेच्या इंजिनावर चालणारी आणि नंतर डि़झेल्वर चालणारी गाडी आली, हातमाग जाऊन त्याऐवजी यंत्र्माग आले. यांत्र्क शेती ही आली , थोडक्यात औद्यगिकरणाने माणसाचे आयुष्य सुखकर झाले. शारिरिक कष्ट कमी झाले आणि मानवाचा विकास होऊ लागला असे ढोबळ्पणाने म्हणावे लागते. म्हणजे सुख आणि विकास यांचा प्रत्यक्ष संबंध आहे हे स्पष्ट्च आहे.
माणसाची जगण्याची मूलभूत प्रेरणा " सुख " आहे आणि अधिकाधिक सुख मिळवणे , त्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे आणि सुख मिळवणे याच साठी मनुष्य जगत असतो. आणि मनुष्यच नव्हे तर आखिल प्रणिमात्र हे सुखासाठीच धडपडत असतात.
सुख म्हणजे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती ! गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली , गुलाब्जाम मिळाले सुख ! तहान लागली थंड्गार पाणी मिळाले सुख ! झोप आली , आरामदायी शय्येवर सुरेख झोप मिळाली , सु़ख ! थोडक्यात-
आपल्या मनातील इच्छांची पूर्ती पुन्हा पुन्हा होत राहणे म्हणजे पुन्हा पुन्हा सुख !
अधिकाधिक इच्छांची पूर्ती म्हणजे अधिकाधिक सुख !
मनातील इच्छांची पूर्ती
सुख = -------------------
मनातील एकूण इच्छा
इतकी सुखाची साधी सोपी सरळ व्याख्या निर्माण झाली, पण सुखाची साधने मर्यादित होती आणि त्यामानाने इच्छुक मात्र उदंड अशी स्थिती निर्माण झाली. मग मनुष्य अधिकाधिक सुखासाठी अधिकाधिक उपभोगाची साधने निर्माण करु लागला / खरेदी करु लागला आणि अश्या प्रकारच्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी अधिकाधिक धनसंचय करु लागला आणि धन संचय म्हणजे सुख असा काहींसा समज दृढ झाला. आणि या पैश्याच्या हव्यासासाठी सुखाच्या मागे धावणारा माणूस प्रत्यक्षात मात्र दु:खी झाला !
आणि ही साधने मर्यादीत न रहावीत म्हणून औद्योगिक क्रांती द्वारे अधिकाधिक उत्पाद्न सुरु झाले. अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी बाजारपेठ अशी चक्राकार गती सुरु झाली.
आणि अश्या प्रकारची विकसित बाजार पेठ निर्माण करणे, त्यामध्ये खर्च करु शकेल असा वर्ग निर्माण करणे आणि सतत पोकळी निर्माण करून त्यात भर टाकत राहणे यालाच "विकास " असे म्हंटले गेले !
दुर्दैवाने पाश्चिमात्य जगातील हीच विकासाची व्याख्या भारतीयांनी स्वाकारली आणि अक्षय सुखाचा ठेवा देणारी सर्वंकष भारतीय जीवन शैली नाकारली.
मनातील इच्छांची पूर्ती
सुख = -------------------
मनातील एकूण इच्छा
हे समिकरण प्राचीन भारतीयांना माहीत नव्हते काय ? त्याशिवाय चार्वाकांसारखे दार्शनिक ही होते. ययाती सारखी ओर्बाडून सुख घेऊ पाह्णारे ही होते , पण भारतीय तत्ववेत्त्यानी सधा विचार केला , हा भागाकार पूर्ण १ यायचा असेल तर " छेद " कमी केला पाहीजे ! इच्छा कमी केल्या की आपोआपाच भागाकार १ कडे जाईल.
पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील !
आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !
( क्रमशः)
प्रतिक्रिया
23 Aug 2013 - 4:09 pm | पुष्कर जोशी
वाचतोय .. उत्तम मालिका येउद्या ....
संदर्भासाठी : दिलीप कुलकर्णीना वाचू शकता
23 Aug 2013 - 4:09 pm | पुष्कर जोशी
वाचतोय .. उत्तम मालिका येउद्या ....
संदर्भासाठी : दिलीप कुलकर्णीना वाचू शकता
23 Aug 2013 - 11:32 pm | पैसा
भारतीय दृष्टीकोनातून विवेचन नव्या प्रकारचे वाटले. आणखी येऊ द्या. यावर खरे तर उत्तम चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
24 Aug 2013 - 12:44 am | अर्धवटराव
"मनुष्य प्राण्याच्या" सुखासंदर्भात हे विवेचन पटलं... पण "मानवाच्या" सुखशोधनाचा कक्षा इतक्या लिमीटेड नाहित. त्यात कला येते, ज्ञान येतं, सामाजीक ऋणानुबंध येतात, स्वातंत्र्याचा अनुभव येतं व कर्तुत्वाचा अभिमान देखील येतो. या सर्व घटकांना आधुनीक/पाश्चात्य जीवन शैलीत बरच वरचं स्थान आहे. या जीवनशैलीला पोषक असा राज्यकारभार पाश्चिमात्य जगात डेव्हलप झाला. हि गोष्ट भारतीयत्वाचा अभिमान बाळगणार्यांनी देखील ओळखली, अॅप्रिशिएट केली (स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर). तेंव्हा, भारताने पाश्चिमात्य विकासाचे मॉडेल वापरुन आपला घात केला हे पूर्णपणे खरं नव्हे... स्विकारण्याच्या बाबतीत आपण थोडा सावधपणा, चोखंदळपणा दाखवायला हवा हे मात्र नक्की. अजुनही भारताकडे जगाला देण्यालायक भरपूर आहे व जगापासुन शिकण्यासारखं देखील...
अर्धवटराव
24 Aug 2013 - 1:03 am | धन्या
लेख आवडला. पुढील भाग लवकरच लिहा.
24 Aug 2013 - 1:13 am | किसन शिंदे
+१
पुढचा भाग येऊ द्या लवकर
24 Aug 2013 - 2:20 pm | अनिरुद्ध प
पु भा प्र
24 Aug 2013 - 3:47 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
25 Aug 2013 - 12:38 pm | बजरन्ग
लेख आवडला... !
27 Aug 2013 - 12:55 pm | विटेकर
लिहायला थोडा वेळ लागेल...
प्रवासात आहे , २-३ दिवसात लिहिन. सर्वांच्या प्रतिसादामुळे हुरुप वाढला आहे.
फूड बिलाच्या पार्श्वभूमीवर तर हे लिहायलाच हवे.